उपक्रमाचे लेखक आणी वाचक वेगळे आहेत!
उपक्रमाचे लेखक आणी वाचक वेगळे आहेत!
उपक्रम सुरू झाल्यावर हे एका जुन्या संस्थळाला पर्याय आहे असे वाटले होते. पण ते तसे नव्हते(हे लेखन गायब झाल्यावर कळलेच;) ). फक्त माहितीपूर्ण लेखन हा उद्देश होता. माझ्यासकट अनेक सदस्यांना हे उपक्रम 'फक्त माहितीपूर्ण' या पर्यायावर चालेल की नाही अशी शंका येत होती. माहितीपुर्ण लेखन म्हणजे काय याची अनेकदा टर उडवली गेली. मी सुद्धा यात सामील होतो. अनेक लेख नि चर्चा उडाल्यावर आणी अनेकदा खूप चिडचिड नि आत्महत्या झाल्यावर हळूहळू सदस्यांना काय हवंय; नि उपक्रमामागचा हेतू काय असावा, याची कल्पना सदस्यांना येऊ लागली आणी येते आहे. मला वाटते की सदस्य आणी उपक्रम हे एकमेकांना अजूनही 'ओळखत' आहेत. हे काम पूर्ण झालेले नाही.
असो, या चर्चेचा मूळ हेतू म्हणजे, उपक्रमावर सर्वसाधारण पणे 'व्यवस्थापन किंवा विक्री तंत्र' या विभागात मोडेल असा प्रतिसाद चाणक्यांच्या लेखावर लिहिला. याच प्रतिसादात थोडे फेरफार करून त्याच विषयावर एक चर्चा मनोगतावर पण टाकली. (त्यात खरं तर मी जाणून बुजून वादग्रस्त मुद्देही टाकले होते हे मी मान्य करतो.;) ) पण मनोगतावर त्या चर्चेला एकही प्रतिसाद आला नाही!
पण त्याच स्वरूपाची (तीच नव्हे!) चर्चा उपक्रमावर येताच त्याला सुमारे ६० प्रतिसाद आले. त्यातले समजा २५ माझीच उत्तरे असतील. तरीही,उरलेले प्रतिसाद हे स्पष्ट करतात की उपक्रमाचे लेखक आणी वाचक हा मनोगता पासून संपूर्ण पणे एक वेगळा वर्ग आहे.
त्यामुळे मला (आताशा) अशी जाणीव होते आहे की उपक्रमाचा 'माहितीपूर्ण लेखन' हा उद्देश योग्य असावा. हा उद्देश काही अंशी सफल होत आहे.
आपल्याला या विषयी काय वाटते?
आपला
गुंडोपंत
Comments
इटेलेक्च्युअल मास्टरबेशन! :)
तरीही,उरलेले प्रतिसाद हे स्पष्ट करतात की उपक्रमाचे लेखक आणी वाचक हा मनोगता पासून संपूर्ण पणे एक वेगळा वर्ग आहे.
नाही रे गुंड्याभाऊ, मला वाटतं की काही मोजके अपवाद सोडले तर तीच मंडळी दोन्हीकडे आहेत. मनोगत हे अधिक डायवर्सीफाईड संस्थळ असल्यामुळे तिथे कदाचित तुझ्या चर्चाप्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नसेल. पण तीच मंडळी जेव्हा उपक्रमवर असतात/येतात, तेव्हा अचानक त्यांना (माझ्यासकट बरं का!) 'माहिती आणि विचारांच्या' संसर्गाची लागण होते आणि त्यांचे इंटेलेक्चुअल मास्टरबेशन सुरू होते आणि मंडळी धडाध्धड प्रतिसाद लिहू लागतात! :)
त्यामुळे मला (आताशा) अशी जाणीव होते आहे की उपक्रमाचा 'माहितीपूर्ण लेखन' हा उद्देश योग्य असावा. हा उद्देश काही अंशी सफल होत आहे.
योग्य की अयोग्य ते माहीत नाही, पण सफल मात्र होत आहे आणि त्याबद्दल उपक्रमाचे अभिनंदन व शुभेच्छा! :)
आपला,
(रोज उपक्रमावर दोनचार माहितीपूर्ण अंडी घालणारा!) -:)
तात्या.
संभ्रम
तेव्हा अचानक त्यांना (माझ्यासकट बरं का!) 'माहिती आणि विचारांच्या' संसर्गाची लागण होते आणि त्यांचे इंटेलेक्चुअल मास्टरबेशन सुरू होते आणि मंडळी धडाध्धड प्रतिसाद लिहू लागतात! :)
इतर सदस्यांविषयी इतक्या खात्रीपूर्वक कसे काय बोलता बरे? याच्या समर्थनार्थ काही माहिती, पुरावे तुमच्याकडे असतील तर कृपया दाखवून द्यावेत अन्यथा विनाकारण इतर सदस्यांवर चिखलफेक करणे बरे नाही.
आपला
(संभ्रमित) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
असं म्हणता?
याच्या समर्थनार्थ काही माहिती, पुरावे तुमच्याकडे असतील तर कृपया दाखवून द्यावेत अन्यथा विनाकारण इतर सदस्यांवर चिखलफेक करणे बरे नाही.
असं म्हणता? बरं बरं! आम्ही आमचे शब्द मागे घेतो! :)
अगदी बिनशर्त माफी मागतो बघा..
बाय द वे वासुदेवराव, 'नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:' याचा अर्थ काय हो? अहो आम्हाला संस्कृत येत नाही म्हणून विचारतोय!
तात्या.
संख्या!?
मनोगत हे अधिक डायवर्सीफाईड संस्थळ असल्यामुळे तिथे कदाचित तुझ्या चर्चाप्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नसेल.
तात्याबा सदस्य संख्या आणी डायवर्सीफाईड संस्थळ हे विचारांत घेता विचारात घेता उलट जास्त प्रतिसाद मिळायला हवे ना?
आपला
डायवर्सीफाईड
गुंडोपंत
उपक्रम आणि मनोगत
लेखक आणि वाचक,
येथे अनेकदा उपक्रम आणि मनोगत यांची तुलना होते. तुलना हा मनुष्य स्वभावाचा एक भाग आहे. पण जेंव्हा जेंव्हा येथे तुलना झाली तेंव्हा हे दिसुन आले की ज्यांनी तुलना केली त्याची काही कारणे आहेत.
१. मुळातच सर्वात जास्त तुलना करणारे जे आहेत त्यांचे मनोगतावर पहिले प्रेम आहे/होते. ते लोक आता तेथे लिहित नाहीत. वाचत नाहीत असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. दुसर्या शब्दात ते तेथे सक्रिय नाहीत. आता ते प्रेम का होते/आहे याची कारणे व्यक्तिसापेक्ष आहेत. आता काही ठराविक सदस्य आहेत त्यांची तक्रार तिथे ही होती आणि इथे ही आहे. तसेच आज ना उद्या इतर ठिकाणी सुद्धा असणार आहे. मग असे सगळीकडे होते आहे असे म्हणले तर मग चुक कोणाची आहे/होती हे सुज्ञास चांगलेच कळते.
२. मुळातच हे संस्थ सुरू करण्याचा उद्देश नेहमी येथे चर्चीला गेला आहे. असे असताना उगाचच तुलना करण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक ठिकाणचे नियम/कायदे पाळायला नकोत का? जर संकेतस्थळ कोणाच्या तिर्थरुपांनी सुरू केले असेल तर त्या चिरंजीवांनी नक्किच माज करावा. ज्यांना हा उद्देश मान्य आहे आणि त्या बद्दल समाधान आहे असे सदस्य एकाच विषयावर तेच तेच प्रतिसाद अनेक ठिकाणी का टाकतील? फुकटात असले तरी स्वतःचा वेळ घालवावा लागतो हे प्रत्येकाला कळते. तसेच आता येथे जास्त सक्रिय असणारे सदस्य दुसरीकडे सुद्धा असतीलच असे नाही.
३. मला उपक्रमाचा उद्देश साध्य होताना दिसतो आहे. येथे असे अनेक वादग्रस्त चर्चा विषय होते ज्यावर अनेकांनी ठरवून प्रतिसाद दिले नाहीत हे जाणवते. लोकांना उपक्रमावर वाद नको आहेत तर माहितीपूर्ण लेखन/चर्चा हव्या आहेत हे यावरून स्पष्ट होते.
असो, एवढे लिहून आम्ही आमचा प्रतिसाद आवरता घेत आहोत. :)
मराठीत लिहा. वापरा.
व्यक्तिगत
१. आम्ही लेखनाला सक्रिय म्हणतो आहोत. उद्या कोमामध्ये असलेल्या माणसाला तुम्ही पुर्ण जीवंत म्हणाल काय?
२. पहिले प्रेम (१९९७ मधले) : या आधीचे प्रेमी सुद्धा भेटतील. त्यात काय विषेश? या संकेत स्थळावर मनोगत हे आमचे पहिले प्रेम आहे असे जाहीर लिहिणारे आहेत. तुम्हा व्यक्तिगतरित्या कशाला घेताय?
३. बालविहाराचा या मुद्याशी अकारण संबंध लावू नये. आपला प्रतिसाद म्हणजे कॉंग्रेसचे (सोनियाचे) राज्य आहे म्ह्णून राहूलने रायबरेलीत कुठेही नागडे नाचावे हे सर्वमान्य आहे असे मानणारा, असा आहे. स्पष्ट बोलतो स्वमक्ष.
मराठीत लिहा. वापरा.
काथ्याकूट
उगाच काथ्याकूट कशाका? ***** काय कोणाच्या बापाच आहे का? अस म्हणण मराठीत प्रचलीत आहे ना? त्यातलाच हा शब्दप्रयोग. आपलेपणा आणि माज यात काहीच फरक नाही का?
माज करायला, स्वतःच्या बापाचेच संकेतस्थळ कशाला असायला हवे ?
बरोबर. मग आयजीच्या बायजी उदार कशाला? सर्व सामान्य माणूस एखादी गोष्ट हक्काने वापरतो जेंव्हा ती स्वतःची असते वा वडीलोपार्जीत आपली. नाही का?
मराठीत लिहा. वापरा.
देश आणि संकेतस्थळ
आपण चांगले मुद्दे मांडले आहेत.
भारत ही आपली गोष्ट आहे, किंवा वडिलोपार्जित. असे आपल्याला वाटते का?
भारत हा देश आहे. संकेतस्थळ नाही. (संकेतस्थळांवर भारताची जाहीर बदनामी करणार्यांवर कारवायीसाठी कायद्याची मदत घेतली जाते आहे.) मी भारतीय आहे कारण माझा येथे जन्म झाला आहे. तो माझ्या आई-वडिलांमुळे ज्यांचा जन्म सुद्धा भारतातच. थोडक्यात माझ्या आधीच्या पीढ्या भारतीय आहेते म्हणून मी. कदाचित आपल्या शब्दात वडिलोपार्जित. माझ्या मते देश आणि संकेतस्थळ यात खुप् मोठा फरक आहे. देशासाठी सैनिक/नागरिक प्रसंगी आपले सर्वस्व द्यायला तयार असतात. संकेतस्थळासाठी? तसेच मी देशासाठी कर भरतो म्हणून सोयीसुविधा आणि हक्क मागतो. उद्या संकेत स्थळाने पैसे मागितले तर त्याचा योग्य मोबदला मिळतो का नाही हे पाहणे हा माझा नक्किच हक्क आहे. थोडक्यात देश आणि फुकटात सदस्यत्व तरीही एक व्यासपीठ देणारे संकेतस्थळ यात खुप फरक आहे.
आपण ह्याविषयी अधिक वाद घातला तर कदाचित ह्या संकेतस्थळाच्या ध्येयधोरणात बसणार नाही. कारण आपल्याला एका विशिष्ट सदस्याला आडून दूषणे द्यायची आहेत, आणि मला सार्वत्रिक विचार मांडायचा आहे. त्यामुळे हा वाद सावजनिक आणि सुसंबद्ध राहणार नाही.
मला सुद्धा यावर अधिक वाद घालून माझा वेळ वाया घालवायचा नाही. मला एका विशिष्ट सदस्याला आडून दूषणे द्यायची आहेत हे सर्वार्थाने चुक आहे. जर ते बरोबर असेल तर अशा वृत्तींना आणि अशा वृत्तींच्या सदस्यांना पाठीशी घालण्याकरता आपण प्रतिसाद लिहिला आहे हे म्हणणे फारसे चुक ठरणार नाही. मला सुद्धा हा वाद पुढे वाढवण्यात स्वारस्य नाही हे जरूर नमुद करतो. आपण चुकिचा अर्थ लावलात हे सांगण्या करता हा प्रतिसाद.
असो, अमेरिकेचे परराष्ट्रधोरण यावर तर लिहायचे आहेच.
मराठीत लिहा. वापरा.
धन्यवाद
धन्यवाद
मराठीत लिहा. वापरा.
हा हा हा!
कारण आपल्याला एका विशिष्ट सदस्याला आडून दूषणे द्यायची आहेत, आणि मला सार्वत्रिक विचार मांडायचा आहे. त्यामुळे हा वाद सावजनिक आणि सुसंबद्ध राहणार नाही.
हा हा हा! कोण हो तो विशिष्ट सदस्य मिलिंदराव? :)
असो, एकंदरीत मंडळींचा त्या विशिष्ट सदस्याच्या 'वर्तणूकीचा आणि वृत्तीचा' बराच अभ्यास असावा असे वाटते! :)
छान छान! मंडळींनी त्या विशिष्ट सदस्याचा असाच अभ्यास करत भरघोस लंबेचौडे प्रतिसाद द्यावेत! :)
काय मिलिंदशेठ, खरं की नाही? :)
आपला,
(जळकुटा!) तात्या.
हक्क आणि कर्तव्ये
यावर ज्येष्ठ विधिज्ञ श्री. सत्यरंजन साठे (आता दिवंगत) यांनी सर्वोच्च्य न्यायालयाचा निकालाचा एक संदर्भ दिला होता त्यानुसार नागरिक कर्तव्यास चुकला म्हणजे त्याच्या हक्कावर बाधा आली असे अजिबात नाही. त्याचे हक्क त्याही स्थितीत अबाधितच रहातात.
प्रकाश घाटपांडे
हेच!
लोकांना उपक्रमावर वाद नको आहेत तर माहितीपूर्ण लेखन/चर्चा हव्या आहेत हे यावरून स्पष्ट होते.
वाद आणी चर्चा वेगवेगळ्या असतात का?
आपला
गुंडोपंत
माझे मत
मूळ चर्चा आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आलेले सुसंगत प्रतिसाद खूपच मनोरंजक - आणि हो, माहितीपूर्णही आहेत. उघड उघड किंवा आडून आडून 'मनोगत' आणि 'उपक्रम' यांची तुलना होत असतेच. (ओंकार जोशीच्या गौरवचर्चेत 'तो' मुद्दा कधी निघतो ते पहात होतो, तसा तो निघालाच!). आता तर मी टाकलेल्या लिखाणाला इकडे इतके प्रतिसाद आणि 'तिकडे' इतके , त्यामुळे 'हे' श्रेष्ठ की 'ते' - अशी तुलना करण्याची नवी मिती उपलब्ध झालेली दिसते.
यावर एक लिखाण एकाच ठिकाणी प्रसिद्ध करावे ही इथेच व्यक्त झालेली सूचना पाळून मी हा मुद्दा माझ्यापुरता संपवला आहे.
सन्जोप राव
थोडीशी गफलत
याआधीही मी प्रतिसाद दिला होता.
माधवरावांची वाक्ये अशी वाचावीत.
१. युनिकोड तंत्र वापरुन गमभनचा विकास झाला.
२. युनिकोड तंत्राच्या आधाराने मनोगत डॉट कॉम व इतर संकेतस्थळे सुरु झाली.
गमभन व मनोगतचा संबंध येथे अभिप्रेत नसावाच. :))
सहमत
मराठीसाठी लिहिताना अशी वाक्य रचनेची चुक अपेक्षीत नाही.
मराठीत लिहा. वापरा.
तंत्र/सॉफ्टवेअर
माधवरावांनी तंत्र हा शब्दप्रयोग युनिकोडसाठी केला आहे. संपूर्ण लेखात युनिकोडचा उल्लेख करताना अमुक तमुक तंत्र असाच वापर ते करतात.
गमभनचा उल्लेख त्यांनी सॉफ्टवेअर / आज्ञावली असा केला आहे.
वाक्यरचनेमुळे थोडासा घोटाळा झाला आहे. मनोगत व गमभनचा वापर न करणार्यांचा मनोगत गमभनचा वापर करते असा समज होणे सहजशक्य आहे. परिच्छेद पाडताना त्यांनी थोडीशी काळजी घेणे आवश्यक होते.
नाही!
'हे' श्रेष्ठ की 'ते' - अशी तुलना अशी तुलना नाही. फक्त, हे वेगळ्या विचारानेही आणी बांधणीवरही मराठी संस्थळ चालू शकते इतकेच.
मी कुणाझी वाईट म्हंटलेले नाहीये.
पण ही संस्थळ तुलना अपरिहार्यही आहे.
तुम्ही नाही का टॉय चांगला की एक्सप्रेस चांगला यावर कधी चर्चा करत?
विचारांचे वेगळेपण यात दिसतेच की आपल्याला...
आपला
गुंडोपंत
वाक्य
गमभन चा उल्लेख आणि नंतरचे वाक्य हे संदिग्ध आहेत, पण मनोगताचा उल्लेख असलेल्याच्या नंतरचे वाक्य वाचल्यास आजानुकर्ण यांची बाजू बरोबर वाटते.
वाक्य ही अशी:
" मराठी ब्लॉगजगतात मुशाफिरी करणाऱ्या ँ़कार जोशी या बुद्धिमान तरूणाने इंटरनेटवर कोणालाही मराठी टाइप करता यावे यासाठी ' गमभन ' नावाचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर तयार करून ते http://www.var-x.com/gamabhana/ या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध केले आहे . या तंत्राचा वापर करून manogat.com सारख्या अनेक दजेर्दार मराठी वेबसाइट्स आज इंटरनेटवर आल्या आहेत . थोडक्यात , कम्प्युटरवर आणि इंटरनेटवर मराठीला गेल्या २५ वर्षांत जे जमले नाही ते येत्या ५ वर्षांत जमेल अशी आशावादी परिस्थिती आणि एक नवे पर्व ' युनिकोड ' तंत्रामुळे आज निर्माण झाले आहे . "
यावरुन असे वाटते की हा सर्व उल्लेख मधेमधे गमभन बद्दल असला तरी एकूणात शिरवळकरांना युनिकोड तंत्राबद्दलच बोलायचे आहे.
छान माहिती.
माहितीपूर्ण विचारांनी,प्रतिसादांनी आम्ही भारावलो आहोत.उपक्रमपंतानी मराठीच्या माहितीच्या संकेतस्थळावर आजघडीला बाजी मारली आहे.पण,आम्हालाही पहिल्या प्रेमाची राहून राहून आठवण येते.
आपला (पहिल्या प्रेमाच्या आठवणीने)
गळा दाटून आलेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा
हो हो हो नाही नाही नाही
(तुलनेपार केव्हाच पोहचलेला) एकलव्य