उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
शुद्धलेखन चिकित्सा
गुंडोपंत
November 7, 2007 - 3:13 am
शुद्धलेखन व स्वयंसुधारणा
शुद्धलेखन सहाय्य सहजतेने उपलब्ध असेल तर नक्कीच वापरले जाते असे मला वाटते.
गमभन चे शुद्धलेखन मोड्युल(?) आता तयार होते आहे. मी ते अधून मधून वापरून पाहत असतो. मला ते बरे वाटते आहे. अजून परिपूर्ण नाही पण काम भागेल असे होत आहे.
ते मोड्युल आता येथे जोडता येणार नाही का?
शिवाय शब्द सुचवणी मदतनीस हवेत अशी कायमची जाहिरातही त्यांना त्या योगे येथे करता येईल.
ओंकार, नीलकांत व इतर जाणकार मंडळींना काय वाटते या विषयी?
त्यात स्वयंसुधारणा नसली तरी शुद्धी चिकित्सक हाताशी असण्याने आमच्यासारख्या लोकांच्या लेखनाची पातळी* बरीच वाढेल असा माझा दावा आहे.
आपल्याला काय वाटते?
आपला
अशुद्धलेखित
गुंडोपंत
(गुंडोपंतांच्या लेखनातल्या माहीतीची पातळी ही दारिद्र्य रेषेशी निगडीत असते असे काही जण म्हणतात... ती येथे अभिप्रेत नाही बरं का! ;)) )
दुवे:
Comments
ते बनवतायेत का?
फायरफॉक्स मध्ये प्लगिन कुणी बनवते आहे का?
म्हणजे थोडक्यात या कंपन्यांनी दिल्याशिवाय ते आपण वापरायचे नाही असे?
मला कळलंच नाही काही...
त्यांनी का बनवायचा हे शुचि चे प्लग इन?
टंकलेखन सुविधा आणि शुद्धिचिकीत्सक सुविधा ह्या सर्व संकेतस्थळांना सारख्याच उपलब्ध असाव्यात असे मी मानतो.
मलाही मान्य आहे... पण कसे घडावे हो हे?
आपला
गुंडोपंत
दूषित लिखाण?
मला स्वतःला शुद्धलेखन चिकित्सेची काहीही गरज नाही. मी करतो ते लेखन इतरांना दूषित वाटले, तर वाटो. त्यांनी वाचू नये.
शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या काही किरकोळ चुका असलेले लिखाण दोषग्रस्त असले तरी दूषित नसते. तसे लिखाण अनुकरणीय नसले तरी वाचनीय असू शकते. श्री. सर्किट यांनी हे ध्यानात घेऊन मनसोक्त लिखाण करावे. आमच्यासारखे अनेक ते आवर्जून वाचतील.
अमेरिकेसारख्या स्पेलिंगबदलू देशात प्रेमपत्रातदेखील केलेले चुकीचे लिखाण पसंत पडत नाही हे श्री. धनंजयांनी लिहिलेले आठवते आहे.-----वाचक्नवी
हं
ही शु.चि. बर्याचदा चालत नाही. तसेच ती १००% शुद्ध (बरोबर) असेल हे मला माहीत नाही कारण मला तितकेसे शुद्धलेखन येते नाही.
म्हणजे सुधारणेला विरोध नाही पण आहे ते काय वाईट नाही आहे.
भिती वाटते की इतके करुन चुका झाल्या तर शुद्धलेखन पोलीस अजुन त्वेषाने तुटून पडतील आमच्यावर की "*@#$% एवढा शु.चि. असून चुका करतोस" अमुक तमुक ब्राउजर मधे आधी अमुक दाबुन, तमुक करुन शु.चि. वापरले तरच शुद्ध होते इतके साधे कळत नाही *@#$%, तुम्ही लोक म्हणजे आमच्या डोळ्यांवर, अस्मितेवर, जाज्वल्य अमुक तमुकवर उघड उघड *@#$% करत आहात....
सुधारणेला विरोध
सुधारणेला विरोध म्हातारी माणसं करतात, कारण त्यांचे बदलण्याचं-सुधारण्याचं वय निघून गेलेलं असतं. तुमचं वाक्य, म्हातारी होऊ लागलेली माणसं म्हणतात म्हणजे मनातून त्यांना बदलणं जमत नसतं पण आपण म्हातारे झालोय असं त्यांना दाखवायचं नसतं. - ह. घ्या.
विशेष सूचना: म्हातारपण वयाने येते असे अस्मादिकांना म्हणायचे नाही.
- राजीव.
कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की....
शुद्धी शब्दात 'द्धी'तला इकार दीर्घ आहे. परंतु शुद्धिचिकित्सकातले द्धि (चि आणि कि) र्हस्व. विधि महाविद्यालय, कृषि संजीवनी प्रमाणे. अगदी शुद्धि चिकित्सक हे दोन शब्द लांब लांब लिहिले तरी! गमभन चा शुद्धि चिकित्सक अगदी सुरुवातीपासून घोषणा करीत वापरणार्या अनुबाईंना(ई वर अनुस्वार देता येत नाही त्याबद्दल बाईंनी आणि शुद्धिचिकित्सकांनी माफ करावे.) हे मी फार पूर्वी सांगितले होते.
निगडीत आणि निगडित या शब्दांच्या अर्थांमध्ये फरक आहे हे यास्मिन शेख यांच्या शुद्धलेखनावरील पुस्तकावर मनोगतावर प्रकाशित झालेल्या परीक्षणलेखावरील प्रतिसादांत आले आहे. ते श्री. रा.रा.गुंडोपंतांनी बहुधा वाचले नसावे. होते असे कधीकधी!
जाताजाता...मनोगतावर शुद्धिचिकित्सक आपल्याला नको असले तरी काम करतो. तो चुकीचे शब्द टंकूच देत नाही. उदाहरणार्थ , 'शुध्द' हा चुकीचा शब्द तिथे उमटवून पाहावे. --वाचक्नवी
होय
पण ती सहीतली इमेज असल्याने ती बदलून नवी टाकायचा कंटाळा केला. आता घेतेच मनावर.
आभार. (यालाच 'दिव्याखाली अंधार' का कायसेसे म्हणत असावेत!!)
स्वाक्षरीची दुरुस्ती चालू आहे.
बदलूनच टाकली.
का चावताय?
अहो वाचक्नवीराव/बाई,
का चावताय मला?
मी म्हणतोय ना स्वतःच की , माझे लेखन काही धड नाही...
माझे लेखन हे एखाद्या बेवड्यासारखे वेडेवाकडे आहे म्हणूनच तर 'शुद्धीचा उतारा' मागतोय ना? ;)
मग मेलेल्याला अजून का मारताय?
'शुध्द' हा चुकीचा शब्द तिथे उमटवून पाहावे.
'शुध्द' शब्द चुकीचा आहे?
मग 'शुद्ध' कसे लिहितात बॉ?
हे नवीनच कळले मला तरी...
बाकी ई वर अनुस्वास मिसळून जाणे वगैरे त्या त्या टंकांचा दोष आहे. (आय शप्पत म्या कायच क्येलं नाही! त्या वोंकारास्नी इचारा काय इचारायचं आसन त्ये!)
निगडीत आणि निगडित हे दोन्ही सबूद म्या कदीच वापरल्या नाय बगा! तवा माजं नाव का घ्यु र्हायले तुमी?
आन चुकून वापरला आसल् तरी बी जो 'आर्त तुमाला लागत आसन्' त्योच घ्या की!
तं आता आसं पघा - म्हंजी म्या जे काय म्हनू र्हायलो हाये, त्ये समजल्याशी काम!
आत जर ह्ये वाचल्यालं समजत आसन तर बरं हाये...
त्ये बी समजत नसन् तं मंग तुमचा जनम सुद्द म्हराटी शिकवन्यात वाया ग्येला म्हनायचा!
आन तुमच्या मनुगतवर लै भारीतले लोक र्हात्यात... आमाला कुट झेपायला टायवालं इंपुरटेट काम? आमी पडलो गाव वाले.
इतके भारीतले आसले तरी बी त्ये लोक लंगडू र्हायले म्हने? म्हंजी आसं ऐकून हाये बॉ?
आपला
गुंडोपंत
अशुद्ध का असेना, लिहीत राहावे !
पंत,
लिहिलेले समजते ते सर्व शुद्धच या पंथातले आपण सर्व, तेव्हा शुद्धलेखनाचे फार मनावर घेऊ नये ! कोणीतरी शुद्ध लिहीले पाहिजे याचे आपण कधी समर्थन करतो का ? नाही ना ! मग अशुद्धलेखनाच्या बाबतीत आपल्या अशुद्ध लेखनाला कोणी छळू नये असे आम्हास वाटते ! आपल्याकडे यादवांची राजवट व ज्ञानदेवासारखे प्रतिभावंत ग्रंथकार यांच्यामुळे बाराव्या शतकातील मराठी बोलीला जसा ग्रांथिक भाषेचा दर्जा मिळाला होता, तसे भविष्यात आपल्या अशुद्धलेखनाचे भयानक स्वरुप पाहून कोणत्या तरी शतकात आपल्या अशुद्धलेखनाच्या लेखनाला ग्रांथिक दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने आपण लिहीत राहू....! :)
ता.क. :- आम्ही अशुद्धलेखनाचे समर्थन करीत नाही, पण अशुद्धलेखन करणा-या सदस्यांचे खच्चीकरण करु नये असे आम्हास वाटते...!
प्रामादिक अशुद्ध - टंकनदोष वगैरे
(मराठीत वेगवेगळ्या ज्या बोली आहेत, त्यातील लकबींना 'अशुद्ध' म्हणू नये असे मी अनेक ठिकाणी माझे मत मांडले आहे. त्यामुळे त्याबद्दल वादच नाही.)
टंकनदोषामुळे माझ्या अनेकदा चुका होतात. मग पुन्हा आपलेच लेखन वाचायची वेळ आली तर घासात खडे लागल्यासारख्या वाटतात, शहारायला होते. बाकीच्यांनाही असेच वाटत असेल. त्यामुळे अशी चिकित्सा करायचे यंत्र मला उपयोगी वाटेल.
शब्द शुद्धचिकित्सकयंत्र उपयोगाचेच !
शु.चि. यंत्र उपयोगाचेच आहे, पण तोपर्यंत मानवीय लेखनातील चूकांची चिकित्सा करु नये , त्यामुळे लिहिणारा जरा डचकत, डचकत लिहितो इतकेच आमचे म्हणने !
ते मोड्युल
इथे जोडावे. सर्वांना उपयोगी ठरेल.
अद्याप तयार नाही
ही सुधारणा अद्याप तयार नाही असे वाटते. दर तीन चार शब्दांतील एक शब्द हायलाईट होतो. मी एकदाही वापरलेली नाही, मात्र शब्द टाकत असते. चाचणी घेत असते. त्यामुळे अधिक सदस्यांच्या मदतीची गरज आहे असे वाटते. भविष्यात ही सुधारणा उपक्रमावर जोडून यायला हवी याबद्दल सहमत.
मनोगतावरील शु.चि. (आता तो लंगडत असला तरी) आणि स्वयंसुधारणेची सोय या दोन्ही अप्रतिम सोयी आहेत. वर्षभरापूर्वीचे माझे कच्चे मराठी सुधारण्यास या सोयींचा उपयोग झाला (तरीही अनेक चुका केवळ निष्काळजीपणामुळे होतात.) उपक्रमावरही भविष्यात अशा सोयी येतील अशी आशा करायला हरकत नसावी.
शब्दशुचिता
सध्या शुद्धलेखनाला "शब्दशुचिता" यापेक्षा वेगळे महत्व नाही. अहो "योनिशुचिता" देखिल आता अद्खलपात्र होत आहे तिथ शुद्धलेखनाचे अवडंबर माजवण्यात काय अर्थ आहे?
प्रकाश घाटपांडे
क्या बात है!
सध्या शुद्धलेखनाला "शब्दशुचिता" यापेक्षा वेगळे महत्व नाही. अहो "योनिशुचिता" देखिल आता अद्खलपात्र होत आहे तिथ शुद्धलेखनाचे अवडंबर माजवण्यात काय अर्थ आहे?
या गोष्टी अदखलपात्र झाल्या हा काळाचा महीमा!
मुद्दा एक वेगळी चर्चा करण्यायोग्य आहे.
आपला
गुंडोपंत
वायला ईषय
मंग हौन जाउंद्या त्येच्याव बी. मुलांना लैंगिक शिक्षण देण्याआदुगर पालकांच व्हाया पाहिशेल हे.
प्रकाश घाटपांडे
मी सुद्धा अशुद्ध
त्यात स्वयंसुधारणा नसली तरी शुद्धी चिकित्सक हाताशी असण्याने आमच्यासारख्या लोकांच्या लेखनाची पातळी* बरीच वाढेल असा माझा दावा आहे.
--१००% सहमत!
आपला,
(अशुद्ध) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥