सविता हलपनवार
सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी भारतीय गर्भवती महिला डॉक्टरांनी गर्भपात करायला नकार दिल्यामुळे जग सोडून गेली . अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्याने हरतर्हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (की धर्माच्या नावाखाली अंधश्रद्ध लोकांनी ?) आणखी एक बळी घेतला.
अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !
या बाबतीत सविताच्या समर्थनार्थ आणि असे पुन्हा जगभरात कुठेही होऊ नये म्हणून एक व्यापक चळवळ (निदान फेसबुक/इंटरनेट वर तरी )चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक.
आपण तेवढे तरी निदान केलेच पाहिजे असे वाटते..................!
Comments
०
आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही.
जे घडले ते कायद्यानुसार घडले. ती बाई हिंदु नसती, लोकल ख्रिश्चन असती, तरी हेच घडले असते. गर्भपाताचे नियम सरकार ठरवते ते डॉक्टरांना पाळावे लागतात.. आंदोलन करायची इतकीच हौस असेल तर त्या देशात जाऊन स्वतःचए गर्भपात केंद्र काढून बसा आणि तुमच्या मर्जीनुसार बायकाना जीवदान द्या.
कायद्याला दोष द्यायला हवा.
नियम सरकार ठरवते ते डॉक्टरांना पाळावे लागतात
हीच या ठिकाणी खरी मेख आहे. डॉक्टरांनी फक्त कायद्याचे पालन केले. या घटनेत दोष द्यायचाच ठरला तर तो कायद्यालाच द्यायला हवा. अंधश्रद्धेचाही यात अर्थाअर्थी काहीही संबंध दिसत नाही.
बाकी हिंदूंच्या अंधश्रद्धेबद्दल कोकलणाऱ्यांना सणसणीत वगैरे चपराक याचे हसूच आले.
रेबीज ने भारतात दर वर्षी २०,००० मृत्यू
एक व्यापक चळवळ चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक
जसे आयर्लंड येथे गर्भपाताला कायद्याने बंदी आहे, तसेच भारतात भटक्या कुत्र्यांना ठार मारायला कायद्याने बंदी आहे. त्या मुळे भारतात दर वर्षी २०,००० (वीस हजार) माणसे कुत्रा चावल्याने मरतात. तर, भटक्या कुत्र्यांना जीवदान देणाऱ्या कायद्याने विरुद्ध करोडो भारतीयांच्या सह्या वगैरे असलेले निषेधपत्र भारत सरकारला पाठविणे अधिक जरूरी आहे, वीस हजार पट अधिक जरूरी. तुम्ही पुढाकार घ्या, मी तुमच्या बरोबर आहे.
आणि By The Way, आयर्लंड येथील गर्भपात विरोधी कायदा अंधश्रद्धा नसून धर्मआधारित आहे. दोन्हीत फरक आहे. काळे मांजर आडवे गेल्या माझे काम होणार नाही, किंवा अमावस्येच्या दिवशी प्रवासाला निघाल्यास अपघात होईल, यांना अंधश्रद्धा म्हणतात. गोहत्या करू नये, डुकराचे मास खाउ नये, गर्भपात करू नये, दाढी-केस कापू नयेत, इत्यादी आचरण / धारणा धर्मावर आधारित आहेत. त्या बरोबर आहेत का चूक, या वर मी कोणतेही भाष्य करीत नाहीये. फक्त, धर्म व अंधश्रद्धा यातील फरक उदाहरण देउन स्पष्ट केला
०
कात्रे, तुमचे धागे आजकाल फार चालत नाहीत.
आधी भारतात ल्या आरोग्य सेवे साठी आंदोलन करा
भारतात लक्षावधी लोक उपचार न मिळाल्यामुळे मरण पावतात. जर काही करायचे असेल तर त्या साठी करा.
सविता ह. ह्या स्वता doctor होत्या, त्यांना कायदे माहिती होते. तरी पण ireland मधे delivery करायची हॉस कशाला?
@ आंबा, चेतन पंडीत - तुमच्या प्रतिक्रिया एकदम पटल्या.
आयर्लंड, गालवे
आयर्लंड मधल्या ज्या गालवे शहरातल्या युनिवर्सिटी हॉस्पिटल मध्ये हे सर्व रामायण घडले त्याच गालवे युनिवर्सिटीत माझे जल विज्ञान अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. त्या मुळे ही बातमी वाचल्यावर अनके जुन्या स्मृती जाग्या झाल्या. गालवे हे आयर्लंडच्या पश्चिम किनार्यावर लहानसे शहर / गाव. जनसंख्या आत्ता २.२५ लाख, मी विद्यार्थी होतो तेव्हा २ लाख पेक्षा कमी. गालवे नंतर साडेतीन हजार किमी समुद्र व मग अमेरिकेचा किनारा. वर्षभर दिवसभर पाउस. तापमान शून्याच्या आसपास. साडेतीन हजार किमी समुद्र वरून सरासरी ताशी ६० किमी वेगाने वाहणारा वारा. त्यामुळे हवा नेहमीच शुद्ध.
आयर्लंड येथे कॅथोलिक पंथाचा dominance आहे. त्यांच्या धर्मा प्रमाणे गर्भपात तर दूरच, घटस्फोट सुद्धा घेता येत नाही. एकमेकांशी अजीबात पटत नसलेल्या दाम्पत्यांना उर्वरीत आयुष्य कसे तरी कंठण्या शिवाय दुसरा कोणताही उपाय नसतो. कारण "Till Deah Do Us Apart" ची शपथ घेतलेली असते. इतकेच कशाला, परिवार नियोजन साधनांना पण बंदी आहे. आमचे एक प्राध्यापक, खूप ज्येष्ठ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे. युनिवर्सिटीच्या कुलपतींची जागा रिकामी होणार होती. मी त्यांना विचारले तुमची ज्येष्ठता बघता तुम्ही कुलपती होण्याची शक्यता काय? ते म्हणाले अजिबात नाही. कारण मी ख्रिश्चन असलो तरी प्रोटेस्टंट पंथाचा आहे. आयर्लंड मध्ये कुलपतींची निवड करताना चर्चच्या धर्मगुरूंच्या मताला खूपच वजन असते व येथे प्रोटेस्टंट व्यक्ती कुलपती होउच शकत नाही.
पण आयर्लंडचे लोक फार म्हणजे फारच चांगले. अत्यंत सज्जन, व आपल्याला कल्पना करता येणार नाही इतके helpful. मी अनेक देशात्त बराच हिंडलेलो आहे. पण इतके चांगले व सज्जन लोक या क्रमवारीत आयर्लंडला मी प्रथम स्थानावर ठेवीन. असो. गालवे या ठिकाणी बाळंतपणात complications व्हावीत हे सविताचे दुर्दैव.
कळले नाही?
काही संदर्भ का दिले ते कळलेच नाही.
या प्रतिसादात हा संदर्भ कळला नाही. अमेरिकेचा संदर्भ कशाला?
भारतात काय वेगळी परिस्थिती आहे? धर्मनिरपेक्ष असुन सुद्धा मनात असल्यास सहजा सहजी गर्भपात नाही, न्यायव्यवस्था इतकी जुनी आणि संथ आहे की घटस्फोटाचे दावे वर्षानुवर्षे रखडतात. आणि भारतातली बरिचशी (टक्केवारी कधा पाहिली नाही) जोडपी एकमेकांशी अजीबात पटत नसले तरी सामाजिक भिती अथवा तस्तम कारणांनी उर्वरीत आयुष्य कसे तरी कंठत असतात. स्वमुखाने भारतात हे मान्य करणारे फारच कमी. :)
भारतात राष्ट्रपती पासून गावचा सरपंच ठरवताना तो शक्यतो मुसलमान/स्त्री/दलित इत्यादी असेल हेच पाहिले जाते. भारतात तरी ज्येष्ठता अथवा इतर महत्वाचे मुद्दे पाहिले जातात. तरी सुद्धा आमची लोकशाही जगातली सर्वात मोठी आणि महान आहे.
त्या देशाच्या लोकसंखे इतके चांगले व सज्जन लोक भारतात नक्कीच मिळतील.
बाकी सविता तेथे असणे हा सविता आणि तिच्या पतीचा निर्णय. इतके चांगले आणि सज्जन लोक असुन सुद्धा सविताचा असा मृत्यु व्हावा हे तिच्या पतीचे दुर्दैव. भारतात असते तर आत्ता पर्यंत त्या दवाखान्याची आणि डॉक्टारांची काही खैर नव्हती. नव्हते ते त्यांचे सुदैव.
०
भारतात राष्ट्रपती पासून गावचा सरपंच ठरवताना तो शक्यतो मुसलमान/स्त्री/दलित इत्यादी असेल हेच पाहिले जाते.
त्यात गैर काय आहे? त्याना बुद्धी नसते का?
म्हणजे?
मी असे काही म्हणले नाहीये. तुम्हाला स्वतःला काही अर्थ काढायचे असल्यास ते तुम्हाला लखलाभ.
०
सरपंचच कशाला? भारतीय सैनिकात लढ्णारे आणि मरणारेही मुख्यत्वे मुसलमान आणि दलितच आहेत. पाकिस्तानविरोधात भारताची जम्मू आणि काश्मीर इंफंट्री मुख्यत्वे लढते. त्यात ६० % मुसलमान असतात आणि तेच शहीद होतात. त्यानंतर नंबर लागतो तो जाट, शीख, मराठा, महार रेजिमेंट यांचा , समजले का?
( तुम्ही जाताय का लढायला? स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली , अजून तुमची शेंडीवाली बटालियन कशी काय निघाली नाही? का, पळाले सगळे डॉलर मिळवायला? सीमेवर लढणारे मुसलमान , दलित ( आणि मराठा / इतरजन ) असतील, तर या देशातील सरपंचच कशाला, सगळीच पदे त्यानाच द्यायला , माझी तरी हरकत नाही. )
प्रतिसाद
वरचा प्रतिसाद ज्याला तुम्ही हा प्रतिसाद दिलात तो परत वाचा आणि समजुन घ्या. :)
एका नासक्या आंब्याने सगळी पेटी कशाला नासता आहात. मुद्दा आयरिश आठवणी आणि तिथला धर्माचा प्रभाव हा आहे. उगाच तुमची मते इतरांवर कशाला लादताय?
मला जे समजायचा मुद्दा येथे गैरलागू आहे. मी तुम्हाला काही विचारलेच नाहिये तर समजवता कशाला. नसता पुणेरी शहाणपणा कोणी सांगितलाय?
कोणती बटालियन कधी आणि कशी काढायची हे ठरवणारा मी कोण? मी एक भारतीत आहे. सरकारची कामे सरकार करते. ते त्यांना करु द्याय. आहे त्या बटालियन अशा न ओळखल्या गेल्यातर जास्त आनंद आहे. तुमची हरकत विचारतय कोण? परत पुणेरी शहाणपणा कशाला?
आंबा आणि चेतन पंडित ह्यांची कीव येते
स्वत: काही करायचे नाही आणि दुसरे काही करणार असतील तर त्यांना नावे ठेवायची.
टिपिकल मराठी खेकडा वृत्ती
बदनाम ही सही, नाम तो हुआ
आंबा आणि चेतन पंडित ह्यांची कीव येते
कोई बात नही. बदनाम ही सही, नाम तो हुआ. आपण अस्मादिकांची दखल घेतली, हे ही नसे थोडके
More seriously, एक गोष्ट तुमच्या ध्यानात आलेली नाही. मंदार कात्रे यांनी फक्त एक इच्छा व्यक्त केली होती. कोणत्याही कृतीची सुरुवात केलेली नव्हती. प्रस्तावित निषेध पत्राचा मसुदा बनवून आपण सर्वांना पाठविलेला नव्हता; व्यापक चळवळ सुरु केलेली नव्हती; कोणकोणत्या देशांना ते पत्र पाठवायचे याची यादी केलेली नव्हती. त्यांना विचारा कि त्यांनी किमान स्वत:च्या एकट्याच्या सहीचे निषेध पत्र तरी पाठविले का. जिथे काही कृतीच नव्हती तिथे खेकडा मनोवृत्ती/ पाय ओढण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही.
पण हे ही खरेच कि मला fashionable causes व fashionable कृती या दोन्हीची अलर्जी आहे. Fashion फक्त कपड्यांची, दागिन्यांची नसते तर विचारांची पण असते. एका सविताच्या समर्थनार्थ काही करणे/बोलणे हे fashionable आहे, भटक्या कुत्र्यांच्या चाव्या मुळे मरणाऱ्या वीस हजार (दर वर्षी) लोकांच्या बद्दल आवाज उठविणे fashionable नाही. उलट भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलणे हे fashionable आहे.
तसेच fashionable कृती. सविताच्या समर्थनार्थ मेणबत्त्या घेउन मिरवणूक काढणे; चौकात सविताचा फोटो ठेवून (वर्तमान पत्रांच्या कॅमेर्यांच्या साक्षीने) त्यावर गुलाब ठेवणे; मानवी साखळी करणे (हे पण कॅमेर्यांच्या साक्षीने); शाळेतल्या मुलांना "स वी ता" ही अक्षरे होतील असे बसवून उंचा वरून त्याचा फोटो काढून तो वर्तमानपत्रा कडे पाठविणे; या सर्व निव्वळ fashionable कृती असतात.
चाणक्य यांना खुलासा
अमेरिकेचा संदर्भ कशाला? गालवे शहर परिसराचे वर्णन, शब्द चित्र. संदर्भ नाही.
भारतात काय वेगळी परिस्थिती आहे? . . . घटस्फोटाचे दावे वर्षानुवर्षे रखडतात. इत्यादी. फरक आहे. घटस्फोट काय किंवा गर्भपात काय, कायद्याने बंदी असणे व बंदी नाही पण प्रक्रियेला वेळ लागतो, यात फरक आहे.
हा हा..
वरच्या बहुतेक प्रतिसादकर्त्यांशी सहमत.
भारताबाहेर रहाणारे भारतीय नागरीकांची थोडीफार जबाबदारी घेणे आणि तिथल्या राजदूतामार्फत निषेध व्यक्त करणे वगैरे समजू शकतो पण एव्हडा इश्यू करण्याची काय गरज होती हे समजलं नाही. एखाद-दुसरं उदाहरण अपवादात्मक सापडलं हो, पण इथं रोज हजारो कुत्ते की मौत मरणार्यांचं काय?
स्वत:ला एक न्याय आणि दुस-यांना वेगळा !!
चेतन पंडित काय म्हणतात - बदनाम ही सही, नाम तो हुआ. आपण अस्मादिकांची दखल घेतली, हे ही नसे थोडके.
म्हणजे ह्यांची काही न करता दखल घ्यायची आणि बिचारा लेखक त्याने काहीतरी प्रयत्न केला तर त्याची टर उडवायची.
चेतन पंडित ह्यांनी जे जे मार्ग सुचविले आहेत ते लेखकाने करून पाहावेत. आपण आशा करू कि त्यांना त्यात मार्गदर्शन आणि यश मिलेल.
बाकी राहिले त्या अनावश्यक सूचना. जसे आधी भटके कुत्रे चावतात त्याचा बंदोबस्त करा. टी बी ने लाखो लोक मारतात त्यावर उपाय करा. इत्यादी.
मूळ लेखक हा कुणी देवाचा अवतार नाहीये. त्याला जो प्रश्न भावाला तो सोडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
कुणी बिल गेट्स ह्यांना विचारते का - इतके लोक कुत्रे चावून मारतात आणि तुम्ही एड्स वरील औषध शोधण्यासाठी का पैसे खर्च करता?
माझी दखल तुम्ही आपल्या आपणच घेतली
म्हणजे ह्यांची काही न करता दखल घ्यायची
आता हे काय नवीनच? माझी दखल तुम्ही आपल्या आपण स्वखुशीने घेतली. मी कधी तुमच्याकडे अर्ज पाठविला होता, कि "मी जे काही केले त्याचे विस्तृत विवरण संलग्न आहे. ते वाचून कृपया माझा राग/लोभ/द्वेष/मत्सर/कीव/कौतुक/हेवा इत्यादी करावे". तुही पुढाकार घेवून कीव केली व ती करून घेण्या इतके माझे कर्तुत्व नाही असे तुम्हाला वाटत असल्यास ती मागे घ्यावी. मी या बाबतीत स्थितप्रज्ञ आहे.
आणि बिचारा लेखक त्याने काहीतरी प्रयत्न केला
प्रयत्न केला? कधी केला? माझ्या समजुती प्रमाणे त्याने, लहान मुले हवेत साबणाच्या पाण्याचे बुडबुडे सोडतात तसा फक्त हवेत एक विचारांचा बुडबुडा सोडला.
कुणी बिल गेट्स ह्यांना विचारते का - इतके लोक कुत्रे चावून मारतात आणि तुम्ही एड्स वरील औषध शोधण्यासाठी का पैसे खर्च करता?
माझी कीव वगैरे करून झाली असेल तर आता आपण मुद्द्यावर चर्चा करूया. रेबीज वर लस already आहे. एड्स वर नाही म्हणून बिल गेट्स त्यावर खर्च करतात. बिल गेट्स असेही म्हणू शकतात कि तुमच्या देशात भटक्या कुत्र्यांचा सुकाळ झाला असेल तर तो तुमच्या मूर्खपणाच्या कायद्यामुळे. कायदा बदला, भटकी कुत्री ठार मारा (culling) आणी रेबीज पासून मुक्ती मिळवा.
समजा मंदार कात्रे म्हणतात तसे आपण करोडो भारतीयांच्या सह्या घेवून आयर्लंडच्या पंतप्रधानांना पत्र पाठविले, व त्यांनी जर उत्तर पाठविले, कि तुमच्या देशात तुमच्याच कायद्यांमुळे दर वर्षी वीस हजार लोक रेबीज ने मरतात तो कायदा आधी बदला व मग आम्हाला अक्कल शिकवा, तर आपण काय करायचे? त्यांची पण कीव करायची? का थोबाडीत मारल्यासारखा चेहेरा करून बसायचे?
केवळ शब्दाला शब्द वाढवून उपयोग नाही
प्रयत्न केला? कधी केला? माझ्या समजुती प्रमाणे त्याने, लहान मुले हवेत साबणाच्या पाण्याचे बुडबुडे सोडतात तसा फक्त हवेत एक विचारांचा बुडबुडा सोडला.
जर उपक्रम ह्या संकेतस्थळावर विचार मांडणे, हे प्रयत्न म्हणूनही गणले जात नसेल तर सगळेच मुसळ केरात.
आयर्लंडच्या पंतप्रधानांना पत्र पाठविले......मग आम्हाला अक्कल शिकवा, तर आपण काय करायचे? त्यांची पण कीव करायची? का थोबाडीत मारल्यासारखा चेहेरा करून बसायचे?
आयर्लंड चे पंतप्रधान मराठी नसावेत असे उत्तर देण्यासाठी !!!....