इंटरनेट स्पिड

इंटरनेट स्पिड
मी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नेरळ ( माथेरान ) या ठिकाणी राहते.
शेतजमीनीवर घर बांधुन गेले सहा महिने निसर्गाच्या सहवासात रहात आहे. डोंबिवली सारख्या शहरात गेले ३० वर्षे (जन्मापासुन ) वास्तव्य केलेले असल्यामुळे शेतात घर बांधुन राहणे खरंचच खूपच वेगळे आहे.

दुसरे असे की इथे कोणत्याही कंपनीचे ब्रॉडबॅन्ड इंटरनेट कनेक्शन अवेलेबल नाही त्यामुळे युनिवर्सल मॉडेममध्ये मोबाईल सिम टाकून सध्या काम चालु आहे. याचा स्पिड कमी आहे तेंव्हा जास्त वेगाने इंटरनेट स्पिड मिळेल असा उपाय कोणी सुचवेल काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

भासंनि

भासंनि आता ग्रामीण भागातही ब्रॉडबँड जोडणी देते, जिचा दर शहरी भागापेक्षा थोडा कमी आहे.
तुमच्या भागातील एक्सचेन्जशी संपर्क करून पाहा.

(मोबाईल वापरून तुम्हाला एज(EDGE)सेवा मिळत असेल असे गृहित धरून) मोबाईल वापरून इंटरनेटचा वेग अंदाजे २५०kbps असू शकतो(शिवाय डाटा ट्रान्स्फर मर्यादाही आहेत). भासंनिच्या ब्रॉडबँडमध्ये ५१२kbps ची अमर्यादित् ग्रामीण भागातील जोडणी ५५०रु ला उपलब्ध आहे. इतर वेगवान प्लॅन्स इथे उप्लब्ध आहेत.

||वाछितो विजयी होईबा||

इंटरनेट हवंच कशाला?

निसर्गाच्या सहवासात इंटरनेट नाही हे बरंच आहे की.

नितिन थत्ते

मराठी संकेतस्थळे

मराठी संकेतस्थळे उघडायला तरी जास्त स्पिड गरज वाटत नाही..

फायरफॉक्स किंवा तत्सम ऍडऑन्स.

तुमच्या ब्राउझरवर ऍड् ऑन्स इन्स्टॉल करून् नको असलेल्या जाहिरीती, फ्लॅश इ. गोष्टी बंद करुन थोडाफार् वेग वाढवता येईल.

फ्लॅशब्लॉक ऍड ऑन् वापरलेत (https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/flashblock/) वेबपेजवरील सर्व कंटेट ब्लॉक होईल. तुम्ही क्लिक केल्यावरच ते सुरु होईल. मी बर्‍याच फोरम्सवर असणारी इमेजेस ऍडब्लॉकप्लस ने ब्लॉक करून् ठेवतो. त्यामुळेही वेगात बदल पडू शकेल.

-Nile

 
^ वर