उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ही कथा की हा लेख की हे ललित?
चिमा
November 12, 2011 - 11:51 am
http://www.loksatta.com/lokprabha/diwali-2011/diva11.htm
मजकूर चांगला आहे की वाईट आहे हे ठरवणे सोपे की मजकूर कथा आहे की लेख आहे की काय आहे हे ठरवणे सोपे?
मेघना पेठे यांनी 'शब्द'च्या अंकात लिहिलेल्या मजकुराला संपादकांनी 'कविता' म्हटले म्हणून नाराजीचे पत्र पुढील अंकात लिहिले होते.
त्यांनी जे लिहिले आहे त्याला त्यांनी 'तुकडा' असे शीर्षक दिले होते. ( मला गौरी देशपांडे यांची 'सोन्याचा टुकडा' ही कथा आठवली.)
मकरंद साठे यांचे नाट्यसमीक्षेचे एक जड ( आणि जाड ) पुस्तक आले आहे आणि त्याचं नाव ( आणि मुखपृष्ठावरचं चित्र ) अरेबियन्स् नाईट्स च्या धर्तीवर 'रंगभूमीवरील ३० रात्री' की कायसं आहे. असे घोळ हे लोक का घालतात?
दुवे: