स्टेम् सेल् संशोधन्
स्टेम सेल् संशोधनाचा वापर् करून् अनेक् जुन्या, दूर्धर् रोगांवर् इलास् सापडले असे संशोधकांचे म्हणणे आहे. प्राण्यांच्या आणि शेवटी माणसांच्या सजीव् अशा एम्ब्रीयोतून् या पेशी काढून् पुन्हा त्यांचे रोपण् मानवी शरीरात् केले जाते. पण् असे करतांना गर्भाची हत्या करून् मग् एक् जीवन् देण्याचा प्रयत्न् आहे असे या पद्धतीचे विरोधक म्हणतात्. म्हणून् अशा संशोधनाला देण्यात् येणारे शासनाचे व खाजगी संस्थांचे अनुदान् बंद् करावे असा त्यांचा नारा आहे. या वर् द स्टेम् सेल् डिवाईड् हे एक् पुस्तक् वाचनात् आले.
मानवाच्या एम्ब्रियोचे उत्पादन् संशोधन् व पुढे नंतर् वैद्यकीय क्षेत्रात् वापरण्यासाठी करावे का?
स्टेम् सेल् संशोधनावर् एवढा खर्च् करावा का?असे संशोधन् मान्यताप्राप्त् झाले तर् माणसाचा एम्ब्रियो घेतांना एखाद्या विशिष्ट् जाती /जमातीचे /देशाचे शोषण् होण्याची शकयता आहे का?
Comments
चांगला विषय
चांगला विषय आहे.
मानवाच्या एम्ब्रियोचे उत्पादन् संशोधन् व पुढे नंतर् वैद्यकीय क्षेत्रात् वापरण्यासाठी करावे का?
वैद्यकीय उपयोग असल्यास संशोधन जरूर करावे, त्यातील नैतीक/अनैतीक प्रश्नांबद्दल उहापोह करून काही नियम ठरवता येतील आणि जसजसे हे संशोधन मूळ धरेल त्याप्रमाणे त्या नियमांमधे कमीअधिक फरक करून कालस्वरूप बदलता यू शकतील.
स्टेम् सेल् संशोधनावर् एवढा खर्च् करावा का?असे संशोधन् मान्यताप्राप्त् झाले तर माणसाचा एम्ब्रियो घेतांना एखाद्या विशिष्ट् जाती /जमातीचे /देशाचे शोषण् होण्याची शकयता आहे का?
हो होऊ शकतो - गैरफायदा, शोषण इत्यादी सर्व. या बाबत तत्स्म प्रकार असलेली सत्यकहाणी "Roche vs Adams" वाचा (हे पुस्तक आहे, खूप वर्षांपूर्वी वाचले होते. जालावर काही संदर्भ मिळू शकतात).
थोडे अस्पष्ट लिहीण्याबद्दल क्षमस्वः मधे मी एक दोन-तीन संस्थांशी निगडीत एक प्रकल्पाच्या सुत्रधारांना भेटलो होतो. तो प्रकल्प हा काय्देशीर होता, त्यातील विचार (निदान वरकरणी) चांगले होते, त्यांना अनुदान पण बरेच मिळाले होते (मान्यवर संस्था त्यात असल्याने) पण दोन पुढारलेल्या राष्ट्रांचा एका प्रगतीशील राष्ट्रातील उद्योजकांची मदत घेऊन दुसर्या प्रगतीशील राष्ट्रातील लहान मुलांना विशिष्ठ आजार होऊ नयेत म्हणून काही औषधे फुकट वाटण्याचा त्यात प्रकार होता. ते जे आजार टाळायचे अथवा "कंट्रोल"मधे आणायचे म्हणत होते, ते वास्तवीक योग्य आहार आणि व्यायामाने होणारच होते! तरी देखील औषधांची बाजारपेठ आणि ती औषधे योग्य/अयोग्य ठरवण्यासाठी असा तिसरा जगाचा दुरूपयोग होता असेच मला वाटले.
हाच प्रकार मोठ्या प्रमाणात स्टेमसेल्स निमित्ताने होईल.
स्टेमसेल बँक
भारतात बंगलुरू ला स्टेमसेल बँक सुरू झालीये असं ऐकलं . मुल जन्मल्यावर त्याची नाळ येथे जतन करता येते. अशी अपेक्षा आहे की येत्या वीस वर्षात ह्या क्षेत्रात चांगले संशोधन होईल आणि मग ह्या जतन केलेल्या मुळपेशींचा(स्टेमसेल्स) उपयोग करता येईल. सध्या ह्या बँकेचा खर्च खुप जास्त आहे. मात्र प्रिया दत्त, रवीना टंडन आदींनी ह्या सोईचा वापर केल्याचं वाचून आहे.
सध्या आपल्या मुलाला देण्यासारखी ही खूप चांगली भेट आहे असं म्हणतात.
-सगळ्या माहितीचा स्त्रोत : पूणे टाईम्स ;)
नीलकांत
नाळ जतन
"नवीन प्रगत पालक"(??) ह्या नात्याने, मी विचार केला ह्या विषयावर. पण त्याची एकंदर किंमत, परत जर का ह्यासंबधी भविष्यात ऑपरेशन करावे लागले तर त्याचा खर्च. हे सर्व होण्याची शक्यता, असे विचार करून सध्यातरी अजूनतरी मला हे जास्त "फ्यूचरीस्टीक् हाय फाय व महाग" प्रकार वाटल्याने रहीत केले.
मला वाटते ज्यांच्याकडे (मागील काही पिढ्यांपासून) धोकादायक आजारांचा पूर्वइतीहास आहे त्यांना हे विशेष महत्वाचे वाटू शकते.
बाकी
मानवाच्या एम्ब्रियोचे उत्पादन् संशोधन् व पुढे नंतर् वैद्यकीय क्षेत्रात् वापरण्यासाठी करावे का?
हो. जरूर.
स्टेम् सेल् संशोधनावर् एवढा खर्च् करावा का?
"एवढा खर्च् " म्हणजे? सापेक्ष आहे हो.
असे संशोधन् मान्यताप्राप्त् झाले तर् माणसाचा एम्ब्रियो घेतांना एखाद्या विशिष्ट् जाती /जमातीचे /देशाचे शोषण् होण्याची शकयता आहे का?
हो किंवा नाही. मला खात्रीने सांगता येणार नाही.
अवांतर : शोषणविरहीत जगात रहाता का तुम्ही. तुमचा ग्रहाचा पत्ता व तुमच्या वस्तीतील रियल इस्टेट चा भाव काय म्हणे? म्हणजे परवडत असेल तर होईन शिफ्ट म्हणून हा ;-) ह. घ्या.
अवघड
विषय महत्वाचा आणि त्याचबरोबर अवघड आहे. यावर उत्तरे मिळवण्यासाठी यातील नैतिक मुद्यांचा विचार केला जाणे आवश्यक आहे. आजही असे बरेच मुद्दे आहेत ज्यावर आशिया, युरोप आणि अमेरिका यांच्यामधील कायद्यांचे एकमत नाही. उदा. माणसाचा जनुक नकाशा (Map of the Human genome) सर्वांना उपलब्ध असावा की नाही याबाबत बर्याच अडचणी आल्या होत्या.
लेखात उल्लेख केलेल्या पुस्तकात यासंबंधी काय विचार आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
आणखी माहिती?
हा वाद नक्की काय आहे आणि स्टेम सेल रिसर्च म्हणजे काय याविषयी थोडक्यात काही सांगता येईल काय?