बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय

हा लेख मिसळपाव वर मी प्रकाशीत केलेला आहे.

बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय

नुकतेच रिझर्व्ह बँकेने बचत खात्यावरील व्याजाचा दर नियंत्रणमुक्त केलेला आहे, त्यानंतर यस बँकेसारख्या काही खाजगी बँकानी बचत खात्यावरील व्याज ६% पर्यंत वाढवले आहे मात्र राष्ट्रीयकृत व प्रमुख खाजगी बँकानी याबाबत काहीही धोरण जाहीर केलेले नाही. या बदलामुळे बँकांची नफाक्षमता कमी होणार असल्यामुळे या बँकानी कदाचीत वेट अँण्ड वॉच हे धोरण अवलंबलेले असावे. या बाबत या बँका निर्णय घेतील तेव्हा घेतील. सध्या बाजारात व्याजाचे दर वाढलेले असल्यामुळे मनी मार्केट सिक्युरिटीज, बॉण्डस्, कर्जरोखे, कमर्शिअल पेपर (सीपी) जे प्रामुख्याने कॉर्पोरेटस् त्यांच्या अल्पमुदतीच्या गरजेपुर्तीसाठी जारी करतात तसेच सर्टिफिकेटस् ऑफ डिपॉझीटस् (सीडी) जी बँका जारी करतात या सर्वच साधनांवरील व्याजाचे दरही चांगलेच (९% पेक्षा जास्त) वाढलेले आहेत. मात्र यातील गुंतवणूक हि फार मोठी असल्यामुळे या पर्यायात सर्वसामान्य माणसाला गुंतवणूक करता येत नाही. मात्र अप्रत्यक्षपणे या गोष्टीचा फायदा सामान्य माणूस करुन घेऊ शकतो, तेच या लेखात पाहुया.

म्युच्युअल फंडामध्ये विवीध प्रकारच्या योजना प्रत्येकाच्या गरजेनुसार उपलब्ध आहेत या पैकी लिक्वीड फंड योजना हि प्रामुख्याने बचत व चालू खात्याला अतिशय उत्तम पर्याय आहे. लिक्वीड फंडात लिक्वीड व लिक्वीड प्लस अशा दोन योजना असतात. दोन्ही योजना या अल्प व अत्यल्प मुदतीसाठी उपयुक्त असतात. अशा योजनेत जमा होणारे पैसे हे जास्तीत जास्त ९१ दिवसांच्या मुदतीच्या निश्र्चित परतावा देणा-या अल्प मुदतीच्या सिक्युरिटीजमध्येच गुंतवले जातात, यामध्ये प्रामुख्याने सीडी, सीपी या मनीमार्केट सिक्युरिटीजचा समावेश असतो. जास्तीत जास्त पैसे जे सीडीमध्ये व काही पैसे उच्च पतदर्जा असणा-या सीपीमध्ये गुंतवले जातात. यावर किती व्याज मिळणार हे गुंतवणूक करतानाच ठरलेले असते, तसेच मुदतही ठरलेली असते जी कमीत कमी दोन दिवस व जास्तीत जास्त ९१ दिवस असते. म्हणजेच या गुंतवणूकीत जोखीम जवळपास शुन्यच असते. बॉण्डसच्या बाबत असे म्हणता येत नाही कारण व्याजाचे दर वाढले कि बॉण्डसे बाजारमुल्य कमी होते व व्याजदर कमी झाले कि बॉण्डसे मुल्य वाढते, हि जोखीम लिक्वीड फंडात नसते कारण गुंतवणूक अल्पमुदतीच्या साधनातच केलेली असल्यामुळे व्याज दराच्या बदलाचा होणारा परिणाम हा अगदी नगण्य असतो. म्हणूनच लिक्वीड फंडाची गुंतवणूक हि बॉण्डस् मध्ये केली जात नाही. तसेच या योजनेतील गुंतवणूकीवर शेअर बाजाराच्या चढ उताराचा कोणताही परिणाम होत नाही कारण यात शेअर बाजारात कोणत्याही स्वरुपात गुंतवणूक केली जात नाही.

लिक्वीड फंड योजना या नेहमीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असल्यामुळे यात केव्हाही पैसे ठेवता येतात तसेच ते केव्हाही काढताही येतात. हा व्यवहार जर ऑनलाईन केला तर तो अधीकच सोईचा होतो कारण जर का आपण दुपारी २.३० पुर्वी नेट बँकींगव्दारे या योजनेत गुंतवले तर आदल्या दिवसाची एनएव्ही मिळते (लिक्वीड प्लस योजनेत) व पैसे काढावयाचे असतील तेव्हा याचप्रकारे दुपारी २.३० पुर्वी सुचना दिल्यास कामकाजाच्या दुस-या दिवशी दुपारी १२ वा. पुर्वी आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतात. म्हणजेच बचत खात्यासारखीच तरलता या योजनेत आहे व मिळणारा परतावा पाहिला तर गेले एक वर्ष तो ८.५०% ते ९% या दरम्याने मिळत आहे जो बचत खात्यापेक्षा तसेच अल्पमुदतीच्या बँक ठेवींपेक्षाही जास्त आहे. आणखीन एक फायदेशीर गोष्ट म्हणजे या योजनेतून पैसे काढताना टिडिएस कापला जात नाही. ज्यांचे वार्षीक करपात्र उत्पन्न हे ३०% च्या स्लँबमध्ये येते त्यानी या योजनेत गुंतवणूक केली तर करपश्र्चात मिळणारा परतावा हा वार्षीक ७.९५% अधीक मिळतो, कारण जरी कराचा दर सारखा असला तरी म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेतून मिळणा-या डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशनवरील टँक्स गणनेची पध्दत वेगळी असते. म्हणून अशा व्यक्तीनी डिव्हीडंड पेआऊट अथवा डिेव्हीडंड पुनर्गुंतवणूक हा पर्याय गुंतवणूक करताना घ्यावा. या योजनेत डिव्हीडंड दैनंदीन, मासीक, त्रैमासीक इ. मिळण्याची सुवीधा आहे. ज्यांचे करपात्र उत्पन्न कमी आहे त्यांनी ग्रोथ हा पर्याय घ्यावा कारण त्यात करआकारणी (म्युच्युअल फंडामार्फत) केली जात नाही, ती वैयक्तीक पातळीवर करावयाची असते.

या योजनेत सर्वसाधारणपणे बँक ठेवींचा जो प्रचलीत दर असतो त्यापेक्षा थोडे जास्तच व्याज (परतावा) मिळत असतो. बचत खात्यावर तर ४%च व्याज मिळते व चालू खात्यावर तर अजिबात व्याज मिळत नसते, म्हणून ज्या व्यक्ती/संस्था/आस्थापने बचत खात्यात अथवा चालू खात्यात अतिरिक्त पैसे ठेवतात त्यानी या सुवीधेचा लाभ घेतलाच पाहिजे. लिक्वीड फंडाच्या काही योजनेत किमान रु.एक लाख गुंतवावे लागतात तर काही योजनेत किमान रु.पांच हजार गुंतवूनही चालतात. सर्वच म्युच्युअल फंड कंपन्याच्या योजनेत जवळपास सारखाच परतावा मिळतो, फरक फारच थोडा असतो, सध्या हा दर ८.५०% ते ९% या दरम्याने आहे. ज्या संस्थाचे खात्यात असणारी अतिरिक्त रक्कम ते अगदी शुक्रवारी गुंतवून लगेचच पैसे काढण्याची सुचना देऊन ४ दिवसांचे व्याज मिळवू शकतात. (सोमवारी पैसे जमा होत असल्यामुळे व गुंतवणूक गुरुवारच्या मालमत्ता मुल्याने होत असल्याने व मिळणारे पैसे रविवारच्या मालमत्ता मुल्याने मिळत असल्याने ४ दिवसांचे व्याज मिळते – या योजनेचे मालमत्ता मुल्य प्रत्येकदिवशी अगदी रविवार व सुटीच्या दिवशीसुध्दा जाहिर होत असते व बदलत – वाढतच असते). वर्षात सर्वसाधारणपणे १०४ दिवस शनिवार रविवारचे व १५ बँक सुट्यांचे असे ११९ दिवस हि सुविधा अशा लोकांना वापरता येऊ शकते जेव्हा पैसे नुसतेच पडून असतात.

हल्ली रिलायन्स म्युच्युअल फंडामार्फत तर अत्यंत आकर्षक सुवीधा मिळत आहे, जर का आपण रिलायन्स लिक्वीड फंड ट्रेझरी प्लान (गेल्या एक वर्षातील याचा परतावा ८.२५% पेक्षा जास्त आहे) किंवा रिलायन्स मनी मँनेजर फंड (गेल्या एक वर्षातील याचा परतावा ८.८०% पेक्षा जास्त आहे) या पैकी कोणत्याही लिक्वीड योजनेत वरीलप्रमाणेच गुंतवणूक केली तर अकाउंटस् स्टेटमेंट सोबतच आपल्याला एक एटिएम डेबीट कार्ड मिळते. या दोन्ही योजनेत किमान रु.५००० (पाच हजार) भरुन खाते सुरु करता येते. यासाठी कोणताही आकार द्यावा लागत नाही, कार्ड अगदी मोफत मिळते. या कार्डाचा वापर करुन अगदी कोणत्याही बँकेच्या एटिएम मधून पैसे रोख काढता येतात ज्यासाठी सध्यातरी कोणताही आकार पडत नाही. तसेच हे कार्ड वापरुन डेबीट कार्डाप्रमाणेच खरेदी सुध्दा करता येते. हे कार्ड भारतात कोठेही व परदेशातही वापरता येते मात्र परदेशात पैसे काढल्यास प्रत्येक वेळी ६९ रुपये आकारले जातात. म्हणजेच या कार्डामुळे बचत खात्याची जवळपास सारी सुविधा (चेक बुक सोडून) मिळते.

सध्यातरी एटीम कार्डची सुवीधा फक्त रिलायन्स म्युच्युअल फंडाकडून मिळत आहे मात्र मला तरी असे वाटते कि लवकरच हि सुविधा बाकीचे फंड हाऊसही घेऊन येतील, काही काळाने तर चेक सुविधाही मिळू शकेल कारण अशी सुविधा परदेशात दिली जाते कारण तेथे ७५% पेक्षा अधिक लोकं बँकेपेक्षा याच योजनेचा वापर करत असतात. भारतात मात्र फक्त मोठे व कॉर्पोरेट गुंतवणूकदारच लिक्वीड फंड योजनेचा प्रामुख्याने फायदा घेत असतात. आता वेळ आली आहे कि प्रत्येकानेच या सुविधेचा फायदा घेण्याची.
लिक्वीड फंडाचे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे केव्हाही गुंतवणूक करता येत असल्याने जेव्हा जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तेव्हा यात गुंतवता येतात व हवे तेव्हा काढताही येतात व डेबीट कार्डमुळे सुविधाही वाढली आहे. ज्याना नेट बँकींग करणे शक्य नसेल त्यानी यात एसआयपीव्दारे गुंतवणूक करावी, ज्या दिवशी पगाराची रक्कम जमा होते त्यानंतरची तारीख एसआयपीसाठी घ्यावी म्हणजे झाले, यासाठी शक्यतो रिलायन्स म्युच्युअल फंडच्या मनी मँनेजर योजनेचा पर्याय घेणे उत्तम कारण मिळणारी डेबीट कार्डची सुविधा.

कर आकारणीची माहिती:

व्याजाचे उत्पन्नावर कर आकारणीची गणना खालीलप्रमाणे केली जाते:
मिळणारे व्याज (उत्पन्न) X कराचा दर
उदा: व्याज दर १०% असेल तर १० X ३२.४४५%
= होणारा कर ३.२४४५ = ३.२५
मिळणारे करपश्र्चात उत्पन्न १० – ३.२५ = ६.७५%
डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टँक्सची गणना खालीलप्रमाणे केली जाते:
जर डिव्हीडंडचा दर १०% असेल तर होणारे रु.१० उत्पन्न हे १३२.४४५% धरले जाते म्हणजेच जरी मिळणारा परतावा (व्याज) १०% ऐवजी ७.५५%
आणि डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टँक्सची गणना रु.१० वर न होता ७.५५ X ३२.४४५% = २४.४९५ या दराने होते
म्हणून होणारी करआकारणी = १० X २४.४९५% या दराने होते
= होणारा कर २.४४९५ = २.४५
मिळणारे करपश्र्चात उत्पन्न १० – २.४५ = ७.५५%
करपश्र्चात जादा उत्पन्न (७.५५ – ६.७५) = ०.८० जादा = ८% परंतु डेसीमल मध्ये येते ७.९५%
या पुढील लेखाचे विषय १) बँक एफडी ला फायदेशीर पर्याय – एफएमपी २) प्रस्तावीत डायरेक्ट टँक्स कोड अँक्ट.

लेखनविषय: दुवे:

Comments

थोडी गल्लत झाली आहे

पुर्ण लेख अजुन वाचला नाही पण ७.५५%-६.७५%=८% कस हे समजावुन सांगा. माझा कॅलक्युलेटर मला ०.८% अस उत्तर देतोय. त्याही पुढे जाउन ७.५५%/६.७५%-१=११.८५% असं उत्तर येतय.

याहुन मोठा मुद्दा म्हणजे तुम्ही म्युचल फंड आणि फिक्स डिपॉसीटची तुलना करताहात. दोन्हीची रीस्क प्रोफाईल पुर्णपणे वेगळी आहे. दोन्ही पुर्णपणे वेगळे असेट क्लासेस आहेत (फिक्सड इनकम आणि एक्विटी). म्युचुअल फंड जरी डेब्ट फंड असला तरी त्याची रिस्क प्रोफाईल एफ.डी पेक्शा संपुर्ण वेगळी असते.

रिस्क प्रोफाईल

लिक्वीड फंडात लिक्वीड व लिक्वीड प्लस अशा दोन योजना असतात. दोन्ही योजना या अल्प व अत्यल्प मुदतीसाठी उपयुक्त असतात. अशा योजनेत जमा होणारे पैसे हे जास्तीत जास्त ९१ दिवसांच्या मुदतीच्या निश्र्चित परतावा देणा-या अल्प मुदतीच्या सिक्युरिटीजमध्येच गुंतवले जातात, यामध्ये प्रामुख्याने सीडी, सीपी या मनीमार्केट सिक्युरिटीजचा समावेश असतो. जास्तीत जास्त पैसे जे सीडीमध्ये व काही पैसे उच्च पतदर्जा असणा-या सीपीमध्ये गुंतवले जातात. यावर किती व्याज मिळणार हे गुंतवणूक करतानाच ठरलेले असते, तसेच मुदतही ठरलेली असते जी कमीत कमी दोन दिवस व जास्तीत जास्त ९१ दिवस असते. म्हणजेच या गुंतवणूकीत जोखीम जवळपास शुन्यच असते. बॉण्डसच्या बाबत असे म्हणता येत नाही कारण व्याजाचे दर वाढले कि बॉण्डसे बाजारमुल्य कमी होते व व्याजदर कमी झाले कि बॉण्डसे मुल्य वाढते, हि जोखीम लिक्वीड फंडात नसते कारण गुंतवणूक अल्पमुदतीच्या साधनातच केलेली असल्यामुळे व्याज दराच्या बदलाचा होणारा परिणाम हा अगदी नगण्य असतो. म्हणूनच लिक्वीड फंडाची गुंतवणूक हि बॉण्डस् मध्ये केली जात नाही. तसेच या योजनेतील गुंतवणूकीवर शेअर बाजाराच्या चढ उताराचा कोणताही परिणाम होत नाही कारण यात शेअर बाजारात कोणत्याही स्वरुपात गुंतवणूक केली जात नाही.

अजुन पर्यंत तरी लिक्वीड योजनेतुन नुकसान झालेले नाही.

या योजनेतुन मार्क टू मार्केट रिटर्नस् मिळते असा इतिहास आहे.

आज या योजनेत १.७६ लाख कोटी रुपये गुंतवणुक मुल्य असुन सर्वाधीक वाटा मोठ्या कंपन्यांचा आहे.

<दोन्ही पुर्णपणे वेगळे असेट क्लासेस आहेत (फिक्सड इनकम आणि एक्विटी)>
इक्वीटीशी तुलना केलेली नाही.

Effective Tax Rate on Bank FD 32.445%
Effective Tax Rate on DDT (Debt) 24.495%

Diff. 7.95% to say 8%

वरिल लेखात हा उलगडा करावयाचा राहून गेला होता.
सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundmarathi.com

रोचक

रोचक माहिती.

लेखातील "रिलायन्स म्युच्युअल फंडच्या मनी मँनेजर योजनेचा पर्याय" या ठिकाणचा दुवा "ठाकुर फायनॅन्शियल सर्व्हिसेस"चा आहे. ते संदर्भावरून स्पष्ट होत नाही. लेखकाने "कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट" तत्त्वाची विशेष काळजी घ्यायला हवी.

दुवा "ठाकुर फायनॅन्शियल सर्व्हिसेस"चा

दोन उद्देश आहेत.
१) जर कोणाला म्यु.फं. बाबत अधीक माहिती हवी तर या दुव्यावर मिळेल.
२) दुसरा उद्देश आपली साइट प्रमोट करणे, जे जगभर आर्टिकल मार्केटींग व्दारे केले जाते.

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundmarathi.com

रिस्क

रिस्क प्रोफाइल बद्दल तुमचा मुद्दा मान्य...ड्युरेशन आणि क्रेडीट दोन्ही रीस्क कमी आहेत तेव्हा हे फंड सेफ आहेत हे नक्की..पण तुमचा ८% वाला मुद्दा अजुनही नाही पटला..व्यनि केलाच आहे

८% वाला मुद्दा

मला आयकरामध्ये (३२.४४५ - २४.४९५) ८% बचत होते असे म्हणावयाचे आहे.
दुसरे दोन व्यवहारातून होणारा ग्रोस फायदा जर समान म्हणजे रु.१० होत असेल पेकी एका माध्यमातुन दुस-या माध्यमापेक्षा जर ८० पेसे प्रति १० रु. मध्ये नेट जास्त मिळत असतील तर ते ८% होतात असे मी वरील उदाहरणात समजलो आहे. दोन्हीकडे आयकराचा दर समानच आहे, मात्र व्याजाचे उत्पन्नावर केली जाणारी आकारणी हि निव्वळ अन्य उत्पन्न समजून केली जाते, कारण मिळणारे व्याज किति हे अगोदरच माहित असते. तर डि.डि.टी. (Dividend Distribution Tax) वर केली जाणारी आकारणी मिळणारा डिव्हिडंड १३२.४४५% आहे असे समजून केली जाते, ती अशाप्रकारे का केली जाते हे मला माहित नाही कदाचीत डिव्हिडंड हे उत्पन्न अनिश्चित असल्यामुळे व ते किती मिळणार हे गुंतवणूक करताना माहित नसल्यामुळे असावे. या बाबत कोणी मार्गदर्शन केल्यास माहितीत भर पडेल. बाकी कर आकारणी कशी केली जाते त्याचे उदाहरण लेखाचे शेवटी दिलेच आहे.
मी चुकत असल्यास दुरुस्त करावे पुढील वेळी चुक सुधारता येइल.

बाकी दोन मात्रा कश्या द्याव्यात?

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundmarathi.com

 
^ वर