उघडझाप करता येण्याजोगे प्रतिसाद,

आदरणीय उपक्रम काका,

अलिकडे उपक्रमावरचे काही लेख/चर्चा यांना येणारे प्रतिसाद/उपप्रतिसाद हे संख्येने खूपच असतात. त्यामुळे नंतर नंतर येणारे प्रतिसाद शोधण्याकरता त्रास होतो. 'त्या तिथे पलिकडे..तिकडे!' आमचं पहिलं प्रेम असणार्‍या संस्थळावर जशी प्रतिसादांची उघडझाप करता येते तशी तांत्रिक सोय इथेही नाही का करता येणार?

तसे झाल्यास प्रतिसादांची शोधाशोध करावी लागणार नाही व ते वाचणे सुलभ/सुकर होईल.

उपक्रमी सदस्यांनो,

वरील प्रस्तावात जे म्हणणे आम्ही मांडले आहे तसेच आपलेही म्हणणे असल्यास कृपया या प्रस्तावावर 'सहमत आहे' अशी प्रतिसादात्मक सही करा! ;)

आपण मंडळींनी चालवलेली ही सह्यांची मोहीम आपल्या फायद्याची ठरेल असे आम्हाला वाटते!

आपला,

सही/-

तात्या अभ्यंकर,
बिल्ला क्रमांक - ४७

लेखनविषय: दुवे:

Comments

उघडत नाहीत ना पण!

मान्य आहे हो पण,
'तिकडचे' प्रतिसाद उघडत नाहीत ना पण कधी कधी!
त्यापेक्षा नको ती उघडझाप असे होते...
त्यपेक्षा सुरवातीला एक अनुक्रमणीका द्या. तीआअपोआप अपडेट राहु शकेल आणी योग्य त्या प्रतिसादावर चटकन जाता पण येइल.

आपला
गुंडोपंत
बिल्ला नं ४८

अवांतर..

गुंड्याभाऊ,

आपला
गुंडोपंत
बिल्ला नं ४८

अरे चुकतो आहेस तू. तुझा बिल्ला क्रमांक ४८ नसून १०४ आहे!

हा बघ! ;)

http://mr.upakram.org/user/104

आपला,
http://mr.upakram.org/user/47 ;)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

स्वारी

तात्याबा स्वारी बरं का!
आतापत्तुर आपल्या लश्क्यातच आल् नाय बॉ...
आत्ता आलं तवा १०४ जिंदाबाद!
हाप्ला
येडा येंधळा
गुंड्या

सहमत

प्रतिसाद उघडझाप करणारे असणे चांगले असे मलाही वाटते.

सहमत

आहे.

सहमत

आहे.

उपक्रमराव, पहा जमतंय का ते...

तात्या, तुम्ही सुचवलेल्या उपायापेक्षा ती सोय सदस्यच ठरवू शकतात. सदस्यांच्या इच्छेनुसार ते setting करू शकतील.
पहा: www.sureshbhat.in
उपक्रमराव, पहा जमतंय का ते...

सहमत

सहमत

रम्या

सहेमत.

मै सहेमत हू.तात्या के विचारधारोसे.

आपकी,
सोनिया फ्रॉम इटली.

सहमत.

उघडझाप असणारे प्रतिसाद आवश्यकच, सहमत आहे.
उपक्रमपंत,पहा राव जमत असेल तर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे मत

युयुत्सु म्हणतात ते बरोबर आहे. उघडझाप ऐवजी, प्रतिसादांच्या संखेला प्रतिबंध घाला. जर एका चर्चेला/लेखाला ५० प्रतिसादच देता आले तर् आणखीन प्रतिसाद देण्यासाठी मुळ लेखनाचा दुवा देउन त्याचा भाग २ सुरू करावा. जे युयुत्सु यांनी केले. पण प्रतिसादांची संख्या प्रतिबंधित नसल्याने पाने वाढत जातात आणि मग चर्चा थोडी कंटाळवाणी होऊ लागते.





मराठीत लिहा. वापरा.

सहमत

सहमत.माझ्या माहितीप्रमाणे असे करणे फारसे अवघड नसावे. तसेच असे करणे हे एखाद्या क्रॉन (मराठी शब्द?) जॉब सारखे असावे.





मराठीत लिहा. वापरा.

ते देणार नाहीत! ;)

मनोगताच्या प्रशासकांकडून ह्याअ सुविधेविषयी उपक्रमाच्या व्यवस्थापनाने माहिती मिळवावी, ही विनंती.

हो, पण ते माहिती देणार नाहीत! ;)

उडिबाबा उडिबाबा उडिबाबा! ;)

आपला,
(आत्ताचा उपक्रमी आणि मायबोलीकर, पण मूळचा मात्र मनोगतीच!) तात्या.

मनोगत

मनोगतावरच कशाला घोडं अडत? हे सुविधा ड्रुपलची आहे. ड्रुपलच्या संस्थवर या बद्दल नक्किच आणि बरिच माहिती मिळेल.





मराठीत लिहा. वापरा.

हेच..

हे सुविधा ड्रुपलची आहे. ड्रुपलच्या संस्थवर या बद्दल नक्किच आणि बरिच माहिती मिळेल.

हेच म्हणू पाहतो.

अहो शेवटी कुणाच्याही कोंबड्याने का होईना, उजाडल्याशी कारण!

कारण संख्येने जास्त असलेल्या प्रतिसादांतून नवे नवे प्रतिसाद शोधायला खरंच त्रास होतो आहे.

मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाचे आणि परस्परांवर किंवा इतर सदस्यांवर अनावश्यक टिप्पणी करणारे लेखन करू नये. या आणि अश्या इतर सूचनांचे जाणीवपूर्वक पालन करून कृपया सहकार्य करावे.

तात्या.

सही

मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाचे आणि परस्परांवर किंवा इतर सदस्यांवर अनावश्यक टिप्पणी करणारे लेखन करू नये. या आणि अश्या इतर सूचनांचे जाणीवपूर्वक पालन करून कृपया सहकार्य करावे.
हे सही... हेच तर मी पण म्हणतोय!

पाहिजे तसे

सुरेशभट डॉट इन या संस्थळावरील 'ज्याला जसे प्रतिसाद दिसायला पाहिजेत तो पर्याय निवडा' सोय चांगली आहे. पण ती करणे जास्त वेळखाऊ आणि किचकट असेल असे वाटते.

ती माहिती मिळू शकेल

उपक्रमराव आणि आपल्या सर्वांचे एक जुने स्नेहीच सुरेश भट.इन चे अध्वर्यु आहेत.
त्यामुळे त्यांनी ते कसे केले याची माहिती हवे असल्यास आणि उपक्रमरावांनी मागणी केल्यास ते देऊ शकतील असे वाटते.
(हे जरा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र होते आहे, हे मान्य आहे. सुरेशभट.इन च्या विश्वस्त साहेबांची अगोदरच माफी मागतो.)

ड्रुपल आणि प्रतिसाद

१. लेखाचे प्रतिसाद वाचन मात्र ठेवता येतात.
२. एका पानावर किती प्रतिसाद हे ठरवता येते.
३. सर्वात नवा प्रतिसाद पहिला का सर्वात जुना हे ठरवता येते.
असो, प्रतिसादांच्या समस्येवर उपाय करता येउ शकतो...





मराठीत लिहा. वापरा.

उपक्रम सेठ काय म्हणतात.

उपक्रम ला असा बदल करायची इच्छा आहे का ? ते काहीच का बोलत नाहीत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला उघडे प्रतिसाद आवडतात.

मला उघडे प्रतिसाद आवडतात.

पण तात्या म्हणतात त्या प्रमाणे दोन पाने प्रतिसाद झाले की मात्र त्रास होतो. पान क्र्. दोन वरील प्रतिसाद नवा असेल तर पान एक वर आपण येवून पोहोचतो आणि पान दोन व´रिल प्रतिसाद त्याला असलेले नवीन हे बिरुद हरवून बसतो. आणि मग शोधशोध करत बसावे लागते. त्यामूळे ते बिरुद तसेच टिकावे आणि ववीन प्रतिसाद पाहण्यासाठी त्याच प्रतिसादाचवर न्याहळकाने घेवून जावे असे काही करावे अशी विनंती.
--लिखाळ.

साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) - (सखाराम गटणे- पुल.)

प्रतिसाद - धोरण आणि तंत्र

मिटलेले आणि उघडलेले प्रतिसाद या दोन्हींचे काही फायदे तोटे आहेत. प्रतिसाद कसे दाखवायचे (मिटलेले की उघडलेले) हे ठरवण्याची सोय ड्रुपलमध्ये आहे. उपक्रमवर आपोआप उघडलेले प्रतिसाद असावेत असे ठरवण्यामागे पुढील कारणे आहेत.

१. चर्चेमध्ये किंवा लेखाला येणारे प्रतिसाद बर्‍याचदा अधिक/विशेष माहिती देणारे असतात. प्रतिसाद जर उघडलेले असतील तर ते आपोआप वाचले जातात.
२. एखाद्या चर्चेत/लेखावर खूपसे प्रतिसाद आले असतील तर एकेक प्रतिसाद उघडत बसणे वाचकांसाठी कंटाळवाणे होऊ शकते.
३. मिटलेले प्रतिसाद उघडण्याच्या क्रियेमुळे सेवादात्यावर अतिरिक्त भार पडेल आणि यातायात वाढेल असा कयास आहे.

जेंव्हा ५० पेक्षा अधिक प्रतिसाद होतात तेंव्हा पुढील प्रतिसाद दुसर्‍या पानावर जातात आणि प्रतिसादाच्या दुव्याने तिथे थेट जाता येत नाही असे निदर्शनास आले आहे. पण ही ड्रुपलची ज्ञात त्रुटी (नोन बग) आहे. जी बहुतेक ड्रुपलच्या पुढच्या आवृत्तीत ठीक केली जाईल.

प्रतिसादांची संख्या मर्यादित करण्यासाठी ड्रुपलच्या कॉमेंट मोड्यूलमध्ये बदल करावे लागतील याकामी पीएचपीमधील जाणकारांनी काही सुचवण्या केल्यास त्यांचे स्वागत आहे.

सहमत

उपक्रमराव,
आपल्या उत्तरासाठी आभार.

१. चर्चेमध्ये किंवा लेखाला येणारे प्रतिसाद बर्‍याचदा अधिक/विशेष माहिती देणारे असतात. प्रतिसाद जर उघडलेले असतील तर ते आपोआप वाचले जातात.
२. एखाद्या चर्चेत/लेखावर खूपसे प्रतिसाद आले असतील तर एकेक प्रतिसाद उघडत बसणे वाचकांसाठी कंटाळवाणे होऊ शकते.

होय माझ्या बाबतीत हे अगदी खरे आहे.

दुसर्‍या पानावर जातात आणि प्रतिसादाच्या दुव्याने तिथे थेट जाता येत नाही असे निदर्शनास आले आहे.

होय याचा फार त्रास होतो.

जी बहुतेक ड्रुपलच्या पुढच्या आवृत्तीत ठीक केली जाईल.
छान.

--लिखाळ.

साहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे- पुल.)

कमेंट क्लोजर व कमेंट आर एस एस

संपादकांच्या " उपक्रमवर आपोआप उघडलेले प्रतिसाद असावेत. " या मताशी मी पूर्ण सहमत आहे.
मात्र खूप जुन्या चर्चांना प्रतिसाद देता येणार नाही अशी सोय करणाऱ्या "Comment Closer" (कमेंट क्लोजर), तसेच फक्त प्रतिसादांचा आर एस एस फीड प्रसवणाऱ्या "Comment RSS" (कमेंट आर एस एस) या दोन मॉड्यूल्सचा विचार व्हावा ही विनंती.

 
^ वर