जन्म नक्की कधी होतो?

जन्म!
आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे जन्म.
एखादा जीव जन्माला येतो तेंव्हा 'जन्म पूर्ण झाला' हे कधी समजते?
मला माहित असलेल्या कल्पनेप्रमाणे जन्म म्हणजे; अर्भकाचा संपर्क जगण्यासाठी या जगातल्या प्राणवायुशी ज्या क्षणी संपर्क होतो, त्या क्षणी जन्म होतो. म्हणजे जन्मल्यावर मूल पहिल्यांदा जो श्वास घेते ते नेमकी जन्माची वेळ.
पण मग त्याआधी बाळ जरी या जगात प्रवेश करते झाले, तरी त्याने जगण्याची सुरुवात केलेली नसते का?
आपल्याला काय वाटते?
जगाच्या विवीध संस्कृतींमध्ये याविषयी काय धारणा आहेत?
नवे आणी जुने वैद्यकशास्त्र काय काय मानते?

आणी आपल्याला या विषयी काय वाटते?

आपला
गूंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

इमेल आय डी.

इमेल आय.डी.आणि पासवर्ड मिळाल्यानंतर,आगमनाची नोंद केली,की जगाच्या दृष्टीने जन्म झाला.पाहुने म्हणजे गर्भातील हालचाल.त्या अगोदर च्या प्रक्रिया म्हणजे एक्स आणि वाय यांची गुंतागुंत.त्याही अगोदर एच.टी.एम.एल. च्या जंतुचे मिलन आवश्यक आहे.

[उपक्रमवर शेवटचा दिवस.]
शुक्रवार !

अश्या धमक्या काय देता सारख्या?

आवांतरः
[उपक्रमवर शेवटचा दिवस.]

असल्या धमक्या काय देता सारख्या?
तुमचेच काय इथे भल्याभल्यांचे प्रतिसाद नि लेख गायब केलेत प्रशासनाने. ते काही सोडून नाही गेले लगेच!
आपली प्रत्येकच गोष्ट इथे पटेलच असे काही नाही. काही वेळा प्रशासन भंपकपणा करतही असेल, पण हे सगळे संपादनाचे कार्य सारखे पाहत राहणे हे सोपे काम नाहिये.
शिवाय इतर सभासदांनी तुम्हाला नका जाऊ म्हणून गळ घातली तेंव्हा तर् तुम्ही साधे प्रतिसादाचेपण सौजन्य दाखवले नाही.
मी जातोय उपक्रमवर शेवटचा दिवस... शेवटचा दिवस... असं करुन कसं चालेल? हे सगळं आपल्या सगळ्यांसाठीच चाललय ना? का कुणाच्या एकाच्या फायद्याचा खेळ आहे का?
जर तुम्हाला बदल हवा असेल तर आपल्यातही बदल करण्याचे तयारी हवी... उगाच असल्या धमक्या देऊन काय उपयोग आहे? जायचे तर जा असं म्हंटले तर?
मी म्हणेन, त्यापेक्षा
१. काहीतरी बदल घडवण्याला बळ द्या.
२. बदल कुठे हवा ते सांगा
३. बदल का आणी कसा हवा हे सांगा.
४.आपले म्हणणे पटवण्यासाठी आपले मुद्दे मांडा.
५. हे मुद्दे वारंवार मांडा, आपल्या सही मध्ये टाका.
६. लेख लिहा, चर्चा सुरु करा.
यामुळे बदल घडून येण्याचे शक्यता तरी तयार होईल.
राजेंद्रांच्या लेखात उल्लेख आल्याप्रमाणे सार्त्र यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्याची जबाबदारी तुमची पण आहे हे लक्षात ठेवा!

तुम्ही करताय असा पळपुटे पणा काय कामास येईल?
असं आपण कामाच्या ठिकाणी पण करु का?
उद्या घरात मोठ्याभावाने/वडिलांनी रागावले किंवा आपले नाही ऐकले तर लगेच आपण घर सोडून जायच्या धमक्या देतो का?
आणी जर अश्या धमक्या देत असु तर निश्चितच आपली विचारसरणी तपासून पाहण्याची वेळ आली आहे.

चु.भु.द्या.घ्या

आपला
गुंडोपंत

मृत्यू कुंडली

[उपक्रमवर शेवटचा दिवस.]

यावरुन मृत्यूकुंडली बनवाता येईल. सोडून जाण्याचे ठिकाण, वेळ आणि दिनांक मिळाला म्हण्जे पुरे?

१. काहीतरी बदल घडवण्याला बळ द्या.
२. बदल कुठे हवा ते सांगा
३. बदल का आणी कसा हवा हे सांगा.
४.आपले म्हणणे पटवण्यासाठी आपले मुद्दे मांडा.
५. हे मुद्दे वारंवार मांडा, आपल्या सही मध्ये टाका.
६. लेख लिहा, चर्चा सुरु करा.
यामुळे बदल घडून येण्याचे शक्यता तरी तयार होईल.

गुंडोपंत, पटले. अगदि मॅनेजमेंटच्या अँगलने लिहिलेत मुद्दे.

प्रकाश घाटपांडे

नको हो नको!

नको हो नको!
संपादकमंडळात स्थान नको.

हेच लिहिता लिहीता दहावेळा बायकोबरोबर भांडून वेळ मिळवतो.
संपादकमंडळात गेलो तर धरुन हाणेलच मला ती.. ;)

(बायकोला घाबरून असलेला पण वर-वर तसे न दाखवणारा)

गुंडोपंत

जगी असा कोण आहे?

त्याचिया जातिचा त्यास मिळो कुणी असे होईल !

बायकोचिया नजरेस डोळा देवू पाहे
असा या जगी कोण आहे?

वहिनींना आमचा नमस्कार सांगा बर का! ;)
हा हा हा!

वा गूंडोसेठ वा !

गुंडो सरकार,

तुमच्या लेखनाच्या,आणि प्रतिसादातला सर्वोत्तम प्रतिसाद म्हणुन या प्रतिसादाची नोंद केली पाहिजे. इथून जाणार्यासाठी,हा प्रतिसाद भविष्यात कामी येईल यात शंकाच नाही,भल्याभल्यांचे प्रतिसाद नि लेख गायब केलेत प्रशासनाने. ते काही सोडून नाही गेले लगेच! सहमत आहे.पण एका व्यक्तीचा प्रतिसादावर मरजी,त्याच स्वरूपाचे व्यं. नि. मी संपादकाला धाडले,त्यांच्या व्य.नि.ची वाट पहातो.आणि मी माझी चूक समजून घेईन. सहा ही मुद्दे पटण्यासारखेच आहेत.विचारसरणी तपासा पण कोणाची ?ज्या अर्थी संपादकाचे काही उत्तर नाही .याचा अंदाज असा माझे प्रश्न बरोबर आहेत.माझ्या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तर नाही.
कोणाच्या जाण्याने कोणाला फरक पडणार नाही.पण भेदभाव असाच चालू राहिला तर यांचेही 'म'व्हायला वेळ लागणार नाही.

प्रतिसाद रहेगा क्या नही हमको नही पता ?

पण काही तर संवाद सदस्यांशी साधाल की नाही?

नमस्कार
उपक्रमराव व नाराज सदस्य,
(आपणाला काय नावाने संबोधावे या संभ्रमात आम्ही आहोत. नाव रोजच बदलते!)
आपल्या म्हणण्यात तथ्य असेलही. आपल्या प्रतिसादाचे स्वरूप समजून घ्यावे लागले. पण मतितार्थ कळला.
मी आपला उद्वेग समजू शकतो. मी पण त्यातून गेलो आहे. माझेही (अ)नेक लेख व प्रतिसाद यांनी गायब केले आहेत.
मी पण त्यविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.
मी मागेही म्हंटले आहेच की, 'उपक्रम हे पाळीव सदस्यांच्या गाळीव लेखनाचे स्थळ' आहे असेच प्रशासनाचे धोरण असल्याचा अनेकदा अनुभव येतो.
आमचे तात्याबा तर अगदी निराश झाले आहेत, त्याचा सामाजिक जाणीव निर्माण करणारा रौशनी उडाल्यावर. त्यावरही प्रशासनाने त्यांना काही उत्तर दिले नाही. तात्यांनी प्रशासनाच्या धोरणांची अनेकदा जाहिर निर्भत्सना केली आहेच. त्याला प्रशासनाने काही उत्तर दिले. पण त्याच्या खंडनाला दिले नाही. हा अनुल्लेखाने मारण्याच प्रयत्न आहे का?

प्रशासनाच तर दोष आहेच त्याविषयी काही शंकाच नाही.
त्यांनीही विचार केलाच पाहिजे की,
१. सदस्य का नाराज आहेत?
२. असे नाराज सदस्य किती आहेत?
३. नाराजीची कारणे काय आहेत? त्यावर आपण काय उपाय करणर आहोत?
४.संस्थळाचे व सदस्यांचे संवादाचे धोरण काय असावे? (हे स्थळ सुरु करतांना याचा खरच काही विचार झाला आहे का?)
५. प्रशासन काय करु शकते या साठी?
६. पुणेरी दुकानदारांचे धोरण आपण कधी सोडणार आहोत का?
७. ईतर बहुतेक संस्थळांवर 'फीडब्यॅक' नावाचा एक दुवा का बरं असावा बरं? त्यातून हे लोक काय साधत असतील?

शेवटी सदस्य 'आपले असणे' महत्वाचा भाग आहे हे प्रशासनाने लक्षात ठेवले पाहिजे.
इन मीन सहाशे सदस्य असतांना सुद्धा 'आपण' आणी 'ते' वेगळे असे सदस्यांना का वाटते बरं याचा विचार नको का व्हायला?

सदस्यांच्या संवादाचे एक दालन बनवायला काय हरकत आहे? या दालनाचे सदस्यत्व सदस्य वय तीन महिने झाल्यावर आपोआप मिळेल असे पण करता येईल. सदस्यांनी किती समस्या मांडल्या / सोडवल्या याचा पण एक ताळेबंद दिला जाउ शकतो.
त्यात सोडवलेल्या समस्यांचा एक आलेख पण देता येईल. आणी हे करण्याला काही वारंवार मनुष्य बळ लागेल असे वाटत नाही. याचे ऑटोमेशन करणे सहज शक्य आहे. यामुळे सदस्यांना विश्वास मिळेल की आपला आवाज पण ऐकला जाऊ शकतो.
हे 'आमचे संस्थळ' आहे याच\ची जाणीव निर्माण होईल. हे एकप्रकारे 'पॉझिटिव कम्युनिकेशन' असेल. ही पॉझिटिविटि किती महत्वाची हे सांगायलाच नको.

आमचे युयुत्सुराव सांगतीलच,
की याहूसाठी कोणतेही पैसे न देणारे सदस्य किती महत्वाचे ठरतात.
त्यांच्याशी संवाद साधायला किती प्रकारे याहू प्रयत्न करते. इथे 'फीडब्याक' का महत्वाचा मानतात?
सदस्या कडून सेवे विषयी एखादी विनंती आली तर त्याचा त्वरित निचरा कसा केला जातो. (यावेळी याहूची सदस्य संख्यापण विचारात घ्या)
मला मान्य आहे हे काही पैश्यासाठी पैश्यावर चालणारे स्थळ नाही. त्यामुळे याहू चे व उपक्रमाची काही बरोबरी नाही.
पण काही तर संवाद सदस्यांशी साधाल की नाही?
नव्यायुगात आपण संवाद साधला तरच टिकु!
शब्द बापुडे वारा नाहीत हे आम्ही सांगायला नकोच!
चु.भु.द्या.घ्या
आपला
गुंडोपंत

जन्मवेळ आणि ज्योतिष

ज्योतिषात हा वाद होता. पण बालकाचे रडणे ही जन्मवेळ मानावी याला आता सर्वमान्यता आहे. स्त्रीबीजफलन ही जन्मवेळ मानून त्याची जन्मकुंडली काढणे. याला आधान जन्मकुंडली मानतात. अर्थात ही वेळ कशी समजणार? पुर्वी नउ महिने नउ दिवस वजा करायचे. आता सिझेरिअन बेबी ला काय करणार? नशीब

प्रकाश घाटपांडे

प्रमाण वेळ-एक (कु)शंका

माझी एक (कु)शंका -
आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे जन्म- हे मान्य. पण जर जन्मच प्रवासात झाला तर - म्हणजे जर कुणाचा विमान (आकाशात उडत असताना), जहाज (पाण्यातून जात असताना) किंवा चारचाकी वाहन (आंतरराष्ट्रिय प्रमाणवेळ रेषेवर) याठिकाणी प्रमाणवेळ दुभागणार्‍या रेषेवर जन्म झाला तर तो कोणत्या प्रमाणवेळेनुसार झाला असे समजावे? (अलिकडच्या प्रमाणवेळ विभागातील का पलिकडच्या?)

प्रमाणवेळ

प्रमाणवेळ ही एखाद्या ठिकाणाची स्थानिक वेळच असते. व्यवहाराच्या सोयीसाठी त्याला प्रमाण वेळ मानली जाते. भारताची प्रमाणवेळ ही ८३.५ रेखांश पुर्व येथील स्थानिक वेळ असते.
अमेरिकेत चार कि पाच प्रमाणवेळा आहेत.
वरील केसेस या अपवादात्मक असतात्. कोंबड झाकलं म्हणून काही तांबड फुटायच रहात नाही.ज्योतिषी लोक वरील केसेस मध्ये संशयाचा फायदा घेतात्. या ठिकाणी हस्तरेषा हा निसर्गाचा आरसा आहे, इथे जन्मवेळचा संबंध येत नाही असे म्हणत हस्तसामुद्रिक् पुढे येतो .
बंडूचा हात्चा चुकला तरी बंडूचे गणित मात्र कसे बरोबर येते? जातक व ज्योतिषी यांचे नाते अपेक्षांचे असते, समीक्षेचे नसते. अस्तित्वात नसलेल्या व्यक्तिचे पण भाकित् ज्योतिषी सांगू शकतात तिथ प्रमाण वेळेचे काय घेउन बसलात विसुनाना?
प्रकाश घाटपांडे

सगळंच

घाटपांडेसाहेब
आपण सगळेच काही ज्योतिष्याच्या चष्म्यातून पाहत अहात, असे आपले प्रतिसाद पाहुन वाटले. मूळ चर्चेमध्ये तर असा काही उल्लेख केला नाहिये...
आपण असे ज्योतिष्याच्या चष्म्यातूनच बघायला माझी काहीच हरकत नाही, पण त्यात आपल्या चौफेर विचारांचा लोप संभवतो की काय असे वाटून हे लिहीले.
राग मानु नका!

(आपल्या चौफेर वाचनातून आलेल्या विचारांचा चाहता)
गुंडोपंत

कळीचा मुद्दा

जन्मवेळ हा ज्योतिषात जेवढा कळीचा मुद्दा आहे तेवढा वैद्यकशास्त्रात नाही. (अर्थात माझ्या मते) जन्मवेळेवर आख्खी तथाकथित जन्मकुंडली अवलंबून आहे. मी फक्त एक विचार मांडला.विविधांगी विचार मांडायला उपक्रमी समर्थ आहेतच. (कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहेतच) वैद्यकशास्त्रात मात्र मृत्यूवेळ हा कळीचा मुद्दा आहे. नेमका कुठला अवयव मृत झाला म्हणजे मृत्यू झाला असे मानायचे?

प्रकाश घाटपांडे

अलाहाबाद

भारताची प्रमाणवेळ ही ८३.५ रेखांश पुर्व येथील स्थानिक वेळ असते.

माझ्या माहितीत ८२.५ आहे.

(वेळेत पोहोचणारा) अभिजित

धन्यवाद

टंकलेखनातील त्रुटी दूर करण्यासाठी अवसर न दिल्याबद्द्ल धन्यवाद
प्रकाश घाटपांडे

बदलावे....

जन्म नक्की कधी होतो?
हे शीर्षक बदलून

संस्थळाच जन्म नक्की कधी होतो?

असे करावे का? ;)

आपला..
गुंडोपंत

बिग्री ते मॅट्रीक

बिग्री ते मॅट्रीक मधील पुलंचा विनोद आठवला:

लहानपणी घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाच्या पंगतीत मुलांना उगाच काही तरी प्रश्न विचारायची हौस(खोड) असायची. मला एकदा अशाच एका पाहूण्याने विचारले की "काय रे नेपोलीअनचा जन्म कधी झाला?" मी ताबडतोब उत्तर दिले, "त्याची आई बाळंत झाल्यावर!" (त्यानंतर माझे जेवण आई आधीच उरकायला लागली!)

खरा जन्म?

... ही काय भानगड असते बुवा?

ही सर्व

चर्चा पाहून असे वाटते कि ज्योतिषशास्त्रापेक्षा मग हस्तरेखाशास्त्र काय वाईट? हातावरच्या रेषा सुस्पष्ट असतात आणि जन्मभर त्या सारख्याच राहातात. म्हणजे वादाचा मुद्दाच नाही राहात. अर्थात, हे मी माझ्या बालबुद्धीने म्हणतो. राग मानू नये,

विनम्र,
ऋजु.

ता.क. प्रियालीने ह्यावर आपले तज्ज्ञ मत नक्की द्यावे.

 
^ वर