दळणवळण - इन्फ्रास्ट्रक्चर

  1. काही दिवसांपुर्वी मुंबईतील (बोरीवली, "लक्ष्मीछाया") एक इमारत बघता बघता पडली असे अगोदर् पण झाले आहे.
  2. जपान मधे भूकंपाच्या वेळेस सर्वात मोठा (जगातला का जपानमधला माहीत नाही) न्यूक्लिअर रिऍक्टर मधले किरणोत्सर्गी पाणी बाहेर् पडले
  3. बॉस्टन भागात हायवेज वर मॅनहोल्स आणि कचर्‍यामुळे अपघात वाढल्याचे आता जाणवायला लागले असून त्यावर कारवाया करणार आहेत. (मधल्याकाळात एका नव्याने बांधलेल्या भूयारी रस्त्याची स्लॅब पडून एक बाईचा मृत्यू झाला होता)
  4. काल अमेरिकेत मिनिऍपोलीस मधे ऐन रहदारीच्या वेळेस मिसिसिपी नदीवरचा पूल पत्त्याच्या बंगल्या सारखा कोसळला. जसे त्यात दुर्दैवी जीव आहेत तसेच चमत्कार म्हणण्या सारखे ६० मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस कशीबशी वाचली आणि ती ही रेडक्रॉसच्या कचेरीसमोर.

मिनिआपोलीसचा व्हिडीओ खाली बघता येईलः

पण या आणि अशा घटना बघताना जाणवते की आपण जिथे राहतो तिथे, काम करतो तोथे आणि ज्या दळणवळणाचा उपयोग करतो ते, सर्व नीटपणे सांभाळले जात आहे की नाही हे समजावून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे. घराच्या बाबतीत स्वतःची असेल तर बाहेरच्या गोष्टींबद्दल नगरसेवक, आमदार इत्यादींच्या मागे लागणे (आणि त्यासाठी आधी मतदान करायला लागणे) आणि तसे जागृक गट तयार करणे आणि स्वतःबरोबर लोकशिक्षण करणे महत्वाचे आहे कारण नंतर पंचनामा करून काहीच उपयोग होत नाही.

आपल्याला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

बरोबर आहे

वाईट ह्या गोष्टीचे वाटते की समजा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली लोकप्रतिनीधी मंडळी असतील तर ह्या लोकांशी चर्चा विचारविर्मश नको वाटतो हो. एकदा अनुभव असा होता की आम्ही काही लोकांनी जाऊन चर्चा केली, त्यात लोकप्रतिनीधीसाहेबांचे खूप कमी लक्ष होते, १० वेळा तरी कोणीना कोणी कार्यकर्तेंमंडळी त्यांना काही सांगत होती, मोबाईल फोनवर बोललेच पाहीजे, समोरच्या लोकांना काय कामधंदा...असो ना काम झाले, ना योग्य मार्गदर्शन, ना खोटी सहानुभुती...काम महानगरपालीकेतल्या एका अधिकार्‍याने शेवटी खुप खेटे मारल्यावर केले.

जागृक गट, तसेच त्या भागातील सरकारी खात्यातुन माहीती व दाद मागायची संधी मिळणे हे उत्तम.

प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग

जागरूकता वाढवण्यासाठी आणि आपले म्हणणे संबंधित लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करता येणे शक्य आहे. मुद्रित माध्यमे याकामी अधिक उपयोगाची आहेत. (इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांना इतर बिनमहत्त्वाचे विषय चघळण्यातच आनंद वाटतो) टाइम्स ऑफ इंडिया सारखी वृत्तपत्रे सरकार, मंत्री, नगरसेवक, कंत्राटदार यांच्या उदासीनतेशी संबंधित बातम्या मिळवण्यासाठी आतूर असतात आणि वृत्तपत्रांनी मुद्दा उचलून धरला की जनजागृती होण्यासही मदत होते.

 
^ वर