मनोरंजन, प्रसारमाध्यमे ....

सेट टॉप बॉक्स वापरून स्थानिक केबलवाल्याकडून किंवा निवडक कंपनीकडून (उदा. टाटा स्काय, एअरटेल, विडीओकॉन, इ.) विविध मनोरंजनात्मक चॅनल्सचे प्रसारण पाहाता येईल असे बातम्यांमधून समजले. परंतु कोणता पर्याय निवडावा, त्याचे फायदे-तोटे काय? कंपन्यांकडून होणारी फसवणूक वगैरे; ह्याबाबतीत अनेकांच्या मनात साशंकता आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

जवळपास सारखेच

सगळ्यां कंपन्यांच्या ऑफरी जवळपास सारख्याच आहेत. उदा., टाटा स्कायच्या साध्या सेवांसाठीचा (एचडी आणि एचडी + नव्हे) सेट्टॉप बॉक्स जवळपास पंधराशे रुपयांत मिळतो. ऑनलाइन ऑर्डर दिल्यास आणखी शंभर दीडशे रुपये स्वस्त. च्यानेल्जचे बेसिक पॅकेज 180 रुपये (उदा. धमाल मिक्स + दोन रीजनल प्याकेज फुकट) आणि इतर च्यानेल घ्याल तसे.

स्थानिक केबलवाले (हॅथवे वगैरे) दरमहा तीनशे साडेतीनशे रुपये आकारतात. सेट्टॉप बॉक्सचा खर्च (डिपॉझिट) 500 ते 1000 एवढा. कनेक्शन बंद केल्यास डिपॉझिट परत मिळावे.

पाच पन्नास रुपयांची चूभद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डिडिबी

ही उत्क्रांती नजिकच्या काळात सामान्या माणसापर्यंत आल्यास वरील प्रपंचाची गरज कमी होइल असे दिसते, तर चर्चाप्रस्तावकास घाई नसल्यास थांबून पहावे.

 
^ वर