स्वप्नाचा आणि वास्तवाचा काय संबंध ?

आपणास स्वप्न पडतात.कधी ती आनंद देतात,कधी दु:ख,एखाद्या प्रश्नाबाबत ती कधी बुचकळ्यात टाकतात, तर कधी त्याचा उलगडा करतात.पण खरा प्रश्न आहे तो हा की,स्वप्नाचा सत्याशी काही संबंध आहे काय ?त्यातून काही उद्दिष्टपूर्ती होते काय ? एक प्रसिध्द उदाहरण स्वप्नाच्या वास्तवेतेशी दिल्या जाते. "ग्युसेप तारतिनी (टॉरटीने) हा अठराव्या शतकातील सुप्रसिद्ब् व्हायोलीन वादक.त्याचे संगीत-स्वरसंयोजक(sonata)चालू होते.त्यातील अवघड भागाची रचना करताना आता काय करावे असा त्याला प्रश्न पडला,विचार करता करता तो थकला व त्याचा डोळा लागला.झोपेत त्याला स्वप्न पडलं.स्वप्नात सैतान दिसला.त्यानं त्याला त्याच्या आत्म्याच्या मोबदल्यात स्वरसंयोजन पुरं करण्याचं आश्वासन दिलं.तारतीनीने ते मान्य केलं. जाग आल्यावर तारतिनिनं स्वप्नात ऐकलेले ते स्वर -संयोजन स्मृती आधारे कागदावर उतरवलं हेच ते तारतिनीकृत प्रसिध्द "द डेव्हिल्ज ट्रिल सनाट"( The Devils Trill Sonata)होय. वरिल उदाहरणाप्रमाणे अन्य कलावंतांना,वैज्ञानिकांना आणि साहित्यिकांना पडलेली स्वप्ने,त्यातून स्फुरलेल्या कल्पनांच्या आधारे लागलेले शोध व अवतरलेल्या कृती याविषयी आपन खूप ऐकत असतो. आर.एल.स्टिव्हेन्सनच्या "डॉ.जेकिल ऍन्ड मि.हाईड"मधील
ब-याच घटनांना लेखकाला पडलेल्या स्वप्नाचा आधार आहे.कोलरिजची 'कुब्लखान'ही कविता आणि डि.क्किन्सीचं 'द कन्फेशन्ज अब् अन् ओपिअम -ईटर हे आत्मचितरित्र ह्यांचा स्त्रोतही अफू खाल्ल्यानंतर आलेल्या गुंगीत पडलेल्या त्यांच्या स्वप्नात आहे." नेहमीप्रमाणे आपल्यासारखाच माझाही या गोष्टीवर विश्वास नाही.पण मी रिस्क घेत नाही.आपले मत काय आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

मनी वसे

मनी वसे ते स्पप्नी दिसे असे म्हणतात. स्वप्नांचे गुढ हे अजून पुर्णपणे उकलेले नाही. ज्योतिषात देखील स्पप्न हे भविष्यात डोकावण्याचे साधन म्हणून पहातात. शुभ,अशुभ स्वप्ने यातून भविष्यातील घटनांचे डिकोडिंग केले जाते.( यातूनच अंधश्रद्धा वाढीस लागतात)
प्रकाश घाटपांडे

हम्म्म्म्म्म्म्

आम्ही हल्ली मिशिगनसरोवराच्या काठावर विकसित राष्ट्रात राहतो. इथे ह्या जन्माच्या आधी पूर्वजन्म होते ह्या समजुतीला भाकड मानतात. ह्या मनाच्या पाठीमागे "अंतर्मने" आहेत ह्यावर मात्र पूर्ण विश्वास ठेवतात. आम्ही पडलो अमेरिकेतले देशी. अविकसित बोललो आणि कुणी ऐकलं तर अब्रूच जाईल. म्हणून विकसित स्टाईलने सांगतो. की स्वप्नातून भविष्यसूचना मिळणे हे अगदीच अशक्य नाही. कारण जी काय चारआठदहा अंतर्मनं असतील, त्यांच्यात कसली कपटकारस्थानं चालली आहेत ह्याची पामर बहिर्मनाला काय कल्पना? मनाला पटत नसलेलंच आत सुरू असतं ना. ते जागेपणी बाहेर पडत नाही. स्वप्नात मधून मधून दिसतं. नंतर कधीतरी अनवधानाने आपण तसलं काहीतरी करून जातो. घडल्यावर स्वप्न आठवतं. धक्का बसतो.

स्वप्न आणि भविष्य ह्यांच्यात संबंध असेल हे आपल्याला पटत नाही. ह्यावर नेहमीचा रामबाण उपाय म्हणजे दोन्हींचा उगम तिस-याच कशात तरी आहे अशी आपण कल्पना केलेली आहे. मग ती वस्तु "मन"-सदृश आहे असं वाटलं तर मनाच्या खाली एक मन, मग त्याच्याखाली आणखी एक मन, असं वाढवत नेणं. "जीवित"-सदृश आहे असं वाटलं तर जन्माच्या आधी एक जन्म, त्याआधी आणखी एक, असं करणं. कारण तिस-यावर थांबत नाही. त्याच्यातून चौथं निघतंच. अशी आपली विचारसरणी चालत आलेली आहे.

सि.फ्रॉईड

जगन्नाथ सेठ,
आपल्या विचाराशी सहमत पण

इ.स.१९०० मधे प्रकशित झालेल्या ' दि इंटरप्रिटेशन अव् ड्रीम्ज' मधे फ्रॉईडनं आपलं मन कसे कार्यशील असते याचे विवेचन केले आहे.प्रकट मनामागे एक अप्रकट मन असते,या मनाच्या आंतरप्रक्रियेत, आपण तसेच आपल्या जगासही घडवतो.असे म्हटले आहे.पण स्वप्नाचा आणि सत्याचा संबंध असेल असे विवेचन मात्र कुठे दिसत नाही.पण स्वप्नात दिसले जे पूर्वी कधी पाहिले नव्हते,आणि त्यावरुन भविष्यकाळाची वाटचाल केली , असे शक्य आहे ! असा विचार कुठे आहे का ? त्याची उत्सुकता आम्हाला आहे.

अवांतर:-( पावसामुळे संसंस्थळावर शुकशुकाट वाटतोय.का उपक्रमी फार बीझी आहेत प्रपंचामधे सध्या ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वप्नाचा आणि सत्याचा संबंध

जगन्नाथ सेठ,
आपल्या विचाराशी सहमत पण

इ.स.१९०० मधे प्रकशित झालेल्या ' दि इंटरप्रिटेशन अव् ड्रीम्ज' मधे फ्रॉईडनं आपलं मन कसे कार्यशील असते याचे विवेचन केले आहे.प्रकट मनामागे एक अप्रकट मन असते,या मनाच्या आंतरप्रक्रियेत, आपण तसेच आपल्या जगासही घडवतो.असे म्हटले आहे.पण स्वप्नाचा आणि सत्याचा संबंध असेल असे विवेचन मात्र कुठे दिसत नाही.पण स्वप्नात दिसले जे पूर्वी कधी पाहिले नव्हते,आणि त्यावरुन भविष्यकाळाची वाटचाल केली , असे शक्य आहे ! असा विचार कुठे आहे का ? त्याची उत्सुकता आम्हाला आहे.

काय आहे सर . . . मी ह्या विषयावर ठरवून शिस्तबद्ध असं काही वाचलेलं नाही. पण "संबंध आहे" ह्यावर मात्र माझा १००% विश्वास आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा, ह्याचा विचार करताना थोडंफार सुचलं ते असं.

रागसंगीतात जसे "संकीर्ण राग" असतात, तशाच स्वप्नात आपल्याला "संकीर्ण व्यक्ति" ब-याचदा दिसतात. म्हणजे कपडे एकाचे, चेहरा दुस-याचा, बोलण्याची ढब तिस-याचीच, हातवारे परत पहिल्याचे, अशी "व्यक्ति" अधूनमधून आपल्याला स्वप्नात दिसते. तरीही ती विश्वसनीय वाटते. म्हणजे अशी व्यक्ति असू शकेल हे पटतं. जो यशस्वी ("विश्वसनीय") जोडराग निर्माण करणारा विदग्ध संगीतकार असतो त्याने काय केले? तर रागाबद्दलचे एक सत्य त्याने प्रकाशात आणले. तसेच आपल्या स्वप्नाने दोनतीन व्यक्तींबद्दलचे एक "सत्य" आपल्या डोळ्यांसमोर आणले असे मला वाटते. ते जर झटकून टाकले नाही तर त्या माणसांना आपण जास्त समजू शकू. पण ह्या बोलण्यात एक गोम आहे. ती म्हणजे नवनिर्मिती करणे, आणि सत्याचा (म्हणजे "असलेल्याचा") शोध घेणे, ह्यांच्यात विरोधाभास नाही का? ह्यावर मला वाटतं की तो विरोधाचा निव्वळ आभास आहे. तो आपल्याला इंग्रजीच्या नादानेही वाटला असेल, कारण त्यांच्यात discovery आणि invention हे दोन शब्द आहेत. आपण दोन्हींना निदान बोलीभाषेत तरी "शोध लावणे" असेच म्हणतो. शोध घेणे म्हणजे जणू सत्याची निर्मिती करणे, अशी त्यामागची भावना आहे. तिच्यात तथ्य आहे असे मला वाटते. (Invention ह्या शब्दात जी एक अत्यंत दर्पयुक्त भावना आहे ती अापल्या संस्कृतीत नीट बसत नसावी.) हे सर्व बोलण्याचे प्रयोजन काय? तर सत्य आणि कल्पित ह्यांच्यात फार काही फरक नाही. "शास्त्रज्ञ" अाणि "कवी" ह्यांच्यात नाही. फ्रॉइडचं मी वाचलेलं नाही. वाचायला हवं. पण निदान वरचं वाचून असं वाटतं की प्रत्येकाचे मन हे "कविमन" आहे, असे काहीसे त्याचे मत आहे. म्हणजेच प्रत्येक माणूस कमीअधिक प्रमाणात प्रतिभावंत अाहे. म्हणून माणसामाणसातले संबंध टिकतात. तर स्वप्नाचा कल्पिताशी जर संबंध आहे, आणि कल्पिताचा वास्तवाशी आहे, तर स्वप्न-वास्तवाचा संबंध लागलाच. ह्या तीन्हींचा उगम मनातल्या अथवा अबोधमनातल्या प्रतिभेच्या उन्मेषांत आहे. असा तो संबंध आहे.

म्हणूनच केक्यूले आणि कोलरिज् ह्यांच्यात वाटतो तितका फरक नाही. दोघांनीहि सत्याची निर्मिती केली. म्हणजे त्यांनी प्रथम वापरलेली भाषा इतर लोक वापरू लागले. ज्ञानेश्वरांनी योजलेली भाषा लोक आपल्या परीने वापरू लागले. म्हणून तीत सत्यसृष्टी आहे, की कल्पित, की स्वप्नसृष्टी, हे प्रश्न बरोबर नाहीत. सत्य आहे की रूपक, हा प्रश्न वाजवी नाही.

शिवाय ह्यावरून "वास्तव" म्हणजे तरी काय, हे ही थोडेफार कळते. आपण ज्याला वास्तव म्हणतो त्याचा आधार ऐंद्रिय संवेदनांत नसून मानवी संबंधांत आहे. भाषेत आहे. म्हणजे आपल्याला आंबा बघून किंवा वास घेऊन तो "आंबा" आहे हे कसे समजते? तर ह्यात आंब्याने काही केले नाही. आईने लहानपणी हा (विशिष्ट आकार, रंग, गंध इत्यादींचा एकत्रित परिणाम) म्हणजे आंबा, असे उदाहरणे देऊन शिकवले, आणि आपण ऐकून-ऐकून शिकलो. शिवाय आंब्याचे काय करायचे, म्हणजे कापून खायचा, नाहीतर आमरस करायचा, वगैरेही त्याच वेळी शिकलो. म्हणूनच आंबा ही संकल्पना आपल्या मनात तयार झाली. ह्याच्यात माणसाने आंबा ह्या "वस्तु"चा शोध घेतलेला नाही, तर आंबा ह्या नावाची निर्मिती केलेली अाहे. नाव देणे हेच कवीचे काम ही शेक्सपियरची उक्ती प्रसिद्धच आहे. ह्या दिशेने विचार केला तर स्वप्न आणि वास्तवाचा संबंध असलाच पाहिजे, इतक्या थराला आपण पोचतो.

मास्तर .

मास्तर,
विषय तसा भारीच हाये,पण मला झोपच येत नाय हो,मंग सपनाचा प्रश्नच नाय !

केक्यूले आणी बेंझीन रिंग

केक्यूलेला बेंझीन रिंगमधील कार्बनच्या अणूंची रचना कशी असावी हे कोडे पडले होते. मग त्याला स्वप्नात एकमेकांची शेपटी तोंडात धरलेले साप दिसले आणि त्यावरुन बेंझीन रिंगचा शोध लागला असे शाळेत असताना वाचले होते.
बाकी उद्याच्या पेपरचा अभ्यास न झाल्याची स्वप्ने अजून का पडावीत हे कोडे उलगडत नाही!

सन्जोप राव

वरच्या बर्थवरून

ट्रेन मध्ये सर्वात वरच्या बर्थवर झोपल्यावर धपकन् खाली पडल्याचं स्वप्न पडत बॉ नेहेमी. (बाजूच्या बर्थवरचा माणूस झोप मोडल्यामुळे "च्यायला झोपा की राव तुम्ही हं झोपा" असं ओरडतो.

ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा

बीएस्सी झालेवर मला ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा हा विषय अजून राहिल्याने आपल्याला डिग्री मिळालेली नाही. असे स्पप्न मला पुढे बराच काळ पडे. डिग्री सर्टिफिकीट मला पोस्टानेही आले नव्हते व कॉलेजमध्येही मिळाले नाही. शेवटी दहा वर्षाने पुन्हा कॉन्व्होकेषन केले व डिग्री सर्टिफिकिट हातात घेतले तेव्हा कुठे स्वप्न पडायचे बंद झाले.(ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा हा विषय राहिल्याने माझे वर्ष वाया गेले होते)

(बीयश्शी अबस्ट्र्याक्ट)
प्रकाश घाटपांडे

मनःस्थिती

स्वप्न हे संपूर्ण नाही तरी काही अंशी आपल्या चंचल मनःस्थितीचे लक्षण असते. कुठल्याही पद्धतीने (नैसर्गीकरीत्या, योगसाधनेने, जाणून वगैरे) जेव्हढे मन शांत ठेवू शकेल त्याला/तीला स्वप्ने पडण्याची शक्यता कमी .

लोकमान्य टिळकांच्या संदर्भात वाचले आहे की ते म्हणायचे की (अगदी तुरूंगात पण) एकदा झोप लागली की पूर्णपणे शांत लागते - एकही स्वप्न पडत नाही. याचे अर्थातच कारण की जे काही कार्य करतो आहे त्याचा कार्यकारणभाव समजून आणि त्याच्या फळाबद्दलची अलिप्तता ("तुटकपणा" अथवा इंग्रजीतील "अलूफनेस" नव्हे) आत्मसात करून कार्यमग्न असणे आणि तशी स्वतःस शिस्त लावून घेणे. अर्थात याला देखील मानवी मर्यादा असतात. म्हणूनच त्यांच्या अंतःकाळी ,मुंबईच्या सरदारगृहात, त्यांचे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत बोलणे (असंबद्ध बडबडणे) चालू होते. त्यात पण स्वातंत्र्य, कागदपत्रे, लोकसंपर्क यावरच एका अर्थी स्वप्ने पडल्यामुळेचबोलणे चालू होते. शेवटची अशी आठवण सांगीतली गेली आहे की, ते भाषणाच्या पद्धतीच "बडबडत" होते आणि अशा अर्थी म्हणाले ,"..आणि म्हणून मी आपला आभारी आहे.." आणि नंतर पूर्ण शुद्ध हरपली.

बिरूटे साहेब.....

माझाही या गोष्टीवर विश्वास नाही पण रोज न चुकता दिसणारी एक सुंदर तरुणी दररोज रात्री, पहाटे स्वप्नात येते किंवा सतत तिचा चेहरा दिसतो त्यामुळे निद्रानाश झालाय हो उपाय सांगाल का?
आपला
कॉ.विकि

बिरुटेशेठ,

माझ्याही स्वप्नात अशाच काही सुंदर मुली आणि स्त्रीया अधनंमधनं येत असतात. तेव्हा बिरुटेसाहेब, आपणच काहीतरी उपाय सुचवा! :)

आणि मला काही वेळेला दिवसाही स्वप्नरंजन करण्याची सवय आहे, त्यावर काही उपाय?? :)

आपला,
(स्वप्नाळू) तात्या.

विकिशेठ आणि तात्या.

निद्रानाशा वरीलआणि डोळ्यासमोर कोणत्याही प्रकारची तरुणी येत असेल तर ध्यान धारना,योग साधना,व्यायाम,कंटाळवाणी पुस्तके,कंटाळवाने सिनेमे,"क "पासून सुरु होणा-या मालिका,कंटाळवाने लेख, या सर्वांचा आनंद घ्यावा नक्की झोप येईल. इतके करुनही निद्रानाश,आणि डोळ्यासमोरील तरुणी जात नसेल तर याचा वापर करावा,नक्की फरक पडेल ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यामारी, ;)

च्यामारी बिरुटेशेठ,

तुम्ही दुवा बाकी जोरदारच दिलाय हो. डायरेक्ट पांढरा घोडा??!! :))

आपला,
(घोडेस्वार!) तात्या.

सही!

(घोडेस्वार!) तात्या.

तात्या म्हणजे तात्या...! :)))))
आपला
गुंडोपंत

अनुभव

बर्‍याचदा आम्ही हवेतून तरंगत तरंगत खाली येत आहोत असे स्वप्नात वाटत राहते. पार्श्वभागाला जमिनीचा दाणकन स्पर्श झाल्यानंतर आम्ही खाटेवरुन खाली पडलो आहोत हे वास्तव स्पष्ट होते.

आमच्या बाबतीत अशा प्रकारे स्वप्नाचा आणि वास्तवाचा अतिशय जवळचा संबंध आहे.

- योगेश

अवांतरः मात्र तात्या व विकि प्रमाणे पडणारी स्वप्ने वास्तवात का येत नाहीत याची चिंता लागून राहिली आहे.

नाईट फॉल

पार्श्वभागाला जमिनीचा दाणकन स्पर्श झाल्यानंतर आम्ही खाटेवरुन खाली पडलो आहोत हे वास्तव स्पष्ट होते.

आमच्या बाबतीत अशा प्रकारे स्वप्नाचा आणि वास्तवाचा अतिशय जवळचा संबंध आहे.

कॉलेजच्या होस्टेल मध्ये मेडिकल चेक अप दर वर्षी व्हायचे, डॉक्टर ने मला एकदा विचारले नाईट फॉल होतो का? माझ्या डोक्यात वरील ".."विचार असल्याने मी 'होतो कधी कधी 'म्हणून सांगून टाकले. मनात म्हणलं आता रात्री झोपेत माणूस कॉट वरून कधी कधी खाली पडतोच की त्यात काय विचारायचे. डॉक्टर ने 'ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही 'म्हणून पुढची तपासणी चालू केली.
माझ्या शहरी मित्राला जेव्हा हा किस्सा सांगितला तेव्हा तो खदा खदा हसला.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर