विभागीय वाहतूक कार्यालय
पर्वा मित्रासाठी दुचाकी लायसन्स काढण्यासाठी वाहतूक कार्यालयात जाण्याचे ठरले.महिन्या अगोदर पूर्णं वाहतूक कार्यालय संगणीकृत केले अस पेपरात वाचलं होत त्यात संगणकामुळे सर्व कारभार चोख होईल भ्रष्टाचार होणार नाही लायसन्स काढताना दलालाची आवश्यकता लागणार नाही अस सगळं वाचण्यात आलं होत. तरी तिथे जाण्याअगोदर सर्व माहिती मिळवली होती रांगेत उभे राहून लायसन्स मिळवले तर ५० रु. पर्यंत खर्च येणार होता. दलाला कडून करून घेतल्यास २५० रु खर्च येतो. तिथे पोहचल्यावर आमच्या आधी माझे काही मित्र लायसन्स घेण्यासाठी पोहचले होते त्यातल्या एकाने तर कामावर सुट्टी घेतली होती. दोन तास सर्व रांगेत उभं राहून ही त्यांना पासपोर्ट आणला नाही म्हणून शेवटच्या रांगेत लायसन्स देण्यास नकार दिला. दलाला कडून माहिती मिळवली असता पासपोर्टची काही आवश्यकताच नव्हती २ फोटो, रेशन कार्ड, शाळेचा दाखला आई वडिलापैकी कोणाचे ही इलेक्शन कार्ड, या गोष्टी आवश्यक होत्या. आमच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मुलींना सकाळ पासून पूर्णं वाहतूक कार्यालय फिरवायला लावले त्यांना पके लायसन्स हवे होते. पके लायसन्स काढताना गाडी चालवण्याच्या परीक्षेत चुका दाखवून लायसन्स देत नाही अस हि ऐकण्यात आलं.फार पूर्वी आमच्यातल्याच एका मित्राने दलाला पैसे द्यावे लागतात मगच काम होत हे बघून ऑफिसरच्या कार्यालयात जाऊन शिव्या घातल्या होत्या तेव्हा कुठे त्याला लायसन्स मिळाले होते.
रांगेत उभे राहिल्यावर हे नाही ते नाही अशी कारणे देऊन फटकारतात पण हिच माणसं दलाला कडून गेल्यावर बरोबर काम करतात यात मुलींनाही समान कायदा लागू होतो. आम्ही शेवटी दलाला कडूनच लायसन्स घेतले. पासपोर्ट बनवताना पोलिसांना १०० रु द्या, लायसन्स काढताना दलाला पैसे द्या, गाडी चालवताना वाहतूक हवालदाराला पैसे द्या.
या सगळ्यांना पैसे वाटण्यासाठी निदान मराठी माणसाचा आणि सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा जातो याचंच वाईट वाटत.
Comments
नमस्कार
मी माझा
१) विदाउटगिअर दुचाकी वाहनाचा शिकावू परवाना,
२) विथ् गिअरचा दुचाकीचा शिकावू परवाना + कार चा शिकावू परवाना,
३) कार+विथ् गिअर दुचाकिचा एकत्र पक्का परवाना,
(वेगवेगळ्या वेळेस) रांगेत उभे राहून, सर्व योग्य कागदपत्रे प्रत्येक वेळी एका दमात दाखवून, दलालाला एक ही पैसा न देता अथवा त्याची मदत न घेता आणि एका पेक्षा जास्त खेपा न घालता कोणालाही लाच न देता मिळवले आहेत. (मला मिळाले आहेत.)
या घटना पुण्यातील आहेत.
पासपोर्ट साठी मात्र त्या पोलीसाने इतर पोलिसांसमोरच पोलिस चौकितच माझ्या कडून १०० रुपये घेतले.
--लिखाळ.
जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!
अगदी असेच
वाहन परवाना मिळवताना कसलीही लाच द्यावी लागली नाही अथवा दलाला मार्फत जावे लागले नाही.
पारपत्र मिळवण्यासाठी मात्र पोलिसाने १०० रुपये मागुन घेतले होते.
माहिती नाही
माझा वाचन परवाना एजंटामार्फत झाला त्यामुळे हे सर्व माहिती नाही. पण पासपोर्ट ला पोलीस चौकीत एक पैसाही द्यावा लागला नाही आणि रेशनकार्ड मात्र दाखवावेच लागले त्याशिवाय पोलीस शहानिशा पूर्ण होणार नव्हती. रेशन कार्डाच्या इथे ही एकही पैसा द्यावा लागला नाही.
(सुदैवी)अनु
वाहन परवाना
वाहन परवाना माझा मी पैसा न द्यायला लागता काढला. कोणी मागीतले नाही.
पासपोर्ट साठी मात्र त्या पोलीसाने प्रत्यक्ष पोलीसमुख्यालयात "आता तुमच काम झाल. तुमचा फॉर्म आम्ही मुंबईला पाठवणार, तुम्ही जाणार परदेशात मग आम्हाला काही.. हॅ ह्यॉ..हॅ ह्यॉ" असे म्हणल्यावर आयुष्यात पहिला लाच अनुभव आला, पण गंमत म्हणजे माझ्या खिशात खरेच पैसे नव्हते, मी म्हणालो " ओ मला माहीती नव्हते अजुन लागतील. ही कुठली फी, तुम्ही म्हणालात नुस्ते येउन जा..माझे बाळबोध चेहर्याने मोकळे पाकीट दाखवले..पुढे म्हणालो "बर तुम्ही इथे कधी असणार चार वाजता आलो तर असाल का" कोणीतरी त्याला हाक मारली , हो असेन म्हणुन तो गेला.... अजुन चार वाजायचेत ... नाना फडणवीस....
हातात पासपोर्ट येईपर्यंत धडधड होती पण माझ्यावर ईश्वरकृपा जबरदस्त....
हाच पोलिसमामा घराचा पत्ता तपासणी करायला आधी घरी आला होता, आल्याआल्या म्हणाला होता अहो किती वेळ लागला तुमचे घर शोधायला...(पुर्ण पत्ता भारतीय स्टाईलने अमुकच्या शेजारी, तमुकच्या मागे होता, अजीबात अवघड नव्हते.) मनात म्हणले लेका पत्ता सुध्दा सापडत नाही म्हणुन तर तुला ह्या खात्यात टाकला नाही तर महत्वाच्या तपासाला नसता का पाठवला...
हा हा हा
फारच मजेशिर