संशोधन आणि बंदी

cannabis for peace या संस्थेचे एक पत्रक नुकतेच वाचनात आले. त्यात cannabis च्या औषधी गुणधर्मा बाबत सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली होती. मग उत्सुकता चाळवली म्हणून युट्युब वर cannabis सर्च केले ,तर एकापेक्षा एक नामवंत डॉक्टर cannabis च्या औषधी गुणधर्माची भलामण करताना दिसले.

जगभरात अनेक देशात cannabis वर बंदी आहे. भारतात "भांग "नावाचा प्रकार उत्तर भारतात सर्रास सर्वत्र उपलब्ध असतो, त्याला कायद्याने परवानगी आहे,म्हणजे दारू दुकानांचे जसे परवाने दिले जातात तसे भांगेच्या ठेक्यांचे परवाने दिले जातात. पण तिकडे भांग किंवा cannabis औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते .

मला युट्युब व्हिडीओ आणि नेत वरून जी माहिती मिळाली ती खालीलप्रमाणे-

१. cannabisच्या सेवनामुळे मेंदूला झालेल्या जखमा भरून येतात .

२.cancer cells नां cannabis निष्क्रिय /अचेतन करते

३. आध्यात्मिक साधना करणाऱ्या /करू इच्छिणाऱ्या मंडळीना meditation booster म्हणून cannabis उपयोगी पडते.

४.मेंदूचे अनेक अज्ञात कप्पे cannabis खोलते. (शास्त्रज्ञांच्या मते सामान्य मनुष्य मेंदूच्या एकूण शक्तींपैकी फक्त १०% शक्ती वापरत असतो.) दिमाग की बत्ती जलादे cannabis

५.बर्याच psyco-somatic & psychic disease वर cannabis उत्तम गुणकारी औषध ठरू शकते.

cannabis चे तोटे व धोके -

१. habitual आहे ,व्यसन लागू शकते,जे धोकादायक आहे.

२.हृदय-विकाराच्या रोग्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. कारण cannabisच्या सेवना नंतर रक्तदाब वाढतो,triglycerides ची level वाढते. ज्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कितीतरी वाढते.

cannabis मधील THC मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ,मेंदूतील neurotransmitters चे योग्य व्यवस्थापन करणारी THC एक चावी आहे ,असे म्हटले जाते. परंतु १८-१९ व्या शतकात अमेरिकेत cannabis खावून लोक वेडे /माथेफिरू /हल्लेखोर होतात ,अशा अफवा पद्धतशीरपणे पसरवून cannabis वर बंदी आणली गेली ,आणि जगभर ती बंदी तशीच आहे,त्यामुळे cannabis च्या औषधी गुणधर्मा कडे दुर्लक्ष झाले व होत आहे.

cannabis hemp पासून उत्तम प्रतीचा कागद बनतो. त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केल्यास कागदासाठी झाडे तोडावी लागणार नाहीत ,hemp oil पासून उत्तम प्रतीचे इथेनॉल मुबलक प्रमाणात मिळते. तो इंधनाचा पर्यायी स्रोत ठरू शकतो.cannabis चे झाड अधिक प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून पर्यावरण शुद्ध करते .
दारू व तंबाखू हे cannabis पेक्षा अधिक घातक असताना cannabis वर बंदी का?

cannabis वरील बंदी ही अज्ञान पूर्वक व हेतू-पुरस्सर आणलेली आहे .आज २१ व्या शतकात cannabis च्या औषधी गुणधर्मा ची व पर्यावरण पूरक उपयोगाची संधी असताना या बंदीमुळे मानवजातीचे प्रचंड नुकसान होत आहे .तरी शास्त्रज्ञानी अधिकाधिक सखोल संशोधन करून cannabis चा खरा उपयोग जगापुढे आणावा , अशी या संस्थेची विनंती आहे..

(आंतरजाला वरून साभार - मित्रवर्य रमेश भिडे यांच्या पूर्वानुमती ने प्रकाशित )

लेखनविषय: दुवे:

Comments

बमभोले

कुणी गांजा पहिल्यांदाच गांजा, अफू आदींचे सेवन करायला जात असल्यास सोबतीस एखादा ट्रिपम्यानेजर असणे उत्तम असे एका अनुभवी गांजाप्रेमी डॉक्टराने एकेकाळी सांगितले होते. उंचचउंच उडणे, शरीराच्या अस्तित्वाची जाणीव नष्ट होणे वगैरे वगैरे मजेदार गोष्टी गांजा घेतल्यानंतर होतात. ह्यालाचा बहुधा मेंदूचे बंद कप्पे उघडणे वगैरे म्हणत असावेत :)

बाकी नेदरलॅन्डमध्ये वगैरे गांज्याचे जॉइन्ट आहेत ना. असो. आपल्याकडची परंपरा बघता गांजा तेवढा धोकादायक वाटत नाही.

ह्यावरून आठवले की कांद्याच्या शेतात अफूचे आंतरपीक घेत असतात. उदा. http://www.esakal.com/esakal/20120307/4694798762282717295.htm

तूर्तास घाईत एवढेच.

औषध आणि अतिसेवन

मानसिक आजारावर दिली जाणारी बरीचशी औषधे अफ़ू पासून बनवली जातात.

औषधी गुण आहेत म्हणून त्याचा मुक्त लागवड/व्यापार होऊ द्यावा हे म्हणणे योग्य नसावे. त्याचे दुष्परिणाम खूपच भयंकर (विशेषत: हॅबिट फॉर्मिंग असणे) असल्याने बंदी असावी.

अतिअवांतर: कांदा आणि लसूण यांच्यातसुद्धा खूप आरोग्यदायी औषधी गुण असतात. (आणि दुष्परिणाम बहुधा तोंडाला वास येणे याखेरीज काहीच नसावा) तरी एकेकाळी त्याच्या सेवनावर धार्मिक बंदी होती. अजूनही काही लोक ती पाळतात. लोकांचे आरोग्य चांगले राहू नये अशी धर्ममार्तंडांची इच्छा असावी का?

अफू

मानसिक आजारावर दिली जाणारी बरीचशी औषधे अफ़ू पासून बनवली जातात.

कुठली बरे? आधुनिक वैद्यकशास्त्रात अफूपासून बनवलेली तीव्र वेदनाशमन करणारी औषधे वापरली जातात. मानसिक आजारावर दिली जाणारी कोणती?

गैरसमज

मानसिक आजारांवर देण्यात येणाऱ्या काही औषधांमध्ये अफूचा समावेश काही दशकांपूर्वी असे. मात्र मानसिक उपचारांतील आधुनिक औषधांमध्ये अफूचा समावेश नसतो.

+

माहितीबद्दल धन्यवाद. धनंजय किंवा निखिल जोशी अधिक प्रकाश टाकू शकतील.

त्या औषधांतील काही घटक (आज) अफूपासून बनवत नसतील.

म्हणजे?

धनंजय यांच्या कामाच्या स्वरुपाबाबत कल्पना आहे.

मात्र

निखिल जोशी अधिक प्रकाश टाकू शकतील.

निखिल जोशी यांचा अफूचा व्यवसाय आहे काय?

प्रमाण

दारु एका विशिष्ट प्रमाणाबाहेर घेतली की घेणार्‍याला ड्रायविंग वगैरे करण्यास बंदी असते कारण तो स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू शकतो. भांग किती प्रमाणात घेतल्यावर हा प्रकार होईल याची कल्पना नाही.

काही प्रीस्क्रिपश्न पेन किलिंग औषधांचे व्यसन लागण्याची शक्यता असल्याने त्यांना काउंटरवर विकता येत नाही. त्याचा परवाना असावा लागतो, काढावा लागतो. भांग या प्रकारातील असावी.

अवांतर:


कांदा आणि लसूण यांच्यातसुद्धा खूप आरोग्यदायी औषधी गुण असतात. (आणि दुष्परिणाम बहुधा तोंडाला वास येणे याखेरीज काहीच नसावा) तरी एकेकाळी त्याच्या सेवनावर धार्मिक बंदी होती. अजूनही काही लोक ती पाळतात. लोकांचे आरोग्य चांगले राहू नये अशी धर्ममार्तंडांची इच्छा असावी का?

पूर्वी बहुधा कांदा-लसूण मुबलक घातलेले जेवण भरपेट जेवून धर्ममार्तंड मंडळी एकमेकांशेजारी घनगंभीर चर्चा करायला जवळजवळ बसत असतील. त्यामुळे ही बंदी अस्तित्वात आली असेल... ;-) एक शक्यता हो.

बंदी

बंदी ही सापेक्ष आहे. थोडे विषयाला सोडून आहे. पण चीनमध्ये गुगल सर्च, जीमेल, फेसबुक आणि ब्लॉग्सवर जवळपास बंदीच आहे. त्यामागे काही तरी हेतु आहेच. पण सर्वत्र बंदी नाही. चीनमधल्या बंदीने त्यांची स्वतःची अशी काही उत्पादने जास्त चालतात. त्यामुळे असे अनुमान काढता येते की कोणत्याही गोष्टीवरची बंदी हि सापेक्ष आहे. गरज पडल्यास नियम/कायदे बदलले जातातच.

वेगळा विषय

विषय उत्तम आहे. गांजाच्या संशोधनावर किती मर्यादा असाव्यात ह्यावर परवाच एनपीआर ह्या अमेरिकन रेडियोवर वाद ऐकला. त्यामधे गांजावर संशोधन केलेल्या डॉ़क्टरने सांगितलेली अडचण अशी होती की अमेरिकेत गांजावर संशोधन करायला गांजा मिळवण्यासाठी एका विशिष्ठ संस्थेकडूनच तो घ्यावा लागतो. त्या संस्थेची अट आहे की हा गांजा दुष्परीणामांवर संशोधन करण्यापुरताच वापरला जावा त्यामुळे गांजाच्या उपयुक्ततेवर संशोधन करणे अशक्य झाले आहे.

धन्यवाद

धन्यवाद चाणक्य आनि वैद्य जी ...अधिक खुल्या मनाने याव्र चर्चा आणि सन्शोधन अपेक्षित आहे .....................!

 
^ वर