आपलं मत काय?
राम राम मंडळी,
उपक्रमाच्या एखाद्या सभासदाने एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले (उदा एखाद्या पदव्युत्तर परिक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे, एखाद्या सभासदाचे लेखन एखाद्या दर्जेदार मासिकात किंवा वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे, एखाद्याचे एखाद्या कलेमध्ये नोंद घेण्याजोगे काम, इत्यादी) तर त्याच्या कामाची नोंद घेणारा, कौतुक करणारा एखादा स्वतंत्र लेख वजा चर्चाप्रस्ताव उपक्रमावर यावा असे आपल्याला वाटते का?
एखाद्याने असे विशेष प्राविण्य मिळवल्यास इतर सभासद साहजिकच त्या सभासदाचे अभिनंदन करू इच्छितात. अश्या परिस्थितीत केवळ तो/ती एक सभासद आहे या एकाच कारणास्तव त्याच्या कामाचा स्वतंत्र उल्लेख न करता सदर उल्लेखाचे स्थान गावाबाहेर जसा महारवाडा असतो तद्वत 'आपापसात' सारख्या एखाद्या सदरात असावे?
आपल्याला काय वाटते?
की उपक्रमाच्या कोणत्याही सदस्याने असे काही कौतुकास्पद काम केल्यास त्याबाबतच्या उच्चाराला उपक्रमावर संपूर्ण बंदीच असावी?
आपल्याला काय वाटते?
उदाहरणार्थ, समजा नारळीकरसाहेब उपक्रमाचे रेग्युलर सभासद आहेत. त्यांना जर एखादा विशेष पुरस्कार मिळाला तर त्याबद्दलचा अभिनंदनपर लेख उपक्रमावर जाहीरपणे यावा की केवळ ते उपक्रमाचे एक सभासद आहेत या सबबीखाली असा लेख येऊ नये?
आपल्याला काय वाटते?
उपक्रमावर 'आपापसात' सारखे सदर असावे का? असल्यास नारळीकरसाहेबांच्यावरचा अभिनंदनपर लेख स्वतंत्र यावा की केवळ ते एक सभासद आहेत म्हणून 'आपापसात' मध्ये जावा?
आपलं मत काय?
ता क - आमच्या एका मैत्रिणीबद्दलचा कौतुकपर लेख आम्ही लिहिला आहे आणि मंजुरीकरता सदर लेख गेले दोन दिवस उपक्रमरावांच्या परवानगीची वाट पाहात आहे. त्यांनी परवानगी दिल्यास सदर लेख इथे प्रसिद्ध करण्यास आम्हाला आनंद वाटेल! आता उपक्रमराव काय निर्णय देतात ते लवकरच कळेल. आम्ही उपक्रमरावांच्या कोणत्याही निर्णयाचा सन्मानच करू आणि त्यांचा निर्णंय आम्हाला अर्थातच मान्य असेल. In the meantime आम्हाला वरील चर्चाप्रस्ताव सुचला! :)
आपला,
(न्यायप्रिय!) तात्या.
Comments
निव्वळ उद्दामपणा
आमचे मत... जाहिर विचारलेत म्हणून...
असा चर्चा विषय सुरू करणे म्हणजे निव्वळ उद्दामपणा आहे. उपक्रमाची ध्येय-धोरणे जाहिर असुनसुद्धा असा विषय चर्चेला टाकणे याचा नक्कि हेतु काय? या बद्दल शंका आहे. हे निव्वळ खोडसाळपणाचे कृत्य आहे दुसरे काही एक नाही.
उपक्रम पंतांना जाहिर विनंती कि आपण यावर योग्य ती कारवाइ करावी. तसेच असे काही मुद्दे वारंवार येणार असतील तर ते अशा सदस्यांनी आणि उपक्रम पंतांनी व्य. नि. ने आपापसात सोडवून घ्यावे अशी जाहीर विनंती.
मराठीत लिहा. वापरा.
चाणक्या,
चाणक्या,
असा चर्चा विषय सुरू करणे म्हणजे निव्वळ उद्दामपणा आहे.
तो कसा काय? या सबंध चर्चाविषयात तुला उद्दामपणा कुठे दिसला ते कळेल का?
उपक्रमाची ध्येय-धोरणे जाहिर असुनसुद्धा असा विषय चर्चेला टाकणे याचा नक्कि हेतु काय?
उपक्रमाची ध्येयधोरणे जाहीर आहेत हे आम्हालादेखील माहीत आहे. परंतु त्यात काही बदल करावा असेही उपक्रमकर्त्यांना वाटू शकतेच ना? ह्या चर्चविषयामुळे, यातील प्रतिसादींचे विचार पाहून उपक्रमपंतांना असा एखादा बदल करावासा वाटल्यास त्यात काय वावगे आहे?
हे निव्वळ खोडसाळपणाचे कृत्य आहे दुसरे काही एक नाही.
कसे काय?
मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाची टिप्पणी करणारा मजकूर आणि उपप्रतिसाद वगळले आहेत. प्रतिसाद देताना ते उपक्रमाच्या ध्येय-धोरणांशी सुसंगत राखण्याची कृपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी.
असो..
तात्या.
खोडसाळपणा, उद्दामपणा!
मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाची टिप्पणी करणारा मजकूर आणि उपप्रतिसाद वगळले आहेत.
अच्छा! म्हणजे उपक्रमरावांच्या मते खोडसाळपणा, उद्दामपणा हे शब्द व्यक्तिगत स्वरुपाच्या टिप्पणीत बसत नाहीत म्हणायचे! :)
छान छान! :)
आपला,
(खोडसाळ आणि उद्दाम!) तात्या.
पटतय का?
कोंबड आरवल (बरोबर का?) नाही तर सुर्य उगवायचा थांबणार आहे का?
उपक्रमवर (किंवा अन्य कोठे) कोणाच्या विशेष प्राविण्याचे कौतुक , उल्लेख झाला अथवा नाही झाला तरी त्या व्यक्तिचे कर्तुत्व , प्रयत्न विफल किंवा त्याची किंमत कमी होते का? माझे मत म्हणाल तर नाही होत.
नुसते नोंद घेणे , कौतुक करणे ह्या पेक्षा, जे महत्वाचे कार्य त्या व्यक्तिने केले आहे ते पुढे नेणे, त्या अनुषंगाने अजुन चर्चा, लेख हे चांगले नाही का?
लेखन एखाद्या दर्जेदार मासिकात किंवा वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे, विशेष पुरस्कार मिळणे ....अन त्याची जाहीर नोंद घेणे , कौतुक करणे .........मी तरी personally अभिनंदन करीन.
BTW असे नक्की काय घडले आहे त्याची उत्सुकता आहे. शेखरराव जमल्यास व्यनि पाठवा. :-)
गेले दोन दिवस ..वाट पाहात आहे ...श्रद्धा , प्रेम, सबुरी.... :-) मी पण तुमच्या व्यनिची वाट पहात आहे.
ह. घ्या.
म्हणणं खरं आहे..
उपक्रमवर (किंवा अन्य कोठे) कोणाच्या विशेष प्राविण्याचे कौतुक , उल्लेख झाला अथवा नाही झाला तरी त्या व्यक्तिचे कर्तुत्व , प्रयत्न विफल किंवा त्याची किंमत कमी होते का? माझे मत म्हणाल तर नाही होत.
सहजराव, तुमचं म्हणणं ही खरं आहे. पण उल्लेख आला म्हणून तरी बिघडलं कुठे?
....अन त्याची जाहीर नोंद घेणे , कौतुक करणे .........मी तरी personally अभिनंदन करीन.
नक्कीच. अहो पण त्याकरता ते समजलं तर पाहिजे ना सर्वांना!
गेले दोन दिवस ..वाट पाहात आहे ...श्रद्धा , प्रेम, सबुरी.... :-) मी पण तुमच्या व्यनिची वाट पहात आहे.
कामाच्या गडबडीत राहून गेलं. एका उद्दाम अन् खोडसाळ माणसाला आवर्जून पाठवलेल्या आपल्या व्य नि बद्दल अनेक आभार! :)
व्य नि चे उत्तर लवकरच उत्तर पाठवतो..
तात्या.
कौतुक झाले पाहिजे.
उपक्रमवर (किंवा अन्य कोठे) कोणाच्याही विशेष प्राविण्याचे कौतुक झालेच पाहिजे.आम्ही अशा चर्चा प्रस्तावाचे स्वागत करु.उपक्रमपंत अशा उपक्रमांना प्राधान्य देतील. कारण विशेष प्राविण्य कशात आहे,याची माहिती सर्व उपक्रमींना आणि वाचकांना होईल असे वाटते.आणि अशी माहिती ध्येय धोरणात बसते असे आमचे मत आहे.
कापूसकोंड्याची
यावरुन कापूसकोंड्याची गोष्ट आठवली... सांगू का? ;)
लेखनविषयक शंका
लेखनविषयक शंका निरोपातून कळवणे योग्य आणि अनुकरणीय आहे. निरोपांना शक्य तितक्या लवकर उत्तर पाठवण्याचा प्रयत्न असला तरी विविध कारणांनी प्रत्येकवेळी विशिष्ट कालावधीत उत्तर पाठवणे शक्य होत नाही. यासंदर्भात सदस्यांकडून संयमाची अपेक्षा आहे. विशिष्ट कालावधीत उत्तर आले नाही तर पुन्हा निरोपातून चौकशी करावी, अश्या स्वरूपाच्या चर्चा सुरू करू नयेत.
ठीक ठीक!
विशिष्ट कालावधीत उत्तर आले नाही तर पुन्हा निरोपातून चौकशी करावी, अश्या स्वरूपाच्या चर्चा सुरू करू नयेत.
ठीक ठीक! :)
तात्या.
ओंकार जोशीचे कौतुक..
असा एक "चर्चेचा प्रस्ताव" नव्हता का पूर्वी मांडला गेला !!
मांडा की मग अजून एक
त्यांची गोष्ट वेगळी..
असा एक "चर्चेचा प्रस्ताव" नव्हता का पूर्वी मांडला गेला !!
मांडा की मग अजून एक
अहो पण ओंकाररावांची गोष्ट वेगळी! कारण ओंकारराव गमभनकार आहेत, शिवाय त्यांचा उपक्रमाच्या संपादक मंडळातदेखील सहभाग आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या चर्चाप्रस्तावाला विरोध होणार नाही याची आम्हाला कल्पना होती आणि म्हणूनच आम्ही तो चर्चाप्रस्ताव टाकला होता.
पण यावेळेस उपक्रमाच्या एका सामान्य सभासदाबद्दल लिहायचे होते म्हणून आम्ही उपक्रमपंतांकडे रीतसर परवानगी विचारली होती. त्यांनी ती नाकारली असून व्यक्तिनिरपेक्ष कौतुकाचा एखादा चर्चाप्रस्ताव बनवा आणि त्यात सदर उपक्रमीबद्दल लिहा असे आम्हास सुचवले आहे!
असो...
तात्या.
म्हणजे काय?
म्हणजे काय आणि नेमका कसा?
अहो म्हणजे कॉमन हो!
अहो म्हणजे एखादा कॉमन चर्चाप्रस्ताव हो, ज्यात सर्वच उपक्रमींच्या विशेष प्राविण्याबद्दल वगैरे लिहिता येईल! :)
आपला,
(बटाट्याच्या चाळीतला थोडी घाईगर्दी असलेला!) तात्या. :)
हे कसं बुवा जमणार ?
व्यक्तिनिरपेक्ष कौतुक? ते कसं करायचं असतं? म्हणजे "**** यांना सुवर्णपदक मिळाले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन" असा प्रस्ताव मांडायचा? मग गळालेल्या जागा भरा अशी एक नवीन तर्कक्रिडा सुरू करायची?
आज समजा एका सदस्याबद्दल आपण लिहिलंत आणि २ महिन्यांनंतर अन्य एखाद्या सदस्याबद्दल मला लिहायचं असेल तर मग मी ते कसं करणार? आपला आधीचा 'कॉमन' चर्चा प्रस्ताव परत पुढे सुरु करणार? की परत तर्कक्रिडा १, तर्कक्रिडा २ ?
नेमका कसा ?
अहो म्हणजे कॉमन हो!
अहो म्हणजे एखादा कॉमन चर्चाप्रस्ताव हो, ज्यात सर्वच उपक्रमींच्या विशेष प्राविण्याबद्दल वगैरे लिहिता येईल! :)
एकाच वेळी दोन प्रश्न सारखे आले,आणि त्याचे उत्तर तात्यांनी दिल्यामुळे त्यातला माझा प्रश्नाचा प्रतिसाद काढतो आहे.
कौतुकास्पद चर्चाप्रस्ताव
चर्चेच्या प्रस्तावाबद्दल सदस्यांची मते अजमावणा-या चर्चांचे जे सदस्य प्रस्ताव मांडतात, त्यांबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे. त्यांचे मी कीबोर्डभरून कौतुक करू इच्छितो. कुठल्याही विशिष्ट व्यक्तीस उद्देशून हे मी म्हटलेले नाही. परंतु "अलभ्य" ह्या शब्दातील एक अक्षर सदर व्यक्तीच्या आडनावात असेल, व त्याच व्यक्तीस बोंबिल आवडत असेल, तर आमचा आदर द्विगुणित होतो. अशी कोणि व्यक्ति कुठे असेल तर तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
असो.. झालं गेलं गंगेला मिळालं, हा घ्या कॉमन चर्चाप्रस्ताव! :)
लोकहो,
उपक्रमरावांनी सुचवल्याप्रमाणे इथपासून पुढे सदर चर्चाप्रस्ताव हा उपक्रमी मंडळींच्या
विशेष प्राविण्याचे कौतुक करणारा एक कॉमन चर्चाप्रस्ताव समजावा!
आम्ही लिहू इच्छित असणारा लेख खालीलप्रमाणे. आता तसं म्हटलं तर यात माहितीही पुरवली गेली आहे जी उपक्रमच्या ध्येयधोरणात बसते. परंतु ही माहिती केवळ एका उपक्रमीबद्दल आहे त्यामुळे या लेखाला उपक्रमावर स्वतंत्र स्थान नाही!
असो...आम्ही उपक्रमरावांच्या इच्छेचा आदर करतो...
आम्ही लिहू इच्छित असणार लेख खालीलप्रमाणे. या माहितीवरून सभासदांनी सदर उपक्रमीचे इथेच अभिनंदन करावे ही विनंती..
--तात्या.
राम राम मंडळी,
आजचा दिवस आहे आपल्याच एका उपक्रमी सदस्याचे कौतुक करण्याचा!
सातीचे कौतुक! अगदी मनापासून...!
उपक्रमावरील एक सदस्या सातीचे मी मनापासून अभिनंदन करत आहे. नुकतीच सातीने मुंबई विद्यापिठातून 'M.D.(Medicine)' ही डॉक्टरी उच्चपदवी प्रथम वर्गात संपादन केली आहे! या पुढील सहा महिने ती मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात महत्वाच्या पदावर कार्यरत असणार आहे.
रत्नागिरीजवळील खेड्यात लहानपणापासूनच अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये, परंतु तेवढ्याच जिद्दीने, मेहनतीने आणि कष्टाने M.D. (Medicine) पर्यंतची उच्चविद्या सातीने संपादन केली आहे याचा एक उपक्रमी म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो.
सातीच्या यजमानांचेही (ते उपक्रमावरील सदस्य नसून केवळ वाचक आहेत) मनःपूर्वक अभिनंदन! ते ही नुकतेच M.D. ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत, एवढंच नव्हे तर त्यात त्यांना मुंबई विद्यापिठाचे सुवर्णपदक मिळाले आहे! त्यांनी 'चेस्ट टी बी' या विषयात प्राविण्य मिळवले असून तेही हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात क्षयरोग तज्ञ म्हणून सहा महिने काम पाहणार आहेत! त्यांचंही मनःपूर्वक अभिनंदन!!
अहो ते जरी उपक्रमाचे सदस्य नसले तरी उपक्रमाचे जावई तर आहेतच की! :)
सातीने आणि तिच्या पतिदेवाने त्यांच्या क्षेत्रातील माहितीपूर्ण लेख (वैद्यक क्षेत्रातील अपडेटस् वगैरे) उपक्रमावरही वेळात वेळ काढून अवश्य लिहावेत अशी मी त्यांना विनंती करतो.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वर्ष-सहामहिन्यांनंतर ते दोघेही इथे मुंबईसारख्या शहरात न राहता खेडेगावात जाऊन आपला व्यवसाय करणार आहेत. मंडळी, ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते. आजही महाराष्ट्राच्या खेडोपाडी उतमोत्तम डॉक्टर्सची नितांत आवश्यकता आहे! असो..
ते दोघेही सायन हॉस्पिटलच्या होस्टेलमध्ये राहून शिकत होते त्या काळात मी त्यांना अनेकदा भेटलो आहे. अगदी छान कपल आहे! :) सायन हॉस्पिटलसारख्या दिवसरात्र गजबजलेल्या हॉस्पिटलमध्ये वेळप्रसंगी लागोपाठ दोन दोन पाळ्यात ड्युटी करून त्यांनी हे विशेष प्राविण्य मिळवले याचे खरंच कौतुक वाटते!
त्या दोघांच्याही परिक्षापूर्व अभ्यासाच्या काळात मी त्यांना 'उत्तम अभ्यास करा आणि झकास पास व्हा!' अश्या शुभेच्छा उपक्रमातर्फेही दिल्या होत्या बरं का! :)
असो,
आपला,
(खोडसाळ आणि उद्दाम!)
डॉ. तात्या अभ्यंकर! :)
अभिनंदन आणि धन्य्वाद
साती आणि त्यांचे पती या दोघांचेही अभिनंदन तसेच असेच यश पुढे लाभावे अशी शुभेच्छा!
तात्या वरील माहीती सांगीतल्याबद्दल आभार!
विकास
भारतीय डॉक्टर
सर्वप्रथम "कपल"ऑफ डॉक्टरांचे मनपुर्वक अभिनंदन! (व्यक्तिनिरपेक्ष कौतुक? अट पुर्ण?)
भारतीय डॉक्टर:-
आज देश विदेशातील डॉक्टर पाहुन आज मी नक्की म्हणु शकतो कि भारतीय डॉक्टर सर्वोत्तम आहेत. माझ्या लहानपणी तरी डॉक्टर म्हणजे नेक्स्ट टु गॉड असेच मानले जायचे. समाजातील इतर क्षेत्रासारखे हे क्षेत्र देखिल थोडे फार गढुळ होत असले तरी अजुनही बर्याच प्रमाणात भारतीय डॉक्टर सर्वोत्तम आहेत.
खेडेगावात जाऊन आपला व्यवसाय करणार आहेत
नक्कीच कौतुकास्पद.
माझे मत मात्र असे की खेडेगावात चांगल्या वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर "योग्य त्या मार्केट मधे व्यवसाय" करून आधि बक्कळ कमवा. चांगली कल्पना, ईच्छा सर्वांच्या (especially सामान्य लोकांच्या) मनात असते, पण ह्या जगात "मनी"($$) असला कि बर्याच गोष्टी नीट जमुन येतात. मी हे एकदम पॉझीटीव्ह बोलतोय हा. गेरसमज नसावा. खेडेगावात "राहून" जरूर गरीब लोकांची सोय करा पण एक वॉर्ड श्रीमंत पेशंट साठी ठेवा (medical tourism term) म्हणजे गरीब लोकांचा वॉर्ड देखिल नीट राखला जाईल तुम्हा दोघांच्या सुरक्षीत भविष्यासकट. ह्यात काही चुकीचे नाही. व्यवसाय हा वाईट शब्द नाही. व्यावसायीकता (भांडवलशाही) अन समाजसेवा (आर्दशवाद) ह्याचा संगम झालाच पाहीजे. एकाशिवाय दुसरे कठीण. सगळ्याच अवचटांना पुलंच सहाय्य मिळतेच असे नाही. मी हे एकदम पॉझीटीव्हली बोलतोय हा.
करीयरबाबतीत तर तुम्ही यशस्वी व्हाल यात शंकाच नाही पण माझ्या शुभेच्छा तुमच्या सुखी आयुष्यासाठी!!! एकमेकांचे दीपस्तंभ बना!! सर्व स्वप्न खरी होतील.
सोपा उपाय
आपल्या समाजात आत्मस्तुती वा आत्मप्रसिद्धी हा दोष मानल्याने, पुरस्कार ही प्रथा चालू झाली आहे. 'क्ष 'यांना 'य' पुरस्कार त्याची परतफेड म्हणून य यांना क्ष पुरस्कार. विद्वत्ता हा देखिल मार्केटिंगचा विषय आहे. नाही तर तुमची विद्वत्ता तुमच्या पाशी. विचारतो कोण? साहित्यसंमेलनातील मानापमान नाट्य , पुरस्कारातील राजकारण, समाजकारण हे पुर्वी पासून चालत आलेले आहे. आज प्रसिद्धिच्या झोतात असलेली मंडळी उद्या अनुल्लेखाच्या काळोखात कधी जातील हे सांगता येत नाही. तरी देखिल उपक्रमींच्या कौतुक करण्याला पायबंद असू नये असे मनापासून वाटते, शेवटी उपक्रम हे देखील एक कुटुंब आहे. सातीचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
अवांतर -( अंनिस त शुभेच्छा शब्द वापरणे अशुभ मानले जाते म्हणून इथे वापरुन घेतला.)
प्रकाश घाटपांडे
अभिनंदन
तात्यांनी ही बातमी इथे दिल्याबद्दल त्यांचे आभार.
साती आणि श्री. साती या दोघांचे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
--लिखाळ.
जय स्वावलंबन ! कष्ट करा ... कष्ट करा !!
अभिनंदन
श्री व सौ साती यांचे अभिनंदन !!
अधिक माहिती
निरोपातील अर्धवट माहिती प्रसृत झाल्याने गैरसमज होऊ नयेत म्हणून निरोपातील अधिक माहिती इथे देण्यात येत आहे.
उपक्रमींच्या चांगल्या कार्याचा परिचय, गौरव व्हावा, उल्लेखनीय यशाचे कौतुक व्हावे आणि त्याचबरोबर उपक्रमाचे स्वरूप अबाधित राहावे यासाठी अशी भूमिका घेण्यात आली आहे, जी विचारांती सर्व सदस्यांना पटेल असा विश्वास आहे.
सदस्यांनी व्यवस्थापनाच्या आणि संपादन मंडळाच्या प्रतिसादामागील भूमिका, आशय समजून घेऊन, प्रसंगी शंका/प्रश्न योग्य मार्गाने सोडवून घेऊन त्यांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे.
शेवट गोड
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चला. ज्याचा शेवट गोड ,ते सारेच गोड. (ऑल इज वेल दॅट एण्ड्स् वेल.)
असं म्हणता?
चला. ज्याचा शेवट गोड ,ते सारेच गोड. (ऑल इज वेल दॅट एण्ड्स् वेल.)
असं म्हणता? च्यामारी चला करून टाकू शेवट गोड! साला वालावलकरशेठ, आपण तुमच्या शब्दाबाहेर नाय! :)
तुमचाच,
तात्या.
अर्रर्र.. चुकलं बघा! :))
तुमचाच,
(काय म्हणतात ते बरं? हां, खोडसाळ आणि उद्दाम!)
-तात्या अभ्यंकर.
:)