उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
युनिकोड फाँट ची माहिती हवी आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
September 30, 2007 - 5:46 am
नमस्कार
वेगवेगळ्या ब्लॊगवर लेखन करतांना वेगवेगळे फॊन्ट वापरता येतात का ? किंवा कॊमन असे कोणते फॊंट आहेत जे ने करुन ते सर्वांच्या संगणकावर दिसतील उदा. नमस्कार हे जर प्रत्येकाच्या संगणकावर दिसते तर आणखी काही वेगळ्या फॊंटचा वापर करुन अक्षरे बदलता येणार नाही का ? त्याची माहिती असेल तर कृपया द्यावी ! आमचे संगणकाचे ज्ञान गमभन चा उपयोग करुन मराठी लिहिणे इतकेच आहे, तेव्हा आमच्या ज्ञानाची पातळी लक्षात घेऊन माहिती द्यावी व मदत करावी ही नम्र विनंती !
दुवे:
Comments
फाँट
मला येथे काही माहीती मिळाली!
ही माहीती बिहार ची सरकारी आहे! :)
शिवाय
युनिव्हर्सीटी ऑफ शिकागो च्या साईट वर हा डाउनलोड.
सिडॅक चे पण आहेत काही फाँट्स ते घरपोच पाठवतात.
पण मला ती फाँट्स् इंस्टॉल करायची प्रोसेस फार काँप्लीकेटेड वाटली !
बघा काही मदत होते का ते.
श्री लिपी ने काही यात सुधारणा आणली की नाही अजून?
आपला
गुंडोपंत
असेच ना !
पंत,
आपण आणि आणखी एका उपक्रमी सदस्यास आम्ही संगणकाच्या विविध तंत्राविषयी माहिती विचारत असतो, आपल्या आणि त्यांच्या उत्तरातून तसेच विकि च्या दुव्यावरुन आमचे प्राथमिक मत बनले ते असे की, वेगवेगळी अक्षरे सर्वांच्या संगणकावर दिसण्यासाठी डायनेमिक फाँट जर असतील तर ते शक्य आहे, नसता ते शक्य नाही असे वाटते किंवा भविष्यात ऑपरेटींग सिस्टीममधेच मराठीचे वेगवेगळे फाँट्स जेव्हा असतील तेव्हा ते सहज शक्य होईल, असे वाटते, असेच ना !
हो!
असे फाँट्स लवकरच तयार होतील यात शंका नाही.
मागे माझ्याकडे असे फाँट्स तयार करण्याचे सॉफ्ट्वेयर होते. (असेच कुठून तरी आलेले पायरेटेड सी डी मधले!)
पण मग ते गेले बॉ.... मी ही कधी ट्रॅक ठेवला नाही.
मला वाटते की कोरल ड्रॉ -९ व पुढील व्हर्जन्स मध्ये ही फाँट्स डिझाईन करता येतात. (नक्की आठवत नाहीये!) शिवाय ऑटोकॅडचेही फॉट्स बनवण्यासाठीचे सॉफ्टवेयर आहे. हे पण अंधूक आठवतेय कधी वापरले नाहीये.
आपला
गुंडोपंत
रुपांतर
चकटफू असलेले या सॊफ्टवेअर ने तुमचे अगोदर देवनागरी असलेल्या फॊन्टस चे युनिकोड मध्ये रुपांतर होते. माझ्याकडे चकटफू असलेला krishna.ttf हा फॉन्ट होता. त्यात असलेले माझे लेखन युनिकोड मध्ये कसे रुपांतर करायचे हा माझ्यासमोर यक्षप्रश्न होता. चित्त ने मला या विषयी सांगितले होते. पण त्यात कृष्णा फाँट चा समावेश नव्हता. मी तीन चार दिवसा पुर्वी सहज आयडीया केली व्हेंडर या ठिकाणी कृती ला टिक केले व रुपांतर करण्याचा प्रयत्न केला चक्क झाले.
प्रकाश घाटपांडे
लोकसत्तेचे फॉन्ट्स?
लोकसत्तेचे फॉन्ट्स देखील या सॉफ्टवेअरद्वारे युनिकोडमध्ये रुपांतरित करता येऊ शकतात का?
प्रयत्न करतो.
लोकसत्तेचा प्रयत्न करतो आहे.
प्रकाश घाटपांडे
रुपांतर
वा! रुपांतर ही मस्तच सोय आहे !
आय आय टी कानपूर ची कृपा! ;))
आधीही मी प्रकाशरावांच्या लेखनाचा चाहता बनलो आहेच; आता
त्यांच्या चिकाटीलाही मी खरंच मनापासून दाद देतो!
त्यांना जे हवे होते ते त्यांनी शेवटी शोधलेच!
आपला
गुंडोपंत
हे पहा
त्या रुपांतरच्या साईटवर तरी तसेच लिहीले आहे. मी काही त्यावर क्लीक करण्याची तसदी घेतली नाही!
Contributed by Source: IIT Kapur & Department of Information Technology
काय रावा आपल्याच शाळेचे काम आणी माहीत नाही?
आपला
गुंडोपंत
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
रुपांतर
प्रकाशराव,
रुपांतर या सॉफ्टवेअर वर ते कसे वापरावे, काय काय क्लूप्त्या आहेत, तुम्हाला काय अडचणी आल्या त्या कशा सोडवल्या याविषयीच एक लिहा ना!
आपला
गुंडोपंत
गावठी उपाय
अहो आम्ही आपले कंचही प्रशिक्शन न घेतलेल्या , पन पघुन पघुन शिकलेल्या गावठी मेक्यानिक सारखे. पाचर मारुन् पघायचि बसली तर बसली.
( नेटघाटातला गावठी मेक्यानिक)
प्रकाश घाटपांडे
हा हा हा
लय झ्याक लिवलासा... पाचर ह्या लेखनात बी शॊलेट बसली हाय.