उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ईर्जिक
रामभाऊ
August 5, 2007 - 6:16 pm
नमस्कार मंडळी,
ईर्जिक हा शब्द ग्रामीण भागात पुर्वी वापरात होता.पंरतु काळाच्या ओघात ईर्जिक पध्दत होत गेली.ईर्जिक बदल आपणास काय वाटते? शेती साठी ही पध्दत फायदेशीर आहे का?
आपले मत काय?
दुवे:
Comments
ईर्जिक म्हणजे..
ईर्जिक म्हणजे काय रे भाऊ?
माफ करा, पण याचा अर्थ मला माहीत नाही, पण आता मात्र उत्सुकता लागली आहे. समजावल्यास बरे होईल.
ध्यन्यवाद
इर्जिक
गावात शक्यतो सर्वच शेतकर्यांची शेतकामासाठी दोन बैल घेण्याची क्षमता नसते. तेव्हा ज्याच्याकडे एक बैल आहे किंवा काहीच नाही अशा लोकाच्या शेताची मशागत कशी होणार? तेव्हा गावातल्या शेतकर्यांनी एकत्र येऊन ज्याच्याकडे जे काही देण्यासारखे आहे उदा बैल, कुळव, नांगर, पैसे ते देऊन आळीपाळीने एकेकाचे शेत नांगरून द्यायचे. याला इर्जिक म्हणतात.
आता बरेच दिवस गावात न राहिल्याने यातले बारकावे माहित नाहीत. पण काही शेतकर्यांना , मानी शेतकर्यांना इर्जिक घातलेली आवडत नाही. आजकाल हा प्रकार कमी झाला असेल् कारण ट्रॅक्टर भाड्याने मिळतो. पण अगदी बंद होणे शक्य नाही. थोड्या वैयक्तिक पातळीवर दोन-तीन शेतकरी मिळून चालू असणारच.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
को. ऑप.
म्हणजे अगदी छोटे को. ऑप. असेच ना?
वा छान आहे की मग ते. ज्याला गरज आहे तो ते करणाराच.
आपण नाही का, चर्चेला अगदीच काही प्रतिसाद नाही आले की एकमेकांना म्हणतो, ' यावर तुमचे मत अपेक्षित आहे' हे पण इर्जिकच! ;)
आपला
गुंडोपंत
धन्यवाद
इर्जिक शब्दाचा अर्थ सांगीतल्याबद्दल धन्यवाद. वास्तवीक ही कल्पना चांगलीच वाटते. त्यातून मनुष्यस्वभावामुळे येणारे गुणदोष कदाचीत येत असतील इतकेच.
शेती करणे: आतबट्ट्याचा धंदा
भारतात शेती हा एकंदरच फायद्याचा धंदा नाही. धरसोडीची सरकारी धोरणे आणि निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून राहणे यामुळे तो अधिकच आतबट्ट्याचा ठरत आहे. शेतीपेक्षा शेतकर्यांनी इतर व्यवसाय चोखाळणे फायद्याचे आहे.
कृषीमंत्री शरद पवार यांनीही आज हेच सांगितले आहे.
शेती करणे: कुठेही अवघडच
अमेरिकेत पण शेती कराणार्यांना सबसिडी लागते आणि युरोपातपण. वास्तवीक शेती हा मुलभूत धदा आहे कारण त्यावर सारे जगच अवलंबून असते. म्हणूनच आपल्याकडे "उत्तम सेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी" असे म्हणले जाते. कॉर्न खूप पिकवला जातो म्हणून प्रत्येकात कॉर्न सिरप घालायला लागले आणि आता प्रकृती स्वास्थ्यासाठी तो भाग कमी होऊ लागला तसे ते इथेनॉल इंधन म्हणून वापरू लागलेत. (वास्तवीक "इथेनॉल" तयार् करायला ऐकलेल्या माहीतीप्रमाणेजास्त उर्जा लागते!)
दुर्दैवाने या धंद्याला, इतर धद्यांच्या तुलनेत भाग-भांडवलासाठी पाहीले जाते. त्यात परत मोठे मासे - छोटे मासे वगैरे भाग आलाच.. वास्तवीक वातावरण बदलामुळे शेतीच्या अनिश्चतेत अजून फरक पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर आखणी केली पाहीजे असे वाटते, कारण हा संबंध राष्ट्राच्या अन्नधान्याचा आहे.
ईर्जिक
अभिजित धन्यवाद,
ईर्जिक बद्दल दिलेली माहिती बरोबर आहे.काही सदस्याना माहिती झाली.
अभिजित, दोन तीन शेतकरी मिळून जे शेती करतात ती ईर्जिक नव्हे. त्याला 'सावड'
म्हणतात. आणि हि पध्दत बंद होणे शक्य नाही.
अजून एक प्रश्न
अभिजीत आणी रामभाऊ नवीन माहीतीबद्दल धन्यवाद.
एक अजून (केवळ उत्सुकता म्हणून) प्रश्न: आपण उल्लेखलेले शब्द हे प्रादेशीक (महाराष्ट्रातील विशिष्ठ भागातील) आहेत का कूठल्याही भागात ते शब्द मराठी शेतकार्यांमधे प्रचलीत आहेत?
विकास
पवनाकाठ
इर्जिक हा शब्द मी गोनीदांच्या पवनाकाठचा धोंडी पुस्तकात वाचला होता. त्यावेळी मी दहावी वगैरेत होतो तेव्हा त्यामुळे आता कदाचित पुस्तकाचा संदर्भ चुकला असेल. वडिलांना इर्जिकचा अर्थ विचारल्यावर त्यांनी वरचे उत्तर दिले होते. . त्यात धोंडीला आपल्या शेतात इर्जिक घातलेली आवडत नाही.
पवनाकाठ म्हणजे साधारण पश्चिम महाराष्ट्रात हा शब्द वापरात आहे अस म्हणायला हरकत नाही. ही पद्धत सगळीकडेच या ना त्या नावाने चालू होती/असणारच. कारण विना सहकार नाही उद्धार हे माणसाला माहीत आहे.
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
पवनाकाठ
आम्हीही सध्या पवनाकाठचेच.
पवनामाई म्हणजे आमच्या चिंचवडमधून वाहते तीच ना... पवनामाईच्या घाटावर मोरया गोसावी मंदिरासमोरची भेळ घेऊन निसर्गनिरीक्षण करणे हा चिंचवडवासीयांचा छंदच आहे.
- पवनाकाठचा कर्ण
शुद्धलेखनाच्या १७.५ नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा व न पाळलेला अर्धा नियम शोधा.
ईर्जिक
विकास ,
हे शब्द पुणे, अ. नगर ,नासिक.या भागात वापर आहे. तसेच महाराष्टातील अन्य भागात ही वापर आसेल.