"जय जय सुरवरपुजित" विषयी

अजय अतुल यांच्या एका गीत संग्रहामध्ये हे गाणे ऐकले..
अतिशय सुंदर लय आणि शब्द अगदी भारून टाकतात..
परंतु प्रयत्न करून ही याचे बोल कुठे मिळाले नाहीत. कुठलीही माहिती देखील नाही.. अजय अतुल यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी देखील याचे रचनाकार माहित नाहीत असे सांगितल्याचे आठवतेय..
तसा youtube वर एक audio सापडला..
मग बोल कसे-बसे लिहिले आहेत..

जाणकारांनी कृपया दुरुस्त्या सुचवाव्यात तसेच अर्थदेखील सांगू शकलात तर उत्तमच..
धन्यवाद..
---
जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ ।
आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥

नवमी श्री भगवंतम् गणपती मति वरदम् ।
वरदंति मुखम् सुमुखम् सादर मे करदम् ॥

वरदम् विपदुधौतम् धौतमलम् शमलम् ।
शमलम् विदम् पिदतम् हत पापी शमलम् ॥

तरुणारुणरुचिरम् तरुणम् श्रीकांतम् ।
कांतम् कलितै कांतम् कलयेसुदुरम् ॥

करुणा वरुणा दयचरणम् दुजितरणम् शरणम् ।
या मोयमिरम् शरणम् द्रुतमतसुवितरणम् ॥

जय जय सुरवरपुजित जित दानव कलभ ।
आस्वरवरलम्बोदर दर हर हर कलभ ॥
---

लेखनविषय: दुवे:

Comments

गणपतीची जुनी संस्कृत आरती

तुम्हाला ठाऊक नाही तुम्ही मला किती आनंद देताय!

ही गणपतीची खूप जुनी आरती आहे.
मी शाळेत असताना आजोबांनी 'ये तुला गंमत सांगतो' म्हणून म्हणून दाखवली होती.
लिहूनही घेतली होती. पण हरवली कुठेतरी..
आता आजोबाही नाहीत...

ऐकतो आणि जमले तर शुद्ध प्रत लिहितो इथे.

 
^ वर