नवे तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. दिवसागणिक बाजारात नवे काहितरी येत असतेच. अनेक नव्या गोष्टी कश्या काम करतात ह्याचे आपल्याला कुतूहल असते. नव्या वस्तू /सेवा ह्यांच्या अनेक जाहिराती आपल्याला अखंड खुणावत असतात. त्यांची माहिती करून घेण्यासाठी, त्यातले बरेवाईट ठरवण्यासाठी आणि या वस्तू/सेवेचा आपण कसा उपयोग करू शकतो हे समजण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाला वाहिलेला हा समुदाय बनवला आहे.

या समुदायाच्या अंतर्गत खालील गोष्टी करता येतील.

  • कोणत्याही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी लेखन
  • नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे लेखन
  • तंत्रज्ञानविषयक चर्चा, प्रश्नोत्तरे आणि माहितीची देवाणघेवाण
  • नव्या तंत्राबद्दल आणि ते वापरून बनवलेल्या उत्पादनांबद्दल आणि सुविधांबद्दल माहिती आणि परीक्षणे (प्रॉडक्ट/सर्विस रिव्ह्यू)

तंत्रज्ञानाचे जाणकार आणि तंत्रज्ञानाची माहिती करून घेऊ इच्छिणारे सर्व या समुहाचे सदस्य होऊ शकतात.

 
^ वर