छायाचित्र - पक्षी

नमस्कार मंडळी,
काही दिवसांपुर्वी माझा फिल्म एसएलाआर कॅमेरा एकदाचा बदलला आणि नवा डिजीटल घेतला. मी काही पट्टीचा छायाचित्रकार वगैरे नाही. खर सांगायच तर शिकण्याची इच्छा असलेला आणि असंच क्लिक करणारा एक हौशी माणूस. प्रयोगाखातर हा खाली दिलेला फोटो काढला आहे. तज्ञांनी मार्गदर्शन करावे हि विनंती.

पक्षी
पक्षी

तांत्रिक माहिती:

Camera NIKON
Model COOLPIX P510
ISO 400
Exposure 1/160 sec
Aperture 5.9
Focal Length 252mm

हा पक्षी कोणता आहे माहित नाही. घरामागच्या जागेतल्या झाडावर बसलेला दिसला. कोणाला माहित असल्यास येथे माहिती द्यावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो चांगला आहे.

फोटो चांगला आहे. पण या कंपोझिशनला जर बदलले तर तो आणखी आकर्षक होऊ शकतो.

यासाठी हा फोटो आपण क्रॉप करु शकतो. मला जर या फोटोची मुळप्रत मिळाली तर् मी स्वतः त्यात बदल् करुन् तुम्हाला पाठवु शकतो.

हा पक्षी बहुतेक Ashy Prinia जातकुळीतील आहे. आधिक माहितीसाठी विकी पाहावे.

अभिजीत राजवाडे

डेप्थ ऑफ फोकस उत्तम

डेप्थ ऑफ फोकसने हिरवी पार्श्वभूमी धूसर केली, हे उत्तम. काही लक्ष विचलित करणार्‍या काटक्या कातरून टाकल्या तर मजा येईल, अभिजित राजवाडेंशी सहमत.

पक्ष्यावरचा फोकसही थोडासा धूसर आहे. (१) लक्ष विचलित करणार्‍या काटक्या (पक्ष्याहीपेक्षा अधिक रेखीव फोकस असलेल्या) कातरून टाकल्यावर पक्ष्यावरचा फोकस अधिक रेखीव वाटतो. (२) चित्रातील डीपीआय दुप्पट केल्यास चित्र आकाराने लहान होते (हा तोटा), पण पक्ष्यावरचा फोकस अधिक रेखीव भासतो (हा फायदा).

चित्र थोडेसे काळवंडलेले/मलूल वाटते. दिवसच तसा असावा बहुधा. पण ते अधिक तुकतुकीत करण्यासाठी काही करता आले असते काय? असा विचार करतो आहे. (व्हाईट बॅलन्स बदलणे, वगैरे.)

छान

चित्र छान आले आहे. पक्षी टिपणे हा अवघड प्रकार आहे. धनंजय म्हणतात तसे कातरुन पक्ष्याला ठळक केले तर अधिक चांगले दिसेल. पार्श्वभुमी धुसर केली असली तरी अजून थोडी डिस्ट्रॅक्टींग आहे. आणखी धुसर केल्यास छान बोके (Bokeh) दिसला असता. शक्य असल्यास कमीत कमी ऍपर्चरला, जास्तीत जास्त झूम करुन टेलेफोटो लेन्सने असे फोटो अचुक येतात. ट्रायपॉड आवश्यक.

आभार

बोके (Bokeh) म्हणजे काय नक्की माहित नव्हते. या निमित्ताने विकी धुंडाळले (दुवा)
नवी माहिती मिळाली. आभार!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

धन्यवाद

पुढच्यावेळी नक्की असा प्रयत्न करेन. सध्याचे छायाचित्र ट्रायपॉड शिवाय काढले आहे. कॅमेरासिम वापरुन शिकण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पार्श्वभुमी अजुन धुसर करण्यासाठी काय करावे लागेल?





कमी ऍपर्चर

वैद्यांनी म्हंटल्याप्रमाणे "शक्य असल्यास कमीत कमी ऍपर्चरला" म्हणजे २.८ च्या जवळ ऍपर्चर असल्यास पार्श्वभुमी अजुन धुसर येउ शकेल, पण तुमच्या कॅमेरात बहूदा ३ अपेर्चरच ठेवता येईल, त्यावर प्रयत्न करुन पहा.

 
^ वर