प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम

प्रदुषणाचे आरोग्यावर विपरीत परीणाम होतात आणि त्याची सरळसोट अनेक उदाहरणे आहेत. त्या विषयावर वेगळी चर्चा करता येईल. पण गेल्या महीन्याभराच्या कालावधीत काही घटना घडल्या त्या मुळे प्रदुषणापासून काळजी घेत असताना आरोग्यावर अनपेक्षीत परीणाम कसे घडून येऊ शकतात ते समजले...

एप्रिल-मे मधे प्रचंड उन्हाळा पुण्या-मुंबईत होता. इथे (अमेरीकेत) सुट्टीच्या दिवशी सर्वजण एकत्र आलेले असताना एका मित्राकडून त्याच्या आईला चक्कर आल्याचे समजले पण नंतर तब्येत परत २-४ दिवसात बरीही झाली. बोलता बोलता ४-५ लोकांच्या घरी असेच (विशॆष करून ज्येष्ठ नागरीकांबरोबर) प्रसंग झाल्याचे समजले. (माझ्या डॊक्टर/बायोटेक मित्राशी बोलताना जाणवले, कृपया या बाबत अनुभव आणि अशीक माहीती असल्यास येथे लिहावी...) मग कारण काय असेल?

अर्थातच उन्हाळा. पण हे सर्व जेष्ठ नागरीक पाणी तर पिऊन स्वत:ची काळजी घेत होते... मग काय झाले? कुठले पाणी पितात? अर्थातच "filter"चे. तसे सर्वजणच हल्ली काळजी घेत असतात कारण प्रदुषणामुळे पाणी कसे असेल (शिवाय सोसायट्यांमधे तर आधी टाकीत पाणी साठवून मग ते घरात येत असल्याने) स्वच्छ पाणी पिताना ही काळजी बहुतांशी लोक (ज्यांना हे परवडते ते!) घेत असतात. शिवाय या "फिल्टर"च्या कंपन्यांनी सेवा कंत्राट घेतलेली असतात आणि ते ठरावीक वेळेस घरी येऊन बदलून ही जातात. त्यामुळे तशी काळजी करायचे कारण नसते.

बरोबर आहे की तुम्ही पाणी पिता... पण...त्या फिल्टर पाण्याने जसे ते शुद्ध होते तसेच त्यातील आयन्स निघून जातात कारण पाणी शुद्ध करताना "डिआयोनाईझ्ड" करतात. (अरे हो आम्ही पर्यावरणाच्या प्रयोगशाळेत तसेच करून स्वच्छ पाणी वापरायचो!). आपले डोके नीट चालण्यासाठी मेंदूत पोटॆशियम आणि इतर काही आयन्स मिळणे जरूरीचे असते. ते सगळे नैसर्गिक पाण्यातून आपल्याला मिळतात ते पुरेसे असतात. पण ’फिल्टर" पाण्यातून ते निघून गेले असतात. त्यात भर म्हणून उन्हाळ्यात घामाच्या धारा लागतात (वीज कपात असेल तर अजूनच) आणि अंगातील क्षार (/आयन्स) अजूनच कमी होतात. त्यात जर कोणी उच्च रक्तदाबावर औषध घेत असेल तर त्या औषधात अंगातील मीठ कमी करण्याचे काम असते... मग चक्कर येणार नाहीतर काय होणार?

लेखनविषय: दुवे:

Comments

ध्वनिप्रदुषण

ध्वनीप्रदुषणाने चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी वाढते,पुण्यात गणपतीत हे प्रमाण खूप वाढते असे निदर्शनास आले आहे.
प्रकाश घाटपांडे

सहमत

आमच्या कचेरीत आलेल्या शुभ्र पाहुण्यांचे कचेरीतल्या पाण्याने पोट बिघडले होते ते आठवले. (हे पाणी आम्ही रोज पितो आणि कोणालाही काहीही झालेले नाही. की, असं आहे का, की ही मंडळी पाणीच पित नाहीते, पाण्याऐवजी त्यांच्या देशांत गॅसवॉटर/कोक/पेप्सी/वाईन पितात म्हणून पाण्याने अपचन झाले??मी मागे एका युरोपिय देशात असताना शीतपेय यंत्रावर 'वॉटर' लिहीलेले वाचून २५ सेंट टाकले असता यंत्रातून गॅसवॉटर उर्फ आम्ही ज्याला भारतात सोडा म्हणतो त्याची बाटली बाहेर आली आणि २५ सेंट (बुडबुडेदार) पाण्यात गेले!मग कळले की 'वॉटर' असे लिहीलेल्या बाटल्यात सोडा असतो आणि खरेखुरे पाणी पिण्यासाठी 'मिनरल वॉटर' मागावे लागते.)

सही

नळाच्या पाण्यातील जंतुंचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (लशीसारखा) उपयोगा होतो
सही.
हा हा हा...
गुंडोपंत

 
^ वर