लेखन करताना -२

लेखन करताना

अनेकदा चर्चा प्रस्ताव, लेख वाचताना, काही गोष्टी हव्यात नि नकोत असे जाणवत राहते.
त्यासाठी आधीच्या भागात खालील गोष्टींचा उहापोह झाला

आपण कुणासाठी लिहिता आहात?
काय म्हणायचे आहे?
कसं म्हणायचे आहे?
वाद प्रतिवाद कसा?
भाषेचे स्वरूप व संवादातले बारकावे पोहोचवण्याची खुबी

आता पुढे भाग २

आपला
गुंडोपंत

Comments

माझी काय चुकचुक नाय बा!

"चल तुझी चुकचुक दूर करतो"
माझी कायच चुकचुक नाय बा!!
असेही ५० तर झालेच आहेत. काही महत्वाचे भर घालणारे असेल तर मजा येते नाय तर - चालू द्या!
म्हणून भाग २ चालू...

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

शुद्धीचा आग्रह का धरायचा?

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

< a href="http://esakal.com/esakal/09052007/Specialnews58E9AA413F.htm">इथे वाचा.--वाचक्‍नवी

माफ करा, पण

आपले रीझनिंग सर्क्युलर आहे.
कारण आपण दिलेल्या बातमीत सदर बीएड च्या विद्यार्थ्यांना "शुद्ध" लिहिता येत नाही, म्हणून ते उत्कृष्ट शिक्षक होऊ शकणार नाहीत, असे बातमीदाराने गृहित धरले आहे.
आणि आपण त्या बातमीचा संदर्भ "शुद्धीचा आग्रह का धरायचा" ह्या शीर्षकाखाली दिलाय.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

पाली चुकचुकल्या की काय?

शुभ बोल रे टग्या म्हटले तर चितेला आग लागली!
पाली शुद्धलेखनाबद्दल पाल चुकचुकायला काय झाले तुमच्या तिकडे. :-)
बुद्धधम्माच्या संघाला 'सरण' म्हणतच जायचे असते. हे आपसूख तसे जात आहेत, आणि त्याच्याऐवजी बळेच तिथे पाठवले की हो तुम्ही.

तरीही कळलेच!

तरीही उमेद्वारांचे म्हणणे आपल्याला 'कळले' आहेच! ;)
तेंव्हा हे
~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

अजूनही ऍप्लिकेबल आहेच! ;)))

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

सर्क्युलर रीझनिंग ?

बातमीदाराने गृहीत धरले आहे की निष्कर्ष काढला आहे? निष्कर्ष चुकीचा आहे ? असे शिक्षक जर मुलांना शिकवतील तर ते शुद्ध भाषा कशी शिकवू शकतील? बी एड्‌‌‌-डी एड्‌ चे विद्यार्थी असे का झाले? तर त्यांना भाषा शिकवणार्‍यांनी शुद्धीचा आग्रह धरला नाही म्हणून. लिहिताना, वाचताना, शिकताना, शिकवताना अशा प्रत्येक पातळीवर शुद्ध साहित्याचा आग्रह धरला तरच पुढच्या पिढ्यांकरिता भाषा टिकून राहील. ब्रिटिशांनी शुद्ध भाषेचा आग्रह धरला म्हणूनच आज जगभरात आणि विशेषत: भारतात सार्वजनिक जागी इंग्रजीचे लिखाण बव्हंशी शुद्ध दिसते.--वाचक्‍नवी

चार पांढरपेशी लोकं!

बातमीदाराने गृहीत धरले आहे की निष्कर्ष काढला आहे? निष्कर्ष चुकीचा आहे ?

पहिली गोष्ट म्हणजे बातमीदाराला निष्कर्ष काढण्याचा अधिकार कुणी दिला?

असे शिक्षक जर मुलांना शिकवतील तर ते शुद्ध भाषा कशी शिकवू शकतील? बी एड्‌‌‌-डी एड्‌ चे विद्यार्थी असे का झाले? तर त्यांना भाषा शिकवणार्‍यांनी शुद्धीचा आग्रह धरला नाही म्हणून.

'शुद्ध भाषेची' व्याख्या काय? की आपण म्हणता ती किंवा जी व्याकरणाच्या पुस्तकाबरहुकूम आहे ती शुद्ध भाषा?? आम्ही असं कुठलंही पुस्तक मानत नाही! चार उच्चशिक्षित पांढरपेशा समाजातली लोकं जी भाषा बोलतात/लिहितात तीच भाषा शुद्ध आहे हे कुणी ठरवलं/कशावरून?

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

या म्हणण्यावर आम्हीही ठाम आहोत!

तात्या.

--
आम्ही जे लिहू, जे बोलू तेच शुद्ध आहे/असते असा आमचा दावा आहे. ज्यांना आमचं बोलणं कळणार नाही त्यांनी ते ऐकावं, आणि ज्यांना आमचं लिहिणं कळणार नाही त्यांनी ते वाचावं असा आमचा बिलकूल आग्रह नाही. इतरांनी त्यांच्या व्याकरणविषयक पुस्तकात लिहिलेले कुठलेही नियम आम्ही मानत नाही/मानणार नाही. व्याकरण विषयक आणि शुद्धलेखन विषयक नियम बनवण्याचे अधिकार कुणा एका व्यक्तिला आहेत, किंवा ती कुणा एका पांढरपेशा समाजाची मक्तेदारी आहे असे आम्ही मानत नाही, आणि सदर मक्तेदारी असलीच तर ती उधळून लावण्यास आम्ही सदैव समर्थ आहोत!

क्या बात है!

वा तात्याबा आपळे बंड नि आम्हाला दिलेला पाठिंबा आवडला!

चार उच्चशिक्षित पांढरपेशा समाजातली लोकं जी भाषा बोलतात/लिहितात तीच भाषा शुद्ध आहे हे कुणी ठरवलं/कशावरून?

हेच तर आम्ही म्हणतो.

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.

पण हे एकदा मानलं की तो पण एक नियमच झाला ना...? आता काय करणार? मग परत तो नियमही तोडणार?
मी स्वतंत्र आहे असं म्हणण्यातही 'स्वातंत्र्य या कल्पनेची' गुलामगीरी आहेच ना!
हा आता हा जरा लोच्याच वाटतो आहे.

आपला
गुंडोपंत
~सामान्य माणसाने जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

एकदम पटले!

मी स्वतंत्र आहे असं म्हणण्यातही 'स्वातंत्र्य या कल्पनेची' गुलामगीरी आहेच ना!

मस्त! एकदम पटले!

उच्चशिक्षित बीएड् डीएड् विद्यार्थी

चार उच्चशिक्षित पांढरपेशा समाजातली लोकं जी भाषा बोलतात/लिहितात तीच भाषा शुद्ध आहे हे कुणी ठरवलं/कशावरून?

त्या वृत्तातून असे दिसते की या विद्यार्थ्यांपैकी एकीची आय् ए एस् अधिकारी व्हायची इच्छा आहे आणि अनेकांना शिक्षक ही भरवशाची नोकरी वाटते. सर्वांच्या शुभकामना सफल झाल्या म्हणजे ही मंडळी लवकरच उच्चपदस्थ किंवा भरवशाची पांढरपेशा तरी होतील. मग त्यांच्याच होणार की या पांढरपेशा नियमावली!

पण

ब्रिटिशांनी शुद्ध भाषेचा आग्रह धरला म्हणूनच आज जगभरात आणि विशेषत: भारतात सार्वजनिक जागी इंग्रजीचे लिखाण बव्हंशी शुद्ध दिसते.--
म्हणून ती अनेकांना डोकेदुखीही झाली!!
पण त्याच वेळी, अमेरिकनांनी इंग्रजीला 'म्हणू तसे स्पेलींग' केली.
वापरायला सोपी केली, म्हणून ती जगभर जाऊ शकली.

"वापरातली सुलभता" हा मोठा भाग आहे भाषा टिकण्यात!

आपला
गुंडोपंत

अमेरिकनांनी इंग्रजीला 'म्हणू तसे स्पेलींग' केली?

अमेरिकेतील लोक (सुशिक्षित तरी) स्पेलिंगच्या बाबतीत बाकीच्यांइतपतच कर्मठ असतात. अमेरिकेतील काहीकाही स्पेलिंगे ब्रिटिशांपेक्षा वेगळी आहेत हे खरे. पण नोकरीच्या अर्जात स्पेलिंगच्या चुका करू नये, स्पेलिंग चुकल्यास नोकरी न मिळण्याची शक्यता वाढते, असे या बाबतीतले सल्लागार लोक म्हणतात. (इतकेच काय 'डेटिंग [प्रेम-याचने]च्या जाहिरातीत सुद्धा छाप चांगली पाडायची असेल तर स्पेलिंग सांभाळावे' म्हणून "याहू" च्या मुख्य पृष्ठावर मी माहिती वाचली आहे. म्हणजे अमेरिकेत "शुद्ध" स्पेलिंग सार्वजनिक इतके खाजगीतही लुडबुड करते! ;-) ह. घ्या.)

आता सुशिक्षित लोक हे पुष्कळदा पांढरपेशे किंवा श्रीमंत असतात हेही खरे. पण अमेरिकेतील गरीब आणि कामकरी वर्गाला पुढे कधी पांढरपेशे किंवा श्रीमंत होण्यास मोठी हरकत नसते.

काही का असेना, बहुतांश अमेरिकन आणि इंग्रजी स्पेलिंगे शेक्सपियरच्या थोड्या आधीच्या काळातल्या बोलीप्रमाणे बनवली गेली असल्याकारणाने ती आजच्या उच्चारांसाठी बरीच कठिण जातात.
टॅप (tap) आणि टेप (tape) मध्ये उच्चार वेगवेगळा असून "a"च का वापरला? "टेप" मध्ये (tape) शेवटचे "e" अक्षर कुठून आले? अशी कुठलीतरी सहा-सातशे वर्षांपूर्वीच्या उच्चारांची भुते या स्पेलिंगमध्ये वावरत असतात. आणि ही स्पेलिंगे बदलण्याचे प्रस्ताव कोणीच करत नाही, इंग्रज नाही की अमेरिकन नाही.

त्या मानाने मराठी शुद्धलेखनाचे नियम हल्लीहल्लीचे असल्यामुळे इंग्रजीपेक्षा खूप सोपे आहेत. जग जिंकण्यासाठी इंग्रजी स्पेलिंगचाच आदर्श ठेवायचा असेल, तर मराठीचे शुद्धलेखन कुठल्यातरी भलत्याच उच्चारासारखे करून खूपच कठिण करावे लागतील! ह. घ्या. :-) माझ्या मते मुद्दाम कठिण नाही केले तर बरे.

लिन्कशुद्धि

इथे

प्रकाश घाटपांडे

लिन्कशुद्धि

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी माहितीपूर्ण लिंक(दुवा ) दिली. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. हा दुवा माझ्या परिचितांना ई मेलने कळविणार आहे. शुद्धलेखनाचे अवास्तव स्तोम माजवू नये हे जरी समजण्यासारखे असले तरी अगदीच स्वैर लेखन निषिद्धच होय.एखाद्या प्रतिभावान लेखकाचे सोडा, पण भावी शिक्षकांनी व्याकरणशुद्ध लिहायलाच हवे.

लिंक

सदर लिंक ही वाचक्नवी यानी दिली आहे . मी फक्त लिंकशुद्धि केली.
प्रकाश घाटपांडे

काहीसे मान्य

पण भावी शिक्षकांनी व्याकरणशुद्ध लिहायलाच हवे.

हे मान्य आहे.
शिक्षकांना मात्र भाषा 'कळलेली' असलीच पाहिजे.
बाकी 'कशी शुद्ध' नि 'किती शुद्ध' हे वाद त्या भाषेच्या कौशल्या नंतरचे आहेत.
तेंव्हा यात आपले म्हणणे मान्य आहे.

मात्र नियम सर्वत्रच नि सदैवच लावू नये या मताचा मी आहे. म्हणजे प्रत्येक सामान्य माणसांनी शिक्षकांइतकेच शुद्ध कायम बोलले लिहिले पाहिजे.
हे म्हणणे अवाजवी आहे. त्यात बोलीचे मरण आहे.

आपला
गुंडोपंत

शिक्षक

शिक्षकाने शिक्षण कसे द्यावे ? तर, "ये हृदयीचे ते हृदयी घातले" असे माउलींनी म्हटल्याप्रमाणे.
"ये हृदयीचे ते हृदयी शुद्ध करोनि घातले" असे म्हटलेले नाही.
सदर बीयेड च्या विद्यार्थ्यांची भाषा सदाशिवपेठ, पुणे ३० ह्या क्षेत्रात अशुद्ध समजतील नक्कीच.
पण त्या भाषेतूनच ग्रामीण विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो.
जीएंची कैरी ही कथा (किंवा त्यावर आधारित चित्रपट) वाचल्यास, त्यातील किस्ना मास्तरचे पात्र अशासाठीच पटते.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

सुरेख!

शिक्षकाने शिक्षण कसे द्यावे ? तर, "ये हृदयीचे ते हृदयी घातले" असे माउलींनी म्हटल्याप्रमाणे.
"ये हृदयीचे ते हृदयी शुद्ध करोनि घातले" असे म्हटलेले नाही.

वा तथागतराव! वरील ओळीमध्ये मुद्दामून 'शुद्ध' हा अनावश्यक शब्द टाकून आपण काय सुरेख दाखला दिलात, आणि खुद्द माउलींनीदेखील सोकॉल्ड 'शुद्धी'चे कुठलेही स्तोम माजवलेले नाही हे काय सुरेख दाखवून दिलेत! आपले मनापासून अभिनंदन व आभार..

अर्थात आता काही मंडळी साक्षात माउलींनादेखील 'शुद्धलेखनाच्या' अकारण माजवलेल्या स्तोमात तोलू पाहतील हा भाग वेगळा! :))

सदर बीयेड च्या विद्यार्थ्यांची भाषा सदाशिवपेठ, पुणे ३० ह्या क्षेत्रात अशुद्ध समजतील नक्कीच.
पण त्या भाषेतूनच ग्रामीण विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो.

सहमत आहे..

जीएंची कैरी ही कथा (किंवा त्यावर आधारित चित्रपट) वाचल्यास, त्यातील किस्ना मास्तरचे पात्र अशासाठीच पटते.

वा, क्या बात है! वाचली पाहिजे एकदा ही कथा!

तथागतराव, माउलीच्या वाक्याचे उदाहरण देऊन अगदी साध्या व सोप्या पद्धतीने 'शुद्धीचा' बुरखा फाडणारा आपला प्रतिसाद मनापासनं आवडला...:)

आपला,
(आनंदीत) तात्या.

--
मिसळपाव डॉट कॉम वर शुद्धलेखनाला अवास्तव तर सोडाच, परंतु केवळ तोंडदेखलंही महत्व नसेल! अर्थात, ज्यांना शुद्धलेखानाचे व व्याकरणाचे गोडवे गायचे आहेत, त्यांना 'प्रशासकीय अनुमती'खाली ठेवलं जाणार नाही याची मात्र ग्वाही देतो! :))

यायचे! टाकायचे! जायचे!

लेखन करतांना एकदाच कधीतरी उपक्रमावर यायचे! लेखन टाकायचे! जायचे!
त्या नंतरताअपल्या चर्चेतही कधी सहभाग घ्यायचा नाही.
असे करणारे काही महाभाग आहेत.

मला वाटते, की चर्चा प्रस्ताव हा प्रस्तावकारा सकट सर्वांनी चर्चा करण्यासाठी असतो. यात ग्रुप डिस्कशन सारखे प्रस्तावकाराने चर्चा मुळ मुद्यावर आणायची आहे. नको त्या मुद्यांना बगल द्यायची आहे. हे सहजतेने शक्य नसते. पण हे स्कीलचा आयुष्यात मस्तच उपयोगी आहे! (उपक्रमावर तुम्हाला त्याची फुकट प्रॅक्टीस करायला मिळते आहे, अजून काय हवे? )

पण हे लोक पळूनच जातात नि आपण बसतो वेड्यासारखे त्यांच्या प्रस्तावावर चर्चा करत!
उदा. बाळकृष्ण, जगन्नाथ, विकि व इतरही मंडळी चर्चा टाकून गायबच आहेत. आपल्याला जर चर्चेत सहभागी होता येणार नसेल तर तसे प्रस्तावातच कळवणे योग्य नाही का? (हा वैयक्तिक हल्ला नसून उदाहरणे आहेत याची नोंद घ्या!)

मी तर मानतो की आपल्याच नाही तर आपल्याला पटणार्‍या व न पटणार्‍या सगळ्या विषयांवर मताची एक पिंक तरी टाकावीच. फार तर काय होईल? आपले हसे! ठीक, पण आपल्या विचारांना काही तर गती त्या भागात मिळेल? आपले कुंठीत झालेले विचार 'अच्छा असे आहे होय्?' म्हणून चालू तर लागतील.

आपला
गुंडोपंत

गनिमी कावा...

लेखन करतांना एकदाच कधीतरी उपक्रमावर यायचे! लेखन टाकायचे! जायचे!

ह्यालाच गनिमी कावा म्हणतात की काय? ते काही असो, असे बर्‍याचदा पाहीले आहे. कदाचीत कधी कधी नकळत होत असेल पण एखादी व्यक्ती नेहेमी तसेच वागत असेल तर मात्र अर्थ वेगळा होईल. तसेच वाद कितीही झाले अथवा काही विचार पटले नाहीत तरी ते वैयक्तिक घेऊ नये असे वाटते. शिवाय येथे प्रत्येकाकडे काही ना काही "स्पेशॅलिटी" आढळते त्यामुळे नित्यनवीन काहीना काही कळते - चर्चेत अथवा खरडवहीत! :)

प्रकाटाआ

स्वयंसंपादीत

पण

पण गुंडोपंत,

प्रत्येकाला इतकी इन्टेन्स चर्चा करायची असतेच असे नाही. आणि काही लोकांना वेळही नसतो. नाही, म्हणजे आम्ही असे काही लोक पाहिले आहेत, की ज्यांना महत्वाची कामे असतात. आणि त्यामुळे उपक्रमाबद्दल् कितीही प्रेम असले, तरी दर दोन मिनिटांनी इथे यायला जमत नाही. किंवा काहींना कामे नसली, तरी आपली प्रकृती जोपासायला, व्यायाम करायचा असतो. व्यायाम आणि उपक्रम ह्यामध्ये आम्ही उपक्रम निवडत असलो, तरी काही लोकांना व्यायामाला वेळ देऊन उपक्रमावरचा वेळ कमी करावा लागतो. असे शक्य आहे ना ?

मग वेळेची कमतरता असल्यास आणि चर्चेचा मोह सुटत नसल्यास, फक्त चर्चा टाकून व्यायामास निघून जाणे, हे अधिक श्रेयस्कर नाही का ?

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

असेल असेल!

मग वेळेची कमतरता असल्यास आणि चर्चेचा मोह सुटत नसल्यास, फक्त चर्चा टाकून व्यायामास निघून जाणे, हे अधिक श्रेयस्कर नाही का ?

असेल असेल! तुमचे तसे होत असावे. काही हरकत नाही...!

आपला
गुंडोपंत

पुन्हा एकदा

काही महत्वाच्या गोष्टी

१) चर्चेत एखाद्या प्रतिसादातील एखाद्या वाक्यावरुन मुळ चर्चाविषयापेक्षा काहीसे वेगळे सांगावयाचे वाटत असेल तर त्या प्रतीसादकर्त्याच्या खरडवहीचा, व्यं. नी. चा वापर करावा. कटाक्षाने पाळावे. मला वाटते हे आपल्या सगळ्यांकडून कधीनाकधी घडले आहे तरी भविष्यात आपण काळजी घेऊया.

२) चर्चेचा आवाका हा मूळ चर्चाप्रस्तावकाने जेवढा ठेवला आहे शक्यतो तेवढाच ठेवावा, तुम्हाला कितिही वाढवावासा वाटला / योग्य वाटला तरी शक्यतो मुळ चर्चाप्रस्तावकाला खरडावे व त्याला योग्य वाटले तरच पुढे सरकवावे.

३) शक्यतो विषयांतर नको हे सांगायला नको पण लागते बुवा अधूनमधून.

४)>>कधीतरी उपक्रमावर यायचे! लेखन टाकायचे! जायचे!

हो हे पाहीले आहे, काहीवेळा असे जाणवले आहे की आपल्या राजकीय विचारसरणी, आपली पत्रकारीता प्रॅक्टीस्, ह्याकरता उपक्रमाचा (गैर्??)वापर होतो. एकदा वाटते चला ठीक आहे येथील लोक काही दूधखूळी नाही आहेत, मराठी लोकांना व्यासपीठ मिळते चालू देत. पण अशी लोक , असे चर्चाप्रस्ताव ओळखून त्याला कमी किंवा "योग्य" प्रतिसाद द्यावेत की येथील प्रसीध्दीचा ही लोक आपल्या राजकीय फायद्याकरता वापर करू नयेत. म्हणून दरवेळी अश्या चर्चांना प्रतीसाद दिलाच पाहीजे असे नको. मला वाटते की शक्यतो अराजकीय, समता, बंधूता असे स्वरूप ठेवावे. असो हे माझे मत. मला वैयक्तिक माझी ओळख मराठी / भारतीय इतकी पुरेशी वाटते. पण आडनाव, लेखनशैली, धार्मीकबाबी ह्यांची ओळख लोकांना का हवी असते अजुनही हे जरा ...आपण आपली ओळख अश्याप्रकारे ठेवतो व परदेशात आपण, श्रीलंकन, बांगलादेशी, एकाच वेळी चालत गेलो तर परदेशी माणूस म्हणतो ३ इंडीयनस् दिसतायत्. कुठेही बाहेर आपल्याला इंडीयनस् म्हणून ओळखतात तर आपला अमुकतमुक खोलातील ओळख ठेवायचा आग्रह का?

असो गुंडोपंत म्हणाले पिंक टाका, सॉरी जरा राडा केला....

चर्चेचा प्रस्ताव

आठवड्याला ५-६ चर्चांचा प्रस्तावांचा रतीब घालणार्‍यांनी, चर्चेत येणार्‍या उलट सुलट (पण मुद्याला धरुन) प्रतिसादांचे खंडन तरी करावे किंवा स्वागत तरी. अगदी दुर्लक्ष केले तरी चालेल .. पण आपल्याशी असहमत असणार्‍या प्रतिसादांची बोळवण 'उगीच वाद का उकरता'? अशी करणे योग्य आहे का?

 
^ वर