संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन

'पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल.
ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'उपक्रम' च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा.
सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या 'उपक्रमा'त सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा.
धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहभाग

सहभागी होत आहे

सहभागी व्हायची ईच्छा आहे

सहभागी व्हायची ईच्छा आहे.

गुगल डॉक

या संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यात रस दाखवलेल्या सर्वांचे आभार.
या निमित्ताने वेगवेगळ्या मंचांवर मला काही प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्वांची एकत्र उत्तरे इथेच देण्याचा प्रयत्न करतो.
एक तर ही प्रश्नावली इतकी मोठी आणि किचकट का आहे? एक सरसकट विधान करायचे तर भारतात होत असलेल्या संशोधनाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कुणालाही अगदी नवीन, वेगळे असे काही शोधून काढायला नको आहे. 'पुण्यातले लोक कोणत्या ब्रॅन्डचे आईसक्रीम खाणे पसंत करतात?' या विषयावर येथे पी.एच.डी मिळू शकते. (ही अतिशयोक्ति नाही) Environmentalism based cause-related marketing ही माझ्या या संशोधनामागची कल्पना आहे. लोकांना पर्यावरणाबद्दल किती कल्पना असते? एखादी कंपनी पर्यावरणाला मदत करत असेल तर त्या कंपनीची उत्पादने विकत घेण्यात लोकांना अधिक रस असतो का? त्यासाठी ते अधिक पैसे देतील का? दिल्यास किती? असे हे सगळे आपल्या मनात आतल्या आत खणत जाणे आहे. म्हणून ही प्रश्नावली इतकी मोठी झाली आहे. प्रश्नावलीचा पहिला भाग 'पर्यावरण साक्षरता' Environmental Literacy याबाबत आहे. आपण म्हणतो की आपल्याला पर्यावरणाबद्दल बरीच माहिती आहे, आपण 'पर्यावरण साक्षर' आहोत, पण नुसती माहिती असणे म्हणजे साक्षरता नव्हे. त्यामुळे समाजातले किती लोक खरोखर 'पर्यावरण साक्षर' आहेत हे शोधून काढणे हा या प्रकल्पाच्या पहिल्या भागाचा हेतू आहे.
आणखी एक प्रश्न म्हणजे हे सगळे कुठल्या कंपनीने प्रायोजित केलेले आहे काय? म्हणजे मी फुकटेगिरी करुन विदा गोळा करायचा आणि कुठल्याशा कंपनीकडून पैसे उपटायचे असे आहे काय? याचे खरे व नम्र उत्तर 'नाही' असे आहे. पदरमोड करुन हे सगळे चालले आहे.
शेवटी कुणीसे विचारले की कशाला बुवा असले काही किचकट, गुंतागुंतीचे करत बसता? याचे उत्तर माझ्याकडे नाही. फार फार तर 'Because it is there' असे मी म्हणू शकतो.
या संशोधन प्रकल्पाचा शेवटचा टप्पा म्हणजे खाली दुवा दिलेली सुधारित प्रश्नावली. या प्रश्नावलीतले बहुतेक प्रश्न बहुपर्यायी आहेत. योग्य तो पर्याय निवडून शेवटी 'सबमिट' हे बटण दाबले की ही भरलेली प्रश्नावली माझ्यापर्यंत पोचेल. ज्यांनी याआधी ही प्रश्नावली भरली आहे त्यांनी आणि ज्यांनी भरलेली नाही अशांनीही ही प्रश्नावली प्रामाणिकपणे आणि न कंटाळता भरावी आणि या संशोधनाला हातभार लावावा, ही विनंती. संशोधन या विषयात रस असलेल्या आपल्या मित्रांना, सहकार्‍यांनाही या प्रकल्पात सामावून घ्यावे, त्यांनाही या प्रश्नावलीचा दुवा पाठवून ती भरण्यास उत्तेजन द्यावे , असेही सांगावेसे वाटते. धन्यवाद.
https://docs.google.com/forms/d/1yg6tlUQqCqzuw1BlpU0EK2ASjRGC3Ny4H5RochT...

 
^ वर