एका विचारवंत मराठी स्थळाची ही परिस्थीती असेल तर 'गुप्तांनी वडे...

चाणक्य यांनी जम्बो वडा यावर लिहिलेल्या लेखावर
एक मुद्देस्सूद प्रतिसाद लिहिल्यावर त्यावर एकही
खरोखर मंथन करणारा प्रतिसाद येवू नये?

फक्त वडे घेतांना काय अनुभव कोण किती वडे घ्यायला लावतो इतकेच लिखाण? त्याचा काहीच अनॅलिसीस का नाही?

 1. एका रस्त्यावर वडेवाले किती?
 2. साधारण किती खप?
 3. कोणत्या ग्राहकाला नक्की काय हवे? याच्या काही कॅटेगरीज आहेत का?
 4. अशी विक्रीची मालिका खरंच करता येईल का?
 5. काय केले पाहिजे त्यासाठी आपण?
 6. मॅक चे निकष खरंच योग्य आहेत का?
 7. कुठुन आणले म्हणे हे निकष तुम्ही?
 8. हेच निकष का? मॅक नक्की काय केल्याने ग्लोबल आहे?
 9. त्यांना स्पर्धा कुणाची?
 10. गुप्तांना वडे का ग्लोबल करायचेत?
 11. यात आपल्याला काय काय संधी आहे?
 12. वडे फ्रोझन करून निर्यात करत येईल का?
 13. कुठे कुठे पाठवता येतील? कशी सुरुवात करावी?
 14. लॉजिस्टीक्स चे काय?
 15. प्रायसींग कसे केले पाहिजे?
 16. कोणत्या देशांतले कायदे मऊ/कडक असतील? नक्की काय असतील?
 17. कोणी आधी हे केले आहे का?
 18. चितळे किंवा वाडीलाल हे का नाही करत आहेत?
 19. काय काय संधी नि काय अडचणी आहेत?

कुणालाच काहीच प्रश्न पडू नयेत?????
असं एका विचारवंत मराठी स्थळाची ही परिस्थीती असेल तर 'गुप्तांनी वडे विकणे' आणी आपण मराठी लोकांनी त्यावर 'चर्चा करणे' हेच बरोबर!

(आणी ती ही फक्त इतिहास आणी फिलॉसॉफीचीच चर्चा... ;) )
आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

Comments

वडापावचा शोध सिंध्यांनी लावला!

गुंड्याभाऊ,

कुणालाच काहीच प्रश्न पडू नयेत?????

खरं सांगायचं तर तू जी प्रश्नांची यादी दिली आहेस त्यापैकी एकही प्रश्न मला पडला नाही.

असं एका विचारवंत मराठी स्थळाची ही परिस्थीती असेल तर 'गुप्तांनी वडे विकणे' आणी आपण मराठी लोकांनी त्यावर 'चर्चा करणे' हेच बरोबर!

अरे पण गुप्ता वडा विकतात ही तर वस्तुस्थिती आहे ना? जे गुप्तांना जमलं ते त्यांनी केलं, चितळेला जे जमतंय ते चितळे करतोय आणि आपल्याला जे जमतं ते आपण करू! तू ज्या प्रश्नांची यादी दिली आहेस त्याचा विचार या संस्थळावरील प्रत्येक मराठी माणसाने का बरं करावा? काय सक्ती आहे काय च्यामारी?

आणि मराठीपणाबद्दल वगैरे बोलत असशील तर 'बटाटावडा' हा पदार्थ अगदी १००% मराठी आहे, परंतु त्याला पावात घालून खायची कल्पना मात्र सिंधी माणसाची!

त्यामुळे वडापाव या पदार्थाचा शोध सिंधी माणसाने लावला असं म्हणावं लागेल.!

आपले आईवडील, आजीआजोबा वडे खात होते, पण वडापाव खात नव्हते. वडापाव हा त्या मानाने बराच अलिकडल्या काळातला शोध आहे आणि तो सिंधी माणसाने लावला.

तात्या.

छान!

मिसळपावने वडापावाला सडेतोड उत्तर दिले आहे!

याना बी द्ये येक्

म्हमद्या.... तात्याबांच्या या सडेतोड मित्रास्नी बी च्या आन् येक्!! आन परत् त्येच चामारी! पानी द्येतानी हात् बुचकळू नै!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

घ्या तर आणखी प्रश्न...

१) वडा पाव दुकानांमध्ये 'म्हंमद्या' हा प्रकार पण असावा का?
२)असल्यास त्याने पेल्यात बोटे बुडवुन पाणी आणावे का?
३) गिर्‍हाइकाने त्याबाबत तक्रार केल्यास, 'मला का वरडता? त्यो पानी देनारा मारत्या तर अख्खा हौदात हुबा हाय' हे उत्तर देणार का?

ह्यावरही सखोल विचार व्हावा :-)

मला का वरडता

'मला का वरडता? त्यो पानी देनारा मारत्या तर अख्खा हौदात हुबा हाय'

:-)))

अधिक माहिती: कुर्यात् सदा टिंगलम् नाटकातही हा संवाद होता..

अभिजित

म्हमद्या

म्हमद्या
म्हमद्या हां! इकडं ये आसा..
ह्ये पाय हे हाये वरून सायेब!
हे इचारून र्‍हायलेत का आपल्या म्हम्...
काय! काय?...

वरून सायेब तं खालून कोन्?

पाहु का त्वा कडं काय रे... अय आर् पळ्तो कुडं? इकडंळं येना..
ये म्हमद्या... म्हमद्या....
आर तुज्य नोकरीचं इचारू र्‍हायलेना वरून सायेब... आन् त्या मारतीला काडा रे कुनि तरी हौदातनं भायेर्

च्यामारी म्हमद्या पळाला बर्का!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

लैच की राव!

तात्याबा,

वाचत् हुतो आदीचं जरा तवा वाटलं आन् आता लिवलाय बा जरा तावातावात !
जे जमतं ते आपण करू!
त्येच तं केलं! ;)
तू ज्या प्रश्नांची यादी दिली आहेस त्याचा विचार या संस्थळावरील प्रत्येक मराठी माणसाने का बरं करावा?

आजाबात करु ने! पन् दुसरा तं काय करावा का नाय?

काय सक्ती आहे काय च्यामारी?

आजाबात नै!
आपले आईवडील, आजीआजोबा वडे खात होते, पण वडापाव खात नव्हते. वडापाव हा त्या मानाने बराच अलिकडल्या काळातला शोध आहे आणि तो सिंधी माणसाने लावला.

येक्दम मान्य हाय पन् म्य म्हंतु मराटी मन्सानं वडे इकुचा इचार बी करु नै?
निस्ता इचार् म्हनू रायलो तात्याबा निस्ता इचार... काय म्हाग है का? फुक्कट भेटतो ना त्यो!
जेवडी जास्त् मराटी मान्स धंद्यात येनार त्येवंडं बरंच की रं तात्याबा... त काय् चुकलं काय् माजं?
येवड्यातून येकाला तरी काय कराव वाटलं ना तरी बी लै खुशी हाये रे तात्याबा!

च्या घ्याचा काय तात्याबा??
म्हमद्या.... तात्याबास्नी चा आन् येक्!! आन हात् धून् पानी द्ये एक्!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

खरं हाय!

येक्दम मान्य हाय पन् म्य म्हंतु मराटी मन्सानं वडे इकुचा इचार बी करु नै?
निस्ता इचार् म्हनू रायलो तात्याबा निस्ता इचार... काय म्हाग है का? फुक्कट भेटतो ना त्यो!

हो हो, नुसता विचार फुकटच भेटतो! :)

जेवडी जास्त् मराटी मान्स धंद्यात येनार त्येवंडं बरंच की रं तात्याबा... त काय् चुकलं काय् माजं?
येवड्यातून येकाला तरी काय कराव वाटलं ना तरी बी लै खुशी हाये रे तात्याबा!

खरं हाय. आमालाबी खुशी हाय!

च्या घ्याचा काय तात्याबा??
म्हमद्या.... तात्याबास्नी चा आन् येक्!! आन हात् धून् पानी द्ये एक्!

आधी मिसळ मागव, चहा नंतर! :)

माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

मी पण करतो!

तात्या.

मरतांना जर यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे तर मी अण्णांचा 'शुद्धकल्याण' आणि 'मिसळ' हे उत्तर देईन!

खरं हाय!

मरतांना जर यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे तर मी अण्णांचा 'शुद्धकल्याण' आणि 'मिसळ' हे उत्तर देईन!

एखादं रेकॉर्डिंग सांगता का? "रस भीनी" असं काहीतरी आहे ना?

जगन्नाथ, मिलिंद,

एखादं रेकॉर्डिंग सांगता का? "रस भीनी" असं काहीतरी आहे ना?

हो. ती शुद्धकल्याणातली द्रुत बंदिश आहे. 'तुम बिन कौन' ही विलंबित बंदिश अण्णा गातात. 'मोंदरवा..बाजो' करीमखासाहेबांची बंदिशही अण्णा फार सुरेख म्हणतात. ही

तात्या म्हणतात शुद्ध कल्यान. ते "रस भीनि भीनि आ तेरो "हे दुर्गा हाय बगा.

नाही रे मिलिंदा, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. दुर्गा रागात 'तू रसकन रे' ही विलंबित आणि 'चतर सुगरा..' ही द्रुत बंदिश अण्णा गातात. पण खरं आहे, दुर्गा, शुद्धकल्याण, पुरिया, मालकंस, दरबारी, तोडी, मुलतानी, पुरिया कल्याण इत्यादी राग अण्णांनीच गावेत.

तात्या.

वडापाव मराठी नाहीच

त्यामुळे वडापाव या पदार्थाचा शोध सिंधी माणसाने लावला असं म्हणावं लागेल.!

तर काय! वडापाव मुंबईचा आहे हे म्हणणं फारतर ठीक. पण तो मराठी वगैरे काही नाही. आणि गेल्या वर्षी मसाला डोसा दिग्विजय करणार असं ऐकत होतो त्याचं काय झालं? आधी करून दाखवा साल्यांनो.

शिवाय फ्रॅंचाइस् मध्ये वडापावाची काय विटंबना होणार आहे ते दिसतंच आहे. म्हणजे इंग्लंड-अमेरिकेतले देशी तो महाबेचव प्रकार एक चार-सहा महिने खाऊन बघतील. नाहीतर आणखीही खातील. कारण ह्या देशी लोकांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. पूर्वी भारतातला इंग्रज अगदी भिकारातली भिकार शेक्सपियर कंपनी आली तरी कसा हपापल्यासारखा बघायला जात असेल ह्याची कल्पना करा. तसलेच हे. त्यांचा फायदा घेणारा कोण असेल तो असो. अभिमान कसला डोंबलाचा.

छान चालु आहे.

आम्हाला अनॅलिसीसशी काही देणं-ना-घेणं,बस आपलं एकच काम खाण्याचे, अन तेही तब्येतीने.

अवांतर;) वड्या-बीड्याच्या भानगडीत आमचे गुंड्याभाऊचे मजेशीर प्रतिसाद हरवत चाललेय असे वाटते;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीड्याच्या?

बीड्याच्या नाय!
त्ये आज्काल 'गोळी' मिळना झालंय मास्तरसाब काय सांगावं आता?
इचरलंरं म्हंत्यात शेकुरीटी लै टाईट!
आत तुमीच बगा, गोळी नाय त मग काय लिवायला हुनार?
बरुबर् का नै?

ह्ये आपापसात बर्का : तुमाकड् हाय् का कायी? आत द्या बा आसन् त येकादी... इकडं तिकडं कान्या कोपर्‍यात आसन् ना! पा त खरं तुमी...

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

बीडी का नको !

बिड्या उर्फ विड्याचा (कोंबडा छाप,तोतापरी)फार मनोरंजक इतिहास आहे.खरे तर या वड्याच्या निमित्ताने दैनिकाला जोडून येणा-या पूरवणीप्रमाणे माहिती येईल असे वाटले होते.

अवांतर ;) अशा सटर-फटर खाण्यामुळे पोटाचा गोदाम केला,असा माजघरातला एक उपप्रतिसाद नेहमी आम्हाला येत असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

विड्याचा की विड्यांचा

विड्याचा म्हणजे खायच्या नागवेलीच्या पानाचा.
विड्यांचा म्हणजे तोतापरी/कोंबडा छाप बिड्यांचा

त्यामुळे विड्याचा व विड्यांचा इतिहास वेगळा असावा असे वाटते.

(विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या काळजीत!) योगेशयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

पुस्तकाचे नाव

व कोलबेर या नावाचे आंग्लभाषेतील स्पेलिंग कळेल का?


येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

धन्यवाद

कोलबेर च्या नावातील टी अनुच्चारित आहे काय!. आम्ही केओएलबीईआर असे शोधत बसलो असतो येड्यावानी.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

अमेरिका..

आहाहाहा.... अमेरिकेत आल्यानंतर आम्ही खरेदी केलेले हे पहिले पुस्तक!! इतिहासाचे इतके मनोरंजक आणि 'माहितीपूर्ण' पाठ्यपुस्तक जगात दुसरे नाही ;-)
स्टिव्हन कोलबेर चे स्पेलिंग हे Stephan Colbert असे आहे. कोलबर्ट हे आडनाव फ्रेंच असल्याने त्याचा स्टिव्ह त्याचा उच्चार 'कोलबेर' असा करतो. आणि त्याचीच री ओढत 'कोलबेर रीपोर्ट' ह्या शो चा उच्चार देखिल 'कोलबेरे रिपोर' असा करतो.. त्याउप्पर त्यातल्या खेळ विभागाचा उच्चार स्पोर् रिपोर् असा करतो ते खासच!!

विड्यांचाच ! हा हा हा

विड्याचा व विड्यांचा दोघांचाही इतिहास चांगलाच आहे.खरे म्हणजे आमचे विद्यार्थी 'त' चे तपेले आणि 'त' पासून सुरु होणा-या सर्व शब्दांचे 'दुवे' देतात.त्यामुळे माझ्यासकट कोणीही त्यांच्या भवितव्याची काळजी करण्याचे कारण नाही.कारण शुध्दलेखनाच्या चूका काढण्याचे मानधन त्यांना मिळत नाही.ज्यांना मिळतात ती माणसं कशी हूशारी करत फिरतात, हे आम्हाला केव्हाच कळले आहे. ;)

अवांतरः- मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होऊन आता ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे.ही बातमी अजून अमेरिकेत गेली नाही का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ईचार

हे सगळे इच्चार वडापाव खाउन झाल्यावं मंग करायचा. प्वॉट भर्ल्यावं मंग इचार सुचत्यात्. आमाल बी पल्डे ना हये परशन्?

प्रकाश घाटपांडे

खरंय!

अगदी खरं बर्का सायेब!
प्वाट भरल्यावं मग सुचतं गा समदं!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

आतल्या तारा

युयुत्युराव,
आपण हा प्रश्न विचारून आमच्या 'आतल्या ताराच छेडल्या आहेत'
तसा ही मी जरा जास्त 'अँटी कॉर्पोरेट स्टँड' घेणारा आहे. तुम्ही असे भावनेला हात घालणारे प्रश्न विचारलेत तर मी हा विषय बंद करणार बॉ... तयार मटन हॉटेलात खायलाच छान लागतं, तुमच्या समोरच बोकड कापला तर त्याची तडफड पाहिल्यावर जेवण चांगलं जात नाही...!

तसं आता तुमच्या प्रश्नामुळे माझं झालं आहे...

थोड्यावेळाने लिहितो...
आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

कार्पोरेट

जिथे जिथे कार्पोरेट आली तिथे तिथे सामान्य लोक उध्वस्तच होतात हो!
हेच सत्य आहे. फक्त त्यात मराठी माणसे असली तर तेव्हढा तरी फायदा इतकेच मला वाटते.
कार्पोरेटस ना फक्त त्यांचे सेल्स चे ग्राफ्स वर नेण्यात रस असतो.. लोकांमधे नाही!

आपला
गुंडोपंत

जंबो वडापाव बेचव असल्याचा रिपोर्ट.

पण भावनांना हात घालणार्‍या क्षेत्रात कार्पोरेट आली, तर मग मन उदास होते.

खरं आहे!

त्यात कार्पोरेट आली तर मग कसे ? सेफवे नावाच्या भल्यामोठ्ठ्या दुकानातले टमाटे (आपली भेदरं हो) इतकी चवहीन असतात. काय सांगू. त्यामुळे आमची जीभ मृतवत आहे की काय, असे प्रश्न भेडसावतात.

हे बाकी अगदी खरं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, बाजुला प्यायच्या पाण्याचं प्लाश्टिकचं पिंप ठेवलेल्या साध्या हातगाडीवर जो चटकदार, चवदार वडापाव मिळेल/मिळतो त्या चवीचा, त्या आपुलकीचा वडापाव कॉर्पोरेट झाल्यावर नक्कीच मिळणार नाही. त्याला हायजिनिक, हायफाय वगैरे करण्याच्या फंदात त्याची चव निघून जाईल.

जंबो वडापाव हा अत्यंत बेचव आणि नीरस असल्याचा प्राथमिक रिपोर्ट कालच आमच्या मित्राकडून आम्हाला मिळाला आहे. चमचमीतपणा, झणझणीतपणा, चटकदारपणा आजिबात नव्हता असे सांगत होता.

हा रिपोर्ट ऐकून आमची मिसळ कॉर्पोरेट न झाली तरच बरे, असे आता वाटू लागले आहे..

तात्या.

मरतांना जर यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे, तर मी अण्णांचा 'शुद्धकल्याण' आणि 'मामलेदारची मिसळ' हे उत्तर देईन!

निश्चित असणार!

निश्चित असणार!
त्यात मराठी माणूस कुठाय हो चव आणायला!?

आपला
गुंडोपंत

डिस्क्र्मिनेटीव्ह

"ए सायबांना चा दे रे !" ही आर्डर आत जाणे, मला खुर्ची मिळणे, लगेच त्यासमोरचा टेबल पुसला जाणे,

या गोष्टी डिस्क्र्मिनेटीव्ह आहेत. असं घडायलाच नको!

याचा दुसरा अर्थ असा की, उद्या तुम्ही १ वडा घ्यायला गेलात तर
तुम्हाला हे वरचे काही मिळणार....

अर्थात सगळ्यांना सारखी'च' वागणूक असणे गरजेचे नाही का?

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

हा हा!


तुम्ही स्वतःला काय चिनी साम्यवादी पार्टीचे सब डेप्युटी चिफ कामरेड समजताय का ?

हा हा हा!
हसून हसून दमलो!
चांगलाच टोला! आवडला!!!
तुमच्या त्या गूगलला पण विचारा ना... काय काय झाले नि त्यांनी कसे कसे नाक घासले चीन समोर ते!

असो,
माझे म्हणणे इतकेच, की सर्व ग्राहकांना समान वागणूक देण्याने दुकानावरचा विश्वास वाढतो.
तुम्ही कोणत्याही मालिकेच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला वेगळी वागणूक मिळत नाही. तुमचीही तशी अपेक्षा नसते कारण तुम्हाला खात्री असते की इथे कुणाला वशीला लावावा लागणार नाहिये आणी कोणी स्पेशल फायदा घेणार नाहीये.

रांगेचा फायदा सर्वांना तसेच याचा एक प्रकारे सर्वांनाच फायदा नाही का?

आपला
गुंडोपंत

भारतीय खाद्यपदार्थ अधिक हानीकारक

या वृत्तानुसार भटुरा, पराठा हे पदार्थ पाश्चात्य पदार्थांपेक्षा अधिक हानीकारक आहेत.

त्यामुळे पराठा महालातील वास्तव्य हे पिझ्झा झोपडीतील वास्तव्यापेक्षा अधिक आरोग्यदायी असेल अशा भ्रमात राहू नये.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

थालीपीठ

आमची आज्जी बाजरीचे पीठ घालून बनवते ते कांदा-कोथींबीरयुक्त थालीपीठ (त्यावर लोण्याचा गोळा घेतला तरीही) पराठ्याऐवजी अधिक आरोग्यदायी असेल याची खात्री वाटते. त्यात हानीकारक असे वनस्पती तूप वापरत नाहीत.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

हो!

विकण्याचा एक मार्ग असेल तर ते ही चालेल!
काहिच हरकत नाही.
जगात त्याचे 'हाईप कशी तयार करायची' तेवढे पहा!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

हो! मान्य!

युयुत्सुराव आपले म्हणणे मान्य आहे.
(अनेकदा चवी पेक्षाही) नाव कॅची असणे खुपच महत्वाचे आहे!

आपला
गुंडोपंत

मराठा पराठा

लोण्याबद्दल तुमचे म्हणणे बरोबर!

थालीपीठ ला मराठा पराठा असे नाव द्यावे ;)

बाय द वे, चकुल्या हा पदार्थ माहिती आहे का? भारतीय पास्ता म्हणून विकता येईल. फक्त वरुन साजूक तुपाची धार घालायला विसरु नका.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

हा हा हा!

फक्त वरुन साजूक तुपाची धार घालायला विसरु नका
हा हा हा!!!
फ्रोझन तुपाचा गोळा मिळेल फार् तर!

आपला
गुंडोपंत

तुपावरुन आठवले

एका एकारान्त आडनावाच्या मालकाच्या उपाहारगृहामध्ये तुपाच्या वाटीत एक सपाट चमचा बुडवून नंतर तो ताटावर धरतात. नशीब चांगले असेल तर त्या चमचाला जास्त तूप चिकटते व ताटात पडते. ;)येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

हा हा हा!

झकास!
हे कुठे आहे ते सांगा म्हणजे जाणार नाही! :)

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

नाव सोडून बोला!

उगाच मराठीव्यवसायहानीइच्छुका ! असे म्हणाल मला. ;)येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

याचा काहीच संबंध नाही!

हे बघा याचा काहीच संबंध नाही!
करण तसं बघायला गेलं तर बर्गर सकट जगातली प्रत्येक गोष्ट शरिराला एक मर्यादे नंतर घातकच आहे.
आपल्याला वस्तू काय हा विचार करायचा नाहिये तर बिझिनेस प्रोसेस् बनवायची आहे.
मग हवे ते विकता येईल.

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

आम्ही गिर्‍हाईक

आम्ही गिर्‍हाईकाच्या दृष्टीने विचार करत आहोत. तुमचा म्हाद्या ग्लासात २ बोटे बुडवतो की ३. मारत्याचा गुडघा पाण्यात बुडाला आहे की नाही या गोष्टी आमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत हो.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मान्य!

मग सांगा की काय स्वच्छ हवं आणी कसं हवं.
तेच तर हवंय.

झाली की मग आपली ऑपरेशनल हेल्थ आणी सेफ्टी ची पॉलिसि तयार!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

उत्तम कल्पना!

वा उत्तम कल्पना आहे,

आता यावर हे सगळे 'कसे कसे केले पाहिजे' याचा
'क्रमवार विचार' करत जाऊ आणी मुद्दे लिहुन काढु.
एक मस्त बिझिनेस प्रपोझल तयार होईल.

मग ही बिझिनेस प्रपोझल तयार होण्याचे पद्धत आपण वेगळी काढू. ही पद्धत पण विकता येते!
त्यालाच मालिकेतून वितरण अर्थात फ्रँचायझी डिस्ट्रिब्युशन् म्हणू.

मग विक्रीचे वस्तु बदलली तरी चालेल.

पद्धत आहेच हाताशी हे होईल प्लान ऑफ एक्सपांशन.

कायदा/टॅक्स वगैरे नंतर विचार करता येईल.
येवढंच आत्ता मी म्हणतोय!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

दिवाळ्याचा अर्ज....

मागवून घ्या!!! असे अंतू बर्वा ह्यांनी कळवलेय!
आणि महाराष्ट्र व्यापारात मागे का ह्यावर व्याख्याने द्यायला आपण मोकळे.. असे पुलंनी कळवलेले आहे.

द्यायलाच हवीत!

आम्ही सदर विषयावर भाषणे देणार नाहीच, असे नाही.

भाषणे द्यायलाच हवीत! त्यातूनच विचारांना काही तर चालना मिळेल...
आणी चांगली किंमत येत असेल तर् दुकान विकायला काहीच हरकत नाही.

आपला
गुंडोपंत

तरीपण!

काका
तरीपण मी आशा करेनच!
यात मराठी माणूस नक्कीच पुढे येईल...

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

मराठी माणूस..

जाँ बोद्रियार् यांच्या तत्वज्ञाना नुसार, 'तुम्ही 'कोण' आहात?' हे तुमच्याकडे 'काय' आहे' ह्यावर ठरवणे बंद केले तर मराठी माणूस बाकिच्यांच्या पुढेच दिसून येइल ..पण अर्थातच बी एम् ड्ब्ल्यू वर आधारीत कोण आहात? हे ठरवले तर गोष्ट वेगळी!!
--
IF WHO I AM IS WHAT I HAVE AND WHAT I HAVE IS LOST THEN WHO AM I?

समंकेतस्थळ आणि गुप्तांचे वडे

एका विचारवंत मराठी स्थळाची ही परिस्थीती असेल तर 'गुप्तांनी वडे...

गुंडो,
आपल्या ह्या लांबलचक शिर्षकाचा अर्थ लावयचा गेला एक तास प्रयत्न करतो आहोत.
एका विचारवंत स्थळाची ही परिस्थीती असेल, तर गुप्तांनी वड्याचे काय करावे? ह्या प्रश्नाने आमचे डोके पोखरले आहे. कृपया आपणच मार्गदर्शन करा अन्यथा तर्कक्रिडा ह्या सदरात आम्ही 'वरील वाक्य पूर्ण करा' ह्या प्रकारात आपले शिर्षक कोडीरुपात टाकण्याच्या बेतात आहोत. इथले नामांकित कुटपटू ह्याचा भेद करतीलच.

जाहिरात!

काय कोलबेर राव!
असं काय करता?
बघणार्‍याला वाचण्याची उत्सुकता वाढवणारे वाक्य आणी हाच हेतू ;) इतकेच मी म्हणेन
जाहिरात क्षेत्रात अशा प्रकारे उत्सुकता वाढवणार्‍या सुरवातीच्या वाक्याला हेडलाईन असे म्हणतात.
तुम्ही लेख पूर्ण वाचलात तर 'ते वाक्य शेवटाकडे पुर्ण' पणे वाचता येईलच.
तेंव्हा...

आपला
गुंडोपंत

 
^ वर