माहिती हवी आहे

विद्वान हो,
(१) मराठी ते हिन्दी "डिक्शनरी" तसेच हिन्दी ते मराठी "ऑनलाईन" डिक्शनरी कुठल्या जालस्थलावर मिळेल?
(२) "अंधश्रद्धा निर्मूलन" ह्या बद्दल जालस्थल एवं साहित्या बद्दल दुवे मिळतील का?
कृपया येथे पाठवा किंवा व्य.नि. पण पाठवू शकता...

लेखनविषय: दुवे:

Comments

मराठी हा हा हा

मराठी ते मराठी डिशनरी शोधून राहिलो ती मिळाली की मंग हिंदीचं पाहू कसं ;)
"अंधश्रद्धा निर्मूलन"साठी घाटपांडे साहेबाला भेटा म्हणतो !

बाबूराव

अंनिस

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माहिती साठी इथे क्लिक करा
प्रकाश घाटपांडे

शब्दकोष

मराठी व हिंदी शब्दकोष (इंग्रजीत) इथे मिळतील. दोहोंच्या वापराने हवा तो उद्देश साध्य करणे शक्य आहे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

उत्तम दुवा!

'त्या'ने दिलेला दुवा उत्तम आहे.
पण पान आधी आंग्ल भाषेत दिसल्याने विरस झाला.
मात्र पानाच्या शेवटी युनिकोड असा दुवा दिसला. त्यावर क्लिक केले असता छान मराठी अक्षरे दिसली.
युनिकोड मध्ये पाहिल्यास (जवळपास) पुस्तकाचा आनंद घेता येवू शकतो असे वाटले.
हे पान त्वरीतपणे आवडत्या पानांत टाकले आहे!

या पानाचा दुवा उपक्रमावर कायमचा देवून ठेवणे शक्य आहे काय?
अनेक नवीन जुन्या सदस्यांना हे उपयोगी ठरेल असे वाटते.

आपला
गुंडोपंत

मराठी शाब्दबंध - हिंदी शब्दतंत्र

मराठी शाब्दबंध आणि हिंदी शब्दतंत्र यांचाही उपयोग व्हावा

-आजानुकर्ण

 
^ वर