बँक ठेवींना आकर्षक पर्याय

मि.पा. वर प्रकाशित

फिक्सड् मँच्युरिटी प्लान - एफएमपी

फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी डेब्ट योजना (Close Ended Debt Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो, सर्वसाधारणपणे या योजना स्टॉक मार्केटवर नोंदवल्या जातात. या योजनेत योजना जाहिर केलेल्या कालावधीतच (New Fund Offer period - NFO) गुंतवणूक करता येते त्यानंतर गुंतवणूकदार ह्या योजनेच्या युनीटस् ची ज्या स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झालेली असेल त्याव्दारेच खरेदी अथवा विक्री करु शकतात.
गुंतवणूकीचे उदिष्ट......

गुंतवणूकदारानी एखाद्या म्युच्युअल फंडाचे एफएमपी योजनेत गुंतवलेली रक्कम हि एफएमपीची रक्कम ज्या दिवशी देय होत असते त्या दिवसापर्यंतच्या अथवा त्यापुर्वी रक्कम परत मिळणारे व गुंतवणूकीच्या दिवशीच निश्र्चित असलेल्या व्याज दराच्या (fixed income securities) कर्जरोख्यात गुंतवली जाते. एफएमपीव्दारे गुंतवणूकदाराला करपश्र्चात जास्त चांगले उत्पन्न मिळावे हा मुख्य उद्देश असतो. या प्रकारचय्या योजनेत कमीतकमी जोखीम असते, खरे पहाता अजीबात नसते. अशा प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराचे चढ उताराची तसेच वारंवार होणा-या व्याजदराच्या बदलाची जोखीम नसते. शेअर बाजार व व्याज दरावर खालील बाबींमुळे परिणाम होतो, त्याची काळजी या योजनेत गुंतवणूक करणा-याला करावी लागत नाही:-

• जागतीक बाजारात क्रुडतेलाच्या किंमतीत वारंवार होणारे बदल;
• जागतीक बाजारात व्याजाच्या दरात वारंवार होणारे बदल;
• देशांतर्गत डब्ल्युपीआय मध्ये असणा-या अनिश्र्चितचे सावट;
• देशांतर्गत पतधोरणात मध्ये वारंवार होणारे बदल;
• सरकारव्दारे बाजारातून कर्जरोख्याव्दारे उचलल्या जादा रकमेमुळे कर्जरोख्याच्या किंमतीत होणारे बदल.

वरील सर्व गोष्टींचा विचार करता नियमीत व बहुतांशी प्रमाणार निश्र्चित उत्पन्न मिळवू इच्छिणा-या गुंतवणूकदारांसाठी एफएमपी हि योजना गुंतवणूकीचा उत्तम पर्याय आहे.

एफएमपी योजना कोणा-कोणासाठी उपयुक्त असतात.....
• ज्या गुंतवणूकदाराना निश्र्चित कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असते.
• ज्या गुंतवणूकदाराना कर पश्र्चात जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा असते.
• ज्या गुंतवणूकदाराना नियमीत उत्पन्न मिळावे अशी इच्छा असते.

एफएमपीच्या योजनाव्दारे गुंतवणूक दाराला मिळणारे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे असतात:
१. गुंतवणूकदाराचे इच्छेनुसार कमी अथवा अधिक मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय
एफएमपीच्या योजनांचा कालावधी गुंतवणूकदारासाठी १ महिना, ३ महिने, ६ महिने, १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे इ. असा विविध प्रकारे उपलब्ध असतो. गुंतवणूकदाराला विविध मुदतीचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे तो त्याच्या गुंतवणूकीच्या कालावधीच्या गरजेनुसार एफएमपीच्या योजनेत गुंतवणूक करु शकतो.

२. कमीतकमी जोखीम
डेब्ट फंडाच्या योजनेत तीन प्रकारची जोखीम असते, व्याज दराचे बदलाची, पतदर्जाची व तरलतेची, याप्रकारची जोखीम ज्याना स्विकारावयाची नसते त्यांच्यासाठी एफएमपी हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत व्याज दराचे बदलाची जोखीम जवळपास नसते कारण ह्या योजनेतील पैसे हे फंड मँनेजर्स योजनेची मुदत पुर्ण होण्यापर्यतचे कालवधीसाठीच एका ठरावीक व्याजदराचे पर्यायातच गुंतवणूक करत असतात. त्यामुळे आपल्याला किती व्याज मिळणार आहे त्याची सर्वसाधारण कल्पना गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना असते. यामुळे गुंतवणूकदाला भविष्यात पैशाच्या असलेल्या गरजेनुसार तो या योजनेत गुंतवणूक करु शकतो. त्याचप्रमाणे फंड मँनेजर्स गुंतवणूक करतानाच पतदर्जाचे चांगले मानांकन असलेल्या गुंतवणूक साधनातच गुंतवणूक करत असल्यामुळे अशा योजनेत पतदर्जाची जोखीम हि अत्यल्प असते. तसेच गुंतवणूक केलेल्या साधनाची मुदतपुर्तीची तारिख अगोदरच ठरलेली असल्याने तरलतेचाही धोका जवळपास नसतो. या योजना स्टॉक एक्सचेंजवर नोंदलेल्या असल्यामुळे गुंतवणूकदाराला पैशाची अचानक गरज भासल्यास शेअर बाजारा मार्फत विकून लगेच पैसेसुध्दा मिळू शकतात. तसेच काही बँका युनीट गहाण ठेऊन कर्जही देतात.

३. गुंतवणूकीचे नियोजन
प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याची गुंतवणूक हि गुंतवणूकीच्या विविध साधनात गुंतवावी हा संकेत आहे त्यासाठी निश्र्चित काळात ठरावीक उत्पन्न देणा-या योजनेत गुंतवणूकीचा पर्याय या योजनेव्दारे उपलब्ध आहे एवढेच नव्हे तर ज्या व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करतात त्याना त्यापासून मिळणारा फायदा या योजनेत गुंतवून सुरक्षीतही करु शकतात.

४. करपश्र्चात चांगला परतावा:
या प्रकारचे योजनेत गुंतवणूक जर का ३६६ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी केली तर, येऊ घातलेल्या डायरेक्ट टँक्स कोडनुसार १/४/२०१२ नंतर, यातून मिळणारा फायदा हा दिर्घ मुदतीचा भांडवली नफा या स्वरुपात गणला जाऊन १०% लॉंग टर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, हि सुविधा बँक किंवा अन्य एफ.डी. ला मिळत नाही. कर बचत करणे म्हणजेच जास्त उत्पन्न मिळविणे होय. अल्प मुदतीसाठी कर बचतीसाठी डिव्हीडंड पेआऊट पर्याय घ्यावा.

या प्रकारच्या योजनेतून मिळालेला सरासरी परतावा:
मुदत ३ माहिने २.३०% (वार्षीक ९.२% होतात) पेक्षा अधिक.
मुदत ६ माहिने ५% (वार्षीक १०% होतात) पेक्षा अधिक.
मुदत १२ माहिने ९.५०% पेक्षा अधिक.
एक वर्ष ते ३ वर्षे मुदतीला सरासरी ९.१०% ते १०.७५ या दरम्याने.

आपल्या गरजेनुसार मुदत घ्यावी. सध्याचे व्याजदरात फार मोठी वाढ आता अपेक्षीत नाही, म्हणून आत्ताच दिर्घ मुदत घेणे इष्ट होईल. नंतर आरबीआयने व्याज दर कमी केल्यास यावरील मिळणारे परतावे कमी होतील, मात्र ज्या व्यक्ती आत्ता गुंतवणूक करतील त्याच्या परताव्यावर कोणताही परिणाम होणार नाही कारण या योजनेतील गुंतवणूक हि योजना पुर्तीच्या दिवशी अथवा त्यापुर्वी मँच्युअर होणा-या सी.डि., उच्च दर्जाचे सी.पी. आदि साधनात केली जात असते.

५. टिडिएस कापला जात नाही:
या योजनेतून मिळणा-या पैशातून टिडिएस कापला जात नाही.

६. किमान गुंतवणूक रक्कम:
या योजनेत किमान रु.५००० ते रु.१०००० गुंतवता येतात.

म्हणूनच एफएमपी योजना या सर्वच प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त असतात. कमीतकमी जोखीम व निश्र्चित काळासाठी ठरावीक उत्पन्न देणा-या या योजनेत प्रत्येकानेच त्याच्या गरजेनुसार गुंतवणूक करावी. बँक ठेवीना तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला अशाप्रकारच्या योजनेत गुंतवणूक करावयाची असल्यास सध्या उपलब्ध असलेल्या एफएमपी जाणून घेण्यासाठी या दुव्याचा वापर करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

पर्याय

उपक्रमावर ललित लेखनाला परवानगी नाही म्हणून, नाहीतर एव्हाना कुणीतरी 'सदानंद ठाकूर आणि उपाध्ये गुरुजींच्या लेखनाला आकर्षक पर्याय' असा लेख टाकला असता....
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

 
^ वर