तातडीने मदत हवी आहे

मला टाटाडोकोमोच्या सेवेतील त्रुटीची तक्रार करायची आहे.

माझा प्रीपेड मोबाइल क्रमांक मी १४ मे २०१२ ला आयडिया मधून टाटाडोकोमो मध्ये MNP द्वारे वाहून नेला. त्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता करूनही मी उत्तर भारतात गेलेलो असताना माझी सेवा २२ जून २०१२ ला अपूर्ण कागदपत्रांचे कारण देऊन बंद करण्यात आली. यासंदर्भात मी listen@tatadocomo.com आणि appellate.ap@tatadocomo.com यांना याआधी मेल लिहिले पण काही उपयोग झाला नाही. मोबाइल कंपन्यांच्या वाईट सेवांबद्धल यापूर्वी झालेली चर्चा वाचल्याचे स्मरते पण नेमका दुवा मिळत नाहीय.

मला खालील बाबींवर तातडीने मदत/ माहिती हवी आहे.

  1. संबंधित कंपनीने समस्या सोडवली नाही तर पुढे कोणाकडे तक्रार करावी?
  2. ट्राय (TRAI) किंवा इतर सरकारी संस्था कितपत सक्षम आहेत?
  3. ग्राहक न्यायालयात जावे का?
  4. संबंधित दुवे आणि विरोपाचे पत्ते
  5. इतर उपयुक्त माहिती

आंध्रप्रदेश टाटाडोकोमोमध्ये कुणी सेवेत असल्यास मदत होईल का?

-वामन देशमुख, हैदराबाद

लेखनविषय: दुवे:

Comments

:(

सरकारी सेवेत असे झाले तर तुम्हाला ओरडायला एक ऑफीस नामक जागा असते. खाजगी सेवांची ऑफीसच नसतात कॉलसेंटर असतात तिथे तुमचा कोणताच प्रश्न सुटत नाही.

नितिन थत्ते

सार्वजनिक नळावर नडा

टाटा डोकोमोच्या मॅनेजमेंट टीमला लिंक्ड-इन/फेसबूक वर फॉलो करा...त्यांना त्रास झाला की तुमचा त्रास कमी होईल अशी आशा करुयात.

आभार

मदत करणाऱ्यांचे आभार. माझ्या फोनची सेवा आठ दिवसांनंतर आज सुरु झाली आहे. appellate.ap@tatadocomo.com येथील अधिकाऱ्यांनी मला मदत केली.
संपादकांनी हा धागा उडविल्यास माझी हरकत नाही.

वामन देशमुख,

या इथे विशाल तरुतळी, सुरई एक सुरेची, खावया भाकरी अन् वही कवितेची!

 
^ वर