रेजिंग बुल - चुकवू नये असा चित्रपट

चुकवू नयेत असे चित्रपट - ४ कॅसिनो ( १९९५ ) : http://mr.upakram.org/node/3935
-------------------

Raging Bull - हा अजुन एक Martin Scorsese चा चित्रपट. १९८० साली आलेला आणि आता so-called one of the greatest म्हणुन मानला गेलेला.

हा चित्रपट कथा सांगतो Jake LaMotta नावाच्या १९४०-५० मधल्या बॉक्सर ची. एका अतिशय आक्रमक, असुरक्षीत माणसाची who is run by animal insticts, jealousy , sexual desire. ही सत्यकथा आहे, जेक च्या आत्मचरित्रा वरुन घेतलेली. त्यामुळे थोडी सॉम्य झालीय ( स्वताबद्दल लिहिले आहे ना ).

चित्रपटाची सुरुवात १९६४ मधे जेक च्या बोलण्याच्या practice नी होते. ( तो एका पब मधे stand up comedy ) करत असतो. चित्रपटाची सुरुवात ब्रँडो च्या "I could have been a contender" ह्या प्रसिद्ध वाक्यानी होते ( ऑन द वॉटरफ्रंट ). आणि लगेचच फ्लॅशबॅक चालू होतो.

नंतर १९४१ पासुन ची जेक ची गोष्ट आणि त्याचे घसरत जाणे दाखवले आहे. गोष्ट सांगण्यात अर्थ नाही, नेहमी अपेक्षीत असलेली सुरुवात, मध्य, मग क्लाय्मॅक्स आणि शेवट असे नाहीये. एका Fallible माणसाचे घसरत जाणारे आयुष्य असे ह्या सिनेमाचे स्वरुप आहे.

जेक ची भुमिका रॉबर्ट डी निऱो नी केली आहे. जो पाशि ( Joe Pesci ) नी त्याच्या भावाचे काम केले आहे. जो चा हा पहिलाच सिनेमा.

काय बघावे

- पटकथा विचार करण्या सारखी आहे. संकलन आणि शुटींग चांगले आहे. black & white आहे सिनेमा.
- डी निरो चा अभिनय आणि त्यानी भुमिके साठी केलेली तयारी. तो जेक च वाटतो, कुठेही godfather ची आठवण येत नाही.
- मार्टीन च्या सिनेमा मधे नक्की काय आवडले हे सांगणे नेहमीच अवघड असते. पण पहिल्यांदी हा सिनेमा बघाल तेंव्हा कदाचित विषेश काही वाटणार नाही. पण हा सिनेमा Haunt करतो. आठवतो आणि पुन्हा बघाल तेंव्हा चांगला वाटतो. आणि पुन्हा बघाल तेंव्हा ग्रेट वाटतो.

हे आत्मचरित्र आधी डी निरो नी वाचले आणी मग तो मार्टीन च्या मागे लागला. मार्टीन ला पटवायला त्याला २ वर्ष लागली. आपल्याकडे director's actor नावाचे एक खुळ आहे आणि प्रसिद्ध अभिनेते सुद्धा दिग्दर्शकानी सांगितले तसे केले ( ते अगदी वेड्यासारखे असले तरी. ).
विचारशील अभिनेता, जाण असलेला अभिनेता म्हणजे काय ते डी निरो कडुन शिकावे.
ह्या भुमिके साठी डी निरो नी २२ किलो वजन वाढवले ( ६७ - ८९ किलो ), ते सुद्धा पुढे मोठी कारकिर्द पडली असताना.

नक्की बघा. घाईघाईत नको. आणि थोड्या दिवसांनी पुन्हा बघा.

-----------
चुकवू नयेत असे चित्रपट - ४ कॅसिनो ( १९९५ ) : http://mr.upakram.org/node/3935

लेखनविषय: दुवे:
 
^ वर