लिखीत बडबड अर्थातच चॅटिंग.

याहु अथवा इतर अनेक सेवादाते बडबड करण्यासाठी सुविधा देत असतात. ( याहु मेसेंजर इत्यादी).

उपक्रम या स्थळावर एका वेळेस अनेक सभासद आलेले असतात आणि चर्चेत भाग घेत असतात. त्यांना सर्वांना एकाच वेळेस बडबड ( चॅटिंग) करण्याची सोय "उपक्रम" या संकेतस्थळावर होऊ शकेल काय? ( तांत्रिक बाबी बद्दल मला फारशी माहिती नाही.).

अशी बडबड खोली असली तर चर्चा अजूनही रंजक होतील यात शंकाच नाही.

द्वारकानाथ

Comments

माझे शब्द

माझे शब्द वर बडबडखोलीची सुविधा काहीकाळ होती, पण सुरक्षा कारणांनी ती बंद करण्यात आली होती असे आठवते. कारण ती याहू मेसेंजरसारखी खाजगी खोली नसून त्यात लिहीलेले काहीही सर्व सदस्यांना दिसू शके असा फळा होता.
ड्रुपल मधे चाट सुविधा आहे. पण ड्रुपल वापरणार्‍या बर्‍याच संकेतस्थळांनी ती हेतूपूर्वक वापरणे टाळले असावे(असे वाटते.)

नको

अशा चॅटिंग पेक्षा खरडवहीचा आणि समूह गप्पासाठी 'आपापसात' सारख्या चर्चाविषयाचा वापर करणे उत्तम.
वैयक्तिक वार्तालापासाठी व्य. नि. आहेच.

चॅटिंग सॉफ्टवेअरचा वापर केल्यास संकेतस्थळामध्ये अपप्रवृत्ती वाढतात असे निरीक्षण आहे.


आम्हाला येथे भेट द्या.

संपूर्ण सहमती

अजानुकर्णांशी संपूर्ण सहमती!

अगदी बरोबर नको चॅटींग

एकतर ह्या फूकटच्या अभीव्यक्तीसाठी आहेत तेच उत्तम पर्याय आहेत. जरा ही सेवा देणार्‍यांचे पण काम सोपे करूया. उद्या डेटाबेसचा, अजून कसला प्रॉब्लेम झाला की आपण त्यांना त्रास देणार, आमचा डेटा कूठाय. तसेच कालहरणाचे अजून एक साधन कशाला :-)

गॅब्ली, खुमखुमी

चॅटिंगची खुमखुमी असणार्‍यांना इथे पर्याय उपलब्ध आहे. अर्थात याचा उपक्रमाशी काहीही संबंध नाही.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

गरज - सोय

ड्रुपल करता अशी सोय मी चाचणी स्वरूपात तपासून पाहिली आहे. चॅट रूम ची अशी सोय देणे शक्य आहे. परंतु सुरक्षा, सर्व्हरवरचा ताण, रिस्पॉन्स टाईम, कम्युनिकेशन लॅग इ. गोष्टींची पडताळणी करावी लागेल. उपक्रमावर अश्या सुविधेची खरेच गरज असल्यास मी उपक्रमरावांचाबरोबर प्रयत्न करायला तयार आहे.

प्रयोग

प्रयोग देखील करु नका, मी एकदा नाही तर दोनदा हा प्रयोग करुन पाहीला आहे व तुम्ही ज्या सुरक्षा, सर्व्हरवरचा ताण, रिस्पॉन्स टाईम, कम्युनिकेशन लॅग इ. बद्दल बोलताय ह्या सगळ्याच विसकटतात हा अनुभव आहे.

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

खोली

अशी बडबड खोली असली तर चर्चा अजूनही रंजक होतील यात शंकाच नाही.

चॅटींगबद्दल वरील प्रतिसादांशी सहमत आहे. पण कदाचित एखादी सामाइक खरडवही करता येइल का, मनोगतावरील आपापसात प्रमाणे? कारण कधीकधी दोघांच्या खरडवहीतील गप्पांमध्ये भाग घ्यायचा असेल तर इकडून तिकडे करावे लागते :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

बडबडखोली बाबत

चैटिंग रूम सुरु करण्यात काही गैर वाटत नाही, काही अपप्रवृत्ति घडल्यास त्या सदस्याला लगेच बैन करता येईल, पण त्या मुळे बरेच उपक्रमी लवकरात लवकर सम्पर्क साधू शकतील आणि चर्चा पण रंगतदार होईल ह्यात शंकाच नाही...
आपला
कमी बोलणारा जास्त लिहीणारा
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर