संख्याशास्त्रातील विश्लेषणासाठी मदत

एका संशोधन प्रकल्पातील सांख्यिकी विश्लेषणासाठी (Statistical Analysis) मदत हवी आहे. मदतकर्त्याला शक्यतो SPSS या संगणकीय आज्ञावलीचे ज्ञान असावे. संशोधनासाठीच्या प्रश्नावलीची छाननी करणे, विदा संकलन करण्यास मदत करणे, जमा झालेल्या विद्याची साफसफाई करणे , विद्याचे विशेषण करणे आणि या सगळ्यांतून निघणारे निष्कर्ष संकलित करणे असे या कामाचे स्वरुप आहे. या व्यतिरिक्त या संशोधनातील परिकल्पनांची / गृहितकांची / गृहितकृत्यांची पडताळणी करणे ( Hypothesis testing) आणि शोधपद्धती (Research Methodology) या विषयावर इंग्रजीतून चार शब्द लिहिणे हेही करता आले तर उत्तमच.
सदर प्रकल्प पुण्यात करायचा आहे, अर्थात मदतकर्ता / ती पुण्यात असला/लीच पाहिजे असे नाही. या कामासाठी योग्य मोबदला दिला जाईल. इच्छुकांनी कृपया व्यक्तिगत निरोपांतून संपर्क साधावा. धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर