ग्रामीण कथा

मराठीत अनेक लेखकांनी ग्रामीण कथा लिहिल्या. द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर ही यापैकी काही लेखकांची नावं. (या पेक्षा वेगळ्या लेखकांची नावं जाणकारांनी जरूर कळवावीत.) बदलत्या परिस्थितीने खेडी बदलली. खेड्यातील शिकलेला तरूण नोकरी निमित्ताने शहरात आला. खेड्यांचही शहरीकरण होत आहे. लोकांच्या आवडी निवडी सुद्धा बदलल्या. अशा वातावरणात ग्रामीण कथा मागे राहील्यासारख्या वाटतात. ज्या प्रमाणात शहरी साहित्य प्रसिद्ध होतं त्या प्रमाणात ग्रामीण साहित्य झाल्यासारखं वाटत नाही. अर्थात हे माझं वैयक्तित मत झालं. अलि़कडच्या काळात लिहीलेल्या काही ग्रामीण कथा लेखाकांची नावं आणि त्यांचे लेख याची माहीती जाणकारांनी जरुर कळवावी.
माझ्या सारख्या शहरात वाढलेल्या परंतू तरीही जन्मतः गावची माहेरओढ असण्यार्‍या वाचकाला अजूनही ग्रामीण कथांसाठी द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथांकडे जावं लागतं.

यावर्षी कोल्हापूरात असताना 'प्रमोद तौंदकर' या एका तरूण शिक्षकाशी ओळख झाली. बोलण्याच्या ओघात त्याच्या कथांचा विषय निघाला. कथा वाचल्यानंतर परत एकदा जुन्या ग्रामीण कथांची आठवण आली. कथा सामाज प्रबोधनाच्या हेतूने लिहिल्या असल्या तरी कथेतला ग्रामीण बाज खुपच भावला.

हे आणि असेच काही नवलेखक ग्रामीण कथांना भविष्यातही संजिवनी देऊ शकतील असं वाटतं.

या कथांच्या ग्रामीण बाजाचा आनंद सर्वानाच लुटता यावा या हेतूने काही कथा महाजालावर प्रसिद्ध करत आहे.
यातील पहिली कथा मनोगतावर "निवद" या दुव्यावर वाचता येईल.

(गावरान) रम्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

ग्रामीण साहित्य.

ग्रामीण साहित्यिकांची अनेक नावे आम्हाला आता सांगता येतील,पण आम्ही ते विस्ताराच्या भितीने सांगण्याचे टाळत आहोत.दुसरे असे की,ग्रामीण कथेचे स्वरूप बदलले पाहिजे हे खरेच आहे.तसे बदललेल्या ग्रामीण जीवनाचे चित्रण आता होते आहे.पण लिहिणारे फारसे प्रसिद्ब नसल्यामूळे त्यांचे लेखन वाचनारा वाचक वर्ग कमीच सापडेल.अजूनही ठराविक माजी ग्रामीण साहित्यिकांचे लेखन म्हणजेच ग्रामीण साहित्य, ही प्रतिमा जाण्यास अजून दहा एक तरी वर्ष लागतील. तो पर्यंत नवग्रामीण कथा लेखकांची फळी निर्माण होईल,झाली पाहिजे,असे वाटते.तरच बदलत्या ग्रामीण जीवनाचे लेखन ग्रामीण साहित्यातून वाचावयास मिळेल.

अवांतर;)-आपण दिलेल्या दूव्यावर कथा वाचून आलो.कथा छानच आहे.(विशेषतः कबतकचा संदर्भ आवडला)खरे तर आम्ही आपण दिलेल्या दुव्यावर जाण्याचे टाळतो.आम्ही उपक्रमवर महाभारताच्या चर्चा वाचून वाचून आम्हीही कृष्णाप्रमाणे वागू लागलो आहोत,गोकूळातून,(मनोगत)निघालो, थेट आता मथूरेत(उपक्रम) आहोत.आता जावू तर थेट द्वारकेत.(मिसळपाव डॉट कॉमवर)पून्हा कधी गोकूळात नाही,अन मथूरेत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक नाव

आत्माराम लोमटे ह्या लेखकाचे ग्रामीण जीवनाबाबतचे लेखन अतिशय प्रभावी आहे.
त्यांचा ईडा पीडा हा कथासंग्रह अवश्य वाचावा.

धन्यवाद

 
^ वर