उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ऑस्कर पुरस्कार २०१२
कोब्या
January 14, 2012 - 2:01 am
नविन वर्ष आले तसे चित्रपट प्रेमींना वेध लागले आहेत चित्रपट सृष्टीतल्या सर्वोच्च पुरस्कार ऑस्करचे. ह्यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांविषयी उपक्रमींना काय वाटते त्यांचे अंदाज काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
ह्यावर्षी स्पीलबर्गचा वॉरहोर्स, स्कोरेसीचा ह्युगो वगैरे मोठे चित्रपट आले. तसेच मनीबॉल, द हेल्प, मिडनाइट इन पॅरीस वगैरेही चर्चेत आहेत. त्यापैकी तुम्ही कुठले पाहिलेत? तुम्हाला विशेष आवडलेले चित्रपट कोणते? तुमच्या मते कोणत्या चित्रपटांना पुरस्कार मिळतील/ मिळावेत? ह्यावर्षी भारतीय चित्रपटाची वर्णी लागेल का? अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करूयात.
दुवे:
Comments
मिडनाइट इन पॅरिस
मिडनाइट इन पॅरिस घरी आणला आहे, बघायला वेळ होत नाही ही रड आहे. आज वेळ झाला तर बघून त्यावर अवश्य लिहिन.
चिल्लर पार्टी
भारतीय चित्रपटांमधून चिल्लरपार्टीला पाठवायला हवे.
अदामिंते माकन अबू
हजयात्रेसाठी पैसे जमवणा-या एका अत्तरविक्रेत्याचा संघर्ष मांडणारा `अदामिंते माकन अबू' हा मल्याळम चित्रपट भारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला जाणार आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह आणखी चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.
स्पिएलबर्गचा 'वॉर हॉर्स'
स्टीव्हन स्पिएलबर्ग रॉक्स अगेन इन 'वॉर हॉर्स्' असेच म्हटले पाहिजे. चित्रपटाच्या नावात 'वॉर' आहे, कथेचा निम्म्याहून अधिक भागही वॉरशीच संबंधित आहे, चित्रीकरणही वॉरचेच आहे. असे असूनही हा चित्रपट म्हणजे एक कविता आहे. एका छोकर्याच्या जिद्दीची आणि त्याच्या 'जोए' नावाच्या अफलातून घोड्याची ही एक हृदयस्पर्शी कहाणी जी पाहाणार्याला दोन तास अक्षरशः खिळवून ठेवते. स्पिएलबर्ग म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक तंत्राचा बेताज बादशहा समजले जाते, पण 'वॉर हॉर्स' मध्ये एका इंचाने मोजावा इतकाही त्या गिमिक्सचा मागमूस नाही. आहे तो मन प्रसन्न करणारा निसर्ग, साधेसोपे कौटुंबिक संवाद, युद्धभूमीचे रोखठोक वातावरण आणि त्या घोड्याचा एका मालकाकडून दुसर्याकडे होणारा अटळ प्रवास.
हा चित्रपट यंदाच्या ऑस्कर शर्यतीत आघाडीवर असणार हे निश्चित्तच, तरीही बेस्ट पिक्चर वा बेस्ट डायरेक्टरचे अवॉर्ड् हुकले तरीदेखील फोटोग्राफी आणि संगीत तरी पारितोषिकापासून दूर जाणार नाहीत असा माझा विश्वास आहे.
अशोक पाटील