वृत्तदर्शन

संस्कृत, मराठी आणि अन्य भारतीय भाषांतील काव्यरचनेमध्ये वापरल्या जाणार्‍या पारंपारिक वृत्तांचे पठनद्वारा प्रदर्शन करण्याचा एक स्वल्प प्रयत्न मी केला आहे आणि तो http://www.youtube.com/watch?v=CNnUhll0zzA येथे पहाता येईल. पठनासाठी निवडलेले श्लोक सर्व संस्कृतमधील आहेत. अशा प्रकारचे अन्य काही प्रयत्न करण्याचे मी योजीत आहे. माझा प्रयत्न हा पूर्णत: home production आहे आणि त्यामुळे सफाईमध्ये थोडा कमी पडत आहे ह्याची मला जाणीव आहे.

पुढील प्रयत्नांसाठी मार्गदर्शन म्हणून उपक्रमसदस्यांनी सदर प्रयत्न पाहून आपले अभिप्राय दिल्यास ते मला उपयुक्त ठरेल.

हे प्रदर्शन एकूण सुमारे १५ मिनिटांचे आहे आणि ते इंग्रजीमध्ये आहे. मराठीमधील, संस्कृतमध्ये न मिळणारी साकी-दिंडी-कटावासारखी वृत्ते वापरून असाच एक प्रयत्न, आणि तोहि मराठी भाषेमध्ये, लवकरच करण्याचा माझा विचार आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान - मराठीची वाट बघतो आहे

संदर्भासाठी चांगली फीत आहे.

मराठी वृत्तांच्या चित्रफितीची वाट बघतो आहे.

कालिदासाचा श्रुतबोध : संस्कृत/हिंदी ध्वनिफिती

"श्रुतबोध" ही रचना ~४० वृत्तांची लक्षणे देते. (परंपरेनुसार कालिदासाची रचना आहे.) प्रत्येक वृत्ताचे लक्षण देणारे कडवे त्या-त्याच वृत्तात रचलेले आहे. त्यामुळे पाठांतराची सोय होते.
श्रुतबोध आणि त्याचे हिंदी भाषांतर ध्वनिमुद्रित करून ईस्निप्सवर चढवलेली आहे. ("फोल्डर"चा दुवा : त्यात प्रत्येक वृत्तासाठी वेगवेगळी ~१ मिनिट लांबीची फीत आहे. एक प्रमाद येथेच सांगतो : "उपजाति" वृत्ताच्या ठिकाणी "आख्यानकी" वृत्ताची दुहेरी फाइल चुकून दिलेली आहे.)

 
^ वर