ट्रांसफॉर्मर्स

ट्रांसफॉर्मर्स
निर्माता - स्पीलबर्ग

चित्रपटाची सुरुवात ऑप्टीमस प्राईम याच्या "ऑलस्पार्क क्युब" ची माहिती देण्यातून होते. हा क्युब कुठुन आला माहिती नाही. पण हा ज्या गोष्टीच्या संपर्कात येतो तेथे 'प्राण' येतो. त्यामुळे सायबरट्रोनवरही आयुष्य जन्माला आले. ही वसाहत त्यांना मेगाट्रॉन ने उध्वस्त करे पर्यंत राहीली. या युद्धात ऑलस्पार्क क्युब हरवला. त्याचा विशव्यापी शोध सुरु राहिला. अंतराळात फिरत फिरत क्युब पृथ्वीवर येवून पडला.
अनेक हजार वर्षे असीच गेली...

कतारमधला अमेरिकन बेस. येथे एक अनोळखी हेलिकॉप्टर अवतीर्ण होते.तळावर उतरल्यावर अचानक पणे त्याचा आकार बदलून एक अत्यंत विनाशी मानव सदृष यंत्रात रुपांतर होते. सर्व इलेक्ट्रॉनिक संवाद बंद होतात. (कम्युनिकेशन ब्लॅक आऊट) मोठा विध्वंस होतो. या काळात संगणकाच्या जाळ्यात शिरून सर्व माहिती शोषण्याचा प्रयत्न होतो. पण मुख्य संगणकाच्या तारा कापल्याने काही माहिती वाचते. आणीमग सुरु होते एक अनाकलनीय नाट्य! इतिहासाच्या प्रवासात मानवाचे योगदान वगैरे वगैरे वगैरे

हे प्रत्यक्षच पाहिलेलेच बरे.
(मी पुढे लिहिण्याचा मोह टाळतो आहे!)

पहिला हेलिकॉप्टर मधून यंत्र होण्याचा शॉट मस्त आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. अनेकदा यंत्रे बावळटपणे 'वागत' आहेत हे कळते. यंत्रे इतकी प्रगत असतांनाही, अशी जंगलीपणे अंगावर धावून मारामार्‍या का करतात हे ही एक न उलगडलेले कोडे! स्पीलबर्ग चा चित्रपट असूनही बालीश बावळटपणा ठासून भरला आहे. तंत्रदृष्ट्या मात्र नेहमीप्रमाणेच झकास आहे.
अगदी काहीच करायला नसेल तर, जाऊन बघायला हरकत नाही!

Comments

स्पीलबर्ग चा चित्रपट

स्टीवन स्पीलबर्ग या चित्रपटाचा केवळ निर्माता आहे.

हो!

हो! तो केवळ निर्माता असला तरी त्याच्या नावाने अपेक्षा वाढल्या होत्या माझ्या!
पण चालायचेच.
पोस्टर बद्दल धन्यवाद!
-नि

आर्थर सी क्लार्क

अंतराळात फिरत फिरत क्युब पृथ्वीवर येवून पडला.

२००१ ए स्पेस ओडीसी या आर्थर सी क्लार्क यांच्या विज्ञान कादंबरीत (ज्यावर चित्रपटही निघाला आहे) अशीच प्लेट चंद्रावर आणि त्याही आधी पृथ्वीवर येऊन पडलेली घेतली आहे. त्यावरून ही कल्पना घेतली असावी असे वाटते. २००१ ए स्पेस ओडीसी चे वैषिष्ठ्य म्हणजे त्यात सुपरकाँप्यूटरचे वर्णन आणि स्पेसशटलचे केलेले वर्णन - हे प्रथमच होते आणि त्या काळाच्या खूप पुढचे होते.

अर्थातच हा चित्रपट (स्पीलबर्गचा) पहायची उत्सुकता आहे. त्याचा एआय (Artifical Intelligence) पण असाच वेगळा चित्रपट होता.

एआय

त्याचा एआय (Artifical Intelligence) पण असाच वेगळा चित्रपट होता.

हा खुपच मस्त होता! कथा आणी तांत्रीक दृष्ट्या रसपूर्ण होता.
एआय मध्ये यंत्रणेचा ताबा बदलतो हा (मुख्य) भाग तसा जरा सशक्त नव्हता. त्याची कारणे आणी झालेली सुटका पटली नव्हती, पण तरीही चित्रपट मस्त होता!
(तसा ट्रांसफॉर्मर्स वाटला नाही पण (उपकथानकं) आणी हिरो हिरॉईन मस्त आहेत.)
-नि

डुलक्या

अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. अनेकदा यंत्रे बावळटपणे 'वागत' आहेत हे कळते.

हा यंत्रांचा नव्हे तर चित्रपट दिग्दर्शकाचा बावळटपणा आहे. चित्रपट दिग्दर्शकांच्या डुलक्या हा एक स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. टर्मिनेटर ३ मध्ये श्वार्झनेगर सबंध चित्रपटभर नायकाशी गप्पा मारतो. अचानक मध्येच त्याला कसलीशी आठवण होते आणि म्हणतो मी फक्त कॅथेरीन ब्रूस्टरच्या प्रश्नांची उत्तरे देइन, पण ते तेवढ्यापुरतेच. स्पीड चित्रपटात अफाट साहसे करणारा किनू रीव्ज आणि त्याचा सहकारी साडेतीन फूट उंचीच्या खिडकीतून जायला एक फूट उंचीचे स्टूल वापरतात, असा अफलातून विनोद सुरुवातीलाच बघायला मिळतो. असो. स्पिलबर्ग निर्माता आणि चित्रपट भंकस अशी बरीच उदाहरणे आहेत, त्यामुळे त्याच्या नावावर जाऊ नये.
यंत्र आणि मानव संघर्षामध्ये मला आवडलेले चित्रपट म्हणजे २००१ स्पेस ओडीसी, टर्मिनेटर १,२ आणि मॅट्रीक्स १.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मान्य

मान्य आहे दिग्दर्शक बावळट पणा करतात.
यावरच हॉट्शॉट्स आला होता ना...
धमाल चित्रपट ! मिळाल्यास नक्की पहा!

कशी चालतात?

ही यंत्रे कशी काय चालतात बॉ?
माझ्या माहिती प्रमाणे प्रत्येक यंत्राला चालायला उर्जा लागते. आताचे माहितीचे स्रोत सांगतात की, उर्जा कोणत्याही संचयात असली तरी ती पुनर्निमीत काही होत नाही.
मग हे यंत्र -मानव उर्जा वाया घालवत कसे काय मारामार्‍या करु शकतात?

शिवाय शत्रुत्वभावना कशा येणार याचे काही उत्तर मिळत नाही!
आपला
गुंडोपंत

चांगला आहे की वाईट?

वाचून कळले नाही,
पिक्चर चांगला आहे की वाईट आहे?

शिवानी

बरा आहे!

बरा आहे! वेळ काढायचा असल्यास जाणे इतकेच म्हणेन!

नायिका वगळता चित्रपट वाइट

नायिका वगळता चित्रपट वाइट....व्ययक्तिक मत....अपेक्शाभंग झाला..

 
^ वर