उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
भारताचा परतणारे वैभव - बिझीनेस ऍज युज्वल
विकास
August 4, 2007 - 8:49 pm
अधुनीक भारताच्या साठी निमित्त 'दी लास्ट मुगल: दी फॉल ऑफ ए डायनास्टी, दिल्ली १८५७' पुस्तक आणि त्यासाठी "डफ कुपर - ऐतिहासीक लिखाणाबद्दल पारीतोषीक" मिळवणारे विख्यात लेखक विल्यम डेलेर्म्पल यांचा खालील लेख "टाईम" या साप्ताहीकात प्रसिद्ध होत आहे:
Why India's Rise is Business As Usual
त्यांनी (तसे माहीत असलेले) मांडलेले काही मुद्दे:
- युरोपिअन्स आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाताहात झाली.
- १६०० मधे जेंव्हा ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनी स्थापन झाली - तेंव्हा ब्रिटीशांची वार्षीक वाढ (जीडीपी) जगाच्या १.८% होता तर भारताचा जगाच्या २२.५%.
- तेच आकडे १८७० मधे ब्रिटीशांचे ९.१% झाले आणि भारत इतिहासात प्रथमच अविकसीत राष्ट्र म्हणून गणले गेले.
- डॉलर्सच्या मोजण्यामधे, चीन अमेरिकेस २०३०/२०४० मधे मागे टाकेल तर भारत २०५० च्या सुमारास
- ब्रिटीशांमुळे जरी काही चांगल्या गोष्टी भारतात आल्या असल्या तरी त्यांनी लक्षात ठेवावे की त्यांनी भारताचा राजकीय, सांस्कृतीक नाश करून दारीद्र्य आणले.
- आता इतिहास परत बदल आहे. ब्रिटनमधला सर्वात मोठा श्रीमंत भारतीयच (लक्ष्मी मित्तल) आहे आणि सर्वात मोठी स्टीलची कंपनी पण भारतीयांच्या (टाटा) ताब्यात आली आहे.
छोटेखानी लेख भारताबद्दल खूप चांगले बोलतो, वाचताना बरे वाटते पण कुठेतरी भितीही वाटते की असे "परमवैभव" प्राप्त करून घेण्यासाठीवा आणि ते यशस्वीरीत्या पेलण्यासाठी, आजच्या भारताच्या "वुइ द पिपल" ची मानसीक आणि सांस्कृतीक (समाज, अर्थव्यवस्था, राजकीय) तयारी वरपासून ते तळागाळापर्यंत तयारी होत आहे का? २०२० सालासाठी आता फक्त १२ वर्षे राहीली आहेत...
दुवे:
Comments
मला असे वाटते...
२०२० पर्यंत भारत आर्थिक महासत्ता होईल असे मला तरी वाटत नाही. याची मला सुचतात ती कारणे अशी:
१. भारताचा आर्थिक विकास हा मुख्यतः सेवा क्षेत्र आणि औद्योगिक उत्पादन यांवर अवलंबून आहे आणि भारतीय लोकसंख्या मुख्यतः शेतीवर. या समतोल साधल्याशिवाय विकास तळागाळापर्यंत पोचणार नाही.
२. आळस आणि दर्जा बाबत तडजोड करण्याची वृत्ती
३. श्रमाला प्रतिष्ठा नसणे
४. शिस्त अंगी बाणवून घेण्याची सवय नसणे
५. आपल्या कामाबाबत प्रामाणिक निष्ठेचा अभाव.
सन्जोप राव
सहमत
सर्व कारणे पटण्यासारखी. भारत २०२० पर्यंत आर्थिक महसत्ता सोडाच पण प्रगत राष्ट्र होईल असे वाटत नाही. कागदोपत्री झालाच, तर ती आकडेवारी खोटी आहे असे बेलाशक समजा.
खरे आहे
१०० % खरे
कठोर आत्मपरीक्षण
मला वाटतं भारतीयांनी कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण
१) उद्योगक्षेत्रांत बर्याच मोठ्या प्रमाणावर अप्रामाणिकपणा आहे. लबाडीशिवाय धंदा होऊच शकत नाही अशी एक सार्वत्रिक समजूत आहे. त्या अंतर्गत जशी गिर्हाइकांची फसवणूक आहे तशीच मोठ्या उद्योजकांनी छोट्या उद्योजकांचे पैसे बुडवणे ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे काही मूठभर मोठे उद्योजक जगांत गाजतील पण सर्वसामान्य भारतीयाची उद्योजक म्हणून ओळख निर्माण होणे कठीण दिसते.
२) समाजकारण व राजकारण अनुनयी स्वरुपाचे आहे.
३) शिक्षणक्षेत्रांत गुणवत्तेपेक्षा सार्वत्रिकीकरणावर भर आहे.
४) इतर काही विकसित देशांच्या तुलनेंत सर्वसामान्य भारतीय इच्छाशक्तीच्या बाबतींत कमी असावा असे (मला) वाटते.
पटणारे मुद्दे
संन्जोप आणि शरद,
तुमच्या दोघांच्याही प्रतिक्रीया मुद्देसूद आणि पटण्यासारख्या आहेत. विशेष करून आर्थिक वाढ ही एकेरी होत चालली आहे (सेवा क्षेत्र आणि औद्योगिक उत्पादन )आणि अप्रामाणीकपणा/शिक्षण या बाबत.
कोर्डेसाहेबांचा, "इतर काही विकसित देशांच्या तुलनेंत सर्वसामान्य भारतीय इच्छाशक्तीच्या बाबतींत कमी असावा ", हा मुद्दा काही अंशी पटला तरी त्याही पेक्षा मला सध्या आपल्याला बेसावध (थोडासा आंधळा) आत्मविश्वास येत चालला आहे असे वाटते. दहा-बारा वर्षांपूर्वी, पाश्चात्य असेच "टायगर इकॉनॉमीज्" म्हणत मलेशीया आदींचे कौतूक करायचे. ते पण असेच आत्मविश्वासात गेले आणि नंतर तेच पाश्चिमात्य टायगर इकॉनॉमीज्चे काय चुकले यावर चर्चा करू लागले.
तात्पर्यः एखाद्या टाईम साप्ताहीकाने (तर कधी वॉलस्ट्रीटसारख्या दैनीकाने) चांगला लेख लिहीला म्हणून बरे वाटले तरी, हुरळून जाण्याचे कारण नाही (आज ही बातमी स्वतःची पाठ थोपटवत अनेक भारतीय वर्तमानपत्रात आली आहे). आपण कृण्वंतू विश्वं आर्यम् पण वास्तवात आणण्यासाठी तुर्तास आधी स्वतःला "आर्य" (म्हणजे नोबेल मॅन) करण्याची गरज आहे. "दिल्ली" नक्कीच गाठू शकू पण तुर्तास ती दूरच वाटते आहे...
भारताचा परतणारे वैभव - बिझीनेस ऍज युज्वल
भारतात कोथल्याहि राज्यात कोठल्याहि शहरात असाल तर भारत कुठे आहे हे स्पश्ट कळते .त्यासाठी "टाईम"वाचायला नको.
भारताच्या सर्वात मोठ्या धर्मात सर्व समस्याचे मुळ आहे .बाकि सर्व समस्या ह्या त्याचे लक्शण आहे .जोवर आपण मूळावर् इलाज
करत नाहि तोवर २०२०काय २२०० आले तरि काही फरक पडणार् नाहि.
म्हणजे काय?
भारताच्या सर्वात मोठ्या धर्मात सर्व समस्याचे मुळ आहे .
म्हणजे काय बॉ?
नीट सांगा कळले नाही...?
आपला
गुंडोपंत
म्हणजे काय बॉ?
क्रुपया अधिक माहीतीसाठी 'मनस्म्रुती 'हा ग्रन्थ वाचा.
चर्चा भरकटवू नये
कृपया चर्चा भरकटवू नये..मनुस्मृती वाचलेली आहे अस समजून त्यातल्या नेमक्या कशामुळे उद्योजकतेचा र्हास होतोय हे स्पष्ट करावे. की आम्हीच वाचू आणि आम्हीच तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेऊ? अशाने काय साध्य होणार आहे?
अभिजित...
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.
असंबद्ध...
क्रुपया अधिक माहीतीसाठी 'मनस्म्रुती 'हा ग्रन्थ वाचा.
कृपया आधी आपण चर्चा कशावर चालली आहे ते वाचा. उगाच स्वतःच्या मनातील द्वेष दाखवण्यासाठी या चर्चेचा वापर करू नका. एकवेळ येथे थट्टा-मस्करी चालेल, योग्य ठिकाणी टिका पण आवश्यक आहे, पण तुमच्या सारखी माणसे जेंव्हा द्वेष पसरवतात तेंव्हा स्वतःचे आणि देशाचे नुकसान करतात. तेंव्हा कृपयाबोटे मोडणे आणि आणि उगाच शिळ्या कढीला उत आणून उरबडवेगिरी करणे थांबवलेत तर तुमच्यासाठी पण बरे राहील....
भारतात सध्याच्या घडीला स्वतःस कर्मठ म्हणणार्यांनी पण मनुस्मृती वाचली असेल का हा एक संशोधनाचा विषय आहे, ती आचरणात आणणे तर लांब राहीले. अनेक स्मृती भारतात कालपरत्वे लिहील्या गेल्या होत्या. त्यातील मॅक्समुल्लरला आणि ब्रिटीशांनी फक्त एकच भाषांतरीत केली म्हणून त्याचा गवगवा होतो.
अधिक बोलायचे असेल तर चर्चा चालू करा आणि ती चालू करताना मुद्देसूद लिहा, आम्ही उत्तरे देऊ - मनूस्मृतीच्या बाजूने नाही, पण तीचा सध्यस्थितीसाठी उअहापोअह करणे हा कसा खुळचटपणा आहे ते दाखवण्यासाठी...
आता थोडे वरील चर्चेसंबंधात आणि त्यात आपण केलेल्या मनुस्मृतीचा असंबद्ध उल्लेखाबद्दल:
अजून बरेच काही लिहीता येईल पण आपण जर काही मुद्देसूद लिहीलेत तर त्याला प्रतिक्रीया म्हणून...
वा! सहमत!
अधिक बोलायचे असेल तर चर्चा चालू करा आणि ती चालू करताना मुद्देसूद लिहा, आम्ही उत्तरे देऊ -
विकासराव हा प्रतिसाद आवडला. कलकत्ता कम्युनिस्टांचा तर एकदम खास! ;)
बाकी सर्व मुद्दे सहमत आहे!
आपला
चर्चेखोर
गुंडोपंत