मरअथी मधे कसे लिहावे?

ह्यअ वेब्साइत वर लिहिने अवदे अवघद आहे कि त्यपेक्शअ फेस्बूक किव्व त्वीतर परवदले.

म्हनजे आपन जसे मरथि चित्रपत पहयलआ जआतना कआहि अपेक्शअ थेवत नहि तसेच मरथि वेब्साएत कदून काहिच अपेक्श थेउ नअयेत.

गूगल चे एक चन्गले सोफ्त्वरे आहे मरथि, हिन्दि आनि तत्सम देव्नअगरि लिपि असनार्य भाशन्सथि....क्रुपया ते वापर...मि तर म्हनेल कि ते copy paste कर...

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली कल्पना आहे

जर तुम्हाला गूगल, फेसबुक वरील सुविधा सोयीस्कर वाटत असतील, तर तिथे लिहून मग इथे चिकटण्याची कल्पना चांगली आहे.

गूगलवरती लिप्यंतर टंकन सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा गमभन वगैरे लिप्यंतरकांचा उदय झाला. सवयीमुळे मला गमभन, बरह वगैरे सोयीचे मार्ग वाटतात. आजही गूगल लिप्यंतरण प्रणालीत ज्ञ कसा टंकायचे, ते मला लक्षात राहात नाही. माझ्यासारख्यांच्या सोयीकरिता मराठी संकेतस्थळांवर गमभन-पद्धतीची खिडकी कायम असू द्यावी.

थोडे तरी शुद्ध लिहा

काय भयंकर लिहिले आहे ह्या मरठी माणसानी!!!!

अगदी बरोबर !

इतके अवघड अजिबात नाहिये हे !

’उपक्रम’च्या नव्या मराठी टंकनसुविधेविषयी

’उपक्रम’च्या नव्या मराठी टंकनसुविधेविषयी मलाहि समाधान नाही.

एक चूक दुरुस्त करण्याची वेळ आली तर ते करतांना शब्द पुढेमागे विचित्ररीत्या जोडला जातो आणि नव्या चुका तयार होतात. त्या दुरुस्त करायला जावे तर आणखी नव्या चुका होतात. असे का होते?

हा मजकूर मी ’बराहा’ मध्ये निर्माण करून मी येथे चिकटविला आहे.

एक शंका. ह्या नव्या सुविधेत ’र्‍या’ कसे लिहावे - उदा. ’करणार्‍या’.

?

मला तर नव्या व्यवस्थेत काहीच फरक वाटला नाही.

उलट शेवटचा अ टंकावा लागत नाही आणि अ‍ॅ व्यवस्थित लिहिता येतो हे फायदेच दिसले.

RyA / Ryaa = र्‍या

कदाचित

काही ब्राऊज़रांवर बॅकस्पेस दिल्यावर गमभन गंडते आणि लिहिलेली अक्षरे एकमेकांना जोडली जातात असे वाटते.

ऱ्या

ऱ्या/ र्‍या दोन्हीपैकी कोणता तुम्हाला योग्य दिसत आहे. (तुम्ही योगेश फॉन्ट वापरत असाल तर पहिला बरोबर दिसेल. मंगल वापरत असाल तर दुसरा)

इनस्क्रिप्ट

मराठीमध्ये लिहिण्यासाठी इनस्क्रिप्ट हा सर्वात सोपा पर्याय आहे. ऑपरेटिंग सिस्टम, ब्राऊजर वगैरे कोणत्याही भानगडींचा त्रास होत नाही. सुरुवातीला बटणे लक्षात ठेवण्यापुरता आठवडाभर त्रास होतो. मात्र अतिशय वेगवान टंकलेखन करता येते. गमभन/बरहाच्या तुलनेत 40 टक्के बटणे कमी दाबावी लागतात.

१०० टक्के सहमत

मराठीमध्ये लिहिण्यासाठी इनस्क्रिप्ट हा सर्वात सोपा पर्याय आहे.

वरील मताशी १०० टक्के सहमत.

हे पाहा

दोन वेगळ्या ब्राऊजरमध्ये ऱ्या /र्‍या कसे वेगळे दिसते ते.

योगेश

योगेश वापरुन सुद्धा र्‍या मंगलचा का येतो आहे?

कुठे येतो आहे?

कुठे येतो आहे?

फायरफॉक्स

फायरफॉक्स

गुगल वापरून लिहिलेला मजकूर - तो पण ३ मिनिटात...

मला मराठी चांगले येते...पण उपक्रम वर लिहायचे म्हणजे परत एकदा शाळेत गेल्यासारखे वाटते.

एका मिनिटात

उपक्रमावर टंकलेला मजकूर- एका मिनिटात.
उपक्रम आणि मिपाच्या गमभनमध्येच पहिल्यांदा मराठी टंकन केले. कधीच अडचण वाटली नाही

माझी टंक लेखन पद्धत

मी http://marathi.changathi.com/ ही site वापरतो. कोणत्याही मराठी शब्दाचे त्याच्या उच्चाराप्रमाणे इंग्रजीत स्पेलिंग लिहिल्यानंतर शब्द मराठीत प्रकट होतो. ब्याक्स्पेस वापरल्यावर त्या शब्दाचे पर्यायी शब्द प्रकट होतात आणि त्यांच्यापैकी आपल्याला जास्त योग्य वाटणारा शब्द आधीच्या शब्दाच्या जागी आपण वापरू शकतो.
मसुदा तयार झाल्यांनतर तो कॉपी पेस्ट करून कुठेही वापरू शकतो. हा मजकूर असाच लिहिला आहे.

इनस्क्रिप्ट हा एक चांगला पर्याय आहे.

येथे भेट द्या.

बरहा

तसं पाहता इथे सुद्धा टायपिंग वगैरे साठी काहीच त्रास झालेला नाहीये. आणी अगदी दुसरी सर्वीस हवीच असेल तर बरहा काय वाईट ?

 
^ वर