उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कोंबडी पळाली आणि चिकनी चमेली - चांगल्या गाण्यांचे असे विडंबन योग्य का अयोग्य?
सुहासदवन
December 21, 2011 - 5:33 am
सध्या नवीन वर्षाच्या स्वागतात सगळे नवीन नवीन येणारी गाणी एन्जॉय करताहेत. मग ते कोलावर डी असो कि चिकनी चमेली असो.
हि गाणी तशी भन्नाट आहेत पण त्या गाण्याच्या यशाच्या जोरावर त्या गाण्यांचे जे विडंबन चालले आहे ते मात्र योग्य वाटत नाही.
कोलावारी डी या गाण्याचे
गालावरी दे
जॉईन अन्नागिरी आणि अशी अनेक वर्जनस आली आहेत.
कोंबडी पळाली ह्या मराठी गाण्याने देखील अशाच इतिहास घडविला आहे. आपले हे मराठी गाणे अगदी हिंदी मालिका आणि कार्यक्रमांमध्ये देखील वाजविले जाते.
पण तेच गाणे मराठी सुपर स्टार अजय-अतुल जोडीने आता हिंदीत आणले आहे. पण ते मात्र चिकनी चमेली या बोलांखाली.
गाण्याची लोकप्रियता कॅश करावी पण त्यामुळे मुळ गाणे बाजूला राहते आणि विडंबन मात्र चालू राहते.
या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.
दुवे:
Comments
गाणे बाजूला?
उपरोक्त विडंबन हे योग्य की अयोग्य असा प्रश्न अयोग्य वाटतो. प्रत्येक कलाकृतीचे विडंबन योग्य की अयोग्य हा वेगळा प्रश्न ठरावा. एक मला अयोग्य वाटणारे विडंबन येथे वाचनात आले. परंतु या गाण्यांबाबत विडंबन हे चांगले की सुमार असा प्रश्न फारतर विचारता येईल. विडंबनाच्या दर्जाबद्दल एक चर्चाही येथे वाचनात आली.
कोलावरी आणि कोंबडी पळाली ही दोन्ही गाणी बाजूला राहिल्यासारखे वाटत नाही. दोन्ही गाण्यांनी व्यवस्थित प्रसिद्धी कॅश केलेली आहे. तसेही, चिकनी चमेली हे काही कोंबडी पळालीचे विडंबन नाही. फक्त चाल उचललेली आहे. चाल उचलण्याला विडंबन म्हणायचे झाले तर 'जांभूळ पिकल्या झाडाखाली' या गाण्याची चाल 'होली आयी होली आयी' ला लावणेही विडंबन मानावे लागेल.
बाकी, गाण्याचं विडंबन का रुपांतर/ प्रसिद्ध चाली वापरणे यावर चर्चा होईलच तोपर्यंत कत्रिनाच्या चिकनी चमेलीमधल्या डान्स पोजेस एखाद्या मराठी नृत्याचे विडंबन असल्यास ;-) मला ते बर्यापैकी बीभत्स वाटले असे नमूद करते.
अवांतरः गालावरी दी हे गाणे कोठे ऐकायला मिळेल? तो पवारांना काढलेला चिमटा तर नव्हे?
बीभत्स
बीभत्स. बरोबर. हाच तो शब्द. योग्य.
गल्लाभरू
गल्लाभरू गाण्याच्या विडंबनाला विरोध कशाला? त्याच चालीत गल्ला अजुन भरत असेल तर मुळ उद्देश अधिकच सफल होतोय असे म्हणावे, गाण्याच्या मालकाला आक्षेप नसेल तर विडंबन वगैरे ठिकच आहे.
संगीतकार एकच ?
गाण्याचे मुळ संगीतकार आनि नव्या गाण्याचे संगीतकार एकच आहेत ना?
ऋषिकेश
------------------
एक प्रसिद्ध हायकू:
कमल घर
बघ कमल घर
कमल बघ
हे विडंबन म्हणून, नाही म्हणू शकत.
मागे हृदयनाथ मंगेशकरांनी सुद्धा त्यांच्या "वल्हव रे नाखवा "ला एकदा हिंदीची वाट दाखविली होतीच, त्या मुळे मूळ संगीतकाराने त्याच्याच एका भाषेतील गाण्याची चाल दुसऱ्या भाषेत त्याच चाली सह आणणे हे नवीन नाही.आपल्याला हे गाणे/चाल जुने झाले पण चिकनी चमेलीची चाल हिंदी प्रेक्षकांना नवीनच असेल आणि कदाचित त्या मुळे निर्मात्याच्या किंवा दिग्दर्शकाच्या मागणीला संगीतकार नाही म्हणू शकत नाही/नसेल.विडंबनच म्हणून जर म्हणायचे तर "गालावर खळी डोळ्यात धुंदी" चे "डोळ्यामध्ये खळी (?) गालात धुंदी "(म्हणजे मुलीची छेड काढली म्हणून "डोळ्याच्या खाचा करून त्याचा गाल रंगवला" वगैरे वगैरे तत्सम होऊ शकते.
विडंबन??
ह्याचा अर्थ समजला नाही. चिकनी चमेलीचे कोणते विडंबन आले?
बाकी खडकी कोंबडीच्या तालावर हाय क्लास कट्रिनाचा डान्स कातिल आहे. भरत जाधवला पाहण्यापेक्षा कट्रिनाला पाहणे सुखकारक आहे.