ज्ञानकोश

http://ketkardnyankosh.com
१९२० ते १९२९ ह्या काळात प्रकाशित झालेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर संपादित महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड हा पहिला मराठी ज्ञानकोश. ज्ञानाचा खजिना मराठी भाषेत कोशाच्या स्वरूपात पहिल्यांदा उलगडला त्याला आता ९० वर्षे उलटली. हे २३ खंड नंतर कधीच पुनर्मुद्रित झाले नाहीत. ९० वर्षांचे उन्हाळे-पावसाळे, पूर-पाणी सोसत टिकलेली, ९० वर्षांपूर्वीच्या कागदावर छापली गेलेली, दोऱ्याने बांधली गेलेली पुस्तके आणखी किती उन्हाळे-पावसाळे पाहतील? उगवत्या पिढ्यांसाठी मराठी भाषेतील तो ज्ञानाचा खजिना जपून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अभिनंदन

धागाकर्ते प्रासादिक ह्यांचे अभिनंदन अशासाठी की http://ketkardnyankosh.com/ हे संस्थळ त्यांनी दाखविले. तसेच केतकरांचा ज्ञानकोश पूर्णतः digitize केल्याबद्दल यशवंतराव वव्हाण प्रतिष्ठानचेहि अभिनंदन. मी हे संस्थळ थोडे चाळले त्यावरून असे वाटते की पूर्ण ज्ञानकोश येथे सुकरपणे चाळता वा वाचता येतो. DLI सारख्या संस्थांचे खरेतर हे काम पण तेथे सगळाच आनंद आहे.

कित्येक वर्षांपूर्वी केतकरांचे प्रा.द.न.गोखलेलिखित उत्कृष्ट चरित्र मी वाचले होते. त्यांनीच लिहिलेले केतकरांचे एक चरित्र DLI मध्ये उपलब्ध आहे पण ते १०३ पानांचे आहे. माझ्या स्मृती प्रमाणे मी वाचलेले चरित्र १०३ पानांहून मोठे असावे. ह्याबाबत कोणी काही खुलासा करू शकेल काय?

दुसरी एक आठवण. १९७० च्या सुमारास मी पुण्यात गोळीबार मैदानाजवळील मीरा सोसायटी, क्र. २ येथे राहात होतो. सोसायटी नवीकोरी आणि खूप मोकळी, झाडांनी भरलेली अशी होती. आमच्या दारावरून एक वृद्ध युरोपीयन बाई अनेकदा फिरायला जातांना मी पाहात असे आणि त्या शीलवतीबाई आहेत अशी माझी काही कारणाने समजूत झाली होती. (केतकरांचे घर गोळीबार मैदानाच्या जवळपासच होते हेहि मी कोठेतरी वाचल्याचे स्मरते.) मी पाहिलेल्या युरोपीयन बाई शीलवतीबाईच होत्या काय ह्या माझ्या समजुतीची शहानिशा कोणी करू शकेल काय? त्यांनी १९६९ साली 'मीच हे सांगितलं पाहिजे' अशा नावाचे एक आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले होते ह्यावरून त्या सालापर्यंत त्या पुण्यात होत्या हे दिसते. पण ह्यापलीकडे त्यांची अन्य काही माहिती मला जालावर मिळाली नाही

भारीच!!

आयला सहीच!! इतके दिवस नुसते ऐकून होतो केतकरी ज्ञानकोशाबद्दल , आता प्रत्यक्ष बघायला मिळतील. या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे काम बाकी भारी दिसतेय. कोसांबींबद्दलची साईटसुद्धा त्यांनीच तयार केलेली आहे.

धन्यवाद

दुव्याबद्दल धन्यवाद. साइट चांगली आहे. वापरायला सोपी आहे.

धन्यवाद

या संकेतस्थळाबद्दल मी ऐकले होते. येथे दुवा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा विश्वकोश नक्कीच खूप उपयोगी पडणार आहे. प्रतिष्ठानचे कार्य उत्तमच आहे असे दिसते.

धन्यवाद

दुव्यासाठी धन्यवाद! खजिनाच दिसतोय!

 
^ वर