ऋग्वेद
म.टा. मधील खालील बातमी वाचून आनंद झाला:
'ऋग्वेद' जागतिक स्मृतीचा वारसा
[ Thursday, June 21, 2007 01:44:25 am]
न्यूयॉर्क
पंचमहाभूतांचा विचार सर्वप्रथम (ख्रिस्तपूर्व १८०० ते १५०० वषेर्) मांडणारा 'ऋग्वेद' आता युनेस्कोच्या 'जागतिक स्मृती वारसा यादी'त गेला आहे! ऋग्वेदाच्या ३० हस्तलिखितांना हा मान मिळाला आहे.
जगाचा वारसा ठरावेत असे दस्तऐवज या यादीत समाविष्ट होतात. नव्याजुन्या ३८ दस्तऐवजांचा समावेश युनेस्कोच्या स्मृती वारसा प्रकल्पाच्या संचालकांनी (भारतीय वेळेनुसार) बुधवारी जाहीर केल्यामुळे, १९९२ पासूनच्या या यादीत आता १५८ दस्तऐवज आहेत. http://www.unesco.org/webworld/mdm/register या वेबसाइटवर यादी पाहता येईल.
याआधी भारतातून, तामिळ आयुवेर्दिक ग्रंथ, शैव हस्तलिखिते आणि डच ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रे या 'वारशा'त जमा झाली आहेत. नव्या नोंदीबद्दल केंदीय सांस्कृतिक मंत्री अंबिका सोनी यांनी आनंद व्यक्त केला. (वृत्तसंस्था)
Comments
आनंद
मलाही आनंद झाला. अस्मितांचा जन्म यातूनच होत असावा. पुर्वजांविषयी असलेला ग्रह हा अभिमानात रुपांतरित होतो.
(देशस्थ ॠग्वेदी ,तरिही विवेकवादी,तरिही प्रवादी,तरिही समन्वयवादी,ज्योतिषादि, इत्यादि)
प्रकाश घाटपांडे