'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति

'सु' म्हणजे काहीतरी चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे काहीतरी वाईट / प्रतिकूल. उदा. सुलभ वि. दुर्लभ, सुकाळ वि. दुष्काळ, सुष्ट वि. दुष्ट.

'ख' म्हणजे आकाश. म्हणून 'खग' अर्थ आकाशमार्गे गमन करणारा म्हणजे पक्षी.

यावरून सुख म्हणजे चांगले / अनुकूल आकाश (परिस्थिति?); दु:ख म्हणजे वाईट / प्रतिकूल आकाश. हे अर्थ ज्या अर्थाने 'सुख' व 'दु:ख' हे शब्द वापरले जातात त्यांच्याशी मिळते जुळते आहेत.

आपणास माझ्या या किंचित् संशोधनाबद्दल काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रकाटाआ..

कोर्डेसाहेबांच्या चर्चाप्रस्तावाला आमचा सदर प्रतिसाद हा उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या धोरणात बसत नाही असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही तो येथून काढून टाकत आहोत.

आम्ही 'आभाळ' या गोष्टीविषयी भावनेच्या भरात काही गोष्टी लिहीत गेलो खरे, पण माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या धोरणात भावनेला शून्य किंमत असते ही गोष्ट आमच्या ल़क्षात आली नाही ही आमची चूकच झाली. सबब आमचा प्रतिसाद आम्ही येथून काढून टकत आहोत.

आता हा प्रतिसाद आमच्या हक्काच्या अनुदिनीवर आम्ही टाकला आहे. इच्छुक वाचकांना तो http://tatya7.blogspot.com/2007/05/blog-post.html येथे वाचावयास मिळेल!

क्षमस्व!

तात्या.

धन्यवाद

आपल्या अगोदरच्या विस्तृत व आत्ताच्या मूळ प्रतिसादाचा दुवा देणार्‍या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आकाश!

तात्या, मस्तच लिहीलंय.
शरदरावांचे धन्यवाद मानले पाहिजेत हा चर्चा प्रस्ताव मांडल्याबद्दल.
"आकाश" ही कल्पना खरंच सुंदरपणे मांडली आहे तात्या तुम्ही.
या मराठी इंग्रजी आकाशांबरोबरच अनेक हिंदी गाण्यातले कित्येक "आसमान्" आठवले.
"हमारी मुठ्ठीमें आकाश सारा","आसमानोंमे उडने की आशा" वैगेरे.

'अभीभी पुराना तात्या जिंदा है', हेही नसे थोडके!
खरेच! :)

साते,

"आकाश" ही कल्पना खरंच सुंदरपणे मांडली आहे तात्या तुम्ही.

तुझे अनेक आभार. वास्तविक ह्या विचारांच्या आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या संस्थळावर मी असं काही लिहिणार नव्हतो, पण राहवले नाही. सहज सुचत गेले आणि लिहीत गेलो. पण आपण अत्यंत चुकीच्या ठिकाणी लिहितो आहोत याचे भान लिहिताना राहिले नाही.

हे संस्थळ माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे आहे. आणि आमच्याकडे तर कुठली माहितीही नाही आणि आमचे विचार देवाणघेवाण करण्याइतके प्रगल्भही नाहीत!

असो!

तुझ्या संवेदनशीलतेला प्रणाम!

तात्या.

ललित लेखन आणि विचारांची देवाणघेवाण

या 'विरंगुळ्याच्या' निमित्ताने...
शरदरावांचा मूळ विषय आणि तात्यांचा मुद्दाम 'काढून टाकलेला' सुंदर (त्यांच्यादृष्टीने भावनाप्रधान) प्रतिसाद - दोन्ही ललित लेखनात मोडतात हे खरे.
पण त्यातही माहिती/विचार आहेतच. उपक्रमाच्या अधिकृत धोरणाला तात्यांचा इतका कठोर आक्षेप का असावा हे कळाले नाही.
तर्कशास्त्र आणि कोडी असोत किंवा शोधयंत्रांचा शोध असो - तसे सारे ललित लेखनच ठरते.
(यनावाला काय खुमासदार भाषा वापरतात! युयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात!)
केवळ जडजड, रुक्ष पुस्तकी शब्द वापरून लिहिलेले लेखच उपक्रमावर द्यावेत असे कोठे लिहिले आहे? आणि इथे दिलेली माहिती / लेख वाचून कोणी त्या क्षेत्रातला विद्वान थोडेच होणार आहे? उलट माहिती जास्त सोपी वाटावी - जवळची वाटावी म्हणून तिला ललित लेखनाचा वेष चढवणे आवश्यकच आहे असे मला वाटते. नाहीतर ती बोजड होईल आणि असे लेखन माझ्यासारखा सामान्य वाचक वाचणारही नाही.
तात्यांचा शेअरबाजारावरील 'बाजारगप्पा' लेख हा या अर्थाने अत्यंत योग्य/ वाचनीय ठरतो. कोणी (बाळ?) गाडगीळ असे लेखन (लोकप्रभेत? ? -चुभूद्याघ्या) करत असल्याचे स्मरते. नाहीतर जिथे पाऊल टाकणे मला भितीदायक वाटते त्यावर 'तेजी, मंदी' - 'बुल्स्-बेअर्स्' यापलिकडे काही असते ते जाणून घेण्याची इच्छा कशी होईल?
तात्या आणि त्यांच्यासारख्या आक्षेपी आणि साक्षेपी लेखकांना एवढेच मागणे की उपक्रमाबद्दल आणि उपक्रमरावांबद्दल कसलाही आकस न बाळगता आपापल्या क्षेत्रातील माहिती ललित लेख स्वरूपात दिली तर फार कृपा होईल. (बांगडा, सुरमई, पापलेट, रावशा या खाद्यपदार्थांचे / पाकक्रियेचे साग्र'संगीत' वर्णन हीदेखील माहिती आहे. साधे क्रीम ऑफ ओनिअन सूप कसे बनवावे यावर इलस्ट्रेटेड वीकली मधला (खुशवंतसिंगांचा?) डेमी पृष्ठ आकाराचा मोठा लेख वाचल्याचे स्मरते. तात्या हे आद्य मराठी खुशवंतसिंगच आहेत असे म्हणणे चूक ठरू नये.)

पुन्हा,पुन्हा उपक्रमाचे 'ध्येय, उद्दिष्ट, धोरण आणि स्वरूप' हे चर्वितचर्वण कशाला?

प्राध्यापक विसुनाना यांसी,

शरदरावांचा मूळ विषय आणि तात्यांचा मुद्दाम 'काढून टाकलेला' सुंदर (त्यांच्यादृष्टीने भावनाप्रधान) प्रतिसाद - दोन्ही ललित लेखनात मोडतात हे खरे.

आमचंच चुकलं! आम्ही आमचा प्रतिसाद काढून टाकायला नको होता. पण काल बुधवार होता ना, त्यामुळे रात्री जरा गोंधळच झाला! ;)

पण त्यातही माहिती/विचार आहेतच. उपक्रमाच्या अधिकृत धोरणाला तात्यांचा इतका कठोर आक्षेप का असावा हे कळाले नाही.

अहो मालक कठोर आक्षेप एवढ्यासाठीच की माहिती आणि विचारांची देवाणघेवाण ललितलेखनातूनही होते असे आपल्यासारखेच आम्हालाही वाटते/वाटत आलेले आहे. पण आमच्या उपक्रमरावांना हे पटतच नाही तर काय करणार! ;)

(यनावाला काय खुमासदार भाषा वापरतात!

अरे मग! वाटलं काय तुम्हाला? अहो शेवटी तेसुद्धा आमच्या कोकणातलेच आहेत बरं का! ;)

युयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात!)

काय म्हणालात?

युयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात!)

हां हां! बरं बरं! ;)

उलट माहिती जास्त सोपी वाटावी - जवळची वाटावी म्हणून तिला ललित लेखनाचा वेष चढवणे आवश्यकच आहे असे मला वाटते. नाहीतर ती बोजड होईल आणि असे लेखन माझ्यासारखा सामान्य वाचक वाचणारही नाही.

द्या टाळी! अहो उपक्रम सुरू झाल्यापासनं आम्हीही हेच तर म्हणतोय!

तात्यांचा शेअरबाजारावरील 'बाजारगप्पा' लेख हा या अर्थाने अत्यंत योग्य/ वाचनीय ठरतो.

धन्यवाद शेठ!

नाहीतर जिथे पाऊल टाकणे मला भितीदायक वाटते त्यावर 'तेजी, मंदी' - 'बुल्स्-बेअर्स्' यापलिकडे काही असते ते जाणून घेण्याची इच्छा कशी होईल?

विसुनाना, आम्ही बाजारगप्पांतून शेअरबाजाराविषयी जास्तीत सोप्या प्रकारे माहिती पुरवण्याचा प्रयत्न यापुढेही नक्कीच करत राहू एवढे या क्षणी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो.

तात्या आणि त्यांच्यासारख्या आक्षेपी आणि साक्षेपी लेखकांना एवढेच मागणे की उपक्रमाबद्दल आणि उपक्रमरावांबद्दल कसलाही आकस न बाळगता आपापल्या क्षेत्रातील माहिती ललित लेख स्वरूपात दिली तर फार कृपा होईल.

अहो मालक आकस नाही हो! नाहीतर बाजारगप्पाचे लेखन आम्ही आजही सुरू ठेवले नसते.

तात्या हे आद्य मराठी खुशवंतसिंगच आहेत असे म्हणणे चूक ठरू नये.)

या पदवीबद्दल धन्यवाद! ;)

(खुशवंतसिंग) तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

सहमत.

हेच म्हणतो मी ;)

ध्येय धोरणाबद्दल तुम्ही काही बोलु नका,तूम्ही फक्त लिहीत राहा.आम्ही अन गूंड्याभाऊ अधून मधून बोलत राहू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्युत्पत्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपण दिलेल्या व्युत्पत्ती अनुसार 'सुख ','दु:ख' हे दोन्ही शब्द व्याकरण दृष्ट्या सिद्ध होतात. तसेच ते सार्थही आहेत. आकाश (परिस्थिती?) इथे प्रश्नचिह्नाची आवश्यकता नाही.'आकाश'म्हणजे परिस्थिती यात संशय नाही.'परि' या उपसर्गाचा आजूबाजूला, सभोवती असा आहे. स्थित म्हणजे असलेले.यावरून परिस्थिती म्हणजे तुमच्या भोवतालच्या गोष्टी.म्हणजेच तुमचे आकाश. यावरून तुमची व्युत्पत्ती सिद्ध होते. मग ती सर्वमान्य असो वा नसो.तुम्ही चांगले लिहिले आहे.तुम्हाला चांगले सुचले आहे. मात्र अधिक विस्तार हवा होता.

'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति

एका भाषाशास्त्र्याने म्हटले आहे, की 'ख' म्हणजेच आपले 'मन'! आता बोला.

(मन आभाळायेवढे.. अथांग, गहिरे.. इत्यादि इत्यादि.. आपल्याला माहिती आहेच्.. आम्ही काय सांगणार? ज्योतिषशास्त्रात देखिल मनाचा अन् आकाशाचा काही संबंध असतो असे म्हणतात असे ऐकून आहे.)

'सु' म्हणजे चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे वाईट / प्रतिकूल.
'ख' म्हणजे मन.

.'. सुख = मन आनंदी, प्रसन्न, छान असेल तेंव्हा सुख!
.'. दु:ख = मन आनंदी, प्रसन्न, छान नसेल तेंव्हा दु:ख!

हैयो हैयैयो!

 
^ वर