रोगांविषयी

माहिती जालावर इंग्रजी भाषेतून निरनिराळ्या रोगांविषयी माहिती उपलब्ध आहे. परंतू रोग्याच्या शंकानिरसनासाठी किंवा पेशंट एजुकेशनसाठी मराठीत कोणतेही संकेतस्थळ नाही(एक आयुर्वेदिक वैद्यांचे संकेतस्थळ पाहण्यात आले होते आता नक्की पत्ता आठवत नाही.) मला असे एक् संकेतस्थ्स्ळ् भविष्यात विकसित करायचे आहे , पण सध्या प्रकल्प केवळ विचाराधीन आहे. :)
मी या सदरात अगदी थोडक्यात एकएका रोगाची माहिती देऊ इच्छिते. कृपया इंग्रजी आद्याक्षरांप्रमाणे इथे एकएका रोगाची माहिती द्यावी की सगळ्यात जास्त आढळणार्‍या आणि उत्सुकता असणार्‍या यावर वाचकांनी आपली मते कळवावी.

साती.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली कल्पना

(एक आयुर्वेदिक वैद्यांचे संकेतस्थळ पाहण्यात आले होते आता नक्की पत्ता आठवत नाही.)
साती,
आपण म्हणत आहात तशा धर्तीवरील एक स्थळ येथे पहा. ( http://indianalternativemedicine.blogspot.com/index.html )
आपली कल्पना उत्तम आहे. या बाबतित टग्या यांच्या वरिल प्रतिसादाशी सहमत आहे.
--लिखाळ.

येथे

ते येथे सापडेल.

चांगला उपक्रम

साती
हा एक चांगला उपक्रम आहे. नक्कीच पुढे चालवावा. वाचकांची मते व त्यांच्या अभिप्रायानुसार संपादन करणे शक्य होईल व जशी मागणी येत जाईल तसं तसं हे सदर नक्की चांगला आकार घेईल यात शंका नाही.

पल्लवी

सर्दी-खोकला

मस्त उपक्रम! पण अगदी बाळबोध रोगांपासून सुरुवात करू.

या अमेरिकेतल्या डॉक्टरांना थंड खाल्ल्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो (म्हणजे जरी तो वायरल असला आणि संसर्गजन्य असला तरी थंड गोष्टी उत्प्रेरकाचे काम करतात असे आपण भारतात म्हणतो) किंवा बर्फ खाल्ल्याने घसा दुखू लागतो या आपल्या जुन्या भारतीय लक्षणांवर अजीबात विश्वास नसतो. बरेचदा, 'काल मुलाने/ मुलीने २ आईसक्रिम्स खाल्ली आणि आज शिंका-खोकल्यांनी बेजार आहे' असे सांगितले तर डॉक्टर आ करून 'काय माणसे आहेत तरी यांना काय सांगायचे आता?' अशा अविर्भावात पाहतात.

तेव्हा रोगांना उत्प्रेरित करणार्‍या गोष्टी, खाणे-पिणे, परिस्थिती, रोगांची लक्षणे, रोगांचे आणि त्यावरील औषधांचे साईड इफेक्ट्स असे बरेच काही वाचायला मिळावे. वर नमूद केलेल्या गोष्टीत किती तथ्य आहे इ. जाणून घ्यायला आवडेल.

चांगला उपक्रम

साती,
तुमच्या मनातला उपक्रम चांगला आहे. असे संकेतस्थळ मराठीत हवेच. त्यासाठी हवी ती मदत करायला आवडेल. पण आधी उपक्रमावर काही दिवस लिहून भरपूर मजकूर (कंटेट) तयार करावा.:)

सध्या डिस्टल ह्यूमरस फ्रॅक्चर बद्दल जाणून घ्यायचे आहे. :):)

चित्तरंजन

असेच म्हणतो

तुमच्या मनातला उपक्रम चांगला आहे. असे संकेतस्थळ मराठीत हवेच. त्यासाठी हवी ती मदत करायला आवडेल. पण आधी उपक्रमावर काही दिवस लिहून भरपूर मजकूर (कंटेट) तयार करावा.

असेच म्हणतो.

सायंटिफिक ऍटिट्यूड

म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. त्यातून शरीरशास्त्र काय सांगते?
या अमेरिकेतल्या डॉक्टरांना थंड खाल्ल्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो (म्हणजे जरी तो वायरल असला आणि संसर्गजन्य असला तरी थंड गोष्टी उत्प्रेरकाचे काम करतात असे आपण भारतात म्हणतो) किंवा बर्फ खाल्ल्याने घसा दुखू लागतो या आपल्या जुन्या भारतीय लक्षणांवर अजीबात विश्वास नसतो. बरेचदा, 'काल मुलाने/ मुलीने २ आईसक्रिम्स खाल्ली आणि आज शिंका-खोकल्यांनी बेजार आहे' असे सांगितले तर डॉक्टर आ करून 'काय माणसे आहेत तरी यांना काय सांगायचे आता?' अशा अविर्भावात पाहतात.
हे खरेच आहे. पावसात भिजल्याने सर्दी होते का? चिंचा, आवळे, दही खाल्याने खोकला होतो का? उन्हातून आल्याआल्या गार पाणी प्याले तर काय होते? उन्हात हिंडल्याने डोके दुखते का? अंगात ताप असताना गार वार्‍यात का बसू नये? पंख्याच्या वार्‍याने अंग जडावते का? असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांविषयी वाचायला आवडेल.

सन्जोप राव

उत्सुकता

सगळ्यात जास्त आढळणार्‍या आणि उत्सुकता असणार्‍या

अश्या रोगांची माहिती द्यावी. ती माझ्यामते नंतर अकारविल्हे लावता येईल.
तसेच संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे समजुती, गैरसमजुती याविषयीही लिहावे.

सोयर्‍यासिस

मला सोयर्‍यासिस या आजाराविषयी महिती व त्यावरील उपाय हवे आहेत.कृपया याविषयीही लिहावे.

»

धन्यवाद व मदत

नमस्कार,

आयुर्वेद् व पर्यायी औषध या आमच्या/आपल्या ब्लॊग चा उल्लेख केल्या बद्द्ल धन्यवाद
मी आपल्या या संकल्पास editing ची मदत करण्याचा विचार करत आहे.काहि काळात अधिक लिहीतो.मला आपण् अपेक्षा कळवा
प्रसन्ना
prasannam@indiatimes.com

तयारी

सर्कीटमहोदय,
बर्‍याच लोकांचा असा गैरसमज असतो की आयुर्वेदिक औषधे कोणत्याही पूर्वचाचणीशिवाय बाजारात येत असतात.बरीच नावाजलेली नवी आयुर्वेदिक औषधे योग्य अशा संख्याशास्त्रीय निकषांवर चाचणी होऊनच बाजारात येतात.
नुकताच मी मधुमेहावरील आयुर्वेदिक औषधाच्या चाचणीत (रँडमाइज्ड डबल ब्लाईंड कंट्रोल ट्रायल) भाग घेतला होता. त्या चाचणीच्या गोपनीयतेच्या आवश्यकतेमुळे मी सारे काही स्पष्ट करू शकत नाही. एक मात्र खरे की जगन्मान्य अशा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅकटीसच्या नियमांनुसार ही चाचणी झाली. अशा चाचण्यांचे निकाल जाहीर व्हायला कित्येक वर्षे जातात. योग्यवेळी या विषयी माहिती लिहेनच.
साती.

गुड क्लिनीकल प्रॅक्टीस

"गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅकटीस" नव्हे तर "गुड क्लिनीकल प्रॅक्टीस" असे म्हणायचे आहे का?

चिलेशन थेरपी

मला चिलेशन थेरपी बद्द्ल माहीती हवी आहे.

ही उपचार पध्द्ती ह्रुदयातील अडथळे दूर करण्यासाठी वापरतात.

बायपास शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून् सुद्धा या उपचार पध्द्तीकडे बघीतले जाते.

अधिक माहिती कोणी देइल का ?

लिहायचे आहे पण...

वैद्यकातील प्रत्येक संज्ञेला मराठी प्रतिशब्द माहित नाहीत ही खरी अडचण आहे.
उदा. एंडोथेलियम, नायट्रिक ऑक्साईड इ.
काय उपाय करता येईल?

असे करता येईल

ज्या शब्दांसाठी मराठी शब्द अस्तित्वात नाही किंवा अस्तित्वात आहे पण प्रचलित नाही तिथे इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिता येईल आणि या शब्दाने उल्लेखलेली वस्तू नेमकी काय आहे हे कंसात लिहिता येईल.
मराठी माध्यमातील रसायनशास्त्राच्या पुस्तकात 'नायट्रिक ऑक्साइड' ला 'नायट्रिक ऑक्साइड'च म्हणायचे बहुतेक. तसेच 'कार्बन डाय ऑक्साइड' म्हणायचे 'कर्बद्विप्रणिल वायू' नाही. चूभूद्याघ्या.

चांगली कल्पना

खूपच चांगली कल्पना आहे, याचा पाठपुरावा करावा.

 
^ वर