भाषांतर वि. अनुवाद

भाषांतर आणि अनुवाद यांत कोणता फरक असतो? इंग्रजी किंवा इतर भाषेतून मराठीत आणलेले साहित्य भाषांतरीत आहे की अनुवादित हे कसे ठरवायचे?

या दोन्हीपेक्षा एक वेगळी गोष्ट म्हणजे आधारीत. तेव्हा एखादी गोष्ट दुसर्‍या एखाद्या गोष्टीवर आधारीत आहे, अनुवादित आहे, भाषांतरीत आहे असे केंव्हा आणि कसे ठरवले जाते?

-राजीव.

लेखनविषय: दुवे:

Comments

माझ्या मते,

एखाद्या साहित्याचे शब्दश: रुपांतर म्हणजे 'भाषांतर', आणि एखाद्या साहित्याचे त्याचा मूळ गाभा किंवा आशय बिघडू न देता स्वत:च्या भाषेत किंवा स्वत:च्या शैलीत केलेले रुपांतर म्हणजे 'अनुवाद'!

उदाहरणार्थ,

'Tatyaa was hungry' या वाक्याचे,

'तात्या भुकेला होता' हे झाले भाषांतर!

आणि

'भुकेने तात्याच्या पोटात कावळे ओरडत होते' हा झाला अनुवाद!

;)

तज्ञांनी अधिक खुलासा करावा..

आपला,
(भाषांतरीत आणि अनुवादित!) तात्या.

भाषांतर

भाषांतर-एका भाषेतील साहित्य दुसर्‍या भाषेत आणणे.
अनुवाद-अनुवाद म्हणजे शब्दश: भाषांतर न करता, एका भाषेतील साहित्य दुसर्‍या भाषेत आणताना त्या भाषेची लकब,सौंदर्य विचारात घेणे.
रुपांतर- एका साहित्याप्रकारातून दुसर्‍या साहित्य प्रकारात तीच कलाकृती आणणे.
उदा.कादंबरीचे नाटकात रुपांतर
जाणकारांनी खुलासा करावा,
स्वाती

भाषांतर.

राजीव साहेब,

शद्बांकन,अनुवाद,भाषांतर असे ते विषय असावेत "मूळ विचाराचा परिचय करून देणे हा वाड्मय अनुवादाचा हेतू असतो,असावा".अनुवादाच्या स्वतःच्या काही आवडी निवडी असतात...त्याचा परिणाम अनुवादावर होत असतो."

"एका वाड्मयाचा दुस-या वाड्मयात अनुवाद केला जातो तेव्हा ते भाषांतर" समांतर निर्मिती जसे किंग लेअर चे नटसम्राट.

तात्यांच्या उदाहरणांशी सहमत.तज्ञांनी अधिक खुलासा करावा..इथपर्यंत.

शुद्धलेखनाच्या चुका शोधत राहाल. आपला त्रास वाचावा,म्हणून लिहिण्याचे थांबवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहा हो....

शुद्धलेखनाच्या चुका शोधत राहाल. आपला त्रास वाचावा,म्हणून लिहिण्याचे थांबवतो

लिहा हो. चुका शोधूच. प्राध्यापकांच्याच चुका शोधण्याचे भाग्य मिळू दे की आम्हाला.

आपला,
(विद्यार्थी) राजीव.

एकच?

इंटरप्रिटर आणि ट्रान्स्लेटर एकच का?
प्रकाश घाटपांडे

फरक

इंटरप्रिटर म्हणजेच दुभाषा व ट्रान्सलेटर म्हणजेच भाषांतरकार यांच्यात कायद्यानुसार काहीच फरक नसला तरी वास्तवात एक मूलभूत फरक आहे. दुभाषाला २ किंवा अधिक व्यक्तींत चाललेल्या संवादाचे भाषांतर तिथल्या तिथे काही सेकंदांत करायचे असते. (संवादांना प्रताधिकार कायदा लागू होतो का?) भाषांतरकाराला मात्र लिखित मजकूराचे ठरलेल्या कालावधीत लेखी भाषांतर करून द्यावयाचे असते. त्याला त्याकरिता विविध शब्दकोशांची/ माहितीस्रोतांची मदत घ्यायला पुरेसा वेळ असतो, दुभाषाचे मात्र तसे नसते. दुभाषाचे काम अधिक आव्हानात्मक आहे, त्यासाठी प्रसंगावधान आवश्यक असते. शिवाय त्यांनी भाषांतर करताना काही चूक केल्यास तिचे परिणाम तात्काळ दिसून येतात व ती चूक सुधारायला तिथे कुणी नसल्यास ते परिणाम गंभीरही होऊ शकतात.
भाषांतराशी संबंधित सर्व व्यावसायिकांना फक्त कायद्याच्याच दृष्टीकोनातून पाहून एकाच पारड्यात तोलणे किमान मला तरी योग्य वाटत नाही.
राधिका

असहमत..

भाषांतर आणि अनुवाद एकच.

असहमत.

शब्दशः आणि स्वैर, ही दोन विशेषणे ह्या दोन्ही नामांना लागू होतात.

'भाषांतर' आणि 'अनुवाद' या शब्दांना अनुक्रमे 'शब्दशः' आणि 'स्वैर' ही दोन वेगवेगळी विशेषणे जर लागू होत असतील तर 'भाषंतर' आणि 'अनुवाद' हे एकच कसे काय? तसे असेल तर 'शब्दशः' आणि 'स्वैर' हे दोन समानार्थी शब्द आहेत असे मानले पाहिजे!

तात्या.

तू तज्ञांना विचार काय ते! ;)

तू मला सांग, असे असते तर आपल्या शास्त्रीय भाषेत अशा चार शब्दांची गरज आहे का ? दोनच शब्दांत नसते का सगळे अर्थ ?

ए बाबा, ते मला काही माहिती नाही. मी आपलं मला सुचलं ते लिहिलं! तू आता उगाच नव्याने मला यात खेचू नकोस आणि माझ्या अंगावर दारुची पिंपे फेकू नकोस! ;)

की आपली भाषाच च्यामारी शास्त्रीय नाही, आपल्या संगीतासारखी ?

शास्त्रीत संगीताचा उल्लेख मी हल्ली 'अभिजात संगीत' असाच करतो.

भाषेचं मला माहीत नाही. त्याबाबत तू तज्ञांना विचार काय ते! ;)

तात्या.

संत ज्ञानेश्वरांनी

भगवद्गीतेचे केलेले भाषांतर/अनुवाद/प्राकृतीकरण/देशीकरण म्हणजे भावार्थदीपिका ऊर्फ ज्ञानेश्वरी हे देखील प्रताधिकार कायद्याच्या कक्षेत येऊ शकते का?

भावार्थदीपिका हे नक्की काय आहे? भाषांतर-अनुवाद की इतर काही?व्यावसायिक कारणाव्यतिरिक्त केलेल्या साहित्य ढापाढापीचे मी समर्थन करतो.

फंडा क्लीअर

झाला आहे.

पण सुंदर ते ध्यान लिहिणारे ज्ञानेश्वर व भावार्थदीपिका लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे आहेत असे पुसटसे वाचले आहे. ज्ञानेश्वर एक की तीन या विषयावर एक माहितीपूर्ण चर्चा सुरु करुया.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

ज्ञानेश्वर नाही

पण सुंदर ते ध्यान लिहिणारे ज्ञानेश्वर
तुम्हाला "सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।।" अपेक्षित आहे का? ते तुकारामांनी लिहिले आहे.
आपला
(वारकरी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

हरिपाठ

सॉरी.

तुका म्हणे माझे हेची सर्वसुख पाहिन श्रीमुख आवडीने हे विसरलोच.

हरिपाठ लिहिणारे ज्ञानेश्वर व भावार्थदीपिका लिहिणारे ज्ञानेश्वर हे एकच का?


येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

धन्यवाद

माझ्या शंकेचे उत्तर देऊन येथे प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्वांचे धन्यवाद.

 
^ वर