आजची गोंधळलेली स्री
जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने काही लेख मराठी संकेतस्थळांवर वाचनात आले. सक्षमीकरणाची दुखरी बाजू http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=213... हा लोकसत्तेतील लेख म्हणतो की स्त्रीने स्वतःच्याच अपेक्षा फार वाढवुन ठेवल्या आहेत. आपण मुक्त आहोत किंवा सक्षम आहोत हे स्त्रीला कोणाला दाखवून द्यायचे आहे? असे आरती कदम म्हणतात पण लेखात त्यांना काय म्हणायचे तेच मला कळले नाही. कदमबाई म्हणतात
कुटुंबाला तिच्या घरी असण्याची गरज आहे, तरीही केवळ अट्टहासाने मी उगाच का शिकले म्हणत ती उसनं अवसान आणून काम करते आहे.
आई-मुलं यांच्या नात्यातही वेगळा ताण येऊ लागला आहे. या सगळ्यातून तिची नराश्याची पातळी वाढते आहे.
अहो बाबाचा अरे बाबा झाल्याने पूर्वीचा मुलांना वाटणारा बाबांचा धाक कमी व्हायला लागला आहे.
आज अनेकींच्या घरात स्वयंपाकाला, कपडे, धुणी, लादीला कामवाल्या बाई आहेत. त्या कामातून काही अशी तिची सुटका झाली तरी या बायकांना मॅनेज करणं, मुलांचा अभ्यास, घरी वयस्क मंडळी असतील तर त्यांना सांभाळणं हे स्त्रियांचीच अलिखित कामं असल्यासारखी परिस्थिती घराघरात आहे.
म्हणजे काय?
शिकलेली बाई संसाराच्या रस्त्याला लागते तेव्हा हव्यानकोशा वाटणार्या जबाबदार्या तिच्या अंगावर पडणार हे तिला माहीत नसते का? बाई मुलांच बघते, स्वयंपाकघरात राबते आणि नवरा पेपर वाचत बसतो हे खरे असेलही पण बाई टिव्ही समोर बसते किंवा फोनवर मैत्रिणींशी गप्पा मारते तेव्हा नवरा आर्थिक व्यवहार, मुलांचे अभ्यास, सोसायटीची कामं इ. करत असतो.
पैसा मिळवून घरातली कामे वाटली म्हणजे बाई सक्षम झाली असे अनेक बायकांना वाटू लागले आहे पण घरातली कामे स्वयंपाक आणि मुले एवढीच आहेत असेही वाटते. आर्थिक व्यवहार, बँक, कर्जाचे हप्ते, पत्रव्यवहार, कारचे मेन्टेनन्स, घराचे मेन्टेनन्स, सोसायटीची कामे, त्यांची कागदपत्रे सांभाळणे, कायदेशीर व्यवहार, सरकारी व्यवहार, यंत्र-तंत्र व्यवहार इ. कामे अंगावर घेण्यास बायका नाखुश दिसतात. आपल्या अंगावरच्या जबाबदार्या झटकल्या किंवा दुसर्याच्या गळ्याअ मारल्या की स्त्री मुक्त होते काय? गृहकृत्यात पुरुष सामिल होत नाहीत ही ओरड आता जुनी झाली असली तरी दरवर्षी हीच ओरड घेऊन पठडीतले लेख प्रकाशित होतात.
Comments
वॉन्टेड
या जगात मुक्त आणि न गोंधळलेलं असं कोणी आहे का?
एमसीपी
एकावेळी अनेक संकेतस्थळांवर ही चर्चा टाकायला हवी एवढा हा विषय महत्त्वाचा आणि सामाजिक गुंतागुंतीशी संबंधित आहे. सोबत ग्राफ, चार्ट आणि आकडेवारीही द्यायला हवी होती असे वाटून गेले. असो.
अवांतर: एकंदरच चर्चा वाचून एमसीपी (मेल शोविनिस्ट पिग) हा संज्ञा आठवली.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
महिलांची अवस्था कडेवरच्या बाळासारखी
श्री. महाबळ ह्यांनी टिपिकल पुरुषाच्या भूमिकेतून चर्चाप्रस्ताव मांडताना घरकामांवर भर दिला आहे. त्यामुळे चर्चा लिमिटेड झाली आहे. ती आणखी नीट मांडता आली असती. स्त्रीकडे निर्णयक्षमता आणि आत्मनिर्भरता आली आहे का, ह्यावर फोकस हवा होता. असो. आज 9 मार्चच्या एका पेप्रातला खालील मजकूर वाचला:
आजच्या महिलेचे अवस्था कडेवरच्या बाळासारखी आहे. तिला जिथे जायचे आहे त्या दिशेला ती हातवारे करत असते. तिची इच्छा पूर्ण झाली तर ती आनंदाने उड्या मारते. नाहीतर थोडावेळ हात पाय आपटते आणि शांत बसते. ती सक्षम असली तरी तिच्या हातात निर्णयक्षमता नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली. स्वांतत्र्य आहे, शिकता येते, पैसे मिळवण्याची कुवत आहे. देशा-परदेशात दौरे करता येतात, पण हया स्वातंत्र्याचा उपयोग कसा करावा हे माहीत असणे आवश्यक आहे. महागडे कपडे, दागदागिने, परदेश दौरे म्हणजे कर्तबगारी नव्हे. निर्णयक्षमता, आत्मनिर्भरता ज्यादिवशी येईल तोच खरा महिला दिन, असेही पुढे त्या बातमीत म्हटले आहे.
स्त्री ही निर्णयक्षमतेच्या आणि आत्मनिर्भरतेच्या अभावापायी गोंधळलेली वाटू शकते. असो. कालपरवाच कुठेतरी वाचले/ऐकले की मुली परदेशी काम करणारी एन्नाराय/ग्रीनकार्डी स्थळे नाकारू लागली आहेत. ह्याचे कारण त्यांना तिकडे मोलकरिणी नसल्याने सगळी घरकामे करावी लागतात. राब राब राबावे लागते. दुसरे म्हणजे भारतातही करियरच्या चांगल्या संधी आहेत. आणि परदेशवाऱ्या काय आजकाल कुणी, केव्हाही करते. त्यामुळे तिकडे राहण्याचे अप्रूप कमी होऊ लागले आहे. असो. एकंदर स्त्रीवादाच्या किंवा सक्षमीकरणाच्या गप्पा करणाऱ्या देशी-परदेशी बाया किती सक्षम, निर्णयक्षम आणि आत्मनिर्भर आहेत हे बघायला हवे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मग तर काय....
ती सक्षम असली तरी तिच्या हातात निर्णयक्षमता नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.
अरे वा, मंगला गोडबोले का? मग हे मान्य केलेच पाहिजे. आता मीना प्रभुंनाही विचारुन बघायला हवे!
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता
पंखे दिसता
मंगला गोडबोले आणि मीना प्रभूंच्या लिखाणाचे तुम्ही पंखे आहात तर! मेघना पेठे किंवा कविता महाजन असत्या तर तुम्ही मान्य केले नसते काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सुमती
सुमती क्षेत्रमाडे ह्यांचे अवश्य ऐकले असते ब्वा.
--मनोबा
अरेच्चा! चर्चा कुठे चालली आहे?
अरेच्चा! ही चर्चा भलतीकडे चाललेली दिसते. येथे विषयांतर करण्यापेक्षा "माझी (न्)आवडती लेखिका" अशी स्वतंत्र चर्चा का नाही करत? ;-)
.
.