ललुआ म्हणतो : मराठी युवक लायकीचे नाही ...

लालूप्रसाद यादव मुम्बई बमविस्फ़ोट की बरसी पर मातमपुर्सी के लिये आये थे, वहाँ विलासराव देशमुख के सामने उन्होंने कहा कि "मराठी युवक कम प्रतिभाशाली या कम योग्यता वाले होते हैं, इसीलिए उन्हें रेल्वे में नौकरी नहीं मिलती", हालांकि यह वक्तव्य कूडे़ के ढेर में फ़ेंकने योग्य है, लेकिन फ़िर भी मैं अपने मित्रों से विचार जानना चाहूँगा...क्या वाकई में ऐसा है ? क्यों मराठियों की संख्या रेल्वे या अन्य केन्द्रीय शासकीय विभागों में घटती जा रही है ?

लेखनविषय: दुवे:

Comments

पेपरात जाहिरात

म्हराटी पेपरात जाहिरातच येत नाही नोकरीची तर आम्हाला कसं काय कल्नार हितं ओपनिंग हाये ते?
आता तुमी हितं बी हिंदीत लिवायला लागला म्हंजे कमाल झाली..

शायद

इसलिए की शुद्ध हिन्दी में चर्चा करने के और पढाई करने के बजाय हम मराठी युवकोंको मराठी माध्यम में पढने के लिए, मराठी में बात करने के लिए, लिखने के लिए एवं चर्चा करने के लिए प्रोत्साहित करने में और इसी कारण तरह तरह की वेबसाइट्स (जैसे की उपक्रम) और अन्य सुविधाएं उपलब्ध करवाने में जुटे हुए हैं । आप ने यह बात बडे अनोखे तरीके से इस मन्च पर छेडी है । इस गम्भीर विषय पर हम अब हिन्दी में - जिसे हम राष्ट्रभाषा मानते आए हैं, भले कोई माने या न माने - चर्चा जारी रखेंगे ।

महाराष्ट्रभाषा

हिंदी राष्ट्रभाषा नाहीच.
शिवाय उपक्रम हे संकेतस्थळ केंद्र सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर चालत नाही. येथे भारतीय, अभारतीय असे सर्व लोक आहेत.

उपक्रमाच्या धोरणानुसार येथे महाराष्ट्रभाषेत चर्चा होणे आवश्यक आहे. उपसंपादक लवकरच योग्य ती समज संबंधितांना देतील अशी आशा व्यक्त करतो.
ही चर्चा याच भाषेत येथे चालू राहिली तर उद्या हिब्रू आणि स्वाहिली भाषेमध्ये चर्चा केल्या तर चालतील का? यावर धोरणात्मक स्पष्टीकरण आवश्यक आहे.

कृपया

सुरेशजी,
हे संकेतस्थळ (वेबसाइट) मराठी असल्याने इथे कृपया मराठीतूनच लेखन करावे.

धन्यवाद.

मंडळ आपले आभारी आहे.

भाषांतरित प्रस्ताव

सुरेशजी, उपक्रमींना चर्चा करण्यास सोपे व्हावे म्हणून तुमच्या प्रस्तावाचे मराठीत भाषांतर देत आहे. त्यांना हिंदी येत नाही असे नाही, पण मराठीत चर्चा सुरू होण्या/राहण्यासाठी मराठीतून प्रस्ताव. पुढच्यावेळेपासून मात्र मराठीत लिहा बरे :)

मुंबई बॉम्बस्फोटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लालूप्रसाद यादव मुंबईत आले होते, तिथे विलासराव देशमुखांसमोर त्यांनी "मराठी युवक कम प्रतिभाशाली या कम योग्यता वाले होते हैं, इसीलिए उन्हें रेल्वे में नौकरी नहीं मिलती" असे उद्गार काढले. हालांकि (याला चपखल मराठी शब्द सुचवा बरे) हे त्यांचे विधान कचर्‍याच्या टोपलीत टाकण्यायोग्य आहे पण तरीही मी आपणा मित्रांकडून हे जाणून घेऊ इच्छितो की खरेच असे आहे का? रेल्वे आणि इतर शासकीय विभागातील मराठी माणसांची संख्या का कमी होते आहे?

हालांकि

खरं तर.. तसं पाहता..

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हालांकी

वस्तुतः
सन्जोप राव

येडा आहे लालू

मुळात प्रतिभा असणे नसणे हे कोण कुठे राहतो यावर अवलंबून नाही. उगाच खडा टाकून पाणी गढूळ करण्यातला प्रकार आहे हा. त्याने जर कधी इतिहास, वर्तमान वाचला असेल तर नक्कीच मराठीच काय कुणाबद्दलही असे उद्गार काढले नसते.

वृतीबद्दल म्हणू शकता की बिहारी लोक पडेल ते काम (अगदी पडेल ते) करून आपलं पोट भरायला तयार असतात त्यासाठी घरदार सोडून बाहेर पडतात. हे मराठी लोक नाहीत करत. आणि याला लालूला प्रतिभा म्हणायचे असेल तर त्याच्या अडाणीपणाचा कहर आहे.
अर्थात बिहारमध्ये शाळा, महाविद्यालये किती आहेत आणि किती गांभिर्याने तेथे प्रतिभा वगैरे म्हणजे काय शिकवले जाते हा एक संशोधनाचा विषय आहे.

अभिजित

अनुमतीची प्रतीक्षा संपली. खरं की काय?

प्रतिभाशाली

प्रिय सुरेश

नक्की प्रतिभाशाली म्हणजे काय? हे प्रथम काय् ते सांगा.

ललुआ मह्णतो

लालूच्या दृष्टिकोणा नी पहाल् तर त्याला स्वतह् माहीत नाही कि तो काय बोलू इच्छितो, पण माझ्या दृष्टि ने प्रतिभा असणे म्हणजे केवळ मोठ्या डिग्रीज नव्हे तर बरेच काही नृत्य, संगीत, चित्रकला वगैरे (ज्या बद्दल लालू ला काही देणे-घेणे नाही) :) असो...
http://sureshchiplunkar.blogspot.com

ललुआ म्हणतो

येथे बर्याच मित्रांना मी हिन्दीतून लिहीलेले आवड़लेले नाही, त्या बद्दल मी क्षमस्व आहे... जन्मापासून हिन्दी क्षेत्रात रहात आल्याने, चारी बाजूचे वातावरण, बोलचाल, लिखाण हिन्दी असल्यामुळे ही चूक झाली... अर्थातच मला मराठी वाचताना काही त्रास होत नाहीं पण मराठी लिहीताना मात्र शब्द लवकर सुचत नाही... असो... पुढील चर्चा सुरु करताना मी आवर्जून मराठीत लिहीनच, पण एक गोष्ट सांगावीशी वाटते कि कुठल्याही भाषेबद्दल टोकाचे दुराग्रह ठेवू नये, प्रत्येक भाषेत काही ना काही विशेष असतेच व प्रत्येक भाषा महान असते... हिन्दी बद्दल दुरावा कमीतकमी ठेवावा असे माझे व्यक्तिगत मत आहे...
http://sureshchiplunkar.blogspot.com

सुरेश साहेब.

सुरेशराव, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

लालूप्रसाद यादव यांनी स्वतःच्या अशिक्षित बायकोला बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. त्यामुळे त्यांनी मराठी तरुणांनी शिकावे असा केलेला उपदेश हा "लोका सांगे ब्रह्मज्ञान" प्रकारचा आहे. त्यांनी आधी राबडीदेवींना शिक्षण द्यावे. मराठी तरुणांना जर नोकरीची भरती चालू आहे ही बातमी कळालीच नाही तर ते तेथे कसे जातील? लालूप्रसाद असो किंवा आधी असलेले ममता ब्यानर्जी, सीके जाफर शरीफ असे कोणतेही रेल्वेमंत्री त्यांनी गुणवत्तेऐवजी आपापल्या प्रदेशातील लोकांना रेल्वेत कशा नोकर्‍या मिळतील हेच फक्त पाहिले आहे. मनसे ने वांद्रे येथे मागील वर्षी झालेल्या रेल्वे भरतीमध्ये ३०० पैकी २९१ युवक बिहारचे होते व ३ मराठी होते हे पुराव्यादाखल सिद्ध केले आहे. असे असेल तर मग डायरेक्ट पाटण्यालाच का भरती करत नाहीत. बिचार्‍यांचा पाटणा-मुंबई प्रवासखर्च तरी वाचेल. मी मनसेचा प्रेमी नाही. पण अशा घटनांमुळे मनसे करते ते बरोबर आहे असे वाटत जाते.

अवांतरः
आपल्याप्रमाणेच मला हिंदी वाचताना काही त्रास होत नाहीं पण हिंदी लिहीताना मात्र शब्द लवकर सुचत नाही... असे आहे.

 
^ वर