हॅरी पॉटर्

हॅरी पॉटरचे नवे पुस्तक् आणि शेवटचे २१ जुलै ला येत् आहे, मालिकेतला पुढील् चित्रपट् सुद्धा येतो आहे.
या पुस्तकानंतर् काय्? ही पोकळी कशी भरून् काढणार्?हॅरी पॉटरचा वारसा कोण् चालवणार्?
या शेवटच्या भागाने प्रकाशक् आणि संबंधित् व्यवसायिक् यांना फायदातोटा असे संमिश्र् अनुभव् येत् आहेत्. शेवट् काय होई़ल्? पुस्तकाची किंमत् भारतीय बाजारपेठेत् अर्ध्याने कमी होईल् का?
भारतीय् बाजारपेठेत् याचे मार्केटिंक् किती यशस्वी झाले आहे असे म्हणू शकू?

लेखनविषय: दुवे:

Comments

मी असं ऐकलं

मी असं ऐकलं आहे की जे.के. रोलींग या पुढचा ही भाग लिहीणार आहेत. ( माझ्या अश्या माहितीचा स्त्रोत पुण्यात प्रकाशित होणारं टाईम्स हे वर्तमानप्रत्र, त्यातल्या त्यात मी पुणे टाईम्स वाचतो (खरं तर पाहतो) त्यामुळे नक्की काय हे माहिती नाही.

हॅरी पॉटर पुस्तकांऐवजी चित्रपटातूनच आमच्या जवळ जास्त पोहोचला. आणि आम्हाला अशी पोकळी वगैरे काही वाटणार नाही. वारसा...???

भारतीय बाजारात विशेषतः डेक्कनवर हे पुस्तक ज्या किंमतीत मिळते ती मुळ किंमतीच्या अर्ध्यापेक्षाही खुप कमी असते. :)

(मला हॅरी पॉटरचे सगळेच चित्रपट खुप आवडले. भन्नाट कल्पनाविश्व !)

नीलकांत

वारसा

रोलिंगने सातवा भाग् लिहिला आहे, त्यापुढील् भाग् लिहावयाचा इरादा नाही असे माध्यमांकडून् समजते.

हॅरी पॉटरसारखी लोकप्रियता भविष्यात आणखी कोणाला मिळेल्? चित्रपटांपेक्षा पुस्तक् अधिक् चांगले आहे असे बहुमत् आहे.
डेक्कन् काय ... कमी दर्जाच्या कागदावरील् प्रती आपल्याकडे कमीच् किमतीला मिळतात्. भारताबाहेरील् विक्रेत्यांनी किंमत् कमी केली आहे असे वाचले.
हॅर्री पॉटर् वाचणारे इथे जास्त् नाहीत् , कमाल् आहे.

राग येतो?- जोगिया असू दे

हॅरी पॉटर-७

मी सर्व हॅरी पॉटर पुस्तके वाचली आहेत आणि सर्व चित्रपटही पाहिले आहेत. i am a big fan !!

मला तरी चित्रपटांपेक्षा पुस्तकेच जास्त आवडली आहेत. अर्थात मला नेहेमीच चित्रपटांपेक्षा ती ज्यावर आधारीत आहेत ती पुस्तके जास्त अपील होत आली आहेत, हॅरी पॉटर ही त्याला अपवाद नाही

पण पुढे काय हा प्रश्न नाही पडत आहे, कारण हॅरी पॉटर ला re-reading value आहे, आत्तापर्यंत अनेक वाचनं झालीच आहेत. भन्नाटच कल्पना.

आता हॅरी पॉटर-७ ची वाट पहात आहे.

सुंदर पुस्तक

हॅरी पॉटर ची पुस्तके मस्त आहेत. :)

इच्छुकांना येथून त्याच्या मृदू प्रती उतरवून घेता येतील.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मृदू प्रती

योगेशराव,
मराठी मासिके अथवा साप्ताहिके ह्यांच्या मॄदू प्रती कोठे विकत/विनामुल्य उपलब्ध आहेत का?

माहिती नाही हो!

माझे शब्द वर काही मिळतील पण जास्त नाहीत... तुम्हाला कुठे मिळाली तर नक्की सांगा.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मला तरी भिक्कार वाटले.

हरी कुंभार(हॅरी पॉटर) चा एक चित्रपट (नेमका कितवा-माहित नाही) काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीच्या आग्रहास्तव(ती गाढव(पंखा) आहे त्या कुंभाराची) दूरदर्शनच्या एका वाहिनीवर पाहिला. मला तर त्यातली कथा आणि एकूणच चित्रपट भिक्कार वाटला. तरीही जगामधे हा हरी कुंभार का गाजतोय ह्याचे कोडे मला विचारांती उलगडले.
धोंडोपंतांच्या वडिलांनी त्यांना केव्हाच सांगून ठेवलेले होते...रे बेंबट्या "जगात गाढवांस तोटा नाही ! तस्मात कुंभार हो"!
ही गोष्ट त्या जे.के. रोलींग बाईंना कशी कळली कुणास ठाऊक;पण त्यांनी तो सल्ला ह्या 'हरी कुंभाराच्या' रुपात अंमलात आणला.

काय सांगता? कापला की काय?

(गोरी कातडी पाहून खुश होणारे...

काय सांगता मला वाटायचं की हा चित्रपट लहान मुलांचा आहे... ;) हे नवीनच कळलं!!!
मी पाहिलेल्या पटात तरी सगळी पात्रे कपडे घालूनच होती... अरेरे कापला वाटतं त्यांनी....
;)
आपला
('एकेकाळचा' भक्त प्रल्हादाचा भक्त)
गुंडोपंत

लहान मुलांचा? - ऑर्डर ऑफ फिनिक्स

हे चित्रपट लहान मुलांचे असे कोणी सांगितले?

हॅरी पॉटरचे चित्रपट हे वयाने वाढलेल्या लहान मुलांसाठी असावेत. (हा टोमणा नाही, मी स्वतः पाहिले आहेत आणि अनेक कार्टून्सही पाहते.) परंतु लहान मुलांना हे चित्रपट भीतीदायक आहेत. विशेषतः गॉबलेट ऑफ फायर आणि त्या आधीचा भाग भीतीदायकच होते.

मला वाटतं की हे चित्रपट पाच-सहा वर्षांखालील मुलांसाठी नाहीतच. ८-१० वयोगटांतील शूर ;-) मुलांनीच पाहावेत. वय ११ ते १५ दरम्यानच्या पोरांना नक्की आवडतील पण त्यांना 'लहान मुले' म्हटलेले नक्कीच आवडणार नाही. १६ व्या वर्षांनंतर आवड वेगळीच होत असावी ;-) हे गृहित धरल्यास १६ च्या पुढचे सर्वच एका गटात.

कदाचित, निर्मात्यांना याची कल्पना असावीच म्हणूनच हॅरीच्या चित्रपटांचे रेटींग पीजी-१३ असते.

असो. आजच ऑर्डर ऑफ फिनिक्स पाहिला. काय नाविन्य होते ते कळले नाही (तोच तोच पणा आहे- पाचापैकी अडिच रेटींग) पण बरा होता. (तसे मला सगळेच बरे वाटतात.) मुलीला मात्र आवडला.

हरीच्या पंख्यांना पाहायला आवडेल असे वाटते.

तद्दन भिकार..

मला देखील 'हरि कुंभार' हा प्रकार तद्दन भिकार आणि थर्ड रेट वाटला.

प्रमोदकाका, आणि मिलिंदकाका या दोघांशीही सहमत..

आपला,
('साऊंड ऑफ म्युजिक' ला स्टँडर्ड मानणारा) तात्या.

हेच म्हणतो..

नुसतेच हॅरी पॉटर नाही तर लॉर्ड ऑफ द रींग्ज देखिल (पहिला भाग) तितकाच भिकार वाटला.

पहिली कादंबरीही भिकारच

"कुंभार" पुस्तकांची अत्यंत निर्बुद्ध व छपरी मालिका चांगल्या हुशार-हुशार पोरांना आवडते हे अनर्थसूचक आहे. आणि अॅलिस इन वंडरलँड ह्या नितांतसुंदर कथेच्या देशात हे असलं बटबटीत घाणेरडं लिहिलेलं पुस्तक निघावं ही विशेष दुःखाची गोष्ट आहे.

भिकार

पॉटर् भिकार की पोरेच् हुशार् नाहीत असे समजायचे? स्गळेच रिलेटिव्ह् आहे ...
चित्रपट् भिकार यावर मात्र् द्या १६ आणे सहमत्

राग येतो?- जोगिया असू दे

असहमत

पॉटर मालिकेविषयी वर व्यक्त केलेल्या मतांशी मी बर्‍याच प्रमाणात असहमत आहे.
चित्रपटाबद्दल मत देऊ शकत नाही. त्यांना बहुधा नेहमीच व अपरिहार्यपणे एक व्यापारी स्वरूप येत असते. पण मी स्वतः त्या मालिकेतील आतापर्यंतची सर्व पुस्तके वाचलेली आहेत व ती मला बहुतांशी आवडलेली आहेत.
लेखिकेची कल्पनाशक्ती, तिचे कथारचनेचे कौशल्य, व्यक्तिचित्रण, संवादांचा चुरचुरीतपणा, एकूण वातावरण निर्मिती हे सर्व माझ्या मते उत्तम दर्जाचे आहे.
(जाता-जाता: "लॉर्ड ऑ द रिंग्ज्" या महापुस्तकात सुद्धा वरील सर्व वैशिष्ट्ये आहेत व तेही माझे एक आवडते पुस्तक आहे.)
मला वाटते की वर प्रतिसाद देणार्‍या लोकांनी एकतर ही पुस्तके वाचलेली नसावीत किंवा ते बहुधा नॉन-फिक्शन् या साहित्यप्रकाराचे प्रेमी असावेत व अशा प्रकारच्या साहित्यात समरस होऊ शकण्यासारखा त्यांचा स्वभाव नसावा.
कसेही असो, अधिक वाद घालू इच्छित नाही. केवळ माझे मत नोंदवले आहे.

- दिगम्भा

घाला की राव अजून!

आत्ता कुठे जरा मजा यायला लागली वाचायला तर तुम्ही म्हणताय
कसेही असो, अधिक वाद घालू इच्छित नाही. केवळ माझे मत नोंदवले आहे.

चित्रपट पुस्तक बरं असो की वाईट, पण चर्चा आहे ना मस्त!
घाला की जरा वाद...
आम्ही वाचू ना सगळ्यांची मतं...
आपला
(आगलाव्या)
गुंडोपंत

ह्यारी प्वाटर व लॉर्ड ऑफ द रिंग

पुस्तके अप्रतिमच आहेत.

मात्र चित्रपट हे पुस्तकांच्या तुलनेत थोडे कमीच पडले. विशेषतः ह्यारी प्वाटर चे चित्रपट.
मात्र अंगठ्यांच्या राजा या चित्रपटाचे तिन्ही भाग झकासच. त्यातला गोल्लम हे आमचं आवडतं पात्र. :)

- योगेश गोल्लम!

हे चित्रपट...

हे चित्रपट...
म्हणजे मोठं झाल्यावरचा 'चांदोबा' वाचल्यासारखे... ;)

गुंड्या

चांदोबा

काय हे गुंडोपंत... जखमेवरची खपली बाजूला करुन काय समाधान मिळाले.
चांदोबा वाचून खूप वर्षं झाली... आणि आता यष्टी ष्ट्यांडवर मिळत बी नाही. बंद झालं हो ते.

काय झकास रंगीबेरंगी चित्रं होती त्याच्यात...

आपण तर बाबा चित्रांसाठीच घेत होतो चांदोबा.

नाय बॉ!

काय खपली बिपली काढायचे नवती बा!
आपलं आटवलं

चित्र तर सहीच असायची... माझ्या कडे जुने चांदोबा आहेत बॉ ठेवलेले!
फाटतील म्हणून हात पण लावत नाही...
असो,
आता सध्या अजून कोणती कोणती 'झकास रंगीबेरंगी चित्रं' पाहता आपण?
आपला
गुंडोपंत

स्क्यान करुनशान चढवा की

जरा चांदोबाबद्दल लोकांना माहितीपूर्ण माहिती मिळू द्या की राव!

चित्रे स्क्यान करुन उपक्रमावर चढवा.

आपण विशेष विभाग म्हणून उपक्रमाच्या पेज ३ वर देऊ ना!

प्रयत्न करतओ

नक्की प्रयत्न करतो... :)
चांदोबाची जालावर इंग्रजी मध्ये आहे हे माहित असेलच... :)
आपला
गुंडोपंत

चांदोबा

हॅरी पॉटर बद्दलः
एकच भाग उडता उडता वाचला. मजेशीर आहे. पण अचानक सर्व लहान मुलांनी वेडावून जावं इतकं महान वाटत नाही. पण 'टुकार' वगैरे म्हणण्याइतकं वाटत नाही. प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. उद्या मी पारायणं करत असलेले होम्स कोणाला 'महान पांचट आणि रटाळ' वाटूही शकतील.
चांदोबा: मलापण खूप आवडायचा.
घरी शोधल्यास अजूनही १०-१२ प्रती मिळतील.
काही कथा इथे मिळतीलः चांदोबा सं.स्थ.

चांदोबा आणि हॅरी

चांदोबा आणि हॅरीची तुलना होणार नाही. इंग्रजी आवृत्ती निघाली तरी त्याचा प्रसार जागतिक स्थरावर झाला नाही. मार्केटिंगमुळे हॅरी पॉटरचे भाग्य लखलखले. श्रेष्ट् काय अशी निवड् करायची झाली तर् चित्रपटापेंक्षा पुस्तकांची निवड् राहील्.
राग येतो?- जोगिया असू दे

 
^ वर