अतर्क्य घटना - काही अनुभव? -२

अतर्क्य घटना - काही अनुभव? -२
काहीवेळा असे अनुभव येतात की त्यांची काही संगती लागत नाही. तार्किक दृष्ट्याही काही उत्तर मिळत नाही. अशा अनुभवांना अंधश्रद्धाही म्हणवत नाही.
असे अनेकदा अनुभव सांगोवांगी पण ऐकलेले असतात. असाच एक अनुभव माझ्या एका रिचर्ड नावाच्या मित्राने सांगितला. हा मित्र जिओलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेला आहे. आणि सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये सरकारच्या खनिज खात्याचा एक डायरेक्टर आहे....

अतर्क्य घटना - काही अनुभव?
या चर्चेला ५० प्रतिसाद आल्याने भाग २ सुरु करत आहे कृपया उर्वरीत प्रतिसाद येथे द्यावेत ही विनंती!

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो

ही पुस्तकाचा फोटो काढून टाकाय्ची कल्पना चांगली आहे.
स्केन पण करता येईल ना...
आणी मग् पीडीएफ् कींवा डॉक फाइल मध्ये सगळे पुस्तकच मिळू शकेल
शिवानी

हे बरं केलं

हां भाग २
हे बरं केलं...

मजकूर संपादित. इतर सदस्यांवर व्यक्तिगत स्वरूपाची टीकाटिप्पणी करू नये.
काय लोक इथे येतात नि जातातही!! अतर्क्यच वागणे असते बॉ असो... )
चालयचच नाही का?

आपला
गुंडोपंत

फाडफाड इंग्रजी

उत्तर प्रदेशातील एक कुमार राजेश, ज्याचे शिक्षण हिंदी माध्यमातून झाले आहे, जो कधीही परदेशात गेलेला नाही, परिस्थितीही अगदी गरीबीची आहे, तो अचानक अमेरिकन उच्चाराचे इंग्रजी बोलू लागला! आपण गेल्या जन्मी अमेरिकन वैज्ञानिक होतो असे त्याचे म्हणणे आहे. http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2199155.cms

आपला
(अचंबित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

उत्तरा हुद्दार्

उत्तरा हुद्दार ही अशीच एक् पुनर्जन्माची केस महाराष्ट्रात नागपूर ची होती. 'आजचा सुधारक' या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात् देखील् त्याचा वृत्तांत आला होता. साधार्ण दहा वर्षांपुर्वी.
अशा पुनर्जन्माच्या काही बनावट केसेस चा आधार घेउन न्यायालयात् स्थावर जंगम मालमत्तेत हक्क् दाखवण्याचे प्रकार देखील झाले आहेत. अर्थात कोर्टान अशा गोष्टीस थारा दिला नाही.
प्रकाश घाटपांडे

वा वा! उत्तरा हुद्दार

उत्तरा हुद्दार यांचा हा किस्सा मी कित्येक वर्षे शोधत आहे. एका दिवाळी अंकात तो वाचला होता पण तो नेमका पुनर्जन्माचा होता की काय ते आठवत नाही. त्यात त्यांचे एका बंगाली स्त्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्या आपले अस्तित्व विसरून जात, जे सहसा पुनर्जन्माच्या बाकी प्रकरणांत होत नाही. त्या 'ट्रान्स' या अवस्थेत असत. पुनर्जन्मात सहसा गतजन्मीच्या आठवणी आल्याचे दावे केले जातात, ट्रान्सफॉर्मेशन नाही असे वाटते. परंतु या बाईंची अशी अवस्था तीन तीन महिने टिकत असे. त्या काळात फाडफाड बांग्ला बोलत. (नागपुरात तसेही अनेक बंगाली आहेत असे ऐकून आहे. फाडफाड बोलणे अशक्य नसावे, तरीही) ते मूळ बंगाली कुटुंबही शोधले होते असे वाटते.

माफ करा, पण अत्यल्प स्मृतींतून हा किस्सा लिहिला आहे. कोणाला आठ्वत असल्यास नेमका किस्सा नक्की लिहावा.

कुद्रत

कुद्रत हा चित्रपट पाहीला नसेल तर पहा.. कदाचीत या व्यक्तीने (उत्तरा हुद्दार) तो पाहीला असावा...

त्यात हेमा मालीनी अशीच ट्रांन्स मधे जायची. चित्रपट चांगला घेतला आहे: हेमा मालीनी, राजेश खन्ना, विनोद खन्ना, अरूणा इराणी आणि राजकुमार हे प्रमुख कलाकार होते.

धन्यवाद

हा चित्रपट फार लहानपणी पाहिला होता त्यामुळे फारसा (ट्रान्स इ. किंवा ही ट्रान्स अवस्था असते याचे त्यावेळी आकलनच होत नसावे) आठवत नाही.

मजेची गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सच्या यादीत टाकला आहे. :)) आता याला मात्र योगायोग म्हणू.

कल्पना चावला.


आठ एक दिवसापूर्वी बातमी वाचली एक चार वर्षाची मुलगी स्वत:ला कल्पना चावला म्हणवून घेते आहे.आकाशात मोठ्या गोळ्याशी टक्कर झाली होती.त्यात मी मरण पावले असे ती म्हणते.अर्थात तिच्या वडीलांनी विश्वास दाखविला नाही,म्हणून बरे ! नाहीतर विविध दैनिकांचे मुखपृष्ठ "कल्पना चावलांच्या "आगमनाने दनानुन गेली असती.

दिलीप बिरुटे

टोटल रिकॉल

हिन्दी बातम्यांच्या एका वाहिनीने राजेशने 'टोटल रिकॉल' हा इंग्रजी चित्रपट पाहून, तसेच इंग्रजी वृत्तपत्रे नियमित वाचून इंग्रजीचे अमेरिकन उच्चार शिकल्याचे म्हटले आहे. बिलासपूर येथे त्याने चुकीच्या इंग्रजीत व्याख्यान दिले होते असा उल्लेख होता. त्याच कार्यक्रमात इतर तज्ञांनी, हा "दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचा" मानसिक रोग असल्याचे म्हटले आहे.

राजेशची कथा वाचून आणि सगळा प्रकार पाहून अचंबा वाटला. कदाचित पराकोटीच्या ताणामुळे त्याचे तसे झाले असेल. त्याच्याजवळ प्रचंड गुणवत्ता आहे यात शंकाच नाही. वयाच्या आठ ते दहाव्या वर्षापर्यंत मेंदूची सतत वाढ होत असते. अशा संस्कारक्षम वयापासूनच त्याने इंग्रजी, भौतिकी आणि गणिताचे अध्ययन केले असणे शक्य आहे. (आता त्याचे वय चौदा वर्षे आहे. सहा वर्षाचा काळ भरपूर असतो.) ही निश्चित कौतुकाची बाब आहे. अशा वेळेस, नेमका तो चित्रपट पाहून त्याला काही सुचले असेल. अर्थातच तेथिल लेखात उल्लेख केलेला पुनर्जन्माचा प्रकार नसावा असे वाटते.

त्याची गुणवत्ता सर्वांपुढे येण्यासाठी त्याला पुनर्जन्माचा (आणि अमेरिकन इंग्रजीचा) आधार घ्यावा लागला ही खेदाची बाब आहे. असाच एक किस्सा वाहिनीवर ऐकला - चार वर्षाची बालिका स्वतःला कल्पना चावला असल्याचे म्हणत आहे. या दोन्ही बाबतीत त्या व्यक्तींना अमेरिकेचाच आधार का घ्यावासा वाटला? अशा प्रकारात त्या व्यक्तींना उडीया किंवा काश्मिरी, अथवा थाई भाषा का येत नाही? अमेरिकाच का? त्यामुळेच तो समृद्धीचा योगायोग वाटतो.

एकंदरच, हा किस्सा अचंबित करणारा आहे यात शंकाच नाही, :)

खरं आहे!

अशा प्रकारात त्या व्यक्तींना उडीया किंवा काश्मिरी, अथवा थाई भाषा का येत नाही? अमेरिकाच का? त्यामुळेच तो समृद्धीचा योगायोग वाटतो.

असाच संशय माझ्याही मनी आहे...
पण शैलेशरावांनी मुद्दा मस्त मांडला!

शिवाय 'चीनी भाषा पंडीताचा भारतात पुर्नजन्म झाला' असेही ऐकलेले नाही! (५००० मुळाक्षरं????)

तेंव्हा यात फेकाफेकी दिसते असे मलाही वाटले बॉ!
अपवाद द थर्ड आय वाल्या लोम्बसंग राम्पा चा

पण आमचा खाली दिलेला 'अमेरिकन जन्म' पाहुन मात्र आम्ही चाट आहोत!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर नि त्यातले 'आमच्याशी असणारे साम्य' पाहुन गुंडोपंत चकित आहेत!!!!)

गुंड्या ही व्यक्ती नाही वृत्ती आहे. निंदकाला फक्त शेजारीच नाही तर अगदी आग्रहाने पेइंग गेस्ट बनवण्याचा बाणा म्हणजे गुंड्या.

विट्ठार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. गुंडोपंत यांचा बालपणीचा अनुभव वाचला. समजा विटे ऐवजी वरून कोणी पाणी टाकले असते.ते त्यांच्या पाठीवरील दप्तरावर न पडता नेमके त्यांच्या पायाशी पडले असते तर ती घटना त्यांच्या लक्षातही राहिली नसती.संभवनीयतेच्या(प्रॉबॅबिलिटी) दृष्टीने दोन्ही घटना सारख्याच आहेत. असे घडतच असते. कोणी वाचतो . कोणी जातो. हा लॉ ऑफ रँडमनेस आहे. कदाचित वीट डोक्यावर पडूनही किरकोळ दुखापती खेरीज काही झालेही नसते. डोक्यावर आकाशातून पुष्पमाला पडली आणि इंदुमतीचे (अजाची पत्‍नी, श्रीराची आजी ) तिथेच प्राणोत्क्रमण झाले. (प्रिय पत्‍नीच्या अशा निधना नंतर अजाने केलेला शोक "अजविलाप" म्हणून प्रसिद्ध आहे.) तर अशा सर्व प्रकारच्या घटना घडणारच. त्या अतर्क्य नव्हेत.मात्र त्यांची संभवनीयता अत्यल्प असते. पण शून्य नसते.म्हणून त्या कधी षटी षण्मासी घडतात.

मान्य!

यनावाला साहेब.
आपल्या तर्कसंगतीपुढे
आम्ही काय बोलणार?
हे जेंव्हा ज्या माणसा बरोबर घडते तेंव्हा, अभीजीताने लिहीले आहे तशी वाचाच जाते!
मरण आले होते हेपण वाचलो - यातले अतर्क्यत्व ज्याने अनुभवले आहे तोच जाणतो इतकेच मी म्हणेन.

असो, आपल्या म्हणण्यात तथ्य आहेच याविषयी शंका नाही!

परमेश्वराची कल्पना रिटायर करायलाही माझी काहीच हरकत नाही...
पण त्यानंतर क्वचित प्रसंगी येणार्‍या हताश परीस्थीतीत लागणारे मानसीक बळ आणण्याचा दुसरा मार्गही असला पाहीजे.
तो तसा माझ्यासारख्या अतिसामान्य माणसासाठी काही तर्कसंगतपणे सुचतोय का?

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर नि त्यातले 'आमच्याशी असणारे साम्य' पाहुन गुंडोपंत चकित आहेत!!!!)
गुंड्या ही व्यक्ती नाही वृत्ती आहे. निंदकाला फक्त शेजारीच नाही तर अगदी आग्रहाने पेइंग गेस्ट बनवण्याचा बाणा म्हणजे गुंड्या.

डॉ.लागूंचा मुलगा -तन्वीर्

डॉ.लागूंचा मुलगा -तन्वीर् हा असाच लोकल मधून चालला होता. त्यावेळी बाहेरुन कोणीतरी मारलेला दगड खिडकीतून आत आला व तन्वीरचा प्राण घेतला. आता यात संभवनीयतेचा भाग बघा. गाडीचा वेग.दगडाचा वेग, खिडकितल्या बार मधून उरलेली जागा, आतील अनेक प्रवाशांपैकी नेमका तन्वीर, त्यातून त्याला लागणारे मर्मस्थान इ.. त्यावर काही लोकांनी लागूंना म्हटले, बघा तुम्ही देवाला मानत नाही ना? म्हणून तुम्हाला ही शिक्षा. त्यावर लागू म्हणाले, जो शिक्षा करतो तो परमेश्वर कसा? तो तर कृपाळू पवित्र आहे ना?

प्रकाश घाटपांडे

 
^ वर