वॉरेन बफेट ऑफ द वीक! ;)

राम राम मंडळी,

आमच्या काही जुन्या मित्रांच्या आग्रहावरून आम्ही हा शेअरबाजाराचा खेळ येथे सुरू करत आहोत. पूर्वी 'त्या तिथे पलिकडे, तिकडे..' आम्ही हा खेळ सुरू केला होता परंतु त्याचे स्वरूप थोडे वेगळे होते. दुर्दैवाने काही कारणांमुळे आम्हाला तो खेळ पुढे सुरू ठेवता आला नाही. असो..

आता खेळाचे नियम पाहू -

१) आपल्या प्रत्येकाकडे सुरवातीला असलेले भांडवल रु ५,००,०००/-

२) या खेळाकरता आम्ही एकूण ७ कंपन्या निवडल्या आहेत. त्या कंपन्या आणि त्यांचे आजचे बंद भाव याची माहिती आपल्याला इथे पाहता येतील.

३) ते भाव पाहून आपल्याला कोणत्या कंपनीचे किती शेअर घ्यायचे आहेत हे मला व्य नि ने येथे कळवायचे आहे. आपण काही भांडवल हातात शिल्लक देखील ठेऊ शकता. प्रत्येक कंपनीचे शेअर घेतलेच पाहिजेत असेही नाही. या बाबतीत संपूर्ण मर्जी अर्थातच आपली राहील. हा व्य नि आपल्याला भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी ९ च्या आत पाठवायचा आहे.

४) त्यानंतर रोज बाजार संपल्यावर सदर कंपन्यांचे त्या त्या दिवशीचे बंद भाव काय होते हे आपल्याला कळविण्यात येईल. हे भाव पाहून आपण फायद्यात आहोत की तोट्यात आहोत हे अर्थातच आपल्याला कळेल. त्यावरून आपण पुन्हा खालील गोष्टींकरता मला व्य नि पाठवू शकता -

अ) फायद्यात असलेले शेअर विकण्याबाबत.
ब) ते विकून त्या बदल्यात दुसर्‍या कंपनीचे शेअर विकत घेण्याबाबत.
क) तोट्यात असलेले शेअर आणखी तोट्यात जाऊ नयेत म्हणून विकण्याबाबत.
ड) रोज खरेदी विक्रीचा सौदा केलाच पाहिजे असेही काही नाही.

इत्यादी इत्यादी..

या बाबतीतही सगळी मर्जी अर्थातच आपली असेल!

याबाबतचे व्य नि (शेअर खरेदी विक्रिबाबतच्या सूचना) देखील दुसर्‍या दिवशी सकाळी ९ च्या आत (भारतीय वेळेनुसार) आपल्याला पाठवायचे आहेत. या सूचना जाहीर प्रतिसादातून करू नयेत. त्या स्विकारल्या जाणार नाहीत. सगळे व्य नि याच पत्त्यावर पाठवायचे आहेत.

असे एकूण सात कामाचे दिवस आपल्याला रोजच्या बंद भावावर खरेदीविक्री करायची आहे. सात दिवसांनंतर टक्केवारीनुसार जास्तीत जास्त फायदा कमावणार्‍या सभसदाला 'उपक्रमाचा साप्ताहिक वॉरन बफेट!!' हा किताब जाहीर केला जाईल! ;)

त्यानंतर पुन्हा हाच खेळ पुढच्या सात दिवसांकरता नव्याने सुरू! ज्यांना ह्या खेळात काही कारणांनी भाग घेता आला नसेल त्यांनाही घेता येईल.

कंपन्यांच्या शेअर्सच्या भावांची रोज कशी चढउतर होते, यात फायदा किती होऊ शकतो, तोटा किती होऊ शकतो, याची या बाजाराशी फरसा संबंध नसण्यार्‍या मंडळींना एक सर्वसाधारण ढोबळ कल्पना यावी एवढाच या खेळामागचा हेतू आहे. याचा प्रत्यक्षातल्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी!

सदर खेळ इथे घ्यावा किंवा नाही याबबत मी उपक्रम संपादक मंडळाकडे रीतसर परवानगी मागितली होती आणि ती मला मिळाली आहे याचा आनंद वाटतो! उपक्रम संपादक मंडळाने मला जो डिस्क्लेमर कळवला आहे तोच मी इथे चिकटवत आहे त्याचीही सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

उपक्रमाचा डिस्क्लेमर -

या संकेतस्थळावर कोणत्याही माध्यमातून होणार्‍या लिखाणातील मते, सल्ले, माहिती इ. गोष्टींची जबाबदारी संबंधित लेखकांची आहे आणि या गोष्टींशी उपक्रम व्यवस्थापनाचा संबंध नाही. या गोष्टींच्या सत्यासत्यतेची पडताळणी उपक्रम व्यवस्थापन करत नाही. त्यामुळे इथे उपलब्ध माहितीचा वापर करून कोणताही निर्णय घेण्याशी संबंधित असलेली जोखीम ही संपूर्णपणे निर्णयकर्त्याची राहील.

असो!

चला तर मंडळी, आजचे बंद बाजारभाव इथे पाहा आणि आपण कोणत्या कंपन्यांचे किती शेअर घेताय हे मला व्य नि ने इथे कळवा. लक्षात ठेवा, आपल्याकडे असलेले सुरवातीचे भांडवल रुपये पाच लाख! ;)

अधिक खुलाश्याकरता एक उदाहरण देतो. रिलायन्स ह्या कंपनीचा आजचा बंद भाव रु १७०९ आहे. आपण जर मला 'रिलायन्स = ५०' असे कळवलेत तर ५०*१७०९ इतके पैसे आपल्या एकूण भागभांडवलातून वजा केले जातील.

असो! सर्वांना ऑल द बेस्ट!

आपला,
धीरुभाई अभ्यंकर.

ता क - या खेळाबद्दल वाचून आमचे काही हितचंतक (!) मित्र 'तात्याचा हा काहीतरी नवीन पब्लिसिटी स्टंट आहे' असं म्हणून कदाचित बोंब मारू लागतील किंवा आपापल्या अनुदिन्यांवर त्याबाबत लिहू लागतील! अर्थात, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दुषित पाण्यामुळे लोकांची पोटं बिघडतात याची आम्हाला कल्पना आहे हा भाग निराळा! ;)

Comments

मस्त आयडिया

ज्यांना खरेखरे खेळायची भिती वाटते त्यांना(अम्हाला बी) आत्मविश्वास निर्माण होतो का हे बघण्याची चांगली सुसंधी. बघू विरेन बापट कोण होतो ते?
प्रकाश घाटपांडे

विरेन बापट?

बघू विरेन बापट कोण होतो ते?

विरेन बापट??

हे नांव बाकी मजेशीर आहे! ;)

आपला,
तात्या बापट!

विरेन बापट

नील आर्मस्ट्राँग चे निळुभाउ भुजबळ होतात तर वॉरन् बफेट चे विरेन बापट का होउ नये? हॅ हॅ हॅ .....

प्रकाश घाटपांडे

जनू बांडे!

या आंग्लभाषीय नांवे बदलण्याच्या गंमतीमध्ये आम्हाला जेम्स बॉन्ड चे 'जनू बांडे' हे नामकरण मात्र सर्वात अधिक आवडते! ;)

आपला,
जेम्स अभ्यंकर!

ही आणि ही या संत तात्याबांच्या अत्यंत आवडत्या तमिळ नट्या आहेत. तमिळचा एक शब्दही समजत नसला तरी तात्याबा यांचे सर्व सिनेमे आवडीने पाहतात! त्यातल्या त्यात ही त्यांची विशेष लाडकी आहे. तमिळ व तेलुगु नट्यांचा तात्याबांचा अभ्यास दांडगा आहे! ;)

तात्या

तुमच्या कोकणातील मराठी मुलगी तमिळ सिनेमात काम करते ती माहिती आहे का?

असिन पण चांगली आहे.

पण मला त्रिशा आवडते.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

हो असिनही छान दिसते!

तुमच्या कोकणातील मराठी मुलगी तमिळ सिनेमात काम करते ती माहिती आहे का?

कोण रे?

असिन पण चांगली आहे.

हो, असिनही छान दिसते! बॉलिवुडच्या नट्या तमिळ तेलुगु नट्यांपुढे एवढ्या खास वाटत नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे!

तात्या.

--
बालविहारात नट्यांच्या फोटोंचे दुवे देण्यास मनाई असावी याचे मी समर्थन करतो! ;)

सदाफ मोहम्मद सय्यद ऊर्फ सधा

सधा असे त्या कोकणी नटीचे नाव आहे.

शिवाजी - द बॉस या बहुचर्चित चित्रपटाचा दिग्दर्शक शंकर याचा अपरिचित नावाचा एक मनोरंजक चित्रपट हिंदीत डब होऊन आला होता तो पाहिल्यापासून मलाही ती हिरॉईन आवडायला लागली आहे.

बॉलीवूडच्या नट्यांबद्दल सहमत. अगदी तोंडावर सुरकुत्या दिसायला लागल्या तरी कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून काम करणार्‍या या नट्या पैशे देऊन पिच्चर बघायला येणार्‍या आमच्यासारख्या पिटातल्या प्रेक्षकांवर भयानक अत्याचार करत आहेत.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

अरे हो!

विसरलोच होतो. आमची सधाही छानच दिसते हो! ती रत्नांग्रितली, आम्ही तळकोकणातले! ;)

पण काहीही म्हणा! आमची प्रियमणी बाकी खासच दिसते. आपण तर साला तिला पाहूनच खल्लास होतो!

तात्या.

धन्यवाद

आमच्या अभिरुचीऐवजी व्यक्तिमत्त्वावरच्या टिप्पणीबद्दलची प्रतिक्रिया आवडली ;)

(सज्जन) योगेश निर्गुणाजी.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

सही!

(सज्जन) योगेश निर्गुणाजी.

सही एकदम सही!

आपला
गुंडोपंत

व्य नि येऊ लागले! ;)

चला मंडळी, त्वरा करा! व्य नि येऊ लागले! आपापली खरेदी उद्या सकाळी ९ च्या आत कळवा!

तात्या.

पाठवला आहे.

तात्या अवरु,
व्यनि पाठवला आहे.

चेक माडी.



नानु इल्ली बरेयुत्तेने!

ही कुठली रे भाषा?

काय रे योगेश, ही आमच्या अण्णांची मातृभाषा कानडी की काय? ;)

मस्तच आहे!

'नानु इल्ली बरेयुत्तेने!' म्हणजे काय? अर्थ सांग की जरा याचा.

'चेक माडी' म्हणजे काय? माडीवर जाऊ म्हणतोस की काय? ;))
नको रे, तिथल्या बायका हल्ली खास गात नाहीत! ;)

बाय द वे, 'काय अण्णा तब्येत कशी काय? काळजी घ्या' हे कानडीत कसं म्हणतात ते मला प्लीज जरा लिहून दे. पुढच्या वेळेला अण्णांना भेटायला पुण्याला जाईन तेव्हा मी त्यांच्याशी हे वाक्य बोलेन! ;)

तात्या.

मला पण येत् नाही

मला पण येत नाही हो नीट. शिकून राहिलोय ना!

अण्णावरु हेगे इद्दीरा? असे विचारा. ;)

माडी म्हणजे करा ;)



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

काहीही खरेदी न करण्याचा ऑप्शन!

एका सदस्याने या स्पर्धेत भाग घेतला आहे परंतु त्याने आजच्या बंद भावावर आधारीत काहीही खरेदी न करण्याचा ऑप्शन स्विकारला आहे! या सदस्याने उद्याचा बाजार पाहून त्याचा निर्णय उद्याच्या येणार्‍या बंद भावावर घ्यायचा ठरवलं आहे. आजचा एक दिवस फुकट गेलेला त्याला चालणार आहे!

थोडक्यात काय, तर एखाद्याने सात दिवसांपैकी अगदी आदल्या दिवशीही खरेदीचा निर्णय घेऊन जिंकून दाखवले तरी चालेल! ;)

तात्या.

तात्या

तात्या,

या खेळात आम्हीही सहभागी झालो असतो.

पण च्यायला गेल्या काही दिवसात एवढा पैसा मार्केटमध्ये घालवलाय की मार्केटच्या भातुकलीची पण आता भीति वाटायला लागलेय.

आम्ही तिथे स्टेडियम मध्ये बसतो. तुमचे चालू द्या.

आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

मजकूर संपादित. खाजगी गप्पागोष्टींसाठी कृपया खरडवही किंवा व्य. नि. चा वापर करावा.

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

हे घ्या...

आमचा पोर्टफोलिओ पाठविला आहे... पोचपावती पाठवावी!!

लिमिट ऑर्डर

तात्या लिमिट ऑर्डर टाकू शकतो का?
तसेच बंद भावापेक्षा दिवसातल्या किमान भावाला खरेदी करु शकतो का? आणि कमाल भावाला विकू शकतो का?

-जयेश

जयेशराव,

तात्या लिमिट ऑर्डर टाकू शकतो का?
तसेच बंद भावापेक्षा दिवसातल्या किमान भावाला खरेदी करु शकतो का? आणि कमाल भावाला विकू शकतो का?

या सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू सुरू करणार आहोत, परंतु सुरवतीचे दोन चार आठवडे लोकांना बंद भावावरच खेळू दे आणि थोडंसं फ्यॅमिलियर होऊ दे. सुरवातीलाच या सर्व गोष्टी या खेळात आणल्या तर ते थोडेसे किचकट होऊ शकेल.

तात्या.

कपडा उद्योगात तेजी! :)/आजचे बंद भाव..

राम राम मंडळी,

पहिल्या दिवसाचा निकाल खालीलप्रमाणे -

(कंसातले भाव हे कालचे आहेत. त्यापुढे आजचे भाव आणि त्याच्या चढउताराची टक्केवारी दिली आहे)

Relience (1709) 1704 (-0.29%)

ICICI Bank (953) 946 (-0.73%)

Infosys (1937) 1922 (-0.77%)

Tata Steel (600) 603 (+ 0.5%)

Ucal Fuel (95) 94 (-1.05%)

Ambika Cotton (129) 132 (+ 2.33%)

Sutlej Textiles (143) 145 (+ 1.4%)

कंसातल्या भावाच्या पुढचे हिरव्या किंवा लाल अक्षरात दिलेले भाव हे आजचे बंद भाव आहेत.आता पुढची खरेदी किंवा विक्रीची ऍक्शन काय घ्यायची हे कृपया मला व्य नि ने कळवावे. उदा, एखाद्याने सभासदाने जर कळवले की माझे अंबिका कॉटनचे अमूक अमूक शेअर विका तर त्या सभासदाचे ते शेअर १३२ च्या भावाला विकले गेले असे दाखवून त्याचा तेवढा प्रॉफिट बुक झाला असे समजण्यात येईल. किंवा एखाद्या सभासदाने माझे इंन्फोसिसचे अमूक नग शेअर विका असा व्य नि पाठवल्यास त्या सभासदाचे ते शेअर १९२२ च्या भावाला विकले गेले असे दाखवून त्याचा तेवढा लॉस बुक झाला असे समजण्यात येईल. अर्थात, कोणत्या आणि किती शेअर्सची खरेदीविक्री करायची किंवा कसे, ही मर्जी अर्थातच सभासदांची राहील.

ज्या सभासदांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे असे कालच कळवले आहे ती मंडळी आजच्या बंद भावानुसार खेळात उतरू शकतात. पडलेले शेअर खालच्या भावत खरेदी करण्याचा फायदा अर्थातच त्यांना मिळेल. ज्या सभासदांना या खेळात नव्याने भाग घ्यायचा आहे त्यांना Relience, ICICI Bank, Infosys, Ucal Fuel या शेअर्समध्ये खरेदी करता येणार नाही.

आज एकूण ज्या सभासदांनी अंबिका कॉटन, सतलज टेस्क्टाईल, व टाटा स्टील चे शेअर काल घेतले त्यांना फायदा झालेला आहे! ;)

असो! पुढील सूचनावजा व्य नि उद्या सकाळी ९ च्या आत (भारतीय प्रमाण वेळेनुसार) पाठवावेत ही विनंती!

आपला,
धीरुभाई अभ्यंकर!

स्वागत/अभिनंदन/खेळाची रंगत...

ज्या सभासदांना या खेळात नव्याने भाग घ्यायचा आहे त्यांना Relience, ICICI Bank, Infosys, Ucal Fuel या शेअर्समध्ये खरेदी करता येणार नाही.

ही अट पाळून दोन स्त्री सदस्यांनी नव्याने या स्पर्धेत भाग घेतला आहे! त्यांनी अंबिका, सतलज आणि टाटा स्टीलचे शेयर्स कालच्या वाढीव भावाने खरेदी केले आहेत. नवीन सदस्यांचं स्वागत व अभिनंदन!

ही फक्त या खेळाची सुरवात आहे. जसजसा दर आठवड्याला हा खेळ रंगत जाईल तश्या अजूनही काही कल्पना राबवायचा विचार आहे जेणेकरून ले मॅनची या बाजाराशी जवळून ओळख होईल. सभासदांनी मोठ्या संख्येने या खेळात भाग घ्यावा. (सध्याच्या ७ दिवसात शक्य नसेल तर पुढच्या सात दिवसांपासून)

असो, सर्व स्पर्धकांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा!

आपला,
तात्या अभ्यंकर.
मुख्य प्रशासकीय अधिकारी,
उपक्रम स्टॉक एक्सचेंज,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३.

लया ही देखील संत तात्याबांची एकेकाळची लाडकी नटी. ती आता लग्न होऊन अमेरिकेला गेली.छानच दिसायची हो! असंच साधं आणि सोज्वळ सौंदर्य तात्याबांना आवडतं! 'भडकपणाची गंमत एका दिवसात संपून जाते' असं तात्याबा नेहमीच त्यांच्या प्रवचनात सांगत असतात! ;)

इन्फी आज तेजीत!/सतलज मध्ये अजूनही तेजी! :)

Infosys (1937) 1922 (-0.77%)

कालच बंद भाव १९२२. या क्षणी इन्फी १९३५ असून तेजीत आहे! :)

पुढच्या महिन्यात इन्फीच्या यावर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे बाजाराला कळतील. इन्फीतली सॉफ्टवेअर इंजिनिअर मंडळी मन लावून काम करतात असा आम्हा बाजारवाल्यांचा अभ्यास आहे! :) त्यामुळे पहिल्या तिमाहीचा रिझल्ट लागेपर्यंततरी इन्फीत तेजी राहील असा होरा दिसतो! अर्थात, शेवटी बाजार जे ठरवेल तेच खरं! करा करा, इन्फीतल्या मंडळींनो, असंच मन लावून काम करा आणि आम्हाला पैशे मिळवून द्या! :)

आजची तेजी जर बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली किंवा वाढली तर आज इन्फोसिस घेतलेल्या सदस्यांची मजा आहे! :)

Sutlej Textiles (143) 145 (+ 1.4%)

कालचा बंद भाव १४५.

या क्षणी सतलजचा भाव १४९ असून तेजीत आहे! :)

स्पर्धा सुरू झाल्यापासून सतलज मध्ये दुसर्‍या दिवशीपर्यंत १४९ - १४३ = ६ रुपये म्हणजे ४% वाढ झाली आहे!

ही तेजी जर बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली किंवा वाढली तर आज सतलज घेतलेल्या मंडळींची मजा आहे! :)

आपला,
(संधीसाधू!) तात्या.

सतलजला ठोकला! :(

कालचा बंद भाव १४५.
या क्षणी सतलजचा भाव १४९ असून तेजीत आहे! :)
स्पर्धा सुरू झाल्यापासून सतलज मध्ये दुसर्‍या दिवशीपर्यंत १४९ - १४३ = ६ रुपये म्हणजे ४% वाढ झाली आहे!
ही तेजी जर बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली किंवा वाढली तर आज सतलज घेतलेल्या मंडळींची मजा आहे! :)

ताज्या खबरीनुसार सतलजला बाजाराने आता ठोकला आहे!

सध्याचा भाव १४४ ! :((

अरेरे...:)

बिरुटेसाहेब आघाडीवर, एकलव्य पिछाडीवर, सुभाषराव भाव भाव! :)

आजच्या बंद बाजारभावानुसार बिरुटेसाहेब आघाडीवर, एकलव्य पिछाडीवर, व सुभाषराव भाव भाव (ना फायदा, ना तोटा) आहेत! :)

उद्याकरता सर्वांना शुभेच्छा!

पहिल्या दिवसाचा उपक्रमाचा बाजार बंद!

तात्या.

आगे बढो...

बिरुटेसाहेब आप आगे बढो... हम तुम्हारे पीछे है!

नोंद..

सर्व स्पर्धकांच्या व्य निंची नोंद घेतली आहे. प्रत्येकाला स्वतंत्र व्य नि पाठवंणे शक्य नाही म्हणून ही कॉमन पोचपावती देत आहे..

धन्यवाद..

तात्या.

मार्केट ठोकलं रे बाबांनो! :(

प्रिय स्पर्धकांनो,

आज बाजार ८० गुणांनी गडगडला आहे. याला आमच्या बाजाराच्या भाषेत 'मार्केट ठोकलं' असं म्हणतात!

हे घ्या आजचे बंद भाव. आता या बंद भावानुसार पुढे काय करायचं आणि काय नाही हे मला उद्या सकाळी ९ च्या आत व्य नि ने कळवा! आपण काय, हुकुमाच्या व्य नि चे ताबेदार! काय सांगाल ते करू! :)

(कंसातले भाव हे कालचे आहेत. त्यापुढे आजचे बंद भाव आणि त्याच्या चढउताराची टक्केवारी दिली आहे)

Relience (१७०४) १६९६ (- ०.४७ %)

ICICI Bank (९४६) ९३७ (- ०.९५ %)

Infosys (१९२२) १९३५ (+ 0.६८ %)

Tata Steel (६०३) ५९२ (- १.८२ %)

Ucal Fuel (९४) ९३.४ (- ०.६४ %)

Ambika Cotton (१३२) १२९ (- २.२७ %)

Sutlej Textiles (१४५) १४७ (+ १.३८%)

टाटा स्टील आणि अंबिका कॉटन जरा जास्तच ठोकले आहेत! काळजी घ्या रे बाबांनो! नाहीतर आठवड्याभरात पाच लाखाचे बारा हजार कराल! :))

तात्या.

एकलव्य पिछाडीवर, सुभाषराव आघाडीवर..

कालच्या बंद भावांनुसार एकलव्य महाराज अजूनही पिछाडीवर आहेत. काल पुढे असलेले बिरुटेसाहेब आता मागे पडले असून सुभाषराव आघाडीवर आहेत. प्रकाश घाटपांड्यांच्यात आणि सुभाषरावांत फारसा फरक नाही.

अर्थात सगळी मंडळी तोट्यातच आहेत. 'ज्याचा तोटा कमी तो आधाडीवर', या तत्वानुसार वरील निकाल दिला आहे! ३४.९९ टक्के मार्क मिळवणारा नापासात पहिला समजला जातो! :))

असो, आजचा बाजार संपला. उद्याकरता सगळ्यांना शुभेच्छा!

धन्यवाद!

आपला,
तात्या अभ्यंकर,
मुख्य प्रशासकीय अधिकारी,
उपक्रमाचा शेयर बाजार,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

आगे बढो...

सुभाषराव आप आगे बढो... हम तुम्हारे पीछे है!

आजचे बंद भाव/विशेष फरक नाही..

राम राम,

आजचे बंद भाव देत आहे. या बंद भावानुसार पुढे काय करायचं आणि काय नाही हे मला उद्या सकाळी ९ च्या आत व्य नि ने कळवा!

(कंसातले भाव हे कालचे आहेत. त्यापुढे आजचे बंद भाव आणि त्याच्या चढउताराची टक्केवारी दिली आहे)

Relience (१६९६) १६९० (- ०.३५ %)

ICICI Bank (९३७) ९४४ (+ ०.७५ %)

Infosys (१९३५) १९२५ (- 0.५२ %)

Tata Steel (५९२) ५९५ (+ ०.५१ %)

Ucal Fuel (९३.४) ९३.१५ (- ०.२७ %)

Ambika Cotton (१२९) १२८.२ (- ०.६२ %)

Sutlej Textiles (१४७) १४८ (+ ०.६८%)

कालच्या आणि आजच्या भावात विशेष फरक नाही. सतलज वगळता सर्व शेयर तांत्रिक दृष्ट्या अशक्त वाटत आहेत, परंतु एखाद टक्क्याच्या आसपास फिरत आहेत. हे सर्व शेयर सध्या कन्सॉलिडेट होत आहेत. हा प्रकार गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा एक मोठा तांत्रिक बदल उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. एकतर जोरदार तेजी, किंवा जोरदार मंदी. हा फरक मात्र त्या मानाने मोठा असतो. असो, हे आपलं आमचं मत. शेवटी मार्केट इज ऑलवेज सुप्रीम! ;)

स्पर्धेचा ३ रा दिवस संपला. उद्याकरता सगळ्यांना शुभेच्छा!

तात्या.

आयसीआयसीआय, इन्फीत तेजी!

आयसीआयसीय - कालच बंद भाव - ९४४. आत्ता सुरू असलेला भाव - ९५६.
इन्फीचा कालचा बंद भाव - १९२५. आत्ता सुरू असलेला भाव - १९४६.

आज इन्फी लेनेकी खबर है बॉस! :)

आपला,
खबरीलाल तिवारी,
दलाल स्ट्रीट, मुंबई.

धीरुभाईत अचानक तेजी! :)

कालचा भाव - १६९०
आजचा भाव - १७०९!

आज धीरुभाई चला! आयसीआयसीआय - ९५८!

आज जरा स्पर्धक मंडळी थोडीफार फायद्यात येतील असे वाटते! ;)

तात्या.

सगळी मंडळी तोट्यात!

एकललव्यराव अजूनही पिछाडीवर आहेत, बिरुटेसाहेब आघाडीवर आता पुन्हा आघाडीवर आले आहेत..

आज बाजारात काहीतरी मोठी हालचाल अपेक्षित आहे!

बघुया!

तात्या.

एक सल्ला...

तात्या,
ह्या काल्पनीक खेळांपेक्षा खरोखर काही योजना करता येते का बघा जसे की इच्छूक सदस्यांकडून पैसे घ्या आणि तुमचे ज्ञान वापरून खरोखर बाजारात गुंतवा.. जो काय फायदा होईल तो सगळ्यांनी वाटून घ्यायचा तुम्हाला फंड मॅनेजर म्हणून २% कमीशन... प्रत्येकी हजारएक रुपये वर्गणी काढून सुरू करायचे का? मी तयार आहे.

प्रत्यक्ष पैसा गुंतला तरच हा खेळ सर्वात जास्त रंगेल.

कोलबेरा,

ह्या काल्पनीक खेळांपेक्षा खरोखर काही योजना करता येते का बघा जसे की इच्छूक सदस्यांकडून पैसे घ्या आणि तुमचे ज्ञान वापरून खरोखर बाजारात गुंतवा..

आणि पैशे घेऊन पळून गेलो तर? :)

जो काय फायदा होईल तो सगळ्यांनी वाटून घ्यायचा तुम्हाला फंड मॅनेजर म्हणून २% कमीशन...

फायद्यावर म्हणत असशील तर १५ % तरी पाहिजे, उलाढालीवर म्हणत असशील तर ३% तरी पाहिजे!

प्रत्यक्ष पैसा गुंतला तरच हा खेळ सर्वात जास्त रंगेल.

अर्थातच!

असो, विनोदाचा भाग सोडा. आपण येथे बिनपैशांचाच खेळ खेळू! खरे पैसे लावायचे असतील, आणि कुणाला माझा अशील बनायचे असेल तर व्य नि ची सोय आहे! :)

आपला,
(व्यावसायिक!) तात्या.

शुक्रवारचे बंद भाव..

राम राम,

काल आणि आज बाजार बंद होता.

शुक्रवारचे बंद भाव देत आहे. या बंद भावानुसार पुढे काय करायचं आणि काय नाही हे मला उद्या सकाळी ९ च्या आत व्य नि ने कळवा!

(कंसातले भाव हे गुरुवारचे आहेत. त्यापुढे शुक्रवारचे बंद भाव देत आहे.)

Relience (१६९०) १७००

ICICI Bank (९४४) ९५४

Infosys (१९२५) १९३१

Tata Steel (५९५) ५९८

Ucal Fuel (९३.१५) ९३.५०

Ambika Cotton (१२८.२०) १२७.२५

Sutlej Textiles (१४८) १४६

स्पर्धेचा चौथा दिवस संपला. उद्याकरता सगळ्यांना शुभेच्छा!

तात्या.

आजचे बंद भाव../बिरुटेसाहेब आघाडीवर/विद्या पिछाडीवर!

राम राम,

आजचे बंद भाव खाली देत आहे. या बंद भावानुसार पुढे काय करायचं किंवा काय नाही, हे मला उद्या सकाळी ९ च्या आत (भारतीय प्रमाणवेळेनुसार) व्य नि ने कळवा!

(कंसातले भाव हे शुक्रवारचे आहेत. त्यापुढे आजचे बंद भाव दिले आहेत.)

Relience (१७००) १६८५

ICICI Bank (९५४) ९५१

Infosys (१९३१) १९४२

Tata Steel (५९८) ५९३

Ucal Fuel (९३.५०) ९४.४०

Ambika Cotton (१२७.२५) १२८.३

Sutlej Textiles (१४६) १४४

बिरुटेसाहेबांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे आणि ते आता आघाडीवर आहेत. इतके दिवस पिछाडीवर असलेले एकलव्य आता जरा वर सरकले असून विद्याताई आता पिछाडीवर आहेत!

स्पर्धेचा पाचवा दिवस संपला. उद्याकरता सगळ्यांना शुभेच्छा!

तात्या.

धन्यवाद

आम्ही अजून खरेदीसाठी योग्य मुहूर्त शोधत आहोत.

तेवढा रवी एकदा मार्गस्थ होऊ द्या... मग बघा...

अरे वा!

इतके दिवस पिछाडीवर असलेले एकलव्य आता जरा वर सरकले असून विद्याताई आता पिछाडीवर आहेत!

विद्याताई - काळजी नसावी. आम्ही आहोतच मागच्या बाकावर गप्पाटप्पा करायला. (ह घ्या)

(निश्चिंत) एकलव्य

आज फुल्ल तेजी!/उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि निकाल!

राम राम,

आजचे बंद भाव खाली देत आहे. या बंद भावानुसार पुढे काय करायचं किंवा काय नाही, हे मला उद्या सकाळी ९ च्या आत (भारतीय प्रमाणवेळेनुसार) व्य नि ने कळवा!

(कंसातले भाव हे कालचे आहेत. त्यापुढे आजचे बंद भाव दिले आहेत.)

Relience (१६८५) १७०७

ICICI Bank (९५१) ९६५

Infosys (१९४२) १९४४

Tata Steel (५९३) ६००

Ucal Fuel (९४.४०) ९५.८०

Ambika Cotton (१२८.३०) १३०

Sutlej Textiles (१४४) १४६.३०

स्पर्धेचा सहावा दिवस संपला. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस! उद्या उपक्रमाचा 'वॉरेन बफेट ऑफ द वीक' जाहीर केला जाईल, व ही स्पर्धा पुन्हा नव्याने सुरू होईल!

उद्याच्या अंतिम दिवसाकरता सर्वांना शुभेच्छा! :)

तात्या.

शिल्लक शेयर्स.

न विकलेल्या शेयर्सचे आजच्या दिवशीच्या बंद भावाने मूल्यांकन होऊन त्यानुसार संबंधित स्पर्धकाचा फायदा अथवा तोटा ठरवला जाईल.

तात्या.

विद्याताई, वॉरेन बफेट ऑफ द वीक! अभिनंदन!!

राम राम मंडळी,

विद्याताई या उपक्रमाच्या प्रथम वॉरेन बफेट ऑफ द वीक ठरल्या आहेत! त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..

विद्याताईंनी गेल्या सात दिवसात सर्वाधिक म्हणजे २.३६% इतका सरासरी फायदा कमावला आहे. सर्वात कमी फायदा (०.३४%) सूर्यने मिळवला आहे. सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार. बिरुटेसाहेब, एकलव्य, प्रकाश घाटपांडे, सूर्य, सुभाषराव, आणि विद्या या एकूण सहा मंडळींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

'वॉरेन बफेट ऑफ द वीक'ची पुढची स्पर्धा लवकरच जाहीर केली जाईल. सर्वांनी अवश्य सहभाग घ्यावा.

आजचे बंद भाव खाली देत आहे.

(कंसातले भाव हे कालचे आहेत. त्यापुढे आजचे बंद भाव दिले आहेत.)

Relience (१७०७) १७१३

ICICI Bank (९६५) ९९०

Infosys (१९४४) १९३५

Tata Steel (६००) ६१८

Ucal Fuel (९५.८०) ९७.५०

Ambika Cotton (१३०) १२९

Sutlej Textiles (१४६.३०) १५२

आयसीआयसीआय बँक, सतलज, टाटा स्टील, आणि उकाल फ्युएल या कंपन्यांनी स्पर्धकांना ऐन वेळेस हात दिला!

स्पर्धा संपली! धन्यवाद...

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३

अभिनंदन आणि धन्यवाद!

विद्याताईंचे अभिनंदन, तात्यांना धन्यवाद.

(सूर्यमित्र) एकलव्य

स्पर्धेनिमीत्ताने

शेअर बाजारातले चढ उतार लक्षात आले. हे ही नसे थोडके. तात्यांना त्याबद्दल धन्यवाद. अशाच स्पर्धा घेउन आमच्या ज्ञानात भर पाडावी.

- सूर्य

 
^ वर