उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
विदेशी फोन नंबर बाबत
मंदार कात्रे
November 11, 2012 - 12:10 pm
मध्यंतरी सरकारने + २४३, +१२०......,unknown numbers ,blank calls ना प्रत्युत्तर देवू नये ,किंवा ते फोन रिसीव्ह करू नयेत ,असे जाहीर आवाहन केलेले होते. पण यात मेख अशी आहे कि, ज्यांचे आप्त ,नातेवाईक,मित्र परदेशी व विशेषत: गल्फ मध्ये असतात ,अशा लोकांना वर उल्लेख केल्या सारख्या नंबर वरून सतत फोन येतात कारण ते परदेशी असलेले नातेवाईक voip सेवा वापरून call करत असतात . voip call करताना भारतातल्या फोन नंबरवर विचित्र नंबर येणे अगदी स्वाभाविक आहे .
काही परदेशी कंपन्यासुद्धा voip चा वापर करून telephonic interview घेतात .
यास्तव सगळेच विचित्र नंबर fraud नसतात ,हे लक्ष्यात घ्यावे. धन्यवाद.
दुवे:
Comments
काय करावं ते कळत नसणार अश्या दूरध्वनींबद्दल
घेऊच नयेत असे calls. गरज असणारा व्यवस्थित आधी कळवेल, वेळ ठरवेल आणी मग बोलेल.