दवन्डी

बहुतेक नद्या खूपच प्रदूषित झाल्या आहेत, व सर्वच नद्यांमध्ये प्रवाह पण खूप कमी झाला आहे. गंगा व यमुना या दोन नद्यां करता गंगा अक्शन प्लान व यमुना अक्शन प्लान असे दोन प्लान सरकारने राबविले पण तरी त्या नद्या प्रदूषितच आहेत. काय चुकले ? Recycle And Reuse हे उपाय आहेत का? थेम्स व र्हाइन स्वच्छ, वाहत्या होऊ शकतात तर यमुना का नाही होऊ शकत? जलसंवर्धन म्हणजे नेमके काय व त्याच्या मर्यादा काय? सरकार नदीत किमान पर्यावरणीय प्रवाह (Minimum Environmental Flow) किती असावा हे ठरवून त्या प्रमाणे प्रवाह का ठेवू शकत नाही ? तसे करण्यात अडथळे काय (व कोण) आहेत? व एकूणच भविष्यात आपण "सुंदर, स्वच्छ, वाहत्या नद्या" या बाबत वास्तववादी अपेक्षा काय ठेवू शकतो? त्या करता काय करावे लागेल?

महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, जीविधा, भारतीय जल संस्कृती मंडळ, व निसर्ग संवाद या organizations तर्फे वरील विषयावर ११ मार्च रोजी, सायंकाळी साडे सहा वाजता, पुणे येथे महात्मा फुले सभागृह, घोले रस्ता येथे व्याख्यान आहे. वक्ते - अस्मादिक. Power Point Presentation साधारण एक तास, त्यानंतर प्रश्नोत्तरे. आपण सर्व सादर निमंत्रित आहात

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा.

व्याख्यानासाठी शुभेच्छा. येण्याचा प्रयत्न करीन.

पीपीटी

पीपीटी पहायला मिळेल का?

मेसेज माझ्या बोलण्यात असतो, पीपीटीत नाही

जाहीर व्याख्यान आहे तेंव्हा पीपीटी मध्ये confidential काहीच नाही. पण काही लोक त्यांना जे काय म्हणायचे आहे ते सगळे text पीपीटी मध्ये लिहितात व पीपीटी ची प्रत्येक स्लाईड "वाचतात". तसे मी करीत नाही. माझी पद्धत आहे कि पीपीटी फक्त श्रोत्यांचे लक्ष वेधून ठेवण्या करता असते. कधी कधी काही तरी (चार्ट, नकाशा, चित्र) दाखविण्या करता. मेसेज सगळा माझ्या voice मध्ये असतो. म्हणून voice विना पीपीटी मी शेयर करीत नाही

रोखठोक

कार्यक्रमाला गेलो होतो. चेतन पंडितांच्या उपक्रमावरील व्यक्तिमत्वासारखेच रोखठोक भाषण झाले. चेतन पंडित लोकांना अज्ञानातला आनंदच मिळू देत नाही ब्वॉ!
तत्वज्ञान व दाढदुखीचा किस्सा भारीच!

 
^ वर