शूट आउट@लोखंडवाला.

मूंबैला,ब-याच वर्षापासून भाइगिरी,आणि टोळी युद्धानं ग्रासले आहे.इथे चित्रपट कलाकार,बिल्डर्,नेते, हे एकमेकात इतके गूंतुन गेले आहे.की कधीतरी मानसं किती बेइमान असतात ते ध्यानात येतं. पण् माझी मूंबई म्हणत डोक्यावर् गणपती मिरवत् देहभान् हरवून नाचना-मराठी मानसाला,अन् मुंबै करला गूंडगिरी माहित् नाय.अस्स नाय होउ शकत्.तो अनुभव शूट आउट@लोखंडवाला मधे दिस्तोच्.गूंडगीरी कोणी पोसली.पोलीसांनी,नेत्यांनी,मूंबैकर म्हणून मी.शेवटी माझ्या घरा समोर हातात एके५६ वाला गूंड असला पाहिजे का?पोलीस् ?की दोन्ही सारखेच.सोचना क्या है,बोलो,लिखो.
(माहितीचा मूळ स्रोत चित्रपट:-शूट आउट@लोखंडवाला)

लेखनविषय: दुवे:

Comments

जरा...

नमस्कार एकता कपुर बाई,
(आपल्या सिरियल्स च टि. आर. पी गेल्यामुळे वेळ घालवायला इकडे आलात की काय ;) )
आपल्याला निरनिराळ्या चमत्कारीक नावांनी चर्चा करायला आवडते असे दिसतेय. पण असे लेखन येथे आणण्यापुर्वी जरा शुद्धलेखनपण तपासून पाहत जा. मी अगदी प्रत्येकच शब्द शुद्धच असला पाहिजे असा आग्रह धरणार नाही. (माझेही अनेकदा नसते!) पण काही किमान निकष तरी आपण पाळलेच पाहिजेत आपले लेखन हे वाचण्यायोग्य आहे हे पहावे.
या साठी आपण गमभन शु.चि. वापरु शकता. याचा दुवा अनु यांच्या सही मध्ये आहे. त्याचा वापर करा. शिवाय आपंण मनोगत डॉट कॉम या स्थळावरही असलेल्या शु.चि. चा वापर करु शकता.
आपले लेखन चारचौघात वाचण्यायोग्य असले की आपोआपच आपल्या लेखनालाही प्रतिसाद येऊ लागतील. (असं वाटतं!)
माहितीचा संदर्भ आपण देत अहात ही एक उत्तम गोष्ट आहे. परंतु हा माहितीचा स्रोत 'मुळ' कसा काय आहे बुवा? तुम्हाला चित्रपट चर्चेच्या विषयाचा स्रोत असे म्हणायचे आहे का?

बाकी विषय लय भारी बर्का! अन् पिच्चर बी लय् भारीये!

आपला
(स्थळ स्थळ की कहानी वाला)
गुंडोपंत

गूंड्याभाय.

गूंड्याभाय,
तुम सही बोलता,ये फट्टु है ना, इसको बोला था आपून, आपूनका लेख शुद्धलेखन गमभ मे डालके फिर चिपकाना,तो क्या बोला मालूम है,माया भाय टेन्शन नही लेनेका ! उधर अपने भाई लोग है ! कोयी कूछ नही बोलेगा ! करके वैसा हूआ यार.

डोक्याची वाट लागली रे !!

शूट आउट@लोखंडवाला
काय पिक्चर आहे काय हा?
नुसतं धाड धाड, ह्याला गोळ्या, त्याला गोळया...
डोक्याची पार भजी होऊन गेली!!

संजय दत्त कर्तव्यदक्ष पोलिसाच्या भुमिकेत? तिथेच त्या सिनेमाचं पार वाटोळं झालं ! त्यापेक्षा त्यालाच 'माया'च्या भुमिकेसाठी घेतलं पाहिजे होतं! अशीच भुमिका त्याला शोभून दिसेल!

आणि तो तुषार कपूर! च्यायला याच्यासारख्या मख्ख चेहर्‍याच्या माणसाला कलाकार म्हणून कोणी घेतलं रे? 'गोलमाल' मध्ये मुक्याची भुमिका जरा त्याला शोभून दिसली होती.

सुनील शेट्टी सहनेबल आहे.

विवेक ओबेरॉय मायाच्या भुमिकेत? काय जमलं नाय बुवा! हिरोईनीच्या मागे फिरणारा टपोरी युवक म्हणुन तो ठीक आहे. 'साथीया' मध्ये ठीक वाटला.

'माया'च्या आईची भुमिका कोणी केली तिचं नाव माहीत नाही. जुनी नायिका आहे एवढं माहीत आहे. पण तिचंही छोटसं काम ठीक आहे.

'ए गणपत..' गाणं जरा ठीक वाटलं. बाकी गाण्यांबददल काय बोलायचं?

त्यातल्या त्यात अमितभ बच्चनची छोटीशी भुमिका फार छान वाटली.
सिनेमाच्या सुरवातीला अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि सुनिल शेट्टीचा संवाद छान जमलाय. संवादामधून चालणारे प्रसंग छान आहेत. लक्षात राहण्यासारखा तो एकच प्रसंग.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्लॅक फ्रायडे'च्या पार्श्वभुमीवर 'शुट आउट' कढून फार अपेक्षा होत्या.
त्या सगळ्या अपेक्षांचं शुट आऊट झालं हो!

अर्थात ही माझी वैयक्तिक मतं झाली.

रम्या

चिनी कम..

अरे 'चिनी कम' हा चित्रपट कुणी पाहिला आहे का?

या चित्रपटात आम्ही जिच्यावर मनापासून प्रेम करतो ती 'तब्बू' ही अभिनेत्री असल्यामुळे हा चित्रपट पाहायची आम्हाला फार उत्सुकता लागून राहिली आहे. कुणी हा चित्रपट पाहिला असेल तर त्याचे परिक्षण इथे अवश्य लिहा, ही विनंती!

आपला,
(तब्बू प्रेमी) तात्या.

तब्बूवर प्रेम?

या चित्रपटात आम्ही जिच्यावर मनापासून प्रेम करतो ती 'तब्बू' ही अभिनेत्री असल्यामुळे हा चित्रपट पाहायची आम्हाला फार उत्सुकता लागून राहिली आहे.

अहो तात्या, तब्बू प्रेम करायच्या वयाची राहीली नाही आहे हो!

(प्रियांका शेट्टी प्रेमी) रम्या

लेका,

रम्या लेका,

अरे ३५ प्लस वयातली प्रेम करण्याची चव तुला काय माहिती? ;)

असो, तू अजून लहान आहेस, नाहीतर असं बोलला नसतास! ;)

आपला,
(अविवाहीत परंतु मॅच्युअर्ड प्रेमी!) तात्या.

असं म्हणता?

अरे ३५ प्लस वयातली प्रेम करण्याची चव तुला काय माहिती?

असं म्हणता तात्या,
तर मग ठीक आहे. ३५ प्लस कुठे असेल आमच्या विभागात तर प्रयत्न करून पाहतो ! :०)

मार्गदर्शनासाठी धन्यवाद
(३५ प्लस प्रेमी) रम्या

चिनी कम

तात्या,
तुम्हाला `वर्ज्य' असलेल्या `म'वर सन्जोप राव यांनी लिहिलेलं वाचा. http://www.manogat.com/node/10419 हा दुवा.

 
^ वर